.
Travel-पर्यटन

A jump in to the future, भविष्यकालात उडी


काही दिवसांपूर्वी म्हणजे  31 डिसेंबर 2011 ला, पृथ्वीवरच्या सर्व देशांमधल्या रहिवाशांनी नववर्षाचे स्वागत केले खरे पण ते काही एकाच वेळी केले नाही. प्रत्येक देशाच्या स्थानिक वेळेप्रमाणे, रात्रीचे 12, पूर्वेकडील देशांकडून पश्चिमेकडील देशांकडे, जसजसे वाजत गेले तसतसे त्या त्या देशातील लोकांनी जल्लोश करून नववर्षाचे स्वागत गेले. हे स्वागत न्यूझीलंड या देशातील लोकांनी भारतीय वेळेप्रमाणे काल दुपारी सर्वात प्रथम केले तर हवाई बेटांवरचे लोक हा लेख मी लिहितो आहे त्या वेळी म्हणजे न्यूझीलंडच्या तब्बल 22/23 तासानंतर करत आहेत.
प्रत्येक देशाची स्थानिक वेळ ही त्याच्या पृथ्वीवरील भौगोलिक स्थानाप्रमाणे साधारण असते. समजा आपण पृथ्वीगोलाचे पूर्व- पश्चिम दिशेत 24 काल्पनिक भाग केले तर या प्रत्येक भागातील रहिवाशांची स्थानिक वेळ, 1 तासाच्या फरकाने असेल हे सहज लक्षात येईल. प्रत्यक्षात तसे होत नाही. राजकीय किंवा सामाजिक कारणांनी ही स्थानिक वेळ पुष्कळ वेळा निराळीच ठरवली जाते. उदाहरणार्थ चीन हा देश, भारताच्या सीमेपासून ते पार कोरियाच्या सीमेपर्यंत पसरलेला आहे. खरे तर भौगोलिक कारणांनी चीन मध्ये, विभागांप्रमाणे 4 तरी प्रमाणित वेळा असण्याची गरज आहे. परंतु या सबंध देशात फक्त बिजिंगची वेळ ही प्रमाणित वेळ म्हणून पाळली जाते. शिंजियांग किंवा देशाच्या पश्चिम भागात साधारण भारतीय किंवा पाकिस्तानी भौगोलिक वेळ असते. त्यामुळे भारतीय वेळेप्रमाणे रात्रीचे 3 वाजलेले असले तरी शिंजियांग मधली घड्याळे सकाळचे 6 वाजलेले दाखवतात.
न्यूझीलंडच्या पूर्वेला आणि हवाई बेटांच्या पश्चिमेला रेखांशावर एक काल्पनिक रेषा आखलेली आहे. याला आंतराष्ट्रीय तारीख रेषा असे नाव आहे. या रेषेच्या पूर्वेकडचा भाग व पश्चिमेकडचा भाग यांच्यात 24 तास वेळेतला फरक असतो. प्रशांत महासागरावर ही रेषा येत असल्याने विमानातून अमेरिकेकडे जाताना आपण एकदम 24 तास मागे जातो किंवा अमेरिकेतून येताना 24 तास भविष्यात उडी घेतो. पण रोज हजारो प्रवासी घेत असलेल्या या उडीबद्दल मी लिहित नसून या रेषेला लागून असलेल्या सामोआ या बेटावरील शासन आणि रहिवाशांबद्दल लिहितो आहे. हे सामोआ बेट आणि त्याच्या उत्तरेला असलेले टोकेलाऊ हे बेट ही दोन्ही बेटे प्रशांत महासागरात फिजी बेटाच्या बरोबर उत्तरेला आणि न्यूझीलंड व हवाई बेटांना जोडणारी एखादी रेषा कल्पली तर त्या रेषेच्या मध्यावर येतात. सामोआचे अक्षांश रेखांश आहेत (13S,172W) तर टोकेलाऊचे (9S,171W)!
गेली 119 वर्षे ही दोन्ही बेटे जगातील सर्वात पश्चिमेकडचे देश म्हणून मानले जात. नववर्ष साहजिकच या दोन्ही ठिकाणी सर्वात शेवटी येत असे. या समोआ बेटाची लोकसंख्या आहे 180000 लोक. परंतु या सामोआ वंशाचे 130000 लोक न्यूझीलंडचे रहिवाशी असल्याने न्युझीलंड बरोबर सामोआचे भावनिक, कौटुंबिक व व्यापारी पातळीवरचे अतिशय निकटचे संबंध आहेत. न्यूझीलंड आणि सामोआ याच्यातील वेळेचा फरक 23 तास असल्याने लोकांना एकमेकाशी संबंध ठेवणे जिकिरीचे होते. सामोआत शुक्रवार असतो तेंव्हा न्यूझीलंडमध्ये शनिवार असल्याने सुट्टी असते तर सामोआ रवीवारची सुट्टी घेतो तेंव्हा न्यूझीलंडमधे सोमवारचे काम चालू झालेले असते.
सामोआ हे न्यूझीलंडच्या लोकांचे एक आवडीचे पर्यटन स्थळ आहे तर सामोआचा ऑस्ट्रेलियाशी बराच व्यापार आहे. या सगळ्या कारणांमुळे सामोआच्या शासनाने 29 डिसेंबर नंतर एकदम 31 डिसेंबर तारीख येईल असे घोषित करून टाकले व या वर्षीचा नववर्षदिन जगात प्रथम सामोआ मध्ये उगवला आहे.
लोकांना हा बदल पसंत पडला आहे असे तिथल्या शासनाचे म्हणणे आहे. लोकांच्या सोईप्रमाणे काळ-वेळ बदलण्याची ही पद्धत मला आवडली. भारतात सुद्धा एकच प्रमाणित स्थानिक वेळ न ठेवता 3 प्रमाणित वेळा ठेवल्या तर घड्याळ्यातील वेळ व भौगोलिक वेळा या एकमेकाशी जुळतील व लोकांना सोईचे जाईल असे मला वाटते. आसाम मध्ये हिवाळ्यात दुपारी दोन अडीच वाजता रात्र सुरू होत असते. हा विचित्रपणा अशा तीन प्रमाणित वेळा ठरवल्या तर सहज दूर करता येणे शक्य आहे.
7 जानेवारी 2012
Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “A jump in to the future, भविष्यकालात उडी

  1. farch sunder lekh ahe.

    Posted by sachin | जानेवारी 8, 2012, 9:00 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: