.
अनुभव Experiences, Travel-पर्यटन

एक बेट, जे कधी नव्हतेच


आधुनिक कालामध्ये इंटरनेट ही मानवी बुद्धिमत्तेची कदाचित सर्वात उंच अशी भरारी मानता येईल असे मला नेहमी वाटते. या इंटरनेटमुळे ज्या काही नवीन सुविधा किंवा माहितीची दालने आपल्यापुढे खुली झाली आहेत किंवा होत आहेत त्यात गुगल अर्थ आणि गुगल नकाशे या दोन अ‍ॅपिलिकेशन्सना अतिशय वरिष्ठ असे स्थान आहे असे म्हणता येते. गुगल अर्थ हा कार्यक्रम उघडून त्यावरून जगाच्या कोणत्या तरी कानाकोपर्‍यात असलेला एखादा अज्ञात ( निदान मला तरी!) समुद्र किंवा अथांग वाळू पसरलेले एखादे भयाण वाळवंट येथे मानवी वस्तीच्या खाणाखुणा आहेत का? हे शोधण्यात मी तास अन तास घालवलेले आहेत आणि पुढेही घालवीन. माझ्यासारखे शेकडो किंवा हजारो गुगल अर्थचे चाहते जगभर पसरलेले आहेत. या चाहत्यांनी मानवाच्या स्मरणातून केंव्हाच नामशेष झालेले भूभाग व त्यावरील मानवी वस्तीच्या खुणा, शोधून काढण्यात प्रचंड यश मिळवले आहे.हे गुगल अर्थ सॉफ्ट्वेअर मोठे अचूकपणे भौगोलिक सत्यता काय आहे हे आपल्याला दाखवत असते असा सर्वसाधारणपणे समज आहे व बहुतांशी तो बरोबर असावा. त्यामुळे आतापर्यंत माझी खात्री होती की गुगल अर्थ वर एखादे भौगोलिक वैशिष्ट्य दिसत असले तर प्रत्यक्षात ते तसेच असते. परंतु कोणीतरी, कोठेतरी, या गुगल अर्थच्या सॉफ्टवेअरला गंडवण्यात यशस्वी झाल्याचे उघडकीस आले आहे.

गुगल अर्थ आणि गुगल नकाशे ही दोन्ही अ‍ॅप्लिकेशन्स, ऑस्ट्रेलिया आणि फ्रेंच स्वामित्वाखाली असलेला न्यू कॅलेडोनिया यांच्या मधील अंतराच्या साधारण मध्यभागी असलेले दक्षिण प्रशांत महासागरातील एक बेट स्पष्टपणे दाखवतात. हे बेट एखाद्या पट्टीच्या आकाराचे या नकाशात दिसते. या सर्व नकाशात अणि काही सागरी चार्ट्स मध्ये स्पष्टपणे दाखवलेल्या या बेटाचा सॅन्डी आयलंड किंवा सॅन्डी बेट या नावाने उल्लेख केलेला आहे. डवण्यात यशस्वी झाल्याचे उघडकीस आले आहे.

सिडनी विद्यापीठातील संशोधकांचा एक गट नुकताच, हे बेट जेथे असणे अपेक्षित आहे त्या समुद्री भागाचा अभ्यास दौरा करून आला. या भौगोलिक स्थानावर त्यांना अथांग पसरलेला व 4620 फूट खोल असलेला कोरल समुद्र फक्त बघण्यास मिळाला. एका ऑस्ट्रेलियन बोटीवरून सुमारे 25 दिवसांच्या या सामुद्रिक सफरीवर डॉ. मारिया सेटन या सिडनी विद्यापीठातील एक संशोधक गेल्या होत्या. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचा गट या स्थानावर भूभाग असण्याची अपेक्षा करत होता, कारण गुगल अर्थवर हा भूभाग स्पष्टपणे दिसत होता. परंतु बोटीवर असलेले मार्गदर्शक चार्ट्स मात्र या ठिकाणी 1400 मीटर खोल असा समुद्र दाखवत होते.

ऑस्ट्रेलियाच्या आसमंतातील समुद्री नकाशे करण्याची जबाबदारी अंगावर असलेल्या ऑस्ट्रेलियाची हायड्रोग्राफिक सर्व्हिसच्या मताने काही शास्त्रीय नकाशे व गुगल अर्थ यावर दाखवत असलेले हे सॅन्डी बेट मानवी नजरचुकीने यामध्ये घातले गेले असावे व नंतरच्या कालात या बेटाचा झालेला अंतर्भाव तसाच चालू राहिला असावा. जगातील काही नकाशा बनवणारे आपल्या कॉपीराईटचे उल्लंघन झालेले कळावे म्हणून खोटे रस्ते शहरांच्यात दाखवत असतात त्यातलाच हा प्रकार असावा. परंतु सामुद्रिक नकाशात हा प्रकार कोणी केल्याचे ऐकिवात नाही कारण अशी खोटी बेटे नकाशात दाखवली असली तर ते नकाशे वापरणार्‍या लोकांचा, त्या नकाशांवरील विश्वास उडून जाण्यास फारसा अवधी लागणार नाही.

हे सगळे वाचल्यावर, मी स्वत:च गुगल अर्थवर हे बेट आहे का? हे तपासण्याचे ठरवले. 19d14’70”S and 159d55’52.55”E या अक्षांशरेखांशावर एखाद्या काळ्या सावलीप्रमाणे दिसणारे हे बेट गुगल अर्थ मध्ये मला स्पष्टपणे दिसले. मात्र गमतीची गोष्ट म्हणजे गुगल अर्थ या बेटाचे एलेव्हेशन -1 फूट असे दाखवते आहे. भर समुद्राच्या मध्यभागी असलेले हे बेट समुद्राच्या पातळीखाली 1 फुटावर असल्याचे गुगल अर्थ दाखवते आहे.

गुगल अर्थ वापरणारे लोक एखाद्या स्थानावर प्रत्यक्ष गेले असले व त्यांनी तेथील फोटो काढले असले तर पॅनारामिओया संकेतस्थळाचा वापर करून त्यांनी काढलेले फोटो गुगल अर्थ वरून दिसू शकतील असे अपलोड करू शकतात. स्टीफन डब्ल्यू हे नाव धारण करणार्‍या एका पॅनारामिओखातेधारकाने अपलोड केलेले असे दोन फोटोही मला गुगल अर्थ वर बघता आले. स्टीफन डब्ल्यू ही व्यक्ती संशयास्पद नसून तिचे अधिकृत पॅनारामिओखाते स्टीफन वॉलनर या नावाने आहे आणि या व्यक्तीचा योग्य असा जालावरचा अधिकृत पत्ता देखील आहे.

यापैकी एका फोटोमध्ये उंच उंच झाडांचे बुंधे दिसतात तर दुसर्‍यात हिमाच्छादित असलेले एक जंगल दिसते. दोन्ही फोटो मूळ स्टीफन वॉलनर याच्या संकेतस्थळावरील आहेत. गुगल अर्थच्या छायाकृतीखाली ही छायाकृती US Geographical Survey, Data SIO NOAA US NAVY NGA GEBCO. यांचेकडून प्राप्त झाल्याचा उल्लेख आहे. त्याचा अर्थ मला तरी माहिती नाही.

या सगळ्या प्रकरणावरून स्पष्ट होते आहे की कोणीतरी जाल ठकाने गुगल अर्थ आणि स्टीफन वॉलनर यांची संकेत स्थळे हॅक केली आहेत व फसवाफसवीचे काहीतरी उद्योग करण्यासाठी हा प्रकार केला आहे. काय सांगावे! हे बनावट बेट कोणाला तरी विकण्यासाठीही असे काही कारस्थान केले जाऊ शकते. गरीब बिचारा वॉलनर! आणि कधी अस्तित्वात नसलेले हे बेट शोधण्याचा प्रयत्न करणारे सिडनी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ!

गुगलने आपण हे बेट त्वरित नकाशावरून काढण्याची कारवाई करण्याचे मान्य केले आहे. बघा त्याच्या आत तुम्हाला ते बघायला मिळते का!

18 जानेवारी 2013

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: