.
ताज्या घडामोडी Current Affairs

कालचा गोंधळ बरा होता!, Ignorance is bliss (sometimes)!


 मागच्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात अमेरिकन स्टेट डिपार्टमेंटच्या वेब साईटवर एक भारताचा नकाशा प्रसिद्ध करण्यात आला होता. यात जम्मू-कश्मिर राज्याच्या पाकिस्तानच्या ताब्यात असलेला भागाचा अंतर्भाव, पाकिस्तानमध्ये केलेला दाखवला होता. साहजिकच भारताचे परराष्ट्र व्यवहार खाते व अमेरिकेतील भारतीय दूतावास यांनी या बाबत कडक निषेध व्यक्त केल्याने, स्टेट डिपार्टमेंटने कारवाई करून हा नकाशा वेब साईट वरून काढून टाकला होता.

 

नव्या वर्षात आता भारताचा एक नवा नकाशा स्टेट डिपार्टमेंटने आपल्या वेब साईटवर प्रसिद्ध केला आहे. या नकाशाबद्दल सांगताना स्टेट डिपार्टमेंटच्या अधिकृत प्रवक्त्याने नोव्हेंबर मधे आमची कशी चूक झाली होती असे सांगून या प्रकरणावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला आहे. नवीन प्रसिद्ध केलेला नकाशा, अमेरिकन सरकारच्या नकाशांबद्दलच्या अधिकृत धोरणांप्रमाणे काढलेला असून विवादास्पद भूभागांबाबत अमेरिकन सरकार कसे कोणतीच बाजू घेत नाही व यामुळे नकाशावर हा भाग तुटक रेषेने कसा दाखवला आहे याचे व या तुटक रेषेजवळ माहिती कशी दिलेली आहे याचे वर्णन या प्रवक्त्याने केले आहे. परंतु हा नवीन नकाशा नक्कीच भारताला किंवा कोणत्याच भारतीय नागरिकाला पसंत पडणार नाही. या नकाशात प्रत्यक्ष ताबा रेषा जरी नीट दाखवलेली असली तरी गिलगिट, स्कार्डू व बाल्टीस्तान हे भाग पाकिस्तानमधेच दाखवले गेले आहेत. त्याचप्रमाणे सियाचिन जवळच्या भारताच्या ताब्यातील भूभागजवळ, ही तुटक रेषा दाखवलेलीच नाहीये. मात्र चीनच्या ताब्यातील अक्साईचिन हा भाग मात्र व्यवस्थित रित्या ( चीनच्या ताब्यात आहे पणर भारताचा हा भाग स्वत:चा असल्याचा दावा आहे.) असे नीट वर्णन करून दाखवलेला आहे. हा नवीन नकाशा सुद्धा विवादास्पद ठरणार असल्याने या नवीन नकाशामुळे स्टेट डिपार्टमेंट व भारत यांच्यातील वादावर पडदा पडण्याचे मुळीच लक्षण नाही.
कश्मिर मधील विवादामुळे, या विवादास्पद भागाचा नकाशा आंतर्राष्ट्रीय त्रयस्थ माध्यमात कसा प्रसिद्ध केला गेला पाहिजे याचे एक उदाहरणच बी.बी.सी. ने काल एक लेख व नकाशा प्रसिद्ध करून दाखवून दिले आहे. या नकाशाशी तुलना केल्यावर, स्टेट डिपार्टमेंटचा नकाशा अजुनही कसा चुकीचाच काढलेला आहे व त्यामुळे अमेरिकन सरकारला वेब साईटवर नकाशा न दाखवण्य़ाची आपली झाकली मूठ कशी बरी होती हे बहुदा लक्षात येईल कारण भारतीय लोक व सरकार यांना हा नवा नकाशा मान्य होईल असे वाटत नाही व एका नव्या वादाला बहुदा परत सुरूवात होईल.
5 जानेवारी 2012
Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

3 thoughts on “कालचा गोंधळ बरा होता!, Ignorance is bliss (sometimes)!

 1. थोडक्यात काय चीन (चायना – China) ची बाजू घेऊन भारतीयांना (चुना – Chuna) लावला असेच म्हणायचे आहे ना?

  Posted by गुरुदृष्टी | जानेवारी 11, 2012, 10:34 सकाळी
  • गुरुदृष्टी –

   प्रत्यक्षात नकाशा काय दाखवतो हे मी सांगितले आहे. निष्कर्ष काय काढायचे ते ज्याने त्याने काढावेत. प्रतिसादासाठी धन्यवाद.

   Posted by chandrashekhara | जानेवारी 12, 2012, 12:53 pm
 2. nakashamadhe je dakhavle ahe yavarun ase samajte ki pak ani chin halu halu bhartacha bahutek bhag jinknyacha ankhi praytna karil tyamule bhartala savdh rahile pahije .ata ha nakasha bhartacha vatat nahiye.sorry! pan majhya manatle sangitle..

  Posted by avinash bhote | जून 12, 2012, 4:04 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: