.
Environment-पर्यावरण

एव्हरेस्टवरच्या कचर्‍यातून कलानिर्मिती


16 मार्च 2012 या दिवशी पुण्यामधील काही गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केल्याची बातमी बहुतेक वाचकांनी वाचली असेलच. या गिर्यारोहकांपैकी प्रत्यक्ष शिखरावर पाऊल ठेवण्यात यशस्वी झालेले एक तरूण गिर्यारोहक व त्यांच्या टीम मधील आणखी एक वरिष्ठ सभासद या दोघांचे, या सफरी संबंधीचे निवेदन ऐकण्याचा योग मला काही महिन्यांपूर्वी आला होता. सुमारे एक तासभर चाललेल्या या कार्यक्रमाचे श्रवण करणे व त्यांनी बरोबर आणलेल्या स्लाइड्स बघणे हा सुद्धा माझ्यासाठी एक मोठा चित्तथरारक अनुभव होता. या टीमच्या अनुभवानुसार तंत्रज्ञानात कितीही प्रगती झालेली असली तरी एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करण्याचे आव्हान कोणत्याही गिर्यारोहकासाठी एक अत्यंत दुर्दम व कष्टसाध्य असते याची पुरेपूर जाणीव आम्हा प्रेक्षकांना झाल्यावाचून राहिली नाही.

आपल्या भाषणात या वक्त्यांनी एव्हरेस्ट मोहिमेतील एक क्लेशदायक अनुभव सांगताना या संपूर्ण मोहिमेच्या मार्गावर कचरा व त्याज्य वस्तूंचे ढिगारे कसे जागोजाग पडलेले व विखुरलेले आहेत आहेत याचे सविस्तर वर्णन केले होते. हा सर्व कचरा, मानवासमोर असलेले एव्हरेस्ट जिंकण्याचे सर्वात कठीण आव्हान स्वीकारून या मोहीमेवर आलेल्या, गिर्यारोहकांच्या अनेक पिढ्यांनी निर्माण केलेला आहे. एव्हरेस्टचा मार्ग ज्या प्रदेशातून जातो तेथे असलेल्या आत्यंतिक थंड हवामानामुळे येथे टाकलेल्या कचर्‍याचा प्रत्येक कण अन कण टाकलेल्या परिस्थितीत अबाधित रहात असतो. हा कचरा कोणत्याही प्रकारे कुजत नाही किंवा नष्टही होत नाही. नाही. या वक्त्यांच्या कथनाप्रमाणे आधीच्या मोहिमांमध्ये मृत्यू पावलेले गिर्यारोहक किंवा शेर्पा यांचे मृत देह देखील त्याच परिस्थितीत राहिलेले त्यांना बघायला मिळाले होते. एव्हरेस्ट्च्या मार्गावरील परिस्थिती आता इतकी चिंताजनक झाली आहे की ज्या काही ठिकाणी बहुतेक गिर्यारोहण मोहिमा आपले कॅम्प बसवतात त्या ठिकाणांना आता कचरा डेपोचे स्वरूप आले आहे.

Da Mind Tree या नेपाळची राजधानी खाटमांडू स्थित असलेल्या एका कलाप्रेमी संस्थेने एव्हरेस्ट वरील या कचर्‍यासंबंधी काहीतरी कार्यवाही करण्याचे ठरवून रिकामे प्राणवायू सिलिंडर्स, गॅसचे सिलिंडर्स, अन्नाचे रिकामे डबे, फाटलेले तंबू, दोरखंड, बुटांना गिर्यारोहक बांधत असलेले लोखंडी क्रॅम्पॉन्स, बूट, बशा, पिरगळल्या गेलेल्या अ‍ॅल्युमिनियमच्या शिड्या आणि फाटक्या प्लॅस्टिकच्या पिशव्या या सारखा सुमारे 1.5 टन कचरा जमा केला. हा कचरा शेर्पा गिर्यारोहकांनी 2011 2012 या वर्षांत जमा केला. एव्हरेस्ट मार्गावर जमा केलेला हा सर्व कचरा हमाल व याक प्राण्यांच्या पाठीवर लादून खाटमांडू पर्यंत आणण्यात आला.

हा कचरा जमा केल्यानंतर 15 नेपाळी कलाकारांनी या कचर्‍याबरोबर स्वत:ला जवळ जवळ महिनाभर कोंडून घेतले. ते जेंव्हा यातून जेंव्हा बाहेर आले तेंव्हा त्यांनी एव्हरेस्ट् मार्गावरून आणलेल्या कचर्‍याचे कलेत, 75 विविध प्रकारची शिल्पे निर्माण करून रूपांतर केले होते. या शिल्पात याक प्राण्याचे एक शिल्प व एक विंड चाइम यांचाही समावेश आहे. आहे. हा कलाकार गट श्री. कृपा राणा शाही यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत होता. ते म्हणतात की ही शिल्पकला आणि या वस्तूंचे नुकतेच भरवलेले नेपाळची राजधानी खाटमांडू येथील प्रदर्शन या दोन्ही गोष्टी एव्हरेस्ट कचर्‍यापासून मुक्त करण्याच्या बाबतीत लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी या साठी केलेले प्रयत्न आहेत. ते म्हणतात की एव्हरेस्ट हे आमच्या मुगुटातला शिरोमणी असले तरी ते नेहमी तसेच राहील अशा समजुती खाली आम्ही न राहणे आवश्यक आहे. तेथे असलेला कचरा हा आमच्या अस्मितेवरचा कलंक आहे.”

कचर्‍यातून तयार केलेल्या या कलावस्तूंमध्ये, एक तिबेटी मंडल चित्रकृती आहे. या चित्रात विश्वामध्ये असलेले एव्हरेस्टचे स्थान दाखवण्यासाठी बीअर आणि अन्नपदार्थांचे कॅन्स, आणि इतर धातूंचे पिवळ्या, निळ्या आणि पांढर्‍या रंगाचे तुकडे एका गोल बोर्डावर चिकटवण्यात आले आहेत. एका दुसर्‍या शिल्पात जुने रिकामे ऑक्सिजन सिलिंडर्स एका धातूच्या सांगाड्यावर बसवून त्यांना बौद्ध प्रार्थनाचक्रांचा आकार दिलेला आहे.

एव्हरेस्ट शिखर प्रथम न्यूझीलंडचे सर एडमंड हिलरी आणि भारताचे तेनझिंग नॉर्गे यांनी 1953 मध्ये पादाक्रांत केले होते. त्या नंतर सुमारे 400 लोक या 29035 फूट ऊंच असलेल्या शिखरावर पाय ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. या यशस्वी लोकांत पुण्याच्या एका गटाचाही समावेश आता आहे. मी वर उल्लेख केल्याप्रमाणे, हे गिर्यारोहक हे मान्य करतात की एव्हरेस्ट मार्गावरील उतार हे आता कचर्‍यांनी भरून गेलेले आहेत. हिवाळ्यात हा कचरा बर्फाखाली झाकला जातो परंतु उन्हाळा आला की बर्फ वितळते आणि कचरा परत उघड्यावर येतो. नेपाळ सरकार आता प्रत्येक गिर्यारोहक गटाकडून त्या गटाने एव्हरेस्ट मार्गावर निर्माण केलेला सर्व कचरा परत खाली आणावा या साठी 4000 अमेरिकन डॉलर सुरक्षा निधी घेते आहे. आहे. परंतु जागेवर जाऊन तपासणी करणे अशक्यप्राय असल्याने काही कचरा तेथे राहतोच.

या कलाप्रेमी गटाने निर्माण केलेल्या कलावस्तू आता विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत. या विक्रीतून मिळालेल्या रकमेचा काही भाग कलाकारांना दिला जाईल व बाकीची रक्कम एव्हरेस्ट वरील कचरा ज्यांच्या माध्यमातून जमा केला गेला त्या Everest Summiteers’ Association (ESA) या संस्थेला दिला जाईल.

मी आधी उल्लेख केलेल्या भाषणाबरोबर, पुण्याच्या या गिर्यारोहक गटाने आम्हाला एव्हरेस्टच्या मार्गावरील उतारांवर जमा झालेल्या कचर्‍याची काही छायाचित्रे दाखवली होती व ही छायाचित्रे तरी अतिशय घृणा निर्माण करणारी होती. या पार्श्वभूमीवर या नेपाळी कलाकारांची कलानिर्मिती हे प्रशंसा करण्याजोगे असे उचललेले पाऊल आहे असे मला वाटते व या प्रयत्नामुळे पृथ्वीवरील या सर्वात ऊंच पर्वताच्या कडेपठारांवर जमा झालेला कचरा कमी होण्यास किंवा कमीत कमी तो वाढणार नाही याची जागरूकता भावी गिर्यारोहकांच्या मनात निर्माण होईल अशी आशा करता येईल.

11 फेब्रुवारी 2013

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: