.
Uncategorized

सर्पगिरी


दोन वर्षांपूर्वी एका गाजलेल्या हिंदी चित्रपटाने गांधीगिरीअसा एक नवीन शब्द हिंदी भाषेला प्रदान केला होता. अगदी विनम्र भावाने, गुलाबाचे फूल देऊन विनंती करणे असा या गांधीगिरीशब्दाचा अर्थ रूढ झाला आहे. उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यामधल्या लारा गावातील हक्कुल या एका सर्पमित्राने निषेध प्रगट करण्याचा जो एक नवीनच प्रकार केला आहे त्यामुळे सर्पगिरी हा एक नवीन शब्द रूढ करायला हरकत नाही असे वाटते.

या लारा गावाच्या आजूबाजूला असलेल्या खेड्यापाड्यांत या हक्कुलची, सर्प पकडणारा म्हणून मोठी ख्याती आहे. कोठेही साप निघाला की हक्कुलला पाचारण केले जाते व तो हमखास त्या सापाला पकडतो. त्याने असे सर्प पकडून अडचणीत सापडलेल्या काही लोकांचे प्राणही वाचवलेले आहेत. या हक्कुलला आपण पकडलेल्या सर्पांसाठी, पुण्याला कात्रज जवळ जसे एक सर्पोद्यान आहे तसेच, एक सर्पोद्यान त्याच्या गावाजवळ बनवायचे आहे व त्या साठी सरकारने एक प्लॉट आपल्याला द्यावा अशी त्याची बर्‍याच दिवसांपासून मागणी आहे.

आपल्या मागणीसाठी हक्कुल बर्‍याच दिवसांपासून निरनिराळ्या सरकारी ऑफिसांत खेटे घालतो आहे. अगदी कनिष्ठ अधिकार्‍यांपासून वरिष्ठ अधिकार्‍यांपर्यंत तो सर्वांना भेटला आहे. त्याने राष्ट्रपतींकडे सुद्धा आपला अर्ज पाठवला आहे. हक्कुलच्या म्हणण्याप्रमाणे वरिष्ठ अधिकार्‍यांनी त्याची मागणी मंजूर केलेली असली तरी कनिष्ठ अधिकारी काहीतरी काड्या घालून त्याला हा प्लॉट मिळू देत नाहीयेत. सरकारी अधिकार्‍यांच्या या आडमुठेपणाच्या धोरणाने हक्कुल अतिशय निराश झाला व त्याने वैतागाने एक अतिरेकी उपाय शेवटी अवलंबिला.

दोन दिवसापूर्वी हक्कुल आणि त्याचे काही मित्र हे हरैया या गावातील तहसिलदाराच्या कचेरीत घुसले व बरोबर आणलेल्या पोत्यातील साप व नाग त्यांनी चक्क तहसिलदार कचेरीत सोडून दिले. तहसिलदार ऑफिस त्या वेळी लोकांनी गच्च भरलेले होते. तेथे 100 तरी अधिकारी व लिपिक होते व याशिवाय कामासाठी आलेले अनेक लोक तेथे होते. साप बघितल्यावर घाबरलेले खेडूत व कर्मचारी यांनी पळायला सुरवात केली तर काही टेबलावर चढून बसले. पुढचे काही तास, तहसिलदार कचेरीत संपूर्ण गोंधळाचे वातावरण होते. अनेकांनी सापांचे आपल्या मोबाईलवरून फोटो काढले. काही साप टेबल खुर्च्यांवर चढण्याचा प्रयत्न करू लागले. काही लोकांनी चादरी आणल्या व त्या चादरी ते सापांवर टाकण्याचा प्रयत्न करू लागले. काही लोकांनी काठ्या आणल्या व ते हक्कुलला बडवण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र या सगळ्या गोंधळात, हक्कुल व त्याचे साथीदार गायब झाले. तसेच त्याने सोडलेले साप व नाग तहसिलदार कचेरीत लपून बसले.

नशीबाने कोणालाही सर्पदंश झाला नाही किंवा गोंधळात कोणी जखमीही झाले नाही. आपले अपेक्षित काम झाले नाही म्हणून केलेली ही सर्पगिरी बहुदा हक्कुलला चांगलीच अडचणीत टाकणार आहे. त्याचे काम तर आता होणे शक्यच नाही पण त्याला बहुदा पोलिस कोठडीची हवा खायला लागेल असे वाटते.

1 डिसेंबर 2011

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

4 thoughts on “सर्पगिरी

  1. This is a very interesting story and written very well.
    Sunil Gadgil

    Posted by Sunil Gadgil | डिसेंबर 1, 2011, 7:09 pm
  2. though this may look good but it is wrong way to convey message to government machinery.

    Posted by sahebrao sonawane | डिसेंबर 6, 2011, 9:37 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: