.
ताज्या घडामोडी Current Affairs

दिल्लीचे नेहरू प्लेस मार्केट अमेरिकेच्या काळ्या यादीत; US black lists New Delhi’s Nehru Place market


Twenty five or thirty years ago, I used to visit new Delhi quite often for business purposes. A huge market known as ‘Chandani Chowk market’ exists opposite Delhi’s famous Red Fort. To market products manufactured by my company, I had appointed a dealer for Delhi area and his shop used to be in this market. Because of this, I used to visit this area at least once every six or eight months. On one side of the Electrical market, there used to be a smaller market which dealt exclusively with Electronic products. In those days, Electronic products that were available in India were very few and limited such as radios and voltage stabilizers. The highest selling product was so called ‘Transistor portable radios’.  Only 4 or 5 companies such as Philips, Bush, Murphy and National Ekco had then, Government permission, to manufacture these radios. No other big company was allowed to enter this field, yet there were number of small manufactures or bed room manufacturers, who would do assembly of these radios.The Chandani Chowk Electronic market was famous for making available, branded radios at a very cheap rate. This was done by labeling, radios manufactured by bedroom manufacturers with labels of Bush or Murphy. This business was done openly with total disregard of any laws or rules. Naturally such deals were strictly on cash basis and no invoice or receipt was ever given and if given it would be in the name of some other product.  साधारण पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी मी दिल्लीला व्यवसायानिमित्त बर्‍याच वेळा जात असे. जुन्या दिल्लीतील लाल किल्यासमोर, चांदणी चौक भागात खूप मोठे मार्केट आहे. त्या मार्केटमध्ये मी बनवत असलेल्या उत्पादनांचा एक विक्रेता असल्याने, दर काही महिन्यांनी त्याच्याकडे माझी एक चक्कर असेच. या विक्रेत्याचे दुकान चांदणी चौक इलेक्ट्रिकल मार्केट मधे होते. या मार्केटच्या एका बाजूस इलेक्ट्रॉनिक उत्पादनांचे एक निराळे मार्केट होते. त्या वेळी इलेक्ट्रॉनिक उत्पादने तशी फार मर्यादित होती. मुख्य उत्पादन म्हणजे ट्रान्झिस्टर रेडिओ हे होते. या शिवाय व्होल्टेज स्टॅबिलायझर सारखी इतर काही उत्पादने लोकप्रिय असत. हे ट्रांझिस्टर रेडिओ त्या वेळेस फिलिप्स, मर्फी, बुश आणि नॅशनल एको यासारख्या 4 किंवा 5 कंपन्या फक्त बनवत असत. बाकी कोणाला ते बनवण्यास सरकारी परवानगी नसे. मात्र लघु उद्योग क्षेत्रात बरेच उत्पादक असत. या चांदणी चौक मार्केटचे वैशिष्ट्य म्हणजे तेथे कोणत्याही ब्रॅन्डचे लेबल अशा लघु उद्योगांनी बनवलेल्या किंवा त्या दुकानाच्या मागच्या बाजूस जुळणी केलेल्या ट्रान्झिस्टर रेडिओना लावून मिळत असे. म्हणजेच त्याच रेडिओला फिलिप्स, बुश, मर्फी यापैकी कोणतेही लेबल लावून मिळत असे. हा व्यवहार अगदी खुल्लम खुल्ला चालत असे. अर्थातच असा रेडिओ विकत घेतल्यास बिल एकतर मिळतच नसे व मिळाल्यास दुसर्‍याच कोणत्या तरी नावाचे मिळत असे.
माझी आपली एक भाबडी समजूत होती की आता भारतात जागतिकीकरण झाल्याने आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनावर आणि आयातीवर आता कोणतीही बंधने नसल्याने, दिल्लीचा हा अवैध धंदा आता बंद पडला असेल. पण दिल्लीचे हे मार्केट चालूच आहे. आता फक्त त्याने नवी जागा व व नवा अवतार धारण केला आहे. ट्रान्झिस्टर रेडिओ ऐवजी संगणक क्षेत्रात या मार्केटने प्रवेश केला आहे. या मार्केटला नुकताच एक विशेष सन्मान प्राप्त झाला आहे.
चांदणी चौकातील इलेक्ट्रॉनिक मार्केटचा हा नवा अवतार, नवी दिल्ली मधील नेहरू प्लेस येथे आता हलला आहे. या ठिकाणी असलेल्या 10000 दुकानांपैकी तब्बल 3000 दुकाने इलेक्ट्रॉनिक आणि विशेषेकरून संगणक संबंधी उत्पादनांची विक्री करत असतात. U.S Trade Representative (USTR) या अमेरिकन शासकीय संस्थेने जगातील सर्वात जास्त अवैध व चाचेगिरी केलेली (Pirated) उत्पादने विकली जाणार्‍या मार्केट्सची (Out-of-Cycle Review of Notorious Markets,December 20, 2011) एक जागतिक यादी 20 डिसेंबर 2011 ला प्रसिद्ध केली आहे. या यादीत नेहरू प्लेस मार्केटचा समावेश केला गेला आहे. या यादीत नेहरू प्लेस मार्केट बरोबरच कुप्रसिद्ध अशा जगातील इतर 14 मार्केट्सचा समावेश आहे. यात Bahia Market (Guayaquil, Ecuador), China Small Commodities Market (Yiwu, China), Ciudad del Este (Paraguay), Harco Glodok (Jakarta, Indonesia), La Salada (Buenos Aires, Argentina), Lo Wu Commercial Center (Shenzhen, China), PC Malls (China), Petrivka Market (Kyiv, Ukraine), Quiapo Shopping District (Manila, Philippines), Red Zones (Thailand), San Andresitos (Colombia), Silk Market (Beijing, China), Tepito (Mexico City), Urdu Bazaars (Pakistan) या मार्केट्सची नावे आहेत.
USTR च्या या अहवालात नेहरू प्लेस मार्केट बद्दल म्हटलेले आहे की ” नेहरू प्लेस हे भारतातील प्रमुख शहरात असलेल्या अशा इतर अनेक मार्केट्स प्रमाणे चाचेगिरी केलेल्या संगणक प्रणाली, चित्रपट व संगीत आणि स्मगल केलेल्या चोरट्या व अवैध इलेक्ट्रॉनिक वस्तू या साठी कुप्रसिद्ध आहे.”
हे नेहरू प्लेस मार्केट आहे तरी कसे? माहिती क्षेत्राशी संबंधित असलेली सर्व प्रकारची उत्पादने, ज्यात पर्सनल संगणक, सर्व्हर्स, नेटवर्किंग साधने, संगणक प्रणाली, पेपर कॉपियर, प्रिंटर सारखी उत्पादने आणि त्या संबंधींच्या सर्व सेवा येथे विकत मिळतात. अनेक उत्पादकांची अधिकृत दुकाने येथे आहेत. त्यामुळे संगणक संबंधी विषयात ज्यांना रस आहे अशा सर्व जणांना हे मार्केट म्हणजे एक पर्वणीच आहे. छोट्या जागेत संगणक व सर्व्हर्सची जुळणी करणारे अनेक छोटे उद्योजक येथे आहेत. त्याच प्रमाणे आडगिर्‍हाईकी संगणक सुद्धा येथे विकत मिळू शकतात. संगणक प्रणाली विकणारी छोटी दुकाने येथे आहेत. फ्ली मार्केटमधे माल विकणारे पथारीवाले येथे आहेत ते रस्त्यावर की बोर्ड, प्रिंटर शाईची कार्ट्रिजेस, माऊस या सारखी उत्पादने विकत असतात. या मार्केटमधला बराचसा धंदा कोणतेही बिल किंवा पावती न देता रोखीने केला जात असल्याने गोष्टी बर्‍याच स्वस्त भावाने मिळतात. तसेच येथे माल विकण्याची प्रचंड स्पर्धा असल्याने घासाघीस केल्यास वस्तू बर्‍याच स्वस्त भावाला मिळतात.
या सगळ्या वर्णनावरून नेहरू प्लेसचे हे मार्केट, इलेक्ट्रॉनिक उद्योगाचे एक मोठे मध्यवर्ती व्यापारी केन्द्र बनण्याची शक्यता असलेली जागा आहे हे लक्षात येते. परंतु येथे होणारा व्यापार वैध आणि अधिकृत रित्या आयात केलेल्या वस्तूंचा असणे आवश्यक आहे. दुर्दैवाने हे मार्केट अवैध व चोरट्या मार्गाने आणलेल्या वस्तूंच्या व्यापारासाठी प्रसिद्ध होत चालले आहे. हे असेच चालू राहिले तर सध्या जरी येथील व्यापार जोरात चालत असला तरी भविष्यात या मार्केटचे अस्तित्व चांदणी चौक इलेक्ट्रॉनिक मार्केट प्रमाणेच पुसून टाकले जाईल अशी बरीच शक्यता वाटते.
22 डिसेंबर 2011
Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: