माझ्याबद्दल About

I am a retired Electronics Engineer. I was a businessman  involved in design and manufacture of various types of Electrical and Electronic equipments including Electronic gauging systems and electro- magnetic actuators. I started writing as a hobby, after my retirement. I write regularly in my English and Marathi Blogs. Links to my other blogs appear on the right side column of this blog. Having worked  throughout my career with my own hands, , I do often get an urge to do something creative. For this, I have taken up Paper model making and wooden  fret work. I am deeply interested in Astronomy and satisfy my curiosity with my Meade ETX 90C telescope. However the conditions in the city of Pune, India, where I normally stay, can not be said to be very conducive to my hobby.  Recently I have taken liking to study International strategic moves by nations. You can find number of my blogposts in this area.

मी पेशाने इलेक्ट्रॉनिक्स अभियंता व उद्योजक होतो. आता निवृत्त.  माझ्या व्यावसायिक आयुष्यामधे मी निरनिराळ्या विद्युत व इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा आराखडा बनवणे व त्यांचे नंतर उत्पादन यामधे कार्यरत होतो.  निवृत्तीनंतर मी एक छंद म्हणून लेखन करण्यास सुरवात केली. मी माझ्या इंग्लिश व मराठी ब्लॉग्समधे लेखन करतो. या ब्लॉग्सचे दुवे उजव्या बाजूच्या कॉलममधे सापडतील. माझ्या व्यावसायिक जीवनात मी नेहमीच हाताने काम करत आल्याने सध्या सुद्धा, कधी मधी नवनिर्मितीची उर्मी येते. पेपर मॉडेल्स बनवणे व प्लायबोर्डवर फ्रेटकाम करणे या कामातून मी ही उर्मी शमवतो. मला ज्योतिर्विद्याशास्त्रात खूप रुची आहे. माझ्याकडे असलेल्या मीड ETX 90C दुर्बीणीतून तारे बघण्याचा मला छंद आहे. परंतु पुण्याच्या सध्याच्या परिस्थितीत ही दुर्बीण आता क्वचितच वापरता येते. मला ललित लेखनाची आवड नाही.  इतिहास, भूगोल, शास्त्र हे विषय माझ्या आवडीचे आहेत. माझे बहुतेक लेख या विषयांवरचेच असतात. आंतर्राष्ट्रीय राजकारणातल्या खेळ्यांचा अभ्यास करण्यातही मला खूप रुची आहे. या विषयावरचे बरेच पोस्ट तुम्हाला येथे सापडतील.

\

चर्चा

50 thoughts on “माझ्याबद्दल About

  1. नमस्कार सर,

    मी तुमचे सर्व ब्लोग वाचलेत.
    खरच खुप मस्त लिहिलेत ते तुम्ही……
    तुमच्या शी संपर्क साधता यावा म्हणून मराठी मध्ये लिहितोय…..

    योगेंद्र कोठावदे.

    Posted by Yogendra | जुलै 20, 2009, 6:44 pm
  2. सर
    आपण अतिशय उत्तम लिहाले आहे
    वाचायला फार इंट्रेस्टिंग वाटले
    असेच वाचायला मिळावे हीच आपेक्ष

    राजीव

    Posted by raj | जुलै 28, 2009, 12:16 सकाळी
  3. I want to contact you. Can you pls drop ur email id here.

    Salil

    Posted by salil | ऑक्टोबर 9, 2009, 11:39 pm
  4. तुमचा ब्लॉग बेस्टच आहे. मस्तच आहेत सगळे लेख. वाचतो आहे एक एक करून.
    धम्मकलाडू

    Posted by धम्मकलाडू | नोव्हेंबर 25, 2009, 12:42 सकाळी
  5. nice blog
    like it

    Posted by vikram | डिसेंबर 21, 2009, 5:39 pm
  6. आपले सर्वच ‘ब्लॉग-पोस्ट’ वाचनिय, विचार करायला भाग पाडणारे आणि अभ्यासु आहेत. आपल्याकडुन अशीच साहित्यसेवा घडत राहो हिच शुभेच्छा !!!

    Posted by योगेश बंग | फेब्रुवारी 18, 2010, 10:17 सकाळी
  7. आपले दोन्ही ब्लॉग्स आवडले….
    आपण छान लिहिता…

    Posted by mimarathi | फेब्रुवारी 22, 2010, 6:23 pm
  8. Kaka chaan zalay ho lekh…pan mala tumacha “समुद्री चाच्यांची मगरमिठी” ha lekh atishay awadala…Atishay abhyaaspurn lekhan aahet tumache…Ekda sawadine bolen tumachyashi….Office chya vela sambhalun aaple chand jopasane kharach khup avghad aahe….

    Posted by Ashish | फेब्रुवारी 25, 2010, 7:07 pm
  9. yesterday i read your blog” swapn udyaache’ . Nice one. Now i will follow you.

    Thanhs.

    Posted by sudhir | फेब्रुवारी 26, 2010, 9:41 सकाळी
  10. मी ही सेवानिवृत्त अभियंता आहे. आपले बहुतेक सर्व लेख मी वाचले आहेत. माझे लेख आपण अवश्य वाचवेत हि विनंति.

    Posted by savadhan | मार्च 1, 2010, 2:35 pm
  11. नमस्कार सर,

    मला तुमचे लेख फ़ार आवडतात. मी एक electronics engineeringcha विद्यार्थी आहे आणि तुम्ही आपल्या व्यावसायिक जिवनाबद्दल देखिल थोडे फ़ार लिहावे याची मी आतुरतेने वाट पाहत आहे.

    Posted by pramodkakde | मार्च 10, 2010, 5:29 pm
    • तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. माझ्या व्यावसायिक आयुष्याबद्दल लिहिण्याची आपली सूचना मला आवडली. जरूर प्रयत्न करीन.

      Posted by chandrashekhara | मार्च 11, 2010, 11:34 सकाळी
  12. नमस्कार,
    मी आपला ब्लॉग नियमितपणे वाचतो. आपण सद्ध्या लिहीत असलेली आव्हान ही लेखमाला मला आवडली.
    आपले लेखन हे नेहमीच अभ्यासपुर्ण असते. प्रत्येक विषयाचा अभ्यास करूनच आपण लिहीता हे वाचताना जाणवते.
    मी तुमचा ब्लॉग RSS Feed मध्ये वाचत असल्याने दरवेळी ब्लॉगवर येत नाही.

    असेच लिहीत रहा.

    आपला,
    अनिकेत वैद्य.

    Posted by अनिकेत वैद्य | एप्रिल 6, 2010, 4:20 pm
  13. नमस्कार.
    तूमचे चीनवरचे लेख वाचले. सर्व माहिती आवडली.
    माझे चीनमधील वास्तव्य आठवले.
    मी ही काही लेख लिहिले आहेत.
    ते माझ्या बॉगवरती वाचता येतील.
    http://myurmee.blogspot.com/

    Posted by Meenal Gadre | जुलै 5, 2010, 7:46 pm
    • मीनल

      तुमचे चीनबद्दलचे लेख खरोखरच छान आहेत. मुख्य म्हणजे तुम्ही चीनमधे वास्तव्य करत असताना लिहिलेले आहेत. माझे सर्व लेख चीन बाहेरून लिहिलेले असल्याने तुमच्या लेखांच्यात अनुभवांचा जो ताजेपणा जाणवतो तो मला आणता येत नाही. प्रतिसादाबद्दल धन्यवाद,

      Posted by chandrashekhara | जुलै 6, 2010, 10:24 सकाळी
  14. sir
    i haven’t read any of ur artical at all. when i visited this site ,first i have read all comments . and i came to know that(without reading any thing) u r fantastic. now i will start readig. after then i will send modified replay(no dought, that will remian same).
    thanks.

    Posted by deepti | जुलै 12, 2010, 8:02 pm
  15. sir
    In our college, after 1 week, a group discussion is arranged on the topic ” Indian villages:strenth or weakness”
    will you please write any blog on that subject to guide us?
    this would be better for us to collect the information.

    Posted by deepti | जुलै 27, 2010, 1:53 pm
    • Deepti
      Thanks for your communication. Unfortunately I am a city dweller through out my life and happen to be connected to any village in no way. I also have no idea about life in Indian villages, their problems and strengths. It would be preposterous and pompously humbug to pretend and write about such a subject which I hardly know.
      However I have carried little search for you on the net and found these links which might turn useful to you. link1, link 2, link 3, link4
      It would have been a peasant task for me to write a blog as requested by you. But you would have to excuse me.

      Posted by chandrashekhara | जुलै 27, 2010, 2:49 pm
      • thnk u sir.
        The links u have suggested aer really wonderful. That information will definately help me to prepare for my GD.
        Expecting your kind support in future.

        Posted by deepti | जुलै 29, 2010, 10:25 सकाळी
    • Deepti,

      Please read these articles for the sake of learning / enjoying.
      Please don’t ask to write just because it is there in your GD.
      You are supposed to put forward your own views…

      BTW,
      No offense meant!
      🙂

      Posted by Aniruddha Vaidya | जुलै 30, 2010, 8:23 pm
  16. नमस्कार,

    तुमचा ब्लॉग पाहीला आवडला.
    तुमचे निवडक लेख मीमराठी.नेटच्या वाचकांसाठी देखील उपलब्ध करुन द्यावेत असे इच्छा आहे.
    जर तुम्हाला हरकत नसेल तर, निमंत्रित लेखक म्हणून मी तुम्हाला मीमराठी.नेट तर्फे आग्रहाचे आमंत्रण देत आहे.
    मी मराठी.नेट ह्या संकेतस्थळाबद्दल मी येथेच काही लिहीत नाही तुम्ही खालील दुव्यावर टिचकी मारुन स्वतः एकदा संकेतस्थळ पाहून घ्यावे ही विनंती.

    आपलाच,

    व्यवस्थापक
    मीमराठी.नेट

    http://www.mimarathi.net

    Posted by raj jain | नोव्हेंबर 10, 2010, 8:30 pm
  17. नेटीझमसाठी मराठीतून साहित्य वाचायला मिळणं किंवा एखादी ऑफबीट विषय वाचायला मिळणं ही खरंच काळाची गरज आहे. आपल्या ब्लॉगवरील विविध लेखांमुळे त्याची रंजकता अधिक वाढली आहे. आपल्या उपक्रमास शुभेच्छा
    रवींद्र दंतकाळे, सोलापूर
    (सेल : 8888 45 1857)

    Posted by रवींद्र दंतकाळे (सोलापूर) | एप्रिल 29, 2011, 1:17 pm
  18. sir, I read your articals and I like your style of writting very much.
    And I want to know about your hobbies like model macking, I am also related with Electronics.
    Regards,
    arun karekar.

    Posted by arun ramchandra karekar | मे 15, 2011, 12:27 सकाळी
    • Arun- Thank you very much for your appreciation. Regarding model making, please write to me about what exactly you would like to know, I would be glad to help you.

      Posted by chandrashekhara | मे 15, 2011, 10:13 सकाळी
      • Respected sir,
        Thanks for responding, I am 46 year of age and I have some physical problems in my leg,
        I worked in PAL from1984 to 1998. But now I have no job. As I am TV technician very much
        near to your Electronics field. Because of working very long period with auto, I am trying to make
        car model from mount board. and wanted to know more from you .
        arun karekar

        Posted by arun ramchandra karekar | मे 16, 2011, 4:25 pm
      • Arun –
        Very large number of plans are available on the internet for any model of car, which you may want to build. Just download the plan and get it printed on a plain paper. You can build your car model from this plan.

        Posted by chandrashekhara | मे 17, 2011, 12:55 pm
  19. Hello Sir , I am fan your all blogs, very nice work… I read it regularly.

    Posted by prasanna | मे 19, 2011, 12:37 pm
  20. Respected sir, Thanks for responding, I am 46 year of age and I have some physical problems in my leg,I worked in PAL from1984 to 1998. But now I have no job. As I am TV technician very muchnear to your Electronics field. Because of working very long period with auto, I am trying to makecar model from mount board. and wanted to know more from you . arun karekar
    +1

    Posted by Molli | मे 21, 2011, 8:24 pm
  21. नमस्कार चंद्रशेखरजी

    मी तुमच्या ब्लॉगवर तुमच्या कडे मीड कंपनीची ईटीएक्स ९० सी ही दुर्बीन असल्याचे वाचले . मी पण एक हौशी
    खगोल अभ्यासक आहे . आपण कृपा करून सांगाल का आपण ही दुर्बीन कशा पध्दतीने आयात केली आणि काय
    कींमत पडली . मला खगोलछायाचित्रणाची आवड आहे . त्यासाठीच्या चांगल्या दुर्बीनी अमेरिकेत मिळतात
    दुर्बीन आयात करण्याची काय पध्दत असते ती मला जाणून घ्यायची आहे . आपण मार्गदर्शन करावे ही आपणास
    विनंती आहे

    संदीप

    Posted by sandeep deokar | जुलै 18, 2011, 1:35 pm
    • संदीप-
      माझी दुर्बीण मी अमेरिकेच्या एका वारीत तेथेच खरेदी करून भारतात येताना सोबत आणली होती. दहा वर्षांपूर्वी या दुर्बिणीला 500 अमेरिकन डॉलर्स मी मोजले होते असे आठवले. भारतात ही कशी आयात करायची याबद्दल मला खरोखरच काही माहिती नाही. आंतरजालावर शोध घेतल्यास कदाचित मुंबईचा आयात करून देणारा व्यापारी मिळू शकेल असे वाटते.

      Posted by chandrashekhara | जुलै 19, 2011, 9:32 सकाळी
  22. नमस्कार चंद्रशेखरजी
    तुमच्या कडे इतकी छान दुर्बीन असून तीचा वापर करता येत नाही हे दुर्देव म्हणावे लागेल . कदाचित पुण्यातील लाईट पोल्युशन हे कारण असावे . आपल्या कडे वाढत्या शहरीकरणामूळे लाईट पोल्युशन ची समस्या खूप वाढते आहे. मी पण ह्या प्रकारामूळे खूप हैराण आहे . आमच्या घराच्या आजूबाजूला कोणी झाडे लावली किंवा नविन बांधकाम केले तर मला खूप बेचैन वाटते कारण त्या मूळे आकाशाचा काही भाग दिसत नाही . तसेच स्ट्रिट लाईट प्रखर प्रकाशा मूळे दुर्बीनीचा पूर्ण क्षमतेने उपयोग करता येत नाहे . अशा एक ना अनेक अडचणींमूळे खगोलशास्त्राच्या निरिक्षणाला मर्यादा येत आहे.बरं गावाच्या बाहेर डार्क एरियाच्या ठिकाणी जावं म्हणतो तर त्या साठी बाईक , पेट्रोल खर्च , दुर्बीन वाहून नेणे , आणि मोकळा वेळ आवश्यक आहे . त्या ठिकाणी ही लोक नुसत्या चौकशा करून परेशान करतात .
    मला खगोलछायाचित्रणाची आवड आहे . पण त्या साठी लागणारे साहीत्य उदा. चांगली दुर्बीन , स्लोमोशन कंट्रोल माउंट , डीएसएलआर कॅमेरा . वगैरे साहित्य खूप महाग आहे सर्व खर्च दीड लाखाच्या आसपास जातो . एवढा खर्च करून जर डार्क स्काय मिळत नसेल तर फायदा काय , चांगले फोटो कसे घेणार , कदाचित काही गोष्टी फक्त स्वप्नातच शक्य आहे असे वाटते . कारण एवढा खर्च करायला तेवढी मिळकत नाही . आणि कर्ज काढून केले तर घरचे परवानगी देणार नाही . भारतात तर हौशीस्तरावर संशोधन करायला काही वावच नाही . इकडे अमेरिकेसारखे मोठे खगोलक्लब्ज नाहीत , जे आहेत ते फक्त नवख्यां लोकांना आकाशनिरिक्षासाठी कार्यक्रम आयोजित करण्यापुरते काम करतात . आपल्या कडे सरकारी स्तरावर संशोधन करायला काही आर्थिक मदत हि मिळत नाही . सरकार तर ह्या बाबत खूप उदासिन आहे . काही वेळेस असे वाटते की ह्या विषयाचा एवढा केलेला अभ्यास वाया जातो की काय . सुरूवातीला माझ्या कडे दुर्बीन घ्यायला पैसे नसल्या कारणाने मी घरीच अभ्यास करून व फोन वर काही तज्ज्ञांचे मार्गदर्श घेउन घरच्या घरीच हाताने काचा घासून दुर्बीन तयार केली . त्यासाठी खूप मेहनत व चिकाटी आणि अभ्यास करावा लागला . तेव्हा कुठे दोन दुर्बीनी ( ६” व ८” इंच रिफलेक्टर ) तयार केल्या सध्या त्यांच्या साहाय्यनेच काम चालू आहे . आता खगोल छायाचित्रणाची आवड निर्माण झाली आहे पण त्यासाठी लागणार्‍या उच्च दर्जाच्या दुर्बीनी घरी तयार करणे शक्य नाही . त्या फक्त अमेरिकेत मिळतात . भाततात आयात करून विकणारा एक डिलर आहे पण किंमत खूप प्रचंड आहे .अमेरिकेत जास्त शोध का लागतात ह्याचे हे एक कारण आहे ते म्हणजे तिकडे असणार्‍या सोई सुविधा ज्या भारतात नाहीत
    तुम्ही ही एक खगोल अभासक आहात म्हणून तुम्हाला मनमोकळ सांगावस वाटलं

    संदीप

    Posted by sandeep deokar | जुलै 20, 2011, 6:51 pm
    • संदीप
      सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तुम्ही वर्णन केलेली परिस्थिती भारतात गेली साठ वर्षे तरी तशीच आहे. तुम्ही दुर्बिणीबद्दल लिहिले आहेत. पण मा झा अनुभव असा आहे की 12 वर्षांपूर्वी जेंव्हा मी खगोलशास्त्राचा अभ्यास सुरू केला तेंव्हा या विषयावरचे एखादे पुस्तक मिळवण्यासाठी सुद्धा मला प्रचंड यातायात करावी लागेली होती. आज जरी माझी दुर्बिण फारशी वापरता येत नसली तरी गेल्या दहा वर्षात मी त्यातून अनेक गॅलॅक्सी, नेब्यूला, स्टार क्लस्टर्स बघण्यात यशस्वी झालो आहे. बघण्यास अत्यंत अवघड असलेला बुध हा ग्रह सुद्धा मी बघू शकलो आहे.
      तुम्ही चिकाटीने प्रयत्न करत रहा. तुम्हाला यश मिळेल या बद्दल माझी खात्री आहे. केलेला अभ्यास कधीच वाया जात नाही कधी ना कधी तरी त्याचे फळ हे मिळतेच असा माझा तरी अनुभव आहे.
      चंद्रशेखर

      Posted by chandrashekhara | जुलै 21, 2011, 9:01 सकाळी
  23. चंद्रशेखरजी
    तुमच्या “लेह व लडाख” बद्दलच्या लेखाबद्दल माझे मत
    तुमच्या लेखात लेह बद्दल छान माहिती दिलेली आहे. आपण प्रवास वर्णन फार छान करतात. ब्लॉग वरील फोटो बघून तो परिसर खूप सुंदर नयनरम्य आहे. इतके निसर्गसौंदर्य असून चिन पाकिस्तान मूळे तो भूभाग लष्करीदृष्ट्या महत्त्वाचा व काहीसा डोकेदुखीचा आहे. चीन पाकीस्तान चा बराचसा व्यवहार तिकडच्या मार्गाने होतो . एका गोष्टीचा खूलासा केला तर बरे होइल. लेह लडाख मध्ये राहणार्‍या लोकांची चेहरेपट्टी भारतिय असूनही चिन , तिबेट , व नेपाळच्या लोकांशी जुळते असे का ? तिथे ते लोक कसे आलेत . तो भारतिय भूभाग असून ही आपल्या कडील लोक तिकडे दिसत नाहीत . एवढ्या मोठ्या संख्येने ते लोक त्यांच्या मूळ देशातून स्थांनातरीत होउन ही आपल्या सरकारने त्याची दखल का घेतली नाही . काश्मीर , लडाख , लेह ह्यांचा उल्लेख आपल्या जुन्या इतिहासात आढळ्तो म्हणजे हा भारतिय भाग होता अर्थात तिथे भारतिय मूळ निवासी ही राहत असले पाहिजे असे असतांना आपले लोक गेले कुठे आणि कसे , शिवाय तेथिल लोकांचा धर्म व रितीरिवाज ही आपल्या सारखा नाहीए ह्यामागे काय कारण असावे
    संदीप

    Posted by sandeep deokar | जुलै 23, 2011, 2:01 pm
    • संदीप –

      देश आणि वंश याच्यात तुम्ही गोंधळ करीत आहात असे वाटते. जगात जे काही प्रमुख वंश आहेत त्यात मंगोलियन हा एक प्रमुख वंश आहे. या वंशाचे लोक जपान पासून ते भारतीय सीमेवरील नेपाळ , सिक्कीम पर्यंत पसरलेले आहेत. आपल्या देशात अनेक वंशाचे लोक रहातात त्यात प्रमुख म्हणजे इंडो-युरोपिअयन वंशाचे लोक आहेत. या शिवाय मलै वंशाचे लोकही आहेत. त्यामुळे अमुक वंशाचा तो खरा भारतीय हे विधान फारसे सत्य मानता येणार नाही.
      पूर्व लडाख या भागाला पूर्वी पश्चिम तिबेट असे नाव होते व येथे स्थायिक झालेले बहुसंख्य लोक हे तिबेटहून आलेले आहेत. त्यामुळे ते तिबेटी लोकांसारखे दिसतात व बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही. या उलट पश्चिम लडाख मधले लोक इराणी किंवा मध्य एशियामधल्या लोकांचे वंशज आहेत व त्या मुळे ते निराळे दिसतात.

      Posted by chandrashekhara | जुलै 24, 2011, 9:02 सकाळी
  24. Namaskar , Tumche 3 safarchand ha lekh khupach awadla. Mi ek divali ank kadhato aahe. Tumchi jar parvangi asel tar to mi divali ankat chapu shakto ka?

    Posted by Subhash Sabnis | ऑक्टोबर 15, 2011, 10:34 सकाळी
    • सुभाष सबनीस –

      आपण काढत असलेला दिवाळी अंक आंतरजालावरचा आहे का छापील आहे? ते कळवावे. माझा ई-मेल पत्ता ब्लॉगच्या वरच्या बाजूला दिलेल्या संपर्क या पृष्ठावर दिलेला आहे. आपल्याकडूण ही माहिती मिळाल्यावर मी आपल्याला अनुमती बद्दल कळवू शकेन.

      Posted by chandrashekhara | ऑक्टोबर 15, 2011, 2:09 pm
  25. चंद्रशेखरजी, सप्रेम नमस्कार. आपल्या ’अक्षरधूळ’ अनुदिनीवर मला काही लिहायची संधी दिलीत याबद्दल अत्यंत आभारी आहे. माझी थोडी माहिती देतो. माझा जन्म १९२५ मध्ये ठाणे येथे झाला, म्हणजे आजमितीस मी ८७ वर्षांचा आहे. काही वर्षे कोल्हापूरमध्ये काढल्यानंतर मी १९६२ मध्ये गोवा येथे गेलो व तिथल्या
    शासनात सेवा करून १९८६ मध्ये राज्यपालांचा व्यक्तिगत सचीव आणि विशेष सहाय्यक म्हणून सेवानिवृत्त झालो.
    ३२ वर्षांपूर्वी सहचारिणी कालवश झाल्यामुळे व चारही मुले गोव्यातून बाहेर गेल्यामुळे मुंबई येथे येऊन २ मुलांकडे
    वार्धक्य व्यतीत करीत आहे. गोव्यात लेखनास प्रारंभ केला. आजपर्यंत ४ कादब-या, १ नाटक, ३ कथासंग्रह, ३० हून अधीक नभोनाट्ये, चरित्रकोषात ८०० हून अधीक नोंदी, मराठी व इंग्रजी नियतकालिकांत स्फुट लेखन असा लेखनसंभार आहे. २ कादंब-या, १ नाटक, व २ कथासंग्रह यांना साहित्यपुरस्कार मिळाले आहेत. गेल्या डिसेंबरात
    ’त्रिवेणी’ ही कादंबरी प्रकाशित झाली आहे. वय झाल्यामुळे आता फारसे लिहून होत नाही, तरीही थोडेफार लिहीत
    असतो. माझे मित्र श्री. मंगेश नाबर व श्री. मंदार मोडक यांच्या मदतीने ’मैत्रि२०१२’ ही अनुदिनी उघडली आहे.
    आपल्या साहित्य प्रेमाची कदर करतो. ’अक्षरधूळ’ शी साहित्यिक संबंध ठेवण्यास आनंद वाटेल.
    धन्यवाद.
    यशवंत कर्णिक.

    Posted by Yeshwant Karnik | फेब्रुवारी 18, 2012, 5:25 pm
  26. japaan madhil garbage disposal system baddal tumche mat have aahe.

    Posted by chhaya thorat | मे 23, 2012, 12:48 pm
    • छाया थोरात –

      जपानमधील कचरा सफाई प्रणाली बद्दल मला खरोखरच काहीही माहिती नाही. क्षमस्व.

      Posted by chandrashekhara | मे 23, 2012, 5:44 pm
  27. खूप संशोधावर आधारातीत लेख ..खूप सत्य व वैज्ञानिक ..तुमचे आभार करावे तितके कमी ..कारण मराठी अशी माहित सापडली म्हणून..

    Posted by sagar | फेब्रुवारी 16, 2013, 1:15 सकाळी
  28. फारच छान व उपयुक्त ब्लॉग आहे

    Posted by shrikantkakirde | मार्च 3, 2013, 1:35 सकाळी
  29. ROJACHYCHA VISHYA PEKSHA NAVIN MAHITI AAPLYA MULE MILALI. BLOG VAR PL MARATHI KASE LIYACHE MARGDARSHAN MILAVE

    Posted by MILESH CHITNIS 9860629744 | सप्टेंबर 18, 2013, 11:09 pm

Trackbacks/Pingbacks

  1. पिंगबॅक अष्टादशपुराणेषु… » GuऋviSion - ऑक्टोबर 11, 2011

यावर आपले मत नोंदवा