.
ताज्या घडामोडी Current Affairs, Uncategorized

भरून न येणारे नुकसान; An Irreparable Loss


इ.स 1798 मध्ये नेपोलियन बोनापार्ते या फ्रेन्च सेनानीने इजिप्तवर स्वारी केली होती. या स्वारीच्या दरम्यान, इजिप्तमधील पुरातन संस्कृती व त्या संस्कृती कालामध्ये इजिप्तमध्ये जी प्रगती झाली होती ती प्रगती, पाश्चिमात्य बुद्धीवंतांच्या नजरेसमोर प्रथम आली होती. या प्रगतीने नेपोलियन एवढा भारावून गेला होता की इजिप्त मधे, जीवशास्त्रापासून ते गणित आणि अभिव्यक्ती, कला या पासून ते पुरातन वस्तू शास्त्र या सर्व विषयांमध्ये वरिष्ठ दर्जाचे संशोधन व्हावे असे त्याला वाटू लागले व या साठी त्याने ऑगस्ट 1798 मध्ये L’Institute d’Egypte या संशोधन संस्थेची स्थापना केली होती. या संस्थेच्या ग्रंथालयाने मागच्या दोनशे वर्षात 2 लाखाहून जास्त संख्येने अशी पुस्तके व पोथ्या जमा करून संग्रहित केल्या होत्या. या संग्रहात फ्रेन्च संशोधकांनी 1798 मध्येच लिहिण्यास सुरूवात केलेला “Description de l’Égypte” (Description of Egypt) किंवा “इजिप्तचे वर्णन” या 24 खंडांतील हस्तलिखित अशा एका अतिशय महत्वाच्या ग्रंथाची आता अतिशय दुर्मिळ असलेली मूळ प्रत होती. इजिप्तमधील पुराण वस्तू, देवळे व इतर स्मारके यांचे अतिशय बारकाईने केलेले आमुलाग्र वर्णन या ग्रंथात केलेले होते. या शिवाय जी परत कधीही मिळणार नाहीत अशी 20000 वर संख्येने असलेली पुस्तके, पोथ्या व नकाशे या ग्रंथालयाच्या संग्रहात होती. अठराव्या शतकातील वास्तुकलेचे एक उदाहरण असलेली या ग्रंथालयाची इमारत मध्यवर्ती कैरो शहरातील प्रसिद्ध ताहिर चौकाजवळ असलेल्या कस्र-अल ऐनी Qasr al-Aini या रस्त्यावर शूरा कौन्सिलच्या(Cabinet building) इमारतीजवळ आहे. सध्या इजिप्तमध्ये लष्करी राजवट आहे व लष्कराने सत्ता नागरी सरकारकडे लवकर सोपवावी म्हणून ताहिर चौकात बैठी निदर्शने चालू आहेत. मागच्या शनिवारी (17 डिसेंबर 2011) रोजी हे निदर्शक आणि शूरा कौन्सिल इमारतीचे संरक्षण करणारे सैनिक यांच्यात खडाजंगी उडाली. सैनिक निदर्शकांबर दगड फेक करत आहेत हे बघितल्यावर निदर्शकांनी सैनिकांच्या दिशेने पेट्रोल बॉम्ब किंवा मोलोटोव्ह कॉकटेल्स भिरकावून देण्यास सुरूवात केली. यापैकी एक बॉम्ब नेम चुकून शेजारील ग्रंथालयाच्या खालच्या मजल्यावर जाऊन पडला व तेथे आग लागली. या आगीचे लवकरच मोठ्या प्रमाणात प्रसारण झाले व ती इमारतीच्या वरच्या मजल्यांवरही पसरली.
या लायब्ररीला आग लागली आहे हे समजल्यावर तेथे आलेल्या अग्नीशामक दलाला ग्रंथालयात असलेल्या पुस्तकांच्या प्रचंड साठ्यामुळे आग विझवण्यास 12 तास लागले. एव्हांना ग्रंथालयाच्या जुन्या इमारतीवरचे लाकडी छप्पर जळून भस्मसात झाले होते व या संपूर्ण इमारतीलाच आता धोका निर्माण झाला आहे. ग्रंथालयाला आग लागली आहे हे समजताच नागरी स्वातंत्र्याची मागणी करणार्‍या निदर्शकांपैकी अनेकानी आतली पुस्तके बाहेर आणून रस्त्याच्या कडेला असलेल्या पदपथावर आणून ठेवली व ती वाचली. या निदर्शकांच्या वरची सैनिकांनी दगडफेक व गोळीबार केला. त्यात काही लोक जखमी व मृत झाले.
ग्रंथालयाच्या बाहेर काढलेली अंदाजे 50000 वर पुस्तके आता ग्रंथालयाच्या बाजूला असलेल्या अमेरिकन इस्टिट्यूट मधे हलवली आहेत. मात्र यातली अनेक पुस्तके जळून गेलेल्या अवस्थेत आहेत. काही पुस्तके लोक घरी घेऊन गेले असावेत असा अंदाज आहे. ही परत मिळतील असा विश्वास ग्रंथालयाचे प्रमुख झैन अबदल हादी ( Zein Abdel-Hady) यांना वाटतो आहे. या एकूण घटनेत निदान 14 व्यक्ती तरी मृत्यूमुखी पडल्या असव्यात असा अंदाज आहे. जी काय पुस्तके वाचली आहेत त्यातून चांगल्या स्वरूपात असलेली पुस्तके शोधण्यासाठी पांढरे कोट, सर्जिकल ग्लोव्हज व मास्क लावलेल्या ग्रंथप्रेमींचा एक जथ्था आता या जळलेल्या पुस्तकांच्यात न जळलेली पुस्तके शोधतो आहे.
या दुर्घटनेने इजिप्तचे तर अपरिमित नुकसान झालेच आहे पण हा इतिहासाचा वारसा नष्ट झाल्याने संपूर्ण जगाचेच नुकसान झाले आहे यात शंका नाही. इजिप्त मधील घटनेने पुण्याच्या भांडारकर संशोधन संस्थेवरील हल्ल्याची आठवण झाली. जगभर असलेली जुनी पुस्तके, पोथ्या व कागदपत्र यांचे डिजिटल स्वरूपात जतन करण्याची किती आवश्यकता आहे याची जाणीवच इजिप्तमधील या दुर्घटनेने आपल्या सगळ्यांना करून दिली आहे.
20 डिसेंबर 2011
Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

One thought on “भरून न येणारे नुकसान; An Irreparable Loss

  1. इजिप्तमधल्याच नव्हे तर मध्यपूर्वेतील सर्वच राज्यक्रांत्यांवर इस्लामी सनातनींची पकड आहे.

    Posted by मनोहर | डिसेंबर 29, 2011, 10:25 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: