.
Musings-विचार

पदवीधरांची गुणवत्ता आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स


एखाद्या दिवशी अशीच एखादी बातमी तुमचा त्या दिवशीचा मूड बदलूनच टाकते. खरे तर त्या बातमीशी तुमचा दूरान्वयानेही काही संबंध नसतो आणि त्या बातमीमुळे तुमच्या आयुष्यक्रमात सुद्धा कोणताच फरक पडणार नसतो. तरी सुद्धा तुम्हाला उगीचच छान वाटत राहते. त्या दिवशी वृत्तपत्रात, मी माझी अभियांत्रिकीची पदवी ज्या शिक्षण संस्थेतून प्राप्त केली होती त्या बेंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सकिंवा IISC बद्दलची एक बातमी वाचली व त्या दिवशीचा माझा मूड पालटून गेला. या संस्थेतून सुमारे 46 वर्षांपूर्वी पदवी घेऊन बाहेर पडल्या नंतरच्या मधल्या वर्षांत मी या संस्थेला जेमतेम 2 किंवा 3 वेळा भेट दिली आहे. त्यापैकी एक भेट, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन तंत्राबद्दलचा एक छोटासा कोर्स मी 1980 च्या दशकात केला होता त्यावेळी दिली होती व बाकी 1 किंवा 2 वेळा सोडल्या तर इन्स्टिट्यूटशी माझा काही संपर्क किंवा संबंधही नव्हता. तरीसुद्धा इन्स्टिट्यूट बद्दलची ही बातमी वाचून मला मोठे छान वाटले होते ही मात्र सत्य परिस्थिती होती.

इमर्जिंग ” (Emerging) ही एक ह्युमन रिसोर्स कन्सल्टन्सी देणारी फ्रान्सची राजधानी पॅरिस स्थित असलेली एक संस्था आहे. ही संस्था दर वर्षी जगभरच्या प्रमुख शिक्षण संस्थांचा एक सर्व्हे करत असते. या सर्व्हेला ही संस्था Global Employability म्हणते. या सर्व्हेच्या अनुमानानुसार जगभरातील प्रमुख शिक्षण संस्थांमधून बाहेर पडणार्‍या पदवीधरांना नोकरी मिळण्याची कितपत शक्यता आहे याची चाचपणी केली जाते व या सर्व प्रमुख शिक्षण संस्थांचा एक क्रम लावला जातो. 2012 मध्ये या संस्थेने मे व जून महिन्यात केलेल्या सर्व्हेमध्ये 20 देशातील 2500 लोकांकडून माहिती मिळवली होती. या लोकांत अनेक कंपन्या व योग्य असे उमेदवार शोधणार्‍या एजन्सी बहुसंख्येने होत्या. या सर्व्हेमध्ये, तरूण पदवीधरांची आदर्श गुणवत्ता काय असावी? कोणती गुणवत्ता असलेल्या पदवीधरांचा कायम नोकरीसाठी विचार केला जातो? आणि कोणत्या शिक्षणसंस्था जगातील सर्वात उत्तम पदवीधर निर्माण करतात? हे शोधून काढण्याच्या दृष्टीने माहिती विचारलेली होती.

103 वर्षांपूर्वी स्थापना झालेल्या बेंगलुरुच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सया संस्थेने या सर्व्हेमध्ये, 2011 सालच्या आपल्या 134 व्या स्थानावरून 2012 मध्ये 35 व्या स्थानावर उडी मारून हा सर्व्हे करणार्‍यांसकट सर्वांना आश्चर्यचकित करून टाकले आहे. या उडीमुळे या संस्थेतून पदवी घेऊन बाहेर पडणार्‍या उमेदवारांची गुणवत्ता ही त्यांना नोकरी देऊ करणार्‍या कंपन्या किंवा इतर यांच्या दृष्टीने किती महत्त्वाची ठरते आहे हे स्पष्ट होते आहे. या शिवाय आणखी एक रोचक अनुमान या सर्व्हेमध्ये आहे. जगातील पहिल्या 150 शिक्षणसंस्थात IISC या एकाच भारतीय शिक्षणसंस्थेचा समावेश करण्यात आलेला आहे.

खरे सांगायचे तर मला या सर्व्हेच्या अनुमानांनी अजिबातच आश्चर्य वाटलेले नाही. या जागतिक सर्व्हेला आता हे समजले असेल, परंतु माझ्यासकट, तुम्ही इन्स्टिट्यूटच्या कोणत्याही पदवीधरांना हा प्रश्न विचारलात तरी IISc चे पदवीधर हे सर्वोत्तम व ज्यांना लगेचच नोकरी मिळू शकणारे पदवीधर होते आणि आहेत, हेच उत्तर तुम्हाला मिळेल. मी इन्स्टिट्यूटमधून पदवीधर झालो, त्यानंतरच्या काही महिन्यातच माझ्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याला काहीही अडचण न येता नोकरी मिळू शकली होते. जर ही परिस्थिती 46 वर्षांपूर्वी होती तर आता इन्स्टिट्यूटमध्ये झालेले शिक्षणक्रमातील बदल, आलेली आधुनिकता आणि काळाबरोबर बदल घडवून आणण्याची परंपरा या सर्व गोष्टींमुळे येथून बाहेर पडणार्‍या पदवीधरांना लगेच नोकर्‍या मिळू शकतात यात नवल असे काहीच नाही.

इन्स्टिट्यूटच्या पदवीधरांना असणार्‍या या मागणीच्या मागे बरीच कारणे आहेत असे मला वाटते. या मध्ये कोणत्याही शास्त्र शाखेत शिकत असलेल्या विद्यार्थ्याला इतर शास्त्र शाखेतील विषय अनिवार्य असणे किंवा निवडणे शक्य असणे, उद्योग धंद्यांबरोबर जवळचा संपर्क आणि जगभरातील सर्वोत्कृष्ट संशोधकांबरोबर विद्यार्थांना संपर्क साधता येण्याची शक्यता ही प्रमुख कारणे असावीत. परंतु या बरोबरच भारताच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या व अतिशय भिन्न पार्श्वभूमी असलेल्या वर्गमित्रांबरोबर घेतलेले सहशिक्षण आणि इन्स्टिट्यूट मध्ये असलेले पारंपारिक बौद्धिक वातावरण या दोन्ही घटकांचाही पदवीधरांची गुणवत्ता वाढवण्यासाठी उपयोग होत असला पाहिजे.

पुढील काळात अतिशय वेगवेगळ्या क्षेत्रातील विषयांमधील उच्चतम संशोधन व्हावे यासाठी इन्स्टिट्यूट अतिशय प्रयत्नशील आहे. ते पहाता या माझ्या इन्स्टिट्यूटचा जगभरातील सर्वोत्कृष्ट पदवीधर तयार करणार्‍या पहिल्या 10 संस्थामध्ये लवकरच समावेश होईल या बद्दल माझी खात्रीच आहे.

11 जानेवारी  2013

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

3 thoughts on “पदवीधरांची गुणवत्ता आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स

  1. >>>>>उद्योग धंद्यांबरोबर जवळचा संपर्क आणि जगभरातील सर्वोत्कृष्ट संशोधकांबरोबर विद्यार्थांना संपर्क साधता येण्याची शक्यता

    भारतातल्या इतरही अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विषयक शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये असे होईल तो सोनियाचा दिनू. तोपर्यंत शिक्षण सम्राटांचे खजिने भरण्याशिवाय दुसरे काहीही होणार नाही.

    Posted by सुरजित थोरात | जानेवारी 11, 2013, 6:47 pm
  2. something Indian that gives joy and satisfaction for a change.

    Posted by suresh Purohit | जानेवारी 12, 2013, 4:37 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: