.
Musings-विचार

धाडसी निर्णय आणि प्रसंगावधान


मी कॉलेजात शिकत असताना घडलेला एक प्रसंग मला नेहमी स्मरतो. माझ्या वडीलांच्याकडे त्यावेळेस  350 सी.सी क्षमतेची एक मोटर सायकल होती. त्या  काळात मोटर सायकली चालू करण्यासाठी स्टार्टर नसे व एका पेडलला जोराने लाथ मारून मोटर सायकल सुरू करावी लागत असे. क्वचित वेळा असे पेडल मारताना एक्झॉस्ट पाइप मधून  ज्वलन न झालेले पेट्रोल पेटून उलट्या ज्वाला बाहेर येत व तसे झाल्यास काळजी घ्यावी लागे.त्या दिवशी मोटर सायकलचा कार्ब्युरेटर फ्लड झाल्यामुळे पेट्रोल बाहेर येऊन सगळीकडे सांडले व पसरले होते व वास येत होता. अशा परिस्थितीत मोटर सायकलला कधीच किक मारायची नसते. पण बाहेर जाण्याची घाई असल्याने कोणीतरी ती मारली, एक्झॉस्ट पाइप मधून ज्वाला बाहेर आल्या व पसरलेल्या पेट्रोलने लगेचच पेट.घेतला त्यामुळे टाकीतून कार्ब्युरेटरला पेट्रोल पुरवठा करणारी प्लॅस्टिकची नळी वितळली व  टाकीतून पेट्रोल सरळ पेटलेल्या भागावर पडू लागले.

प्रसंग तर मोठा बाका होता.कोणत्याही क्षणी टाकी स्फोट होऊन फुटण्याची भीती होती.जमलेले सर्व लोक मागे सरकू लागले.माझे वडील तर मोटर सायकल गेलीच असे म्हणू लागले. त्यावेळेस मला अचानक एका महिन्यापूर्वी कारखान्यासाठी घेतलेल्या अग्निशामक नळकांड्याची आठवण झाली. मी पळत पळत गेलो व ते शंकूच्या आकाराचे नळकांडे उचलून आणले. या नळकांड्याला खालील बाजूस असलेले एक बटन जमीनीवर आपटल्यावर त्यातून अग्निशामक द्रावाचा मोठा फवारा सुरू झाला. तो मोटर सायकलच्या दिशने फवारल्याबरोबर काही क्षणात आग विझली. ती विझल्याबरोबर एकाने मोटर सायकलचा पेट्रोल व्हॉल्व्ह बंद केला आणि पेट्रोल बाहेर येणे थांबले व त्याबरोबर अनर्थही टळला.

मी मोठे प्रसंगावधान दाखवून हा निर्णय घेतला वगैरे लोक म्हणू लागले पण मला त्या वेळेस सर्वात कसला आनंद झाला असला तर आमची मोटर सायकल वाचली होती त्याचा. मी जे काही करू शकलो यामागे मोटर सायकल वाचवणे हा एवढाच हेतू होता हे अगदी प्रामाणिक सत्य आहे.

खरे प्रसंगावधान दाखवला गेलेला प्रसंग घडला होता माझ्या मावस आजीच्या आयुष्यात! आणि तो सुद्धा 1940च्या दशकात! त्या वेळेस ती पुण्याजवळच्या हिंगणे या खेडेगावात रहात होती. सध्याकाळी ती यजमानांबरोबर कॅनॉल जवळून जाणार्‍या रस्त्यावरून फिरायला गेलेली असताना तिचा पाय एका फुरशावर पडला व त्या फुरशाने तिला नडगीजवळ कडाडून दंश केला.काही तरी करणे ताबडतोब आवश्यक होते नाहीतर मृत्यू अटळ होता. माझ्या आजीने यजमानांचा रुमाल घेतला व त्यांच्याकडून  पोटरीजवळ  पाय निळाजांभळा होईल एवढा करकचून घट्ट बांधून घेतला व यजमानांना तिने ब्लेड आणण्यासाठी घरी पाठवले. ते परत येईपर्यंतची 15/20 मिनिटे ती वेदना सोसत तेथेच बसून राहिली. यजमान आल्यावर तिने स्वत:च्या हाताने नडगीच्या वरच्या बाजूस इंग्रजी क्रॉसच्या आकाराचे छेद आपल्या पायावर घेतले व रक्त भळाभळा वाहू दिले. एव्हांना इतर लोक आले होते त्यांनी तिला उचलून छकड्यात घातले व 8 मैलावरच्या ससून हॉस्पिटलमधे पोचवले.तेथे इतर उपचार झाल्यावर ती थोड्या  दिवसांतच बरी झाली. माझ्या या आजीने  खरे प्रसंगावधान दाखवून निर्णय घेतला होता असे मला वाटते.

अशा बाक्या प्रसंगानुरुप निर्णय घेणे त्या परीने सोपे असते असे मला नेहमी वाटते. विचार करून जेंव्हा एखादा धाडसी किंवा मनाला वेदना देणारा निर्णय घेतला जातो तेंव्हा मनाचे प्रचंड धारिष्ट्य अंगी असणे आवश्यक असते. त्या निर्णयाचे दूरगामी परिणाम काय होतील याची पूर्ण कल्पना असते. असे निर्णय घेणे खरोखरच कठिण असते.

माझ्या परिचितांपैकी एका कुटुंबातील मोठ्या मुलाला तो कॉलेजात असताना त्याचे अभ्यासात लक्ष नाही आणि सिगारेट्स फुंकत तो वेळ वाया घालवतो आहे म्हणून त्याच्या वडीलांनी विचारपूर्वक घरातून हाकलून देल्याची सत्य घटना मला माहिती आहे. त्याला घालवून दिल्यावर त्याच्या वाट्याचा वडिलोपार्जित संपत्तीचा हिस्सा त्याच वेळी त्यांनी मुलाच्या हवाली केला होता. वडील आणि मुलगा यांची आयुष्यात परत भेट झाली नसली तरी विभक्त झालेला मुलगा हा मात्र पुढे पूर्णपणे रुळावर आला होता. या  प्रकारचा कटू निर्णय घेणे अतिशय कठीण असले पाहिजे यात शंकाच नाही.

काही वेळा आपण मन सांगते म्हणून आपण एखादा निर्णय घेतो.अगदी सोपे उदाहरण द्यायचे तर एखाद्या रस्त्याला दोन फाटे फुटत असले आणि नकाशा किंवा रोडसाइन यापैकी काहीच उपलब्द्ध नसले त  दोन्हीपैकी एक रस्ता निवडण्याचा निर्णय. हा निर्णय घेणेही तसे सोपेच असते कारणजे काय बरे-वाईट होईल त्याची जबाबदारी आपण खुशाल मनावर टाकलेली असते.

म्हणूनच विचार करून घेतलेले निर्णय घेण्यासाठी जी लागते ती खरी निर्णय क्षमता असते असे मला वाटते. होऊन गेलेले मोठे सेनानी,राजकारणी किंवा औद्योजक यांच्याकडे ती अंगभूत होती म्हणूनच ते मोठे झाले असे म्हणणे गैर ठरणार नाही. प्रसंगावधान  दाखवणारे लोक काही वेळा मोठे नुकसान टाळतात हे जरी खरे असले तरी त्यांच्या अंगी खरी निर्णयक्षमता असते असे काही म्हणता येणार नाही.

8 मे 2015

 

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

One thought on “धाडसी निर्णय आणि प्रसंगावधान

  1. What is written here is absolutely true. Those decisions which are instinctively taken may sometimes appear great but it is not so. When a deliberate decision is taken using conscious brainpower it is really great of that person.

    Posted by suni lfrm Auckland | फेब्रुवारी 3, 2016, 5:19 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: