.
Travel-पर्यटन

कर्नाटक मधील समुद्र किनारे – एक फोटोब्लॉग


समुद्र किनारा म्हटला की आपल्याला साहजिकच प्रथम आठवतात ते कोकणचे किंवा गोव्याचे समुद्र किनारे. परंतु गोव्याच्या आणि कारवारच्याही दक्षिणेला काही अप्रतिम सुंदर समुद्र किनारे आहेत. या किनार्‍यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे काशीद किंवा मुरूड सारखे व्यापारीकरण अजून झालेले नाही. त्यामुळे प्राकृतिक निसर्ग सौंदर्य भरपूर प्रमाणात पहायला मिळते.

गोकर्ण महाबळेश्वर मंदिराजवळ असलेला हा ओम किनारा. शेजारी असलेल्या खडकांच्या रांगानी अतिशय रमणीय दिसतो. गोव्या प्रमाणेच येथे परदेशी पाहुणे बरेच येतात.

हा मरवंथी किनारा! याचे वैशिष्ट्य म्हणजे या किनार्‍याला लागूनच सुपर्णिका नदी वाहते. रस्त्याच्या एका बाजूला मरवंथी किनार्‍याजवळच्या खुल्या समुद्रातले खारे पाणी तर दुसर्‍या बाजूला गोड्या पाण्याची नदी असे सहसा न आढळणारे चित्र येथे दिसते.

मरवंथी किनार्‍याला लागूनच असलेला हा ट्रासी किनारा! माडाची झाडे, हिरवळ व रुपेरी वाळू यांनी हा अतिशय निसर्गरम्य वाटतो.

अरबी समुद्रा लगतच बैन्दूर ही एक टेकडी आहे. या टेकडीवरून खाली बघितले की घनदाट वृक्षराजी व त्याच्या मागेच समुद्राच्या लाटा दिसतात.

बैन्दूर टेकडीवरून दिसणारा अरबी समुद्र व खाडी.

बैन्दूर टेकडीवर राहण्यासाठी बांधलेले घरकुल.

समुद्रस्नान किंवा नुसतेच डुंबणे यासाठी सर्वात सुरक्षित असलेला सोमेश्वर किनारा. याचा उतार इतका कमी आहे की समुद्राच्या आतपर्यंत बिनधास्त जाता येते.

मुरुडेश्वरचा किनारा; या किनार्‍याजवळ एक शंकराचे देऊळ व गोपूर आहे. शेजारील टेकडीवर शंकराची एक भली थोरली मूर्ती आहे.

मुरुडेश्वर किनार्‍यावरचा सूर्यास्त. नितांत रमणीय व निसर्ग सौंदर्य असलेले कर्नाटकाच्या समुद्र किनार्‍यांना एकदा तरी भेट द्यायलाच हवी.

28 नोव्हेंबर 2011

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

10 thoughts on “कर्नाटक मधील समुद्र किनारे – एक फोटोब्लॉग

 1. तुमचे blogs मी आवर्जुन वाचतो. खूप छान लिहिता आणि खूपच छान माहिती मिळते. असेच नेहमी लिहित रहा, आणि आमच्या बुध्दीला खाद्य देत रहा. Wish you all the very best.
  Sandeep Karambelkar

  Posted by Sandeep Karambelkar | नोव्हेंबर 28, 2011, 7:48 pm
 2. वाह.. सुंदर फोटोज. एकदा जायला हवंच 🙂 🙂

  Posted by सुहास | नोव्हेंबर 29, 2011, 4:21 सकाळी
 3. खूपच…सुंदर फोटो

  Posted by bolMJ | नोव्हेंबर 29, 2011, 10:56 सकाळी
 4. sagle photos bhannat. akdam mast. akdatari bhet dywe ashi thikane…mast…keep it up….sundar sundar photos yewu det…

  Posted by prasad | डिसेंबर 1, 2011, 10:00 pm
 5. photo pahun he samudrakinaare khoop pahavese vatat aahet. mi nakki ekhadya tour company barobar jain \
  urmila wadwekar

  Posted by urmila wadwekar | डिसेंबर 11, 2011, 8:38 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: