.
ताज्या घडामोडी Current Affairs

आकाश- दर्शन


2008 साली दिल्लीला भरलेल्या ऑटोएक्स्पो या मोटरगाड्यांशीसंबंधित प्रदर्शनात, टाटा मोटर्स या कंपनीने नॅनो हे नाव ठेवलेली व 1 लाख किंमत असणारी, जगातील सर्वात स्वस्त मोटरगाडी प्रदर्शित करून एक खळबळ उडवून दिली होती. आपले प्रॉमिस कायम राखत या कंपनीने ही मोटर गाडी खरोखरच 1 लाख रूपयामध्ये 2009 साली लोकांना प्रत्यक्ष विकण्यास सुरूवात केली. या गाडीची किंमत लक्षात ठेवून जर या गाडीची इतर गाड्यांशी तुलना केली तर ही गाडी अतिशय उजवी आहे हे लगेच लक्षात येते. आज सुद्धा रस्त्यावर ज्या नॅनो गाड्या दिसतात त्या तुमचे लक्ष वेधून घेतील अशाच आकर्षक असतात.

असे जरी सगळे असले तरी नॅनोची विक्री, टाटा कंपनीला पाहिजे तशी वाढत का नाही? सुरूवातीच्या काही गाड्यांना अचानक पेट घेणे वगैरे अडचणी आल्या होत्या. परंतु कंपनीने त्यांचे निराकरण केल्यावर पुढे काही तांत्रिक अडचण, नॅनो संबंधात असल्याचे ऐकिवात तरी नाही. तरीही या गाडीची विक्री अपेक्षेप्रमाणे वाढत का नाही हा एक मोठा रोचक विषय मला वाटतो आहे.

परवा भारताच्या शिक्षण मंत्र्यांनी संगणक क्षेत्रातील अशाच एका नॅनो उत्पादनाची घोषणा करून खळबळ उडवून दिली आहे. आकाश असे नाव ठेवलेला हा संगणक विद्यार्थ्यांना फक्त 2276 रुपयात देण्याची सरकारची योजना आहे तर खुल्या बाजारात हा संगणक 3000 रुपयाला नोव्हेंबर पर्यंत मिळू शकेल असे कॅनडा मधील या संगणकाची उत्पादक कंपनी डेटाविन्डम्हणते आहे. मागच्या वर्षी ऍपल कंपनीने आयपॅड या नावाचा टॅबलेट संगणक बाजारात आणून धमाल उडवली होती. त्या टॅबलेट प्रकारातीलच हा आकाश संगणक आहे. आयपॅड पंचवीस ते तीस हजार या किंमतीला ग्राहकाला पडत असताना हा आकाश संगणक फक्त 2276 रुपयाला देणे कसे शक्य आहे? असा प्रश्न कोणालाही पडेल.

या आकाश संगणकाची एकूण स्पेसिफिकेशन्स काय आहेत हे बघणे त्यामुळे महत्वाचे ठरेल. हा संगणक 7 इंच आकाराचा असून वजन फक्त 350 ग्रॅम इतकेच आहे. या संगणकात ऍन्ड्रॉइड 2.2 फ्रोयो ही प्रणाली किंवा ऑपरेटिंग सिस्टीम वापरलेली असून मुख्य प्रोसेसर 366 मेगाहर्टझ वारंवारितेवर कार्य करतो. या बरोबरच यात एक व्हिडियो कोप्रोसेसर आहे. संगणकाची रॅम 256 एमबी एवढी आहे. अर्थात या संगणकावर एचडी प्रकारचे व्हिडियो बघणे कठिण दिसते. कसेही बघितले तरी ही स्पेसिफिकेशन्स काही अगदी टुकार आहेत असे म्हणता येणार नाही.

 

हा संगणक वायफाय, 2जी किंवा 3जी या द्वारे आंतरजालाला जोडता येणार आहे. संगणकाची मेमरी 2 जीबी एवढी आहे. आंतरजालावर भ्रमंती करण्यासाठी या संगणकात यूबीआय सर्फर म्हणून प्रणाली आहे. व बाहेरून इतर उपकरणे जोडण्यासाठी यूएसबी पोर्टस सुद्धा दिलेली आहेत. मला स्वत;ला या संगणकाची सर्वात आवडलेली वैशिष्ट्ये म्हणजे .डॉक किंवा .पीडीएफ या सारख्या फाईल्स यावरून सरळ वाचता येणार आहेत. पुस्तके वाचण्यासाठी हा संगणक त्याचा आकार व वजन यामुळे आदर्श ठरावा.

हा संगणक बनवणार्‍या कंपनीची इतर उत्पादने बघितली तर या प्रकारची बरीच उत्पादने ते करत आहेत असे दिसते. हा संगणक सर्वसामान्य ग्राहकांसाठी यूबीस्लेटया नावाने बाजारात नोव्हेंबरमध्ये विक्रीस येईल.

या संगणकाची सर्व वैशिष्ट्ये बघितल्यावर मला दोन तीन गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. एक तर पूर्ण क्षमतेच्या संगणकाची ज्यांना आवश्यकता नाही किंवा ज्यांना परवडत नाही अशा विद्यार्थी किंवा तत्सम वर्गासाठी हा संगणक मुद्दाम बनवला आहे. या संगणकाचा वेग आणि क्षमता ही अतिशय सीमित आहे. जरी या संगणकात, उत्पादकांनी खूपशी वैशिष्ट्ये घालण्याचा प्रयत्न केला असला तरी प्रत्यक्षात फक्त काही ठराविक कामांसाठीच हा संगणक वापरता येईल असे दिसते. आय पॅड सारख्या इतर टॅबलेट संगणकांशी याची तुलना करण्यात काहीच अर्थ नाही.

मात्र नॅनो गाडीशी तुलना या संगणकाशी करण्याचा मोह मला आवरत नाही. नॅनोमध्ये सुद्धा अशीच सर्व वैशिष्ट्ये देण्यात येतात. असे असूनही नॅनो गाडीची विक्री ज्या कारणांसाठी होत नाही त्याच कारणांसाठी हा आकाश संगणक विकला जाणार नाही अशी भिती मला वाटते आहे. नॅनो गाडी खरे म्हणजे दुचाकी स्वारांसाठी बनवली गेली होती. पण रस्त्यावरच्या गर्दीत दुचाकीवरून मार्ग काढणे जसे शक्य होते ते नॅनो वापरणार्‍याला शक्य होत नाही व तिला दुचाकीच्या मानाने खर्चही बराच जास्त येतो. त्यामुळे दुचाकी स्वार दुचाकीच जास्त करून वापरतात. मग नॅनो घेतो कोण आहे? ज्या कुटुंबांत दोन किंवा तीन गाड्या आहेत ते आणखी एक छोटी गाडी जवळपास जायला बरी असावी म्हणून नॅनो घेत आहेत.

याशिवाय ग्राहकांच्या मानसिकतेचा आणखी एक पैलू या नॅनोच्या निमित्ताने दिसतो आहे. लोकांना स्वस्त गोष्टी नकोशा असतात. आपण स्वस्त गोष्ट घेतल्याने इतरांच्या मनातील आपली प्रतिमा खालच्या दर्जाची होईल असे बहुदा त्याना वाटत असावे. याच कारणामुळे छोट्या गाड्या पाच दहा वर्षांपूर्वी घेणारे लोक आता मोठ्या मोठ्या गाड्या, रस्ते व पार्किंग जागा कमी पडत असूनही खरेदी करताना दिसतात. नॅनोला ग्राहकांचा जो विरोध होतो आहे तो या कारणानेच होत असावा असे मला वाटते.

नॅनोच्या बाबतीत जी मानसिकता ग्राहकांची आहे तीच मानसिकता आकाशच्या बाबतीत लोकांची असेल अशी शक्यता मला वाटते आहे. ज्यांना हा संगणक पुरेसा आहे ते सुद्धा जोशी काय म्हणतील?” अशा मनोवृतीमुळे, आकाश विकत घेण्यात काचकूच करू शकतात.

मी मात्र आकाश नक्की विकत घेणार आहे. आरामखुर्चीवर बसून ईबूक्स वाचण्याचे माझे स्वप्न या संगणकाद्वारे नक्की साध्य होईल असे मला वाटते.

7 ऑक्टोबर 2011

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

5 thoughts on “आकाश- दर्शन

 1. i am also waiting for this tablet , hope it will be in market in month of nov.

  Posted by prasannakulkarni | ऑक्टोबर 7, 2011, 4:05 pm
 2. good one lokanchi mansikta achuk olakli ahe, every one is thinking lok kay mhantil.

  Posted by anil | ऑक्टोबर 7, 2011, 4:28 pm
 3. अनावश्यक सोयींची भरती केली जात असल्यानेच तथाकथित महागाई वाढत आहे. हौस करावयाची असल्यास करा, पण त्याची किंमत चुकती करताना केकाटू नका असे सांगण्याची वेळ आली आहे.

  Posted by मनोहर | ऑक्टोबर 7, 2011, 11:09 pm
  • मनोहर-

   आपल्या गरजेपेक्षा जास्त सोयी असलेली उत्पादने घेण्याकडे लोकांचा कल पीअर प्रेशर मुळे असतो. त्या साठी ते परवडत नसतानाही पैसा व वेळ खर्च करण्यास नेहमीच तयार असतात हे नॅनोच्या उदाहरणावरून दिसून आले आहे तसेच या संगणकाच्या बाबतीतही हो ऊ शकते असे मला म्हणायचे आहे.

   Posted by chandrashekhara | ऑक्टोबर 8, 2011, 12:05 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: