.
History इतिहास

1143 वर्षांपूर्वीचे छापील पुस्तक- वज्र सूत्र; 1143 year old printed book- Diamond Sutra


In the ancient and medieval times, the cultural and commercial interaction between countries like China, Persia and India from Asia and European nations on the Mediterranean sea coast, mainly took place through a 7000 mile long caravan route. Traders, monks and preachers, nomadic tribes and soldiers on campaigns, travelled on this very same caravan route. Even though the caravans carried all kind of goods, bulk of the trade was of the items like silks, musk, perfumes, jewels and decorative glass. Because of this, the caravan route became known as the ‘Silk Route’. This route was in use for at least three millennia. The main silk route started from Xian in Chaina and reached the borders of the Roman empire through Kazakhstan, Iran and Iraq. Another subsidiary or feeder road came to India via Iran and Afghanistan. Number of taverns and water points were built on this route for the convenience of the caravans.
A famous Archaeological explorer of twentieth century, Sir Aurel Stein,  led three expeditions on the silk route, between 1900-1901, 1906-1908, 1913-1916. Combining the three expeditions, Stein and his team walked about 25000 miles on foot. They crossed places like mountain ranges of Kashmir and Afghanistan as well as deadly deserts of ‘Takalamakan’, ‘Lop-Nor’ and ‘Gobi’ number of times. he faced number of life threatening incidences in his travels. Nevertheless, he managed to discover many ancient  frescoes, banners, books and other items of significance. Perhaps his most important discovery was ‘Magao’ or ‘1000 Buddha’ caves near the town of Dun Huang in Gansu district of China. This town was on the old silk route. Stein came to know about the ancient caves hare and befriended the self appointed monk in charge ‘Wang Uanlu’. Stein negotiated with this monk and managed to collect a huge cache of banners and document from a sealed room in these caves.


एशिया खंडातले चीन, भारत, इराण या सारखे देश आणि भूमध्य युरोपियन देश यांच्यामधे जी काही व्यापारी व सांस्कृतिक देवाणघेवाण प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडात होत असे ती 7000 मैल लांबवर पसरलेल्या एका मार्गानेच प्रामुख्याने होत असे. व्यापारी, धर्मप्रचारक, भटके टोळीवाले आणि सैनिक याच मार्गानेच जा ये करत. निरनिराळ्या प्रकारची मालवाहतुक या मार्गावरून होत असली तरी प्रामुख्याने रेशमी वस्त्र, कस्तुरी, सुगंध, औषधे,, रत्ने, मसाले, काच सामान वगैरेसारख्या ऐषारामाच्या वस्तूंचा व्यापार या मार्गावरून होत असल्याने या मार्गाला रेशीम मार्ग किंवा Silk Road असे नाव पडले. हा रेशीम मार्ग किमान 3000 वर्षे तरी वापरात होता. चीनमधल्या शियान या गावापासून सुरू होणारा मार्ग चीन, कझागस्तान, इराण, इराक या मार्गे रोमन साम्राज्याच्या सीमेपर्यंत पोचत असे तर दुसरा फाटा इराण, अफगाणिस्तान या मार्गाने भारतापर्यंत पोचत असे. या मार्गाने प्रवास करणारे व्यापारी वगैरेंच्या सोईसाठी ठिकठिकाणी सराया, पाणपोई वगैरे गोष्टी निर्माण केल्या गेल्या होत्या.
1900-01, 1906-08 आणि 1913-16 या वर्षांमधे त्या काळचा सर्वात नावाजलेला व प्रसिद्ध पुराण वस्तू संशोधक (Archaeological explorer) सर ऑरेल स्टाइन याच्या नेतृत्वाखाली तीन प्रमुख उत्खनन मोहिमा या रेशीम मार्गावर पर पाडल्या गेल्या. या तिन्ही मोहिमा मिळून ऑरेलने 25000 मैलांची पायी भ्रमंती केली. काश्मिर, अफगाणिस्तानमधल्या हिमालयांच्या रांगा किंवा Takalamakan’, ‘Lop-Nor’ आणि ‘Gobi’ यासारखी भयानक वाळवंटे त्याने व त्याच्या टीमने अनेक वेळा ओलांडली. अनेक जीवघेण्या प्रसंगातून तो पार पडला. या सगळ्यातून अनेक कलाकुसर केलेल्या वस्तु, रेशमी फलक, पुस्तके आणि रंगवलेली लाकडी पॅनेल्स त्याने शोधून काढली. ऑरेलचा सर्वात महत्वाचा शोध म्हणजे ‘मोगाओ‘ किंवा 1000 बुद्धांच्या गुहा! चीमधल्या गान्सू प्रांतातले दुनहुआंग हे शहर जुन्या रेशीम मार्गावर आहे. या ठिकाणी असलेल्या प्राचीन गुहांची माहिती ऑरेल स्टाइनला मिळाली. त्यावेळी वांग युआन्लू नावाचा एक भिक्खू या ठिकाणाची देखभाल करत असे. ऑरेलने या भिक्खूला आपलेसे केले व केवळ 220 ब्रिटिश पौंडांना या ठिकाणी असलेले अनेक दस्ताऐवज, चित्रे, रेशमी फलक खरेदी केले.
या ठिकाणी मिळालेल्या दस्ताऐवजात, या सर्व कागदपत्रांचा मेरूमणी शोभेल असा एक ग्रंथ स्टाइनला मिळाला. 11 मे 868 या दिवशी (1143 वर्षांपूर्वी), जाड कागदावर छपाई केलेला हा ग्रंथ कागदाच्या सलग गुंडाळीवर लाकडी ब्लॉक्स छपाई करून छापलेला आहे. ही कागदाची गुंडाळी तब्बल 16 फूट लांब आहे. हा ग्रंथ आहे, महायान बुद्धपंथीय ज्याला अतिशय पवित्र ग्रंथ असे मानतात ते ‘वज्र सूत्र’ किंवा डायमंड सूत्र. इ.स 520 मध्ये चिनी भिख्खू शुएन झांग हा मुख्यत: हे वज्र सूत्र मूळ स्वरूपातून मिळवण्यासाठी चीनहून भारतात खुष्कीच्या मार्गाने आला होता. अर्थात मोगाओ गुंफात मिळालेला हा ग्रंथ, शुएन झांगने भारतातून नेलेल्या मूळ ग्रंथाबरहुकूम आहे किंवा नाही हे सांगणे कठिण आहे. या ग्रंथाच्या सुरूवातीला भगवान बुद्ध सुभूतीला इअतर भिख्खूंच्या उपस्थितीत मार्गदर्शन करत असल्याचे चित्र देखील आहे.

या ग्रंथाचे मूळ संस्कृतमधले संपूर्ण नाव ‘वज्रच्छेदिकाप्रज्ञापारमितासूत्र,’ असे आहे. परंतु लघु स्वरूपात वज्र सूत्र किंवा डायमंड सूत्र(Diamond Sutra) या नावाने ते ओळखले जाते. बौद्ध सूत्रे ही मुखोद्गत करून धार्मिक भक्तीभावाने उच्चारण करावयाची असल्याने, ती उच्चारणार्‍याने आपले मुख व शरीर सर्वात प्रथम पवित्र कसे करून घ्यावे या बद्दलच्या सूचना या सूत्रात दिलेल्या आढळतात.

हे सूत्र म्हणजे भगवान बुद्धांनी दिलेले एक आख्यान किंवा प्रवचन आहे. उत्तर हिंदुस्थानातील एका वाटिकेत, एक सह्स्त्र बौद्ध भिख्खू ज्याचा भाग होते अशा एका मोठ्या जनसमुहासमोर बुद्धांनी हे प्रवचन केलेले आहे. या समुहामध्ये असलेली ‘सुभूती’ या नावाची एक व्यक्ती, बुद्धांना त्यांनी या जनसमुहाला निर्दोष ज्ञान अनुभूती (Perfection of wisdom) कशी करून घ्यावी? या बद्दल मार्गदर्शन करावे अशी विनंती करते. व त्याच्या विनंतीला मान देऊन, बुद्धांनी हे वज्र सूत्र सांगितलेले आहे.
या सूत्राचे मुख्य तत्व असे आहे की हे सर्व लौकिक जग भ्रामक आणि मिथ्या आहे त्यामुळे या जगात कोणत्याच वस्तू किंवा व्यक्ती नाहीत. एक मूळ तत्व सोडले तर दुसरे काहीच नसल्याने सजीव, निर्जीव असे काहीच नाही व त्यामुळे सुख दुख: वगैरे प्रत्यक्षात काहीच नाही. बुद्धांना अशी विचारणा होते की गंगा नदीत किती वाळूचे कण असतील? बुद्ध यावर उत्तर देतात की जेवढे वाळूचे कण आहेत तेवढ्याच गंगा नद्या जगात आहेत असेही म्हणता येईल. पण प्रत्यक्षात वाळूचे कणही नाहीत आणि गंगा नदीही नाही. सर्व जगच एक भ्रम आहे आणि हा प्रश्न विचारणारी व्यक्ती सुभूती, ही सुद्धा एक भ्रमच आहे.

भगवान बुद्ध आपल्या आख्यानात पुढे म्हणतात की बौद्ध धर्मात प्रचलित असलेली व हे लौकिक जग एक भ्रम व मिथ्य आहे हे सांगणारी अनेक सूत्रे आहेत. भ्रम किंवा मिथ्य यांच्यावर विजय मिळवण्यासाठी आवश्यक अशा निर्दोष ज्ञान अनुभूतीचे वज्र हे केवळ एक चिन्ह असल्यामुळे, या सूत्रात वर्णिलेल्या विचारविनिमयाला, ‘निर्दोष ज्ञान अनुभूतीचे वज्र सूत्र’ (Perfection of Wisdom Diamond Sutra) या नावाने पुढे ओळखले जावे. अर्थात या सूत्राला दिलेले वज्र सूत्र हे नाव सुद्धा तसे बघायला गेले तर मिथ्याच आहे. हे सर्व आणि बुद्धांचे विचार ऐकल्यावर सुभूतीच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले असे हे ‘वज्र सूत्र’ पुढे म्हणते.
स्टाइनने हा ‘वज्र सूत्र’ ग्रंथ, परत भारतात आल्यावर ब्रिटिश म्युझियमला देऊन टाकला. व गेली 100 वर्षे तो तेथेच आहे. काही दिवसांपूर्वी ब्रिटिश लायब्ररीने त्यांच्याकडील असे काही महत्वाचे ग्रंथ जालावर उपलब्ध करून दिले आहेत. त्यात ‘वज्र सूत्र’ हा ग्रंथ देखील आहे. मूळ ग्रंथ गुंडाळीवर छापलेला असून तो गुंडाळी उलगडत डावीकडून उजवीकडे वाचत जायची आहे. आंतरजालावर हा ग्रंथ 5 चित्रपृष्ठे या स्वरूपात आहे. या पुस्तकात शेवटी ” वांग जि याने आपल्या माता-पित्यांच्या वतीने शियान्टॉन्ग च्या 9व्या वर्षातील 4थ्या पंधरवड्यातील पोर्णिमेला हे पुस्तक अत्यंत भक्तीभावाने सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे” असा उल्लेख आहे. ही तारीख 11 मे 868 अशी येते. त्यामुळे संपूर्ण स्वरूपात उपलब्ध असलेला हा सर्वात प्राचीन छापील ग्रंथ आहे असे आज मानले जाते.
7 जानेवारी 2012

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

6 thoughts on “1143 वर्षांपूर्वीचे छापील पुस्तक- वज्र सूत्र; 1143 year old printed book- Diamond Sutra

 1. छपाईच्या तंत्राबद्दल काय सांगता येईल?

  Posted by मनोहर | जानेवारी 12, 2012, 10:44 pm
  • मनोहर –
   चीनमध्ये प्रचलित असलेल्या छपाईच्या तंत्रात जो मजकूर छापायचा आहे त्याचा लाकडी ठसा करून घेण्यात येत असे. आपल्याकडे साड्यांवर ज्या पद्धतीने डिझाईन्स अजूनही छापली जातात तशीच काहीशी ही पद्धत होती. प्रिंटिंग प्रेस ही संकल्पना जर्मनीत प्रथम गुटेनबर्ग़ याने आणली. चीनमधे ही कल्पना नव्हती.

   Posted by chandrashekhara | जानेवारी 13, 2012, 9:20 सकाळी
 2. आपला हा लेख वाचता वाचता, जोहान गुटेनबर्ग या जर्मन मुद्रण तज्ज्ञाची आठवण झाली नाही, तर नवल. या संदर्भात मी खाली एक परिच्छेद उद्घृत करत आहे. हे चरित्र गोव्याच्या नवप्रभा दैनिकात प्रसिद्ध झाले होते. :-
  ” ज्या काळात पुस्तकांचे दुर्भिक्ष असायचे, त्या काळात बुद्धी व अलौकिक चिकाटी यांच्या जोरावर ज्याने मुद्रणाचे तंत्र शोधून काढले आणि जगातील पहिले छापलेले पुस्तक निर्माण केले, त्या जर्मनीच्या जोहान गुटेनबर्ग (Johann Gutenberg) या महापुरुषाला आपण विसरू शकत नाही. आजच्या आधुनिक मुद्रण तंत्राचा तो आद्य जनक मानला जातो. दुर्दैवाने आज गुटेनबर्गविषयी फार थोडी माहिती उपलब्द्ध आहे. त्याचे व्यक्तिमत्व म्हणजे एक गूढ आहे. त्याचे असे चित्र त्याच्या सबंध आयुष्यात काढलेले नाही. नैऋत्य जर्मनीत -हाईन नदीच्या काठावर वसलेल्या मेंझ (Mainz) या गावात गुटेनबर्ग जन्माला आला. त्याची नेमकी जन्मतारीख अद्यापही अज्ञात आहे. इ.स. १३९४ ते १३९९ या काळात तो जन्मला असावा. अर्थातच ज्याची व्यक्तीशः माहिती आपल्याला फार थोडी ठाउक असली, तरी त्याची महान कामगिरी आपल्याला ज्ञात झालेली आहे. आजच्या मुद्रण तंत्राचा तोच खरा जन्मदाता आहे. “

  Posted by Mangesh Nabar | जानेवारी 13, 2012, 8:47 सकाळी
 3. आपल्या या लेखावरील प्रतिक्रियेत आपण आणि श्री. मंगेश नाबर यांनी जोहान गुटेनबर्ग या आदय जर्मन संशोधकाचा व गोमांतकातील नवप्रभामधील त्याच्या चरित्राचा उल्लेख केला आहे. वास्तविक हे चरित्र खुद्द श्री. नाबर यांनी लिहिले, असे मला समजले होते. आपण ते आपल्या अनुदिनीवर पुनर्प्रसिद्ध केले तर अनेक वाचकांना वाचता येईल.

  Posted by Vinayak Parvatkar | जानेवारी 13, 2012, 8:51 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: