.
ताज्या घडामोडी Current Affairs

बिनतोड जवाब


दोन दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करणारे व अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातील एक सहकारी असलेले श्री. प्रशांत भूषण यांनी कश्मिर बद्दल एक वादग्रस्त विधान केले. या विधानामुळे भारतातील सर्व सुबुद्ध नागरिकांना खेद वाटणे साहजिकच आहे. परंतु मला तर श्री, प्रशांत भूषण यांचे हे विधान म्हणजे कश्मिर बद्दल या सदगृहस्थांना असलेल्या अज्ञानाचेच द्योतक वाटते. श्री. प्रशांत भूषण मोठे कायदे पंडीत आहेत. कायद्यांबद्दल त्यांना सखोल ज्ञान आहे या गोष्टी कोणीही नाकारणार नाही परंतु कायद्याचे ज्ञान असले म्हणजे ती व्यक्ती सर्वज्ञानी असतेच असे नाही हेच श्री. प्रशांत भूषण यांनी आपल्या वक्तव्याने दाखवून दिलेले आहे.

गेली 64 वर्षे कश्मिर मधील पाकिस्तानी आक्रमण, नंतरची घुसखोरी व 1948, 1965, 1971, 1999 या वर्षात झालेली भारत पाकिस्तान युद्धे या सर्वांची मोठी झळ ज्या सेनादलांनी सहन केली आहे. या साठी ज्या जवानांनी व अधिकार्‍यांनी रक्त सांडले आहे व आपल्या कुटुंबियांची अपरिमित हानी डोळ्यासमोर दिसत असताना सुद्धा स्वत:चे प्राण झोकून देऊन कश्मिरचे संरक्षण केले आहे त्या सर्व सैनिकांच्या स्वार्थत्यागाचा हे विधान म्हणजे एक मोठा अपमानच आहे असे मला वाटते. सेनादलांची गोष्ट जरी बाजूला ठेवली तरी कश्मिरमध्ये सार्वमताची आवश्यकता आहे हा शोध प्रशांत भूषण यांनी कसा लावला त्याचा विचार करण्यातही फारसा अर्थ मला दिसत नाही.

श्री. प्रशांत भूषण यांच्या कश्मिर बाबतच्या विधानाला एक बिनतोड जवाब आजच प्रसिद्ध झालेल्या काही आंकड्यांमुळे दिला जातो आहे. या वर्षी कश्मिरला 11 लाख भारतीयांनी या उन्हाळ्यात भेट दिली आहे. लडाखला 1.43 लाख व अमरनाथच्या यात्रेला 6.35 लाख भारतीय या वर्षी जाऊन आले. कश्मिर बद्दल भारताला किती प्रेम व आत्मियता वाटते आहे हेच या आकड्यांवरून दिसते आहे यात शंकाच नाही. या शिवाय जम्मू मधील प्रसिद्ध वैष्णव देवी मंदिराला 75 लाख भारतीय भाविकांनी भेट दिली आहे. कश्मिर मधला वादविवाद हा काही फुटीरतावादी व पाकिस्तानवादी गटांनी धगधगत ठेवलेला आहे व सर्व सामान्यांना त्याचे काही फारसे सोयरसुतक नाही ही गोष्टच यावरून दिसून येते. कश्मिर मधे शांतता राखली गेली तर किती मोठ्या प्रमाणातील पर्यटन व्यवसाय या राज्यात होऊ शकेल ? व यामुळे या राज्यातील लोकांना केवढे मोठे उत्पन्न व रोजगार मिळू शकेल? या दोन्ही प्रश्नांचे हे आकडे अतिशय चपखल अशी उत्तरे आहेत. कोणत्याही प्रदेशातील आर्थिक व्यवस्था जर सुदृढ असली तर त्या प्रदेशाचा विकास होण्यास फारसा वेळ लागत नाही. कश्मिरमधे शांततेच्या उन्हाळ्यांची आणखी काही अशीच वर्षे गेली तर त्यामुळे वाढत जाणार्‍या पर्यटनाचा बराच मोठा हातभार, तेथील दारिद्र्य दूर होण्यास कारणीभूत होईल हे एखादा शाळकरी मुलगाही सांगू शकेल.

कश्मिर मधला पर्यटकांचा ओघ पुढे वाढतच जाणार आहे. बनिहाल जवळच्या पिर पांजाल पर्वतराजीमध्ये, 11 किलोमीटर लांबीच्या रेल्वे लाईनसाठी खोदलेल्या बोगद्याचे काम याच आठवड्यात पूर्ण झाले आहे. पुढच्या वर्षांपर्यंत कश्मिर मधील रेल्वे मार्ग हा उधमपूरला जोडला जाईल असे रेल्वे मंत्रालयाचे म्हणणे आहे. एकदा का रेल्वे मार्ग प्रवासी वाहतुकीला खुला झाला की कश्मिर मधील पर्यटन अगदी सर्व साधारण माणसाच्याही आवाक्यात आल्याशिवाय रहाणार नाही. कोणत्याही प्रदेशात रेल्वे लाईन टाकली गेली की त्या प्रदेशाचा विकास अतिशय जोमाने होत राहतो. कश्मिर याला अपवाद असणार नाही हे नक्की आहे.

कश्मिर खोर्‍यात पाकिस्तानवादी व फुटीरतावादी गट कार्यरत आहेत ही गोष्ट कोणीच नाकारणार नाही. ही सर्व मंडळी परदेशातून येणार्‍या पैशांवर अतोनात श्रीमंत झालेली आहेत. परंतु कश्मिर खोर्‍याशिवाय या राज्याचे जम्मू आणि लडाख हे आणखी दोन भाग आहेत हे बरेच लोक विसरतात. जम्मू तर महाराष्ट्र किंवा बिहार यांच्या इतकाच भारताशी एकरूप झालेला भाग आहेच पण लडाखचा प्रदेशही भारताशी संपूर्ण एकरूप झालेला आहे ही गोष्ट बर्‍याच मंडळींना दुर्दैवाने माहितीच नसते. दक्षिण लडाख मधील झंस्कर नदीचे खोरे हा आतापर्यंत पर्यटकांना फारसा परिचित नसलेला आणखी एक भाग आहे. या भागातील पर्यटन आता कोठे सुरू झालेले आहे.

 

मनालीलेह रस्त्यावर रोहतांग पास या नावाची एक खिंड लागते. हिवाळ्यात ही खिंड बंद होत असल्याने हा रस्ता बंद राहतो. हा रस्ता 12 महिने सुरू रहावा म्हणून या खिंडीच्या खालच्या बाजूस एका बोगद्याचे काम मागच्या वर्षी सुरू झाले आहे. हा बोगदा पूर्ण झाला की मनाली हे गाव झंस्कर खोर्‍यातल्या पद्म या गावाशी 12 महिने जोडले जाईल. पद्म या गावापासून कारगिल व लेह या दोन्ही ठिकाणी 12 महिने चालू असणारे रस्ते असल्याने लडाखचा भाग उर्वरित देशाशी 12 महिने चालू असलेल्या रस्त्यांनी जोडला जाणार आहे.

कश्मिर देशाच्या इतर राज्यांसारखेच देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा एक मजबूत भाग झाले की द्रव्यार्जन करण्याच्या संधींचा अभाव असण्याची तिथल्या लोकांची एक मुख्य मागणीच दूर होणार आहे. या वर्षी पार पडलेल्या उत्तम पर्यटन सीझनमुळे राजकीय मागण्यांनी लोकांच्या द्रव्यार्जन करण्याच्या कालात अडथळे आणू नयेत हे सत्य फुटीरतावादी शिकले असतील अशा आशा करता येईल तर नव्या दळणवळणाच्या मार्गांच्यामुळे कश्मिर भारताच्या आर्थिक व्यवस्थेचा एक मजबूत भाग बनेल अशी आशा आहे.

16 ऑक्टोबर 2011

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

10 thoughts on “बिनतोड जवाब

 1. Aapli lekhan shailee sahaj sopi aahech tasech aapaN kelele likhaN abhyaaspoorN aahe.

  Parantu, haa lekh swatantr lekh mhaNoon adhik samarpak vaaTato. Prashan BhooshN hyaanchyaa vaktavyaashee sambandhit kamee aahe.

  aso. vaachoon aanand miLala. tyaasaathi aabhaar!

  Posted by ranjeetparadkar | ऑक्टोबर 16, 2011, 4:23 pm
  • रणजित पराडकर –

   प्रतिसादाबद्दल धन्यवाद. प्रस्तुत लेख प्रशांत भूषण यांच्या वक्तव्यासंबंधी लिहिलेलाच नसल्याने त्या संबंधी फारसे काही लिहिलेले नाही. त्याचा फक्त उल्लेख केला आहे. कश्मिर मधले पर्यटन वाढले की तेथील बहुतेक अडचणींचे कसे निराकरण होईल व पर्यटनाला वाढ मिळावी म्हणून काय प्रयत्न चालू आहेत याचा मी एक आढावा येथे घेण्याचा प्रयत्न करतो आहे.

   Posted by chandrashekhara | ऑक्टोबर 16, 2011, 5:41 pm
 2. wonderful nicearticle and information

  Posted by anil | ऑक्टोबर 16, 2011, 5:06 pm
 3. आपले उपद्रवमूल्य वाढवणे हा अण्णाना समर्थन देणाऱ्यांचा हेतू आहे. त्याना भ्रष्टाचाराचे सोयरसुतक नाही.

  Posted by मनोहर | ऑक्टोबर 16, 2011, 10:26 pm
 4. चंद्रशेखर,
  तुम्ही छान लिहिता! 🙂
  पण या लेखाबद्दल मी पूर्णपणे सहमत नाही.

  आपल्या इथे स्वत:ला जे योग्य वाटेल ते बोलले तर देशद्रोह असं का समजलं जातं?
  भारतीय आहे म्हणून कायम भारताचीच बाजू घ्यावी असे काही नाही.

  जे काही थोडं-फार मी वाचलेलं आहे, त्यावरून, काश्मिरी जनतेला भारत/पाकिस्तान हे ठरवण्यासाठी जनमत घेण्यात यावं असं ठरवण्यात आलेलं होतं, जे काही ( 🙂 ) कारणाने झालं नाही. ( हे चुकीचं असल्यास, कृपया निदर्शनास आणून द्या. )

  मुद्दा हा आहे, की काश्मिरी किंवा ईशान्य भारतातील राज्यांना भारताबद्दल आत्मीयता का वाटावी?
  महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक इ. ठराविक राज्येच फक्त प्रगत आहेत.

  अर्थात, बिहार, उत्तरप्रदेश पण मागासच आहेत, पण ते मुख्य भूमीवर तरी आहेत.
  What about north-eastern states? They don’t even have proper connectivity. We saw that in Sikkim quake.

  जर काही पाहिजे असेल तर ते म्हणजे राजकीय इच्छाशक्ती! border states ना main-stream मध्ये आणण्याची!
  प्रशांत भूषण पण हेच म्हणाले होते. आधी हे सर्व करा, आणि त्यांनाच ठरवू द्या की त्यांना प्रगतीशील भारतात रहायचंय की स्वत:च कोसळू लागलेल्या शेजारी देशात!

  मत व्यक्त करायचा अधिकार सर्वांना आहे, जरी ते चुकीचं(!) असलं तरी!
  नको वाटलं तर नका घेऊ, पण म्हणून बोलायचचं नाही असं नाही!

  प्रशांत भूषण याचं मूळ वक्तव्य : http://www.youtube.com/watch?v=eRjfDuO340w

  -अनिरुद्ध

  ता. क. : बाकी पर्यटन वाढल्यावर राहणीमान सुधारेल आणि काम मिळाल्याने असंतोष कमी होईल हे मात्र अगदी खरंय!

  Posted by rohit | ऑक्टोबर 19, 2011, 5:49 pm
  • रोहित
   प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तुम्ही बरेच मुद्दे उपस्थित केले आहेत त्यामुळे माझ्या कुवतीप्रमाणे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.
   1. स्वत:चे मत मांडणे हा लोकशाही मधला मूलभूत अधिकार आहे व झुंडशाहीने त्याला दबवू पाहणे हे अर्थातच संपूर्णतया गैर आहे. माझे आधीचे हे ब्लॉगपोस्ट बघितल्यास या बाबतीतले माझे काय विचार आहेत हे लक्षात येऊ शकेल.
   2. 1948 साली जेंव्हा कश्मिरमध्ये युद्ध विराम घोषित केला गेला तेंव्हा झालेल्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीच्या ठरावाप्रमाणे कश्मिर मध्ये सार्व मत घेण्यापूर्वी पाकिस्तानने ताब्यात घेतलेला सर्व प्रदेश परत भारताच्या ताब्यात देणे जरूरीचे होते. हा प्रदेश पाकिस्तानने सोदला तर कधीच नाही आणि त्यातील सीमेवरचा बराच मोठा भाग चीनला परस्पर दान करून टाकला. पाकिस्तान ने करार भंग केलेला असल्याने भारताने सार्वमत घेण्याची आपली जबाबदारी मात्र पार पाडावी या विचाराला काही अर्थच उरत नाही.
   3. कश्मिर किंवा पूर्वेकडील राज्ये ही गेली 50 वर्षे मुख्य भूमीपासून अनेक कारणांनी आयसोलेटेड राहिलेली आहेत. दिलीतील सरकारांनी या राज्यांत दळणवळणाची साधनेच उपलब्ध करून दिली नाहीत हे त्या पैकी एक प्रमुख कारण आहे. गेल्या 5/10 वर्षापासून या साठी प्रयत्न सुरू झाले आहेत. यापैकी कश्मिरपर्यंतचा रेल्वे मार्ग व लडाख साठी रोहतांग बोगदा हे दोन प्रमुख प्रयत्न आहेत.
   4. कश्मिर मध्ये अतिरेक्यांचा प्रभाव पडण्याच्या बर्‍याच आधी मी कश्मिर मधे काही महिने वास्तव्य केलेले आहे. सगळीकडे बसने फिरलेलो आहे. त्या काळात तरी तिथल्या जनतेला आपण भारताचा भाग नाही असे वाटत असल्याचे मला कधीही फील झाले नाही. ही चळवळ काही फुटीरतावाद्यांनी व दिल्लीच्या सरकारने सुरवातीच्या काळात अनुसरलेल्या धोरणांमुळे फोफावली असे मला वटते.

   Posted by chandrashekhara | ऑक्टोबर 20, 2011, 1:56 pm
 5. This post has boosted my confidence that come what may, Kashmir shall always be a part of India.

  Posted by shashi | ऑक्टोबर 19, 2011, 9:36 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: