.
Uncategorized

वसुंधरा दिनाची खास भेट


रविवार दिनांक 22 एप्रिल रोजी जगभर एका आगळा वेगळा दिन साजरा केला गेला. या दिनाला वसुंधरा दिन किंवा Earth Day असे मोठे समयोचित नाव दिले गेले आहे. पर्यावरणातील बदल, प्रदुषण आणि उर्जेची वारेमाप उधळपट्टी टाळून पृथ्वी परत एकदा कशी हरित करता येईल याकडे लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी हा दिन साजरा केला जातो आहे. हा दिन साजरा केले जाण्याचे हे 42वे वर्ष आहे.

या दिवशी, हॉलंड मधील विख्यात व जगप्रसिद्ध कंपनी ‘फिलिप्स’ यांनी एका अभूतपूर्व असे एक उत्पादन अमेरिकेमध्ये सादर केले आहे. कमीतकमी 20 वर्षे तरी आयुष्य असलेला विजेचा बल्ब या कंपनीने ग्राहकांसमोर सादर केला आहे. 2 वर्षांपूर्वी अमेरिकेच्या उर्जा विभागाने एका स्पर्धा जाहीर केली होती. “Bright Tomorrow Lighting Prize”  हे नाव असलेल्या या स्पर्धेमध्ये उत्पादकांना कमीत कमी उर्जा वापरणारा व जास्तीत जास्त प्रकाश देणारा व अनेक वर्षे आयुष्य असलेला विजेचा बल्ब सादर करण्याचे आव्हान दिले होते. ‘फिलिप्स’ कंपनीचा हा दिवा या स्पर्धेमधे उतरवलेला एकुलता एक दिवा होता व सतत 18 महिन्यांच्या चाचणीनंतर हा दिवा स्पर्धेत उतरवला गेला होता. तांत्रिक दृष्ट्या योग्य असल्याने या बल्बने साहजिकच या स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवले होते. हा स्पर्धा विजेता बल्ब आता सर्व साधारण ग्राहकांना 50 अमेरिकन डॉलर्स किंवा अंदाजे 2500 रुपये या किंमतीला उपलब्ध झाला आहे. कंपनीच्या मताने, एकदा पुरेशा संख्येने उत्पादन करता येऊ लागले की या बल्बची किंमत 25 अमेरिकन डॉलर्स पर्यंत खाली येऊ शकेल. फिलॅमेंट असलेला 60 वॅटचा बल्ब जेवढा प्रकाश देऊ शकतो तेवढाच प्रकाश हा 10 वॅटचा बल्ब देऊ शकतो शकतो आणि कमीतकमी 30,000 तास तरी या बल्बचे आयुष्य आहे असा कंपनीचा दावा आहे. सरासरीने रोज 4 तास या दराने या बल्बचे आयुष्य 20 वर्षे तरी होते. बल्बमध्ये अर्थातच LED  (light-emitting diode ) या तंत्रज्ञानाचा वापरा केलेला आहे.

कंपनीच्या मताने हा बल्ब सध्याच्या वीज पुरवठा दरांच्या हिशोबाने 20 वर्षात 165 अमेरिकन डॉलर्सची तरी बचत ग्राहकांसाठी करणार असल्याने या बल्बची 50 डॉलर ही किंमत योग्यच आहे. पांढरा शुभ्र आणि मंद प्रकाश देणारा हा बल्ब 940 ल्युमेन्स ( lumens ) एवढ्या शक्तीचा प्रकाश बाहेर टाकू शकतो आणि फिलॅमेंट बल्बच्या मानाने हा बल्ब 83% तरी जास्त कार्यक्षम आहे. थॉमस एडिसनने शोधून काढलेला फिलॅमेंट बल्ब अनेक दशके वापरात आहे. परंतु हा बल्ब उर्जेची फार मोठी नासाडी करत असतो. त्यामुळे अनेक देशांमध्ये या बल्बची जागा सीएफएल (CFL) दिव्यांनी घेतलेली आहे. मात्र या दिव्यांच्या बांधणीत पार्‍याचा वापर होत असल्याने या प्रकारचा जळलेला दिवा कचर्‍यात फेकून देणे हे पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक वा हानीकारक असल्याचे आढळून आले आहे.

या बल्बला खरी स्पर्धा जवळपास तितकेच कार्यक्षम असलेल्या CFL दिव्यांकडून साहजिकच होणार आहे. या कारणामुळेच हा बल्ब पर्यावरणाच्या दृष्टीने कसा बिनधोक आहे हे फिलिप्स कंपनीकडून परत परत सांगितले जाते आहे व ते स्वाभाविकच आहे. फिलिप्स कंपनीच्या मताने अमेरिकेतील सर्व फिलॅमेंट बल्ब जर या दिव्याने बदलले तर प्रति वर्ष अमेरिका 3.9 बिलियन अमेरिकन डॉलर्स एवढी किंमता असलेली 35 टेरॅवॅट-तास एवढी विद्युतउर्जा वाचवू शकेल. या बचतीमुळे 20 मिलियन मेट्रिक टन एवढे कार्बन उत्सर्जन (रस्त्यावरून चालणार्‍या 4 मिलियन गाड्या रस्त्यावरून काढून टाकण्यासारखे) कमी होईल. हा बल्ब ग्राहकांना स्वस्तात देण्यासाठी फिलिप्स कंपनीने 280 वीज पुरवठा कंपन्यांबरोबर करार केलेले असून आणखी 230 कंपन्यांबरोबर या जूनपर्यंत करार होतील.

विजेचा बल्ब ही वस्तू आता काही महिने किंवा काही बर्षे यानंतर बदलण्याची गोष्ट राहणार नसून 2 दशकांनंतर बल्ब बदलण्याचा विचार करावा लागणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने कशी क्रांती घडवून आणणे शक्य आहे याचे हा बल्ब हे एक उत्तम उदाहरण आहे यात  शंकाच नाही.

24 एप्रिल 2012

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

10 thoughts on “वसुंधरा दिनाची खास भेट

 1. I am an electrical engineer n i am so happy to know this info about new development in bulbs….
  🙂 🙂 🙂

  Posted by carolswilliams | एप्रिल 24, 2012, 3:57 pm
 2. मस्त लेख.पण सौर उर्जेचा दिवा जास्त व्यावहारिक पडेल असे वाटते.

  Posted by full2dhamaal | एप्रिल 24, 2012, 6:10 pm
 3. This is an exciting news….. I am quite sure that soon or later computer silicon chip will be replace by organic chip…

  Posted by rajesh bhosale | एप्रिल 25, 2012, 2:39 सकाळी
 4. अतिशय सुंदर आणि औचित्यपूर्ण माहिती आपण दिलेली आहेत.
  हे दीर्घजीवी, पर्यावरणस्नेही, ऊर्जाबचत करणारे, मूल्यप्रभावी दिवे आपले भविष्य उज्ज्वल करतील ह्यात मुळीच संशय नाही.

  जुने द्या, नवे घ्या, दिवे दिव्य-दिप्ती ।
  चिरायू ठरू द्या, ही अनमोल क्रांती ॥

  नरेंद्र गोळे २०१२०४२८

  Posted by नरेंद्र गोळे | एप्रिल 28, 2012, 9:17 सकाळी
 5. फिलिप्स वाल्यांचा जवाब नही ! आणि चंद्रशेखर काकांचा पण !

  संदीप

  Posted by sandeep deokar | मे 2, 2012, 3:41 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: