Latest Post

देणें समाजाचे


आज सकाळी एक प्रदर्शन बघण्याचा योग आला. ‘देणे समाजाचे’ या संस्थेने हे प्रदर्शन आयोजित केले होते. हे प्रदर्शन हा काही नवीन उपक्रम नाही असे समजले व ही संस्था हे प्रदर्शन दर वर्षी, गेल्या काही वर्षांपासून भरवत आहे. परंतु माझ्यासाठी तरी या प्रदर्शनाच्या संकल्पनेपासून सर्व काही नवीनच होते व म्हणूनच मला ते भावले.  सर्वसाधारणपणे प्रदर्शन म्हटले की त्याचा सुद्धा एक … Continue reading

आणखी थोडे काही

  • बेंगलुरू शहरामध्ये, केंद्र सरकारच्या 'आधार' कार्डासंबंधीच्या संगणक कार्यप्रणाली विकसित करण्यासाठी एक कार्यालय आहे. तुषार आणि मॅट हे या कार्यालयात काम करणारे दोन तरूण. नोकरी लागल्यावर एकच सदनिका शेअर करण्याचे त्यांनी ठरवले व एकत्र रहायला लागल्यानंतर दोघांची चांगलीच मैत्री जुळली. दोघांचे पूर्वायुष्य तसे साधारण एकाच चाकोरीतून गेलेले! तुषार हा हरयाणामधील एका पोलिस अधिकार्‍याचा मुलगा! भारतातील शिक्षण पूर्ण झाल्यावर अमेरिकेतील पेनसिल्व्हानिया विद्यापीठातून पदवीधर झाल्यावर इनव्हेस्टमेंट बॅन्कर म्हणून 3 वर्षे अमेरिका व सिंगापूरला काम केलेला! मॅट हा आपल्या आईवडिलांबरोबर लहान वयातच अमेरिकेला स्थायिक झाला. अमेरिकेतील एम आय टी सारख्या प्रतिष्ठित संस्थेतून त्याने शिक्षण घेतले. या दोन्ही तरूणांच्या मनाने घेतले की आपण भारतात परत जावे म्हणजे आपल्या देशाला आपला काहीतरी उपयोग होईल. त्याप्रमाणे ते परत आले व त्यांनी बेंगलुरूमध्ये ही नोकरी घेतली. (अधिक…)
  • सीबीआय ही सर्व प्रकारच्या गैरव्यवहारांची चौकशी करणारी भारतातली सर्वात श्रेष्ठ दर्जाची यंत्रणा मानली जाते. या सीबीआयचे महासंचालक श्री. ए.पी.सिंग हे गृहस्थ आहेत. आंतर्राष्ट्रीय पोलिस संघटना किंवा इंटरपोलने नुकताच " भ्रष्टाचार टाळण्यासाठी व अवैध रित्या जमा केलेला पैसा उघड करण्यासाठी इंटरपोलचा जागतिक कार्यक्रम " ( Interpol global programme on anti-corruption and asset recovery ) हातात घेतला आहे. या निमित्ताने आयोजित केलेल्या कॉन्फरन्सच्या उदघाटन प्रसंगी या सदगृहस्थांनी तुम्हाला आम्हाला माहिती असलेली एक गोष्ट परत सांगितली. मात्र त्यांनी या बाबत जी काही डिटेल्स दिली ती मोठी रोचक आहेत. (अधिक…)
  • मला आठवते की मागच्या वर्षी कधीतरी एक बातमी मी वृत्तपत्रांतून वाचली होती. कर्नाटकच्या सर्व आमदारांना स्मार्टफोन देण्यात येणार म्हणून!. त्या वेळेस मला थोडे आश्चर्यही वाटले होते की ही मंडळी हे स्मार्टफोन घेऊन काय करणार? पण राज्यासमोर असलेल्या निरनिराळ्या प्रश्नांची माहिती करून घेता यावी. त्यांच्या मतदारसंघांतील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी, शेती उत्पादन या सारख्या संख्या लक्षात ठेवता याव्या व मूलभूत स्वरूपाची माहिती स्वत:जवळ ठेवण्यासाठी हे स्मार्टफोन दिले गेले असल्याची माहिती या बातमीत दिलेली होती. पण 2 दिवसापूर्वी कर्नाटक विधानसभेत, सत्र चालू असताना, लक्ष्मण सावेदी, सी.सी.पाटील व जे. कृष्णा पालेमार हे तीन मंत्री आपल्या स्मार्टफोनवर अश्लील चित्रफीत बघत असताना त्यांचे चित्रीकरण टीव्ही वाहिन्यांनी करून आपल्या वाहिन्यांवरून प्रसृत केले व कोणत्या कारणासाठी या मंडळींना हे स्मार्टफोन खरे तर हवे होते याचा उलगडा झाला. (अधिक…)
  • काही वर्षांपूर्वी हैदराबादला गेलो होतो त्या वेळी, तिथले जगप्रसिध्द सालारजंग संग्रहालय नव्या वास्तूत गेले आहे असे समजल्याने, लक्षात ठेवून ते मुद्दाम परत बघायला गेलो होतो. तिथली दालने बघत असताना एका दालनात खुद्द निझाम व त्याचे सरदार यांचे रत्नखचित अंगरखे चौकटींच्यात मांडून ठेवलेले दिसले.ह्या अंगरख्यांवर सोन्या-चांदीच्या तारेने कशीदा तर काढलेला होताच पण त्या शिवाय निरनिराळी रत्नेही जडवलेली होती. दिव्यांच्या प्रकाशात हा कशीदा व रत्ने मोठी चमचम करताना दिसत होती. त्याच वेळी मनात विचार आला होता की असे चौकटीत मांडून ठेवलेले हे अंगरखे बघायला जरी मोठे मोहक दिसत असले तरी ते अंगाखांद्यावर वापरणे मोठे कर्म कठिण काम आहे. अंगाला तो कशीदा सारखा घासणार, ती रत्ने उठता बसताना टोचणार, वेळप्रसंगी अंगातून रक्तही काढणार. तेंव्हा त्यांच्यापासून मी लांब आहे तोच बरा. परवा सहज विचार करत असताना असे लक्षात आले की अरे! आपली नाती गोती पण या अंगरख्यांसारखीच आहेत की! जोपर्यंत ती लांब चौकटीत मांडलेली होती तोपर्यंत अशीच मनाला सुखद वाटत होती. अंगाखांद्यावर वावरण्याची वेळ आल्यावर ती पण अशीच घासू आणि टोचू लागली आहेत. एखादे वेळी ओरखडा व रक्ताचा थेंब सुध्दा दिसतो आहे. ग़ोत्यांत नेतात ती नाती हे मनाला पटू लागले आहे. (अधिक…)

काही जुने! खास माझ्या आवडीतले लेख!

शनिवारवाडा

delhi gate शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहू महाराज हे सन 1707 मध्ये मोगलांच्या कैदेतून सुटून महाराष्ट्रात आले व इ.स. 1713 मध्ये त्यांनी बाळाजी भट यांची, पंतप्रधान पेशवा म्हणून नियुक्ती केली. इ.स. 1817 मध्ये शिवाजी महाराजांचे वंशज, सातार्‍याचे प्रतापसिंह महाराज हे इंग्रजांच्या स्वाधीन झाले व त्यांच्याच सांगण्यावरून प्रतापसिंह महाराजांनी त्या वेळचे नियुक्त पेशवे, बाजीराव रघुनाथराव यांना पेशवेपदावरून दूर केले. या दोन घटनांमधील 104 वर्षांच्या कालखंडात, मराठी राज्याची सर्व सत्ता, बाळाजी भट व त्यांच्या घराण्यातील 5 पिढ्यांच्यातील पुरुष, यांच्याच हातात पेशवे म्हणून एकवटली होती. आपल्या कर्तुत्वाने पेशव्यांनी, अटकेपर्यंत आपले झेंडे लावले आणि सर्व उत्तर हिंदुस्थान आपल्या अंमलाखाली आणला होता. या कालात सर्व सत्ता सूत्रे पुण्यातून हलत असल्याने पुणे हे हिंदुस्थानचे सत्ता केंद्र झाले होते. मराठ्यांच्या या सत्तेला, वैभवाला साजेशी त्यांची गादी असली पाहिजे या हेतूने थोरले बाजीराव पेशवे यांनी, पुण्यामध्ये मुठा नदीच्या काठावर एक भव्य आणि सुरक्षित वास्तू बांधायचे ठरवले व 10 जानेवारी 1730 रोजी त्यांनी या वास्तूचा भूमिपूजन समारंभ केला. अशी दंतकथा आहे की या ठिकाणी बाजीराव पेशव्यांनी एका सशाला कुत्र्याचा पाठलाग करताना पाहिले. हे पाहिल्यावर बाजीरावांच्या असे मनात आले की या जागेत काहीतरी विशेष असले पाहिजे व त्यांनी ही जागा पेशव्यांच्या गादीसाठी मुक्रर केली. ही जागा त्यावेळी पुणे कसब्यात मोडत होती व या जागेभोवती मातीची भिंत बांधलेली होती. त्यावेळी या जागेत फक्त काही कोळी व कोष्टी वास्तव्य करून असत. बाजीराव पेशव्यांनी या लोकांना, मंगळवार पेठेत पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्या व 5 एकर क्षेत्रफळाची ही जागा आपल्या ताब्यात घेतली. Read more

जिगसॉ पझल

मी लहान असताना, सुप्रसिद्ध लेखिका इरावतीबाई कर्वे या आमच्या घरासमोरच असलेल्या त्यांच्या बंगल्यात रहात असत. एकतर त्या वेळी एरंडवण्याच्या माळावर असलेल्या आमच्या वस्तीत, फारशी घरे अशी नव्हतीच आणि दुसरे म्हणजे, कर्वे कुटुंब तसे आमच्या नात्यातलेच होते. त्यामुळे कर्व्यांच्या घरात माझे जाणे येणे बरेच असे. एकदा इरावतीबाई काही कामासाठी अमेरिकेला गेल्या. परत येताना त्या 5000 तुकड्यांचे एक भले थोरले जिगसॉ पझल किंवा कोडे घेऊन आल्या. सामान आणण्यावरचे वजनाचे निर्बंध त्या वेळी खूपच कडक असत. त्यामुळे ते पझल सुटे करून एका पिशवीतून ते तुकडे त्यांनी आणले होते. घरी आल्यावर एक मोठ्या लाकडी टेबलावर त्यांनी आमचा मुलांचा कॅरम बोर्ड ठेवून त्यात या सगळ्या तुकड्यांचा ढिगारा केला होता. त्या तुकड्यांतून कोणते चित्र निर्माण होणार आहे? कोणता तुकडा कडेचा आहे? आणि कोणता तुकडा कोणत्या तुकड्याला जोडला जाईल? हे सर्व सांगणे केवळ अशक्य होते. घरातले, लहान मोठे, आले गेले सर्व जण या तुकड्यांवर अगदी दहा पंधरा मिनिटांचा वेळ असला तरी आपला हात चालवून बघत. प्रथम प्रथम काहीही कल्पना न येणारे ते चित्र जसजसे दिवस गेले तसतसे स्पष्ट होऊ लागले. काळपट असणारे तुकडे जमिनीचा भाग असतील असे आधी वाटले होते पण नंतर ते एका झाडाचा भाग निघाले. नक्की आकाशाचे म्हणून काही निळसर तुकडे आम्ही बाजूला काढले होते ते तर समुद्राचे निघाले. जे तुकडे एकमेकाला जोडले जातील असे वाटले होते ते प्रत्यक्षांत विरुद्ध कोपर्‍यांतले निघाले. महिना दोन महिन्यांनंतर जेंव्हा ते चित्र पूर्ण झाले तेंव्हा आमच्या कल्पनेतल्या चित्रापेक्षा संपूर्ण निराळेच असे चित्र आमच्या नजरेसमोर आले होते. Read more

वर्दे गुरुजी

माझ्या मोठ्या आत्याबाई, एका प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून काम करत असत. शिक्षकांना रहाण्यासाठी, संस्थेने आवाराच्या एका कोपर्‍यातच, एक चाळवजा दगडी इमारत बांधलेली होती. त्याला शिक्षक चाळ असे म्हणत. प्रत्येक बिर्‍हाड, आगगाडीच्या डब्यांसारख्या जोडलेल्या, तीन खोल्यांचे असे. माझ्या आत्याचे बिर्‍हाड अगदी कोपर्‍यातले होते. मे महिन्याच्या सुट्टीत मी पुष्कळ वेळा आत्याकडे रहायला जात असे. ही संस्था तशी गावापासून बरीच लांब असल्याने दिवस रात्र तसा शुकशुकाटच असे. रात्री रातकिड्यांच्या किरकिरण्याशिवाय दुसरे फारसे आवाज कधी ऐकू यायचे नाहीत. मी असाच एकदा आत्याकडे रहायला गेलो असताना, रात्री अतिशय सुमधुर अशा गाण्याचे स्वर ऐकू येऊ लागले. गंमतीची गोष्ट म्हणजे तेच गाणे चार पाच वेळा परत परत ऐकायला मिळाले. आत्याला विचारल्यावर ती म्हणाली “गुरुजी गाणे बसवत असतील शाळेच्या कार्यक्रमाचे, म्हणून फोनो घरी आणला असेल.” मग नंतर काही गाणे ऐकू आले नाही आणि मी झोपून गेलो. Read more

लडाख डायरी

लेख वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा

Follow me on Twitter

देवांचे दिवस (आणि अप्सरांचेही)

लेख वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा

टाटा ‘ ज गोल्ड

लेख वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा

दख्खनच्या पठारावर

लेख वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा

वाचकांचा प्रतिसाद

madhukarsonavane च्यावर विश्वकर्म्याचे चार भुज –…
Anand Gambhire च्यावर पानशेत 1961
Smita kamath च्यावर पानशेत 1961
Avinash pimpalkar च्यावर पानशेत 1961

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 396 other followers
MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात