.
Science

सूर्यावरील महावावटळ ; A solar Tornado


एका पाठोपाठ एक निर्माण झालेल्या अग्निशिखा(Solar Flares)

उन्हाळ्याच्या दिवसात भर दुपारी गरम गरम वारे वाहू लागतात व अकस्मात एखाद्या भोवर्‍यासारखे गरगर फिरणारे धुळीची वावटळ निर्माण होते व ही वावटळ कशीही व कोठेही भरकटत जाते हा अनुभव आपल्या सर्वांना नेहमीच येतो. अमेरिकेसारख्या देशात तर या वावटळी महाविशाल असतात व त्या शेकडो मैल सुद्धा प्रवास करतात व आपल्या कचाट्यात सापडलेली घरे, गाड्या यांना भिरकावून देत असतात.

अमेरिकेच्या अवकाश संशोधन विभागामधील सोलर डायनॅमिक्स ऑब्झरवेटरीने (NASA’s Solar Dynamics Observatory) नुकताच सूर्याच्या पृष्ठभागावरील अशाच एका वावटळीचा व्हिडिओ नुकताच प्रसिद्ध केला आहे. अर्थात सूर्यावर धूळ नसल्याने या वावटळीत सूर्यावरील विद्युतभारित वायू (sun’s plasma) हाच सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रात गोल गोल फिरत व भरकटत राहिला. या वावटळीतील वारे अंदाजे तासाला 300,000 मैल या गतीने वहात होते. पृथीवरील सर्वात तीव्र समजल्या जाणार्‍या वावटळींच्यात (F5 ) सुद्धा, वारे जास्तीतजास्त तासाला 300 मैल या पेक्षा जास्त गतीने वाहत नाहीत. सूर्यावरील ही वावटळ सुमारे 30 तास भरकटत होती.

embeddedVideo.php?storyId=147071253

(हा व्हिडिओ बघण्यासाठी वरील दुव्यावर क्लिक करा.)

सूर्य हा अतिशय उद्रेकी तारा समजला जातो. आण्विक कण व उर्जेचे तो सतत प्रसारण करत असतो. या प्रसारणामुळेच पृथ्वीवर ऑरोरा प्रकाश व चुंबकीय वादळे निर्माण होत असतात. सूर्यावरील घडामोडी पहाण्यासाठी जगभरात आता सूर्य निरिक्षण दूरादर्श उभे केले जात आहेत. भारतात लडाखमध्ये असाच एक सूर्य दूरादर्श उभारण्यात येणार आहे.

19 फेब्रुवारी 2012

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

4 thoughts on “सूर्यावरील महावावटळ ; A solar Tornado

 1. लेख छान आहे .

  मी ही खगोलअभ्यासक आहे . अमेरिका अन नासा ग्रेट आहेत खगोलशास्त्रात त्यांनी माहीतीची प्रचंड भर घातली आहे . खगोलशास्त्रात संशोधन करायचे असेल तर अमेरिकेतच जन्माला यावं असं कधी कधी वाटतं . . . . . . .. कारण त्यांच्या कडे खूप सोई सुविधा आहेत .

  असो ………………

  तुम्ही तुमच्या दुर्बीनीचा सध्या उपयोग करतात का? मला जाणून घ्यायला आवडेल.

  संदीप

  Posted by संदीप देवकर | फेब्रुवारी 19, 2012, 5:44 pm
  • संदीप -पाच वर्षे मागेपर्यंत मी दर्बिण पुष्कळ वापरत असे. आता पुण्यात तारे बघणे कठिणच होत चालले आहे त्यामुळे क्वचितच वापरली जाते.

   Posted by chandrashekhara | फेब्रुवारी 20, 2012, 6:16 सकाळी
 2. video apratim aapan suryala hiranya garbh ka mhanto hya video varun samajate

  Posted by ashok patwardhan | फेब्रुवारी 28, 2012, 4:58 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: