.
ताज्या घडामोडी Current Affairs

फ्लॅश मॉब – हे काय आतां?( Flash Mob- What’s that?)


वेळ- मागच्या रविवारची दुपार; स्थळ- मुंबईचे प्रसिद्ध बोरीबंदर किंवा व्ही.टी. किंवा छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानक;
रविवारचा दिवस असल्याने रेल्वे स्थानकावर तशी गर्दी फारशी नाहीये. थोडे फार प्रवासी लगबगीने इकडून तिकडे जा ये करत आहेत. हमाल, हातगाडीवाले आरामात बसलेले आहेत. अचानक कोठून तरी एकदम बॉलीवूडच्या ‘रंग दे बसंती’ या चित्रपटातील एका गाण्याचे संगीत मोठ्याने वाजू लागते. त्या बरोबर 200 च्या आसपास असलेल्या संख्येचे नर्तक एकदम त्या गाण्याच्या तालावर नाच करू लागतात.
आजूबाजूचे लोक हे काय चालले आहे? अशा प्रश्नार्थक मुद्रेने जमा होतात? त्यांना काही समजण्याच्या आतच 10 मिनिटात नाच संपतो. नर्तक गायब होतात व संगीतही लुप्त होते. उरतात ते फक्त दर्शकांच्या मनातले प्रश्न!
त्याच दिवशी या नाचाचे व्हिडिओ, यू-ट्यूब वर दिसू लागतात . फेस-बुक व ट्विटरवरून या व्हिडिओंची देवाण घेवाण होते. व मुंबईतून एक नवीनच सामाजिक प्रयोग भारतामध्ये जन्माला येतो. या प्रयोगाचे नाव आहे फ्लॅश मॉब, आणि हा प्रयोग जरी अकस्मात झाल्यासारखा वाटत असला तरी तो अतिशय काळजीपूर्वक प्लॅन केलेला असतो.
फ्लॅश मॉब किंवा एका समूहाचे अचानक अवतरणे, नाच सुरू करणे व काय होते आहे ते कळण्याच्या आत गायब होणे, हा प्रयोग परदेशांमध्ये 2003 मध्ये प्रथम सुरू झाला. यात भाग घेणार्‍या कलाकारांच्या दृष्टीने हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. आश्चर्यचकीत झालेल्या प्रेक्षकांच्या समोर हा नाच करणारे कलावंत आपण काहीतरी विशेष केल्याच्या आनंदात असतात व त्यातूनच त्यांचा हा समूह एकजीव होत जातो. या फ्लॅश मॉब मुळे कलावंतांना जरी आनंद मिळत असला तरी त्याचा उपयोग काय? असा प्रश्न कोणालाही पडेल.
फ्लॅश मॉब इतक्या अकस्मात केला जातो की तो सुरू झाल्यावर त्या ठिकाणी असलेल्या प्रत्येकाचे तो लक्ष खेचून घेतोच. त्यामुळेच सामाजिक प्रश्नांकडे लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठीची ही एक नामी युक्ती आहे असे या कार्यक्रमाच्या संयोजकांना वाटते आहे. पथ नाट्यापेक्षाही हा कला अविष्कार लोकांचे लक्ष खेचून घेण्यात अग्रेसर आहे. सार्वजनिक वाहतुकीचे प्रश्न, स्त्री-पुरुष समानता, अंधश्रद्धा या सारख्या सामाजिक प्रश्नांकडे या कला अविष्कारामुळे लोकांचे लक्ष अधिक उत्तम रितीने आकर्षित करून घेता येईल असे संयोजकांचे म्हणणे आहे.
मुंबईच्या शोनन कोठारी यांनी आयोजित केलेल्या फ्लॅश मॉबला आंतरजालावर लाभलेली लोकप्रियता बघता या प्रयोगाचा प्रसार सगळ्या शहरांत व गावांत लवकरच होईल असे दिसते. या आठवड्यात दिल्लीला फ्लॅश मॉब होणार आहे. स्थळ, वेळ अर्थातच कोणालाच माहीत नाही.
3 डिसेंबर 2011
Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “फ्लॅश मॉब – हे काय आतां?( Flash Mob- What’s that?)

  1. आपला आत्मसन्मान(ईगो) अभिव्यक्त करण्याची गरज पत्येकाला असतेच. त्या गटातला हा प्रयत्न आहे.

    Posted by मनोहर | डिसेंबर 8, 2011, 10:24 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: