.
ताज्या घडामोडी Current Affairs, Science

एकाच माळेचे मणी- भाग 3; Birds of the same feather and flock? -Part III


2011 सालच्या सुरुवातीस टीव्ही माध्यमांनी जेंव्हा Antrix-Devas घोटाळ्याच्या बातम्या प्रसृत केल्या त्या वेळी केंद्रीय सरकार, 2जी घोटाळा आणि राष्ट्रकुल खेळ घोटाळा यांमुळे प्रचंड दबावाखाली आले होते. कदाचित त्यामुळे केंद्र सरकारने त्वरित पावले उचलली व 16 फेब्रुवारी रोजी, Antrix-Devas करारच रद्दबातल करून टाकला.या नंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दोन गट स्थापन करण्यात आले. यापैकी पहिला गट निवृत्त सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनर श्री. प्रत्युश सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली नेमला गेला तर दुसरा गट बी. के. चतुर्वेदी व रॉडम नरसिंम्हा या दोघांचा बनवला गेली. या दोन्ही गटांनी आपले अहवाल आता सरकारला सादर केले आहेत. दरम्यान भारताचे मुख्य लेखा परिक्षक किंवा कॉम्प्ट्रोलर आणि ऑडिटर जनरल ऑफ इंडिया (CAG) यांनीही या प्रकरणाची निराळी चौकशी हातात घेतली. हा अहवाल तयार असून तो लोकसभेच्या पटलावर मार्च महिन्यात सादर होईल. परंतु या प्रकरणावर CAGने ओढलेले ताशेरे एका वृत्त वाहिनीने या आधीच प्रसिद्ध केले आहेत.

 

चौकशी करणार्‍या या दोन्ही समित्या व CAG या प्रकरणाबद्दल काय म्हणतात ते थोडक्यात पाहूया. प्रत्युश सिन्हा गटाच्या अहवालाप्रमाणे या प्रकरणात काही व्यक्तींनी व्यवस्थापकीय आणि कार्यवाही करण्याबाबतचे नियम धुडकावून लावले असून त्यांनी एकत्रितपणे कारस्थान करणे‘ (collusive behaviour) या सारखे वर्तन केल्याचेही संकेत मिळाले आहेत.. या पद्धतीचे वर्तन करणार्‍या व्यक्तीत Antrix संचालक मंडळाचे चेअरमन व भारत सरकारच्या अवकाश विभागाचे सचीव श्री, जी. माधवन नायर, ISRO मधील SATCOM कार्यालयाचे संचालक श्री. भास्करनारायण, Antrixचे मुख्य संचालक श्री. के.आर. श्रीधरमूर्ती आणि ISRO उपग्रह केंद्राचे माजी संचालक श्री. के.एन. शंकर यांचा समावेश आहे.”

 

The deal reflects not only serious administrative and procedural lapses but also a suggestion of collusive behaviour on the part of certain individuals.” The report holds following persons responsible for various acts of commissions; Chairman of the Antrix Board and Secretary, Department of Space; Mr. G. Madhavan Nair; Director of the SATCOM office at ISRO; Mr. A.Bhaskaranarayana; Mr. K.R. Sridharamurthi, former Managing Director of Antrix, and Mr.K.N. Shankara, former director of the ISRO Satellite Center.”

 

हे सर्व अधिकारी अतिशय वरिष्ठ दर्जाचे सरकारी अधिकारी असून आता या सर्वांना कोणतेही सरकारी पद ग्रहण करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे.या शिवाय सिन्हा कमिटीने खालील अधिकार्‍यांनी नियमबाह्य वर्तनाकडे काणाडोळा ( acts of omission) केल्याचे म्हटले आहे. या अधिकार्‍यांत स्पेस कमिशनचे माजी सदस्य श्री. एस.एस. मीनाक्षीसुंदरम आणि वीणा एस.राव, जी. बालचंद्रन व आर. जी. नाडादुर या अवकाश विभागाच्या तीन अतिरिक्त सचिवांचा समावेश आहे. या सर्व व्यक्तींनी माहिती दडवून ठेवणे, सत्य परिस्थिती दुसरीच असल्याचे भासवणे आणि खर्चाचे आकडे कमी असल्याचे दर्शवणे (concealing information, obfuscating facts and dissimulating cost calculations) या सारखी वर्तने केलेली आहेत.

 

Sinha team also finds, responsible for the acts of omission, following persons; the former Member (Finance), Space Commission, S.S. Meenakshisundaram; and three former Additional Secretaries of the Department of Space, Veena S. Rao, G. Balachandhran and R.G. Nadadur. Sinha report also gives detailed examples of varius misdeeds by these persons such as concealing information, obfuscating facts and dissimulating cost calculations.

 

चतुर्वेदीनरसिम्हा गटाने, वरीलपैकी बहुतेक लोकांना या घोटाळ्यासाठी जबाबदार धरलेले असून Antrixने स्वाक्षरी केलेल्या कराराबद्दल टिपण्णी करताना म्हटले आहे की Antrixने हा करार ज्या कंपनीबरोबर केला त्या कंपनीचे आरंभीचे भागभांडवल फक्त 1 लाख रुपये होते आणि भागधारकांची संख्या फक्त 2 होती. करार केलेल्या या कंपनीसाठी Antrix आणि ISRO अंदाजे 800 कोटी रुपयाची गुंतवणूक करणार होते आणि या कंपनीला असाधारण अशा बर्‍याच मोठ्या सवलती या काराराप्रमाणे दिल्या गेल्या होत्या. याच स्पष्ट अर्थ असा होतो की ज्यांच्याकडचे तंत्रज्ञान अजुन कोठेही वापरले किंवा तपासले गेलेले नव्हते व ज्यांना काहीही आर्थिक पाठबळ नव्हते अशा लोकांवर ISRO मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करण्यास तयार होते. आर्थिक दृष्टीने हा करार कमजोर होता.

CAG चा अहवाल (एका वृत्त वाहिनीच्या बातमीप्रमाणे) ISROचे मुख्य जी. माधवन नायर आणि ISRO आणि Antrix चे इतर वरिष्ठ अधिकारी यांना देवाज बरोबरच्या करारासाठी दोषी मानतो आहे.

या तिन्ही अहवालांवरून कोणाच्याही हे सहज लक्षात येऊ शकते की या वरिष्ठ सरकारी अधिकार्‍यांनी कारस्थान सदृष्य वर्तन करून सत्य परिस्थिती दुसरीच असल्याचे दर्शविणे व अचूक रित्या सत्य परिस्थितीचे वर्णन न करणे या सारखे वर्तन केले आहे. या वर्तनामागचा त्यांचा हेतू काय असेल याचा सहज अंदाज बांधणे शक्य आहे. अर्थात प्रत्यक्षात काय घडले आहे हे या मंडळींची चौकशी केल्यावरच उघडकीस येऊ शकेल.

2जी घोटाळ्यासंबंधीच्या एका रिट अर्जावर भाष्य करताना भारताच्या सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की स्पेक्ट्रम (विद्युतचुंबकीय लहरींच्या वर्ण पटामधील) बॅन्डविड्थ ही एक राष्ट्रीय संपत्ती आहे. भारतीय लोकांच्या मालकीची ही राष्ट्रीय संपत्ती, सरकारकडे एक ट्रस्टी म्हणून सुपूर्त केलेली असते. सरकारचे हे पवित्र कर्तव्य बनते की ही राष्ट्रीय संपत्ती कोणत्याही व्यक्तीच्या हितासाठी वापरली न जाता फक्त देशाच्या हितासाठी वापरली जाईल. वर उल्लेख केलेल्या सरकारी अधिकार्‍यांच्या वर्तनावरून हे स्पष्ट जाणवते आहे की बॅन्डविड्थचा वापर करताना देशाच्या हितापेक्षा दुसरा कोणता तरी विचार त्यांच्या मनात होता.

दिल्लीमधील नोकरशाहीच्या जंजाळात एखादा चतुर अधिकारी सहजपणे नियमबाह्य वर्तन कसे करू शकतो हे या उदाहरणावरून स्पष्ट होते आहे. परंतु गेल्या काही वर्षात अशा प्रकारच्या वर्तनाची प्रमाणाबाहेर उदाहरणे दिसू लागली आहेत हेही सत्य आहे.. माझ्या मताने, युती व आघाड्यांच्या सध्यच्या राजकारणामुळे पंतप्रधान कार्यालयाची कठोर निर्णय घेण्याची क्षमता कमजोर झाली आहे व हेच या परिस्थितीला खरे तर कारणीभूत आहे.

(समाप्त)

 

9 फेब्रुवारी 2012

 

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

5 thoughts on “एकाच माळेचे मणी- भाग 3; Birds of the same feather and flock? -Part III

 1. आपले तीनहि लेख आज वाचले. लेख अतिशय माहितीपूर्ण आहेत. मी व्यवसायाने इंजिनिअर होतो. सर्वसाधारणपणे घडामोडींची माहिति मिळवण्यात मला रस आहे. या प्रकरणाबद्दल मात्र मला काही माहिती नव्हती. आपली वर्तमानपत्रे काय दर्जाची आहेत हे आपण सर्व जानतोच त्यामुळे त्यांचेकडून जनतेला अशा प्रकरणांची व्यवस्थित माहिती मिळण्याची मुळीच आशा करताम्येत नाहीं. तुमच्यासारख्या अधिकारी व्यक्तीने हे काम केलेले पाहून मला समाधान वाटले. ISRO बद्दल माझा भ्रमनिरास झाला आहे. ज्या सम्स्थेने देशाला अब्दुल कलामसारखा अध्यक्ष दिला तिची केवढी ही अधोगति!

  Posted by pkphadnis | फेब्रुवारी 9, 2012, 10:32 सकाळी
  • पीकेफडणीस
   तांदुळात काही खडे सापडले म्हणून सर्व तांदूळ आपण थोडेच फेकून देतो. ISRO मधे पुष्कळ चांगली मंडळी आहेत वे ती चांगले कार्य करत आहेत. प्रतिसादासाठी धन्यवाद

   Posted by chandrashekhara | फेब्रुवारी 10, 2012, 6:37 सकाळी
 2. चंद्रशेखरजी

  लेख छान आहे . वर्तमानपत्रात देखिल एवढे डीटेल कोणी लिहिले नाही जे आपण लिहिले. इतक्या दिवसांपासून ह्या घोटाळ्याची चर्चा सूरू आहे पण घोटाळ्याचे स्वरूप समजत नव्हते . आपल्यामूळे ते चांगले समजले . फारच हायटेक घोटाळा म्हणावा लागेल हा . भारतात घोटाळ्यांसाठी अंतराळक्षेत्र देखिल अपवाद राहीले नाही . फार पध्दतशीर इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी हा घोटाळा केला . घोटाळ्यात मुख्यत्वे सगळे साउथइंडीयन शास्त्रज्ञ आहेत हा घोटाळा वाचल्यावर असे वाटते की लांडग्यांनी कळपाने एखाद्या सावजाची निर्घुण शिकार करावी असे वाटते .

  तुमचे म्हणणे बरोबर आहे केंद्रात साउथइंडीयन पक्षांची काँग्रेसबरोबर युती असल्याने हा घोटाळा समजायला अन कारवाई करायला काहीसा उशिर झालाय . ह्यात कदाचित काही राजकिय पक्ष व नेत्यांचे देखिल हितसंबध असतील

  ह्याप्रकरणावर प्रकाश टाकला त्याबद्दल आपले आभार
  संदीप

  Posted by संदीप देवकर | फेब्रुवारी 9, 2012, 3:21 pm
  • संदीप
   प्रतिसादाबद्दल धन्यवाद. यातून दक्षिण व उत्तर भारतीय असा काही निष्कर्ष काढू नका कृपया. गैर व्यवहार करणारे सगळीकडे असतात तसे चांगले लोकही सगळीकडे असतात.

   Posted by chandrashekhara | फेब्रुवारी 10, 2012, 6:39 सकाळी
   • चंद्रशेखरजी

    उत्तर कींवा दक्षिण भातरतिय असा काही भेद जाणिवपूर्वक दाखवण्याचा माझा खास उद्देश नव्हता ?
    पण लेख वाचतांना एक गोष्ट जी फार कधींपासून माझ्या मनात होती ती अशी की इस्त्रो मध्ये महत्त्वाच्या पदांवर विशेषतः संचालक पदावर साउथइंडीयन व्यक्ति व्यतिरिक्त अन्य भारतिय व्यक्ति असल्याचे क्वचित वाचण्यात आले आहे .मी जेव्हापासून इस्त्रोबद्दल जाणून आहे तेव्हापासून प्रो. यु. आर. राव . , के. कस्तुरिरंगन , जी. माधवन . अशीच नावे आढळली आहेत . अन्य गुजराती , मराठी , शिख ही मंडळी इस्त्रोत कमी असावी असा माझा समज आहे , बाकी जाणिवपुर्वक मी त्यांना कमी लेखत नाही . तुम्ही तसा काही गैरसमज करू नका

    संदीप

    Posted by संदीप देवकर | फेब्रुवारी 10, 2012, 3:21 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: