.
Science

भारतीय सैनिकांसाठी नवी दिव्यदृष्टी


पूर्वीच्या काळात प्रत्येक सैनिकी तुकडीमध्ये काही अचूक नेमबाज असत. शत्रूच्या मर्म स्थानी प्रहार करून युद्धाचे पारडे आपल्या बाजूला फिरविण्यासाठी तो एक हमखास उपाय मानला जात असे. परंतु आता आधुनिक कालातील युद्धांमध्ये फक्त अचूक नेमबाज तुमच्याकडे असणे हे लढाईमध्ये निर्णायक बदल घडवून आणण्यासाठी पुरेसे ठरत नाही. पायदळाचे सैनिकाला मोठे मदतनीस ठरणारी अनेक नवी उपकरणे आता आधुनिक सैनिक वापरात आणू लागले आहेत. यामध्ये औष्णिक प्रतिमा पडद्यावर उमटवून रात्रीच्या अंधारात सैनिकाला दृष्टी देणारे थर्मल इमेजर्स (thermal imagers) किंवा अंतराळात सज्ज असलेल्या उपग्रह मालिकेच्या द्वारा शत्रूच्या ज्या स्थानावर मारा करायचा आहे ते स्थान जगभरात कोठेही असले तरी त्या स्थानाचे अक्षांशरेखांश अचूकपणे सांगणारी जी.पी.एस. स्थान प्रणाली (GPS or Global positioning system) किंवा लेसरच्या सहाय्याने शत्रूचे स्थान तुमच्या स्थानापासून बरोबर किती अंतरावर आहे हे अचूक सांगणारी लेसर अंतर मापक प्रणाली (laser range finder) या सारखी अनेक उपकरणे पायदळ सैनिकांच्या मदतीसाठी आता उपलब्ध आहेत.

जगभरच्या सैनिकी दलांमध्ये आता पायदळाच्या सैनिकांना, हातात धरून वापरता येईल, अगदी कमी वजन असेल आणि एकत्रितपणे बहुविध कार्यप्रणाली अंमलात आणू शकेल (a hand-held, lightweight, fully integrated multi-function system (IMFS) अशा उपकरणाने सज्ज करण्याची पद्धत रूढ होत चालली आहे. असे उपकरण जवळ असले तर ते सैनिक त्यांना जेथे मारा करावयाचा आहे त्या लक्षाला शोधून काढून त्याची ओळख पटवून घेऊन त्याचे स्थान नेमके कोठे आहे हे सहज रित्या माहिती करून घेऊ शकतात. या उपकरणामुळे हे सैनिक गुप्तपणे शत्रूची टेहेळणी व आज्ञा मिळाल्यास त्यावर त्वरित मारा करू शकतात.

डेहराडून येथे असलेली भारतीय सैन्यदलाची उपकरण संशोधन व विकसन प्रयोगशाळा (Instruments Research and Development Establishment (IRDE) गेली कित्येक वर्षे

प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेल्या थर्मल इमेजर्स, जी.पी.एस स्थान प्रणाली, लेसर आधारित सुटसुटीत उपकरणे आणि इलेक्ट्रोऑप्टिक्स प्रकारची टेहेळणी आणि तोफांना लक्षावर बरोबर नेम धरण्यासाठी उपयुक्त अशा प्रकारच्या उपकरणांचे संशोधन व विकसन करण्याच्या प्रकल्पावर कार्य करत आहे. भारतीय पायदळाने आता या प्रयोगशाळेने विकसित केलेली व एकत्रितपणे बहुविध कार्यप्रणाली अंमलात आणू शकणारी नवी उपकरणे बनवून त्यांचा पायदळाला पुरवठा करण्याची 70 कोटी रुपयांची मागणी नोंदवली आहे.

या नवीन उपकरणामध्ये थर्मल इमेजर, लेसर रे न्ज फाइंडर, सी.सी.डी (colour charge-coupled-device) कॅमेरा, जी.पी.एस. स्थान निश्चित करण्याची प्रणाली आणि डिजिटल मॅगनेटिक कंपास एवढ्या विविध कार्यप्रणाली करणार्‍या प्रणाली एकत्रित केलेल्या आहेत.

यापैकी लेसर रेन्ज फाइंडर, एक लेसर किरण लक्षावर पाठवून त्याचे स्थान, अंतर व अक्षांश, रेखांश अचूकपणे सांगू शकतो. थर्मल इमेजर, रात्रीच्या अंधारात लक्षाची प्रतिमा या उपकरणाच्या पडद्यावर दाखवू शकतो. सी.सी.डी.कॅमेरा लक्षाची छायाचित्रे उजेडात घेऊ शकतो आणि जी.पी.एस. प्रणालीने लक्षाचे अचूक स्थान नकाशावर दाखवता येते. हे उपकरण साधारणपणे 300 मिमि. किंवा 1 फूटभर लांब असून याचे वजन 3.5 किलो असल्याने ते सहजपणे सैनिकांना बरोबर नेणे शक्य आहे. हे उपकरण खालील कामासाठी उपयुक्त ठरावे. हे उपकरण सैनिकांना मारा करण्याचे लक्ष शोधून काढणे, शत्रू प्रदेशाची टेहेळणी करणे, शत्रूच्या गुप्त हेरांना किंवा टेहेळणी करणार्‍यांना शोधून काढणे त्याचप्रमाणे अतिरेकींचा शोध करणे कामांसाठी खूपच उपयुक्त ठरावे.

या उपकरणामुळे भारतीय सैन्यदलातील सैनिकांना नवीन दिव्यदृष्टीच प्राप्त होणार आहे असे म्हटले तरी फारसे चूक ठरणार नाही.

18 डिसेंबर 2012

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

One thought on “भारतीय सैनिकांसाठी नवी दिव्यदृष्टी

  1. भारताने ज्यू राष्ट्र व अमेरिकेसोबतच संयुक्त प्रकल्प उभारून अश्या शस्त्रास्त्रांची व उपकरणांची निर्मिती केली पाहिजे

    Posted by ninad kulkarni | डिसेंबर 19, 2012, 3:25 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: