.
Environment-पर्यावरण

भारतातील विषाणूयुक्त पाणी आणि हवा; India’s sickening air and water


 अमेरिकेतल्या येल आणि कोलंबिया विद्यापीठांतील The Yale Center for Environmental Law and Policy and Columbia’s Center for International Earth Science Information Network या दोन विभागांनी नुकतेच एका जागतिक पहाणीचे निष्कर्ष प्रसिद्ध केले आहेत. Environmental Performance Index 2012 या नावाचा हा अहवाल, स्विट्झरलॅन्ड मधील डाव्होस गावात सध्या चालू असलेल्या World Economic Forum मध्ये सादर करण्यात आला.
पर्यावरण संबंधित निरनिराळ्या प्रकारची 22 निरीक्षणे करून खाली दिलेले 10 गट तयार करण्यात आले. या प्रत्येक गटात भारताला मिळालेला क्रमांक पुढे दिला आहे.
• Environmental Burden of Disease – 110
• Water (effects on human health) -104
• Air Pollution (effects on human health) – 132
• Air Pollution (ecosystem effects) -73
• Water Resources (ecosystem effects) – 122
• Biodiversity and Habitat – 97
• Forestry – 21
• Fisheries- 35
• Agriculture – 126
• Climate Change- 55
यापैकी प्रत्येक गटाखाली, 132 देशांचे क्रमांक या अहवालात लावलेले आहेत. भारतातील एकूणच दूषित हवामान, पर्यावरणासंबंधीची आपली एकूण अनास्था बघता, भारताचा क्रमांक या यादीत शेवट्च्या काही देशांत असणार हे भारतात राहणार्‍या कोणालाही सहजपणे लक्षात येईल. या पाहणीतील काही रोचक निरीक्षणे अशी आहेत.
सर्व 22 निरिक्षणे किंवा 10 गट एकत्रित करून लावलेल्या यादीत भारताचा क्रमांक 125 वा आहे. चीनचा क्रमांक या यादीत 116 वा आहे. भारताखाली या यादीत कुवेत, येमेन, दक्षिण आफ्रिका, कझाखस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान व इराक हे देश आहेत.
मानवी आरोग्यावर होणारा प्रदुषित हवेचा परिणाम (terms of air quality with regard to its effect on human health.)– भारताचा क्रमांक शेवटचा 132 (मिळालेले गुण 3.73/100). सबंध दक्षिण एशिया व चीन या निरिक्षणात शेवटच्या 5 स्थानांवर आहेत. चीन-128, पाकिस्तान -129, बागला देश- 130
जंगले, मत्स्यव्यवसाय, हवेतील प्रदुषण व जैविक वैविध्यता या गटात जरी भारताचा क्रमांक वर असला तरी जल स्रोतांचा मानवी जीवनावरील परिणाम, शेती या गटात भारत बर्‍याच खालच्या क्रमांकावर आहे.
प्रदूषणामुळे भारतातील जीवनमान कसे खालावत चालले आहे याचा अनुभव भारतात राहणार्‍या प्रत्येकाला येतोच आहे. फक्त या खालावलेल्या जीवनमानाला, या अहवालानुसार आकड्यांमध्ये आणले आहे. ज्या पद्धतीने भारतात पर्यावरणाचा र्‍हास सतत चालू आहे तो बघता या यादीत भारताचा क्रमांक वर येण्याची शक्यता पुढील काही वर्षांत तरी धूसरच आहे.
31 जानेवारी 2012
Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

6 thoughts on “भारतातील विषाणूयुक्त पाणी आणि हवा; India’s sickening air and water

 1. इंडिया म्हणजे नक्की कोणता भूभाग ग्राह्य धरला जातो ते काही प्रमाणभूत धरता येत नाही… तेव्हा सगळा आगळा गोंधळ मोजमापणीतच आहे… असे आमचे प्रामाणिक वोट आहे…

  Posted by मिस्टरिंडिया... | फेब्रुवारी 5, 2012, 12:11 pm
 2. चंद्रशेखरजी
  भारताची एकूणच अशी अवनती व्हायला माझ्या मते जर काही जबाबदार असेल तर ते म्हणजे ह्या देशाची भयंकर लोकसंख्या . खूप जास्त लोकसंख्या असल्यामूळे सरकारी पातळीवर सुधारक योजना राबवायला खूप त्रास होतो . प्रशासन हतबल होते . प्रशासनात जर ज्यादा कर्मचारी भरायचे तर सरकारी तिजोरीवर आर्थिक भार पडतो . एकात एक अशा बर्‍याच समस्या निर्माण होतात . शिवाय लोकांची मानसिकता सरकारी योजनांना अनूकूल करायला ही वेगळा त्रास होतो . तुम्ही म्हणाला की चिन ची ही लोकसंख्या जास्त आहे मग त्यांच्या कडे कसा विकास झाला . तसं पाहिलं तर ह्या गटात चिन ही आपल्या आसपासच आहे . त्यांना ही लोकसंख्या वाढीचा तोटा सहन करावाच लागतोय . चिन चा एक फायदा असा आहे की त्यांच्या देशात निदान आपल्या सारखी भाषिक , धार्मिक , व जातवार विविधता नाहिए ( असलीच तर आपल्या पेक्षा कमी असावे ) म्हणून त्यांना सुधार योजना राबवायला फारसा त्रास होत नसावा . शिवाय त्यांचं सरकार खूप खंबीर अन कठोर ही आहे बळजबरीने का होईना एखादी योजना अमलात आणू शकतात

  आपल्या कडे मात्र एखादी नविन योजना की जिच्याने लोकांचे जिवणमान सुधारेल देशाचं नाव आंतराष्ट्रिय पातळीवर वर जाईल राबवायला गेले अन ती योजना एकाद्या विशिष्ट गटाच्या लोकांना रुचली नाही किंवा त्यांचे हितसंबंध आड येत असतील त्यास विरोध करतात
  संदीप

  Posted by संदीप देवकर | फेब्रुवारी 5, 2012, 4:38 pm
 3. याचा न छापलेला भाग आमचे तंत्रज्ञान विकत घ्या असा आहे.

  Posted by मनोहर | फेब्रुवारी 5, 2012, 10:47 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: