.
People व्यक्ती

मारिओ मिरांडा – (Mario Miranda- An obituary)


1970 च्या दशकातील काही वर्षे मी मुंबईला नोकरी करत असे. अंधेरीला राहून रोज सकाळी लोकल ट्रेन पकडायची. मुंबईच्या प्रसिद्ध डबेवाल्यांमार्फत आलेला डबा लंच टाईम मधे खायचा व संध्याकाळी परत एकदा लोकल ट्रेनमधला गर्दीचा प्रवास करायचा असा माझा मुंबईच्या इतर हजारो किंवा लाखो चाकरमान्यांसारखा दिनक्रम असे. त्या वेळी करमणुकीची काही फारशी साधनेच उपलब्ध नव्हती. सिनेमा म्हणजे बहुधा हिंदी सिनेमे, ते सुद्धा ठराविक ठशाचे, हिरो, हिरॉइन, खलनायक, गाणी शेवटी ठिश्यां ठिश्यां! आणि गोड अखेर, या धर्तीचे! मासिके सुद्धा फारशी नसत. आणि जी काय मिळत त्यांची छपाई तितपतच असे. याच काळात नंतर इंदिरा गांधीनी आणीबाणी लागू केली. सर्वसामान्य माणसाचे जीवन आणखीनच नीरस व कळाहीन बनले.

या सर्व काळात चेहर्‍यावर स्मिताची रेषा हमखास उमटवू शकतील अशा दोनच गोष्टी होत्या. यातली पहिली गोष्ट म्हणजे अर्थातच आर.के लक्ष्मण यांची कॉमन मॅनची रोजची ‘यू सेड इट’ व्यंगचित्रे आणि दुसरी म्हणजे टाईम्स व इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया मधे प्रसिद्ध होणारी ‘ मारिओ मिरांडा’ या व्यक्तीची व्यंग चित्रे. लक्ष्मण यांची व्यंगचित्रे साधी – सोपी असत. त्यात एक किंवा दोन व्यक्ती असत. या उलट मारिओ मिरांडा यांची व्यंग चित्रे पानभर, त्यात शंभर, दोनशे तरी व्यक्ती व यातल्या अनेक व्यक्तींच्या तोंडातून निघालेली मुक्ताफळे, यामुळे एक व्यंग चित्र बघायला किंवा वाचायला निदान 15/20 मिनिटे तरी लागत. जितका जास्त वेळ हे व्यंगचित्र बघावे तितकी जास्त जास्त मजा येत असे. खूप विशाल वक्षस्थळे असलेली स्त्री, गांधी टोपी घातलेले पुढारी, मुंबईचा शेटजी किंवा गोव्यातली कोळीण ते इतक्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने काढत की मारिओ यांचे व्यंगचित्र आले आहे हे लगेच कळत असे.
गोव्यामधला मासळी बाजार किंवा मुंबईच्या रस्त्यावरचा सीन यांचे व्यंगचित्र म्हणजे एक संपूर्ण लेख किंवा कथा असे. लोकलमधून जाताना हातात मारिओचे व्यंगचित्र असले की प्रवास कधी संपत असे ते कळतच नसे.मारिओंनी साकार केलेल्या मिस निंबूपाणी सारख्या व्यक्तीरेखा मी आयुष्यात कधी विसरणे शक्य नाही.
टाईम्स ऑफ इंडिया मधल्या नोकरीतून निवृत्त झाल्यावर मारिओ मिरांडा हे गोव्यात रहात असत हे मला खूप वर्षे माहीतच नव्हते. अगदी अलीकडे काढलेली मुंबईचे रस्ते, प्रसिद्ध ठिकाणे याबद्दलची त्यांची व्यंगचित्रे सुद्धा इतकी अचूक असत की मी त्यांना मुंबईकरच समजत होतो.
आज वयाच्या 85व्या वर्षी या कलाकाराच्या हातातला कुंचला, चित्रे रंगवण्याचे काम सोडून एकदम थांबला आहे. मारिओ मिरांडा आता नाहीत.
तत्कालीन शासनाच्या तथाकथीत समाजवादी धेय धोरणांमुळे भारतात राहणार्‍या माझ्या पिढीच्या तरूणपणातील नीरस आणि कंटाळवाण्या आयुष्यात, आपल्या चित्रांनी आनंदाचे दोन क्षण आणणार्‍या मारिओना माझी श्रद्धांजली.
11 डिसेंबर 2011
Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 385 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: