.
ताज्या घडामोडी Current Affairs

वेड्यांच्या इस्पितळाकडे


गेल्या आठवड्यात दोन मान्यवरांनी आणखी दोघा मान्यवरांना वेड्याच्या इस्पितळाकडे जाण्याचा सल्ला दिला आहे. यापैकी पहिला सल्ला अण्णा हजारे यांनी एका राजकीय पक्षाच्या सुपरिचित पुढार्‍याला दिला आहे. या पुढार्‍याची एकूण वक्तव्ये बघता अण्णांचा सल्ला काही फारसा चूक आहे असे म्हणता येणार नाही. मात्र दुसरा असाच एक सल्ला, भारतातल्या एका मोठ्या राज्याच्या मुख्य मंत्र्यांनी दिला आहे. हा सल्ला त्यांनी विकिलीक्स चे प्रमुख संपादक ज़्युलिअन पॉल असान्गे यांना दिला आहे. कोण आहेत हे ज्युलिअन असान्गे? हे पाहणे रोचक ठरावे.

ज्युलिअन पॉल असान्गे हे चाळीस वर्षे वयाचे एक ऑस्ट्रियन पत्रकार आहेत. या शिवाय ते एक प्रकाशक, संगणक तज्ञ व आंतरजालावरील सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी अनेक देशांत वास्तव्य केलेले आहे व छापील माध्यमाची स्वायत्तता, शोधक पत्रकारिता व सेन्सॉरशिप या बद्दल त्यांनी अनेक देशांमधे ठाम भूमिका घेतलेली आहे. शासन हे खुले व पारदर्शक असले पाहिजे हे ते ठामपणे सांगतात.
विकिलीक्स हा काय प्रकार आहे? हे कदाचित काही वाचकांना माहिती नसेल. ही एक आंतर्राष्ट्रीय, विना नफा, तत्वावर चालणारी संस्था आहे. या संस्थेचे संकेत स्थळ किंवा वेब साईट 2006 मध्ये सनशाईन प्रेस ऑर्गनायझेशन यांच्या विद्यमाने चालू झाले. निरनिराळ्या देशांची सरकारे, त्यांचे राजदूत व इतर अधिकारी यांच्यात जो गुप्त पत्रव्यवहार चालू असतो हा गुप्त पत्रव्यवहार प्रसिद्ध करून हे पत्रव्यवहार लोकांना कळवण्याचे अतिशय महत्वाचे कार्य विकिलीक्स ही संस्था करत आहे. इराक, अफगाणिस्तान या देशांच्यात अमेरिकन सरकारचे प्रत्यक्ष धोरण काय होते व गुप्तपणे त्यांचे काय कार्य चालू होते हे दर्शवणार्‍या केबल्स मागच्या वर्षी प्रसिद्ध करून, विकिलीक्सने अमेरोकन सरकारला एक फार मोठा दणका मागच्या वर्षीच दिला होता. भारतातील अमेरिकेचे राजदूत व वॉशिन्ग्टन येथील परराष्ट्र खात्याचे अधिकारी यांच्यातील गुप्त पत्रव्यवहार सध्या विकिलीक्स प्रसिद्ध करत आहे. या पत्रव्यवहारातील एक हलकी फुलकी केबल दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाली. या केबल मधे भारतातील एका मोठ्या राज्याच्या मुख्य मंत्र्याबद्दल अमेरिकन राजदूताचे मत प्रसिद्ध झाले आहे.
या केबलमधे अमेरिकन राजदूत म्हणतात की या मुख्य मंत्री मनोरुग्ण असलेल्या हुकुमशहा आहेत. नवी चप्पल पाहिजे म्हणून त्यांनी एक खाजगी विमान चप्पल आणण्यासाठी दिल्लीला पाठवले होते. यासाठी राज्यसरकारचे दहा लाख रुपये खर्च झाले होते. आपल्यावरील या टीकेमुळे संतप्त होऊन या मुख्य मंत्र्यांनी ज्युलिअन असान्गे यांच्यावरच आग पाखडली आहे व त्यांना वेड्याच्या इस्पितळात भरती होण्याचा सल्ला दिला आहे.
वास्तविक रित्या या मुख्य मंत्र्यांबद्दलचे हे निरिक्षण त्या काळातले अमेरिकेचे भारतातले राजदूत, डेव्हिड सी. मलफर्ड यांनी केलेले आहे. त्याच्याशी ज्युलियन असान्गे यांचा काहीच संबंध नाही. त्यांनी फक्त ही केबल प्रसिद्ध केली आहे. असे असताना प्रत्यक्षात कोणाला वेड्याच्या इस्पितळात जाण्याची गरज आहे? हे कोणत्याही सूज्ञांस सहज कळू शकेल.
मुख्य मंत्र्यांनी या केबलचा संबंध थेट परंपरावादी सनातन्यांशी जोडला आहे. त्यांच्या मताने एक दलित, मुख्य मंत्री झालेला या सनातन्यांना बघवत नाही व म्हणून त्यांनी हे असले खोटे आरोप त्यांच्यावर केले आहेत. एक परदेशी नागरिक असलेले व भारताबाहेर वास्तव्य असलेले ज्युलियन असान्गे हे असले उद्योग का करतील याचे काहीच स्पष्टीकरण या मुख्य मंत्र्यांनी दिलेले नाही. मात्र असान्गे यांनी मुख्य मंत्र्यांनी त्यांच्यावर पाखडलेली आग हसण्यावारी नेऊन त्यांना उलट सल्ला दिला आहे की ज्युलियन यांना, त्यांच्या लंडनमधल्या स्थानबद्धतेतून बाहेर काढून राजकीय आश्रय जर या मुख्य मंत्र्यांनी दिला आणि त्यांना आणण्यासाठी जर आपले खाजगी विमान पाठवले तर ज्युलियन असान्गे मुख्य मंत्र्यांसाठी अतिशय छान अशी इंग्लिश चप्पल घेऊन येतील.
हे सगळे प्रकरण एक राजकीय स्टंट म्हणून जरी दुर्लक्षले तरी यातून दोन महत्वाचे मुद्दे नजरेसमोर आल्याशिवाय रहात नाहीत.
या प्रकरणात जरी या एका मुख्य मंत्र्यांचे नाव कुप्रसिद्ध झालेले असले तरी राजकीय सत्ता प्राप्त झाल्यावर, पाहिजे तशी मनमानी करून स्वत:च्या वैयक्तिक स्वार्थासाठी आणि लहरींसाठी सरकारी यंत्रणा कशीही वापरण्याची सवय अनेक राजकीय नेत्यांना असल्याचे सतत दृष्टीस येते. या मुख्य मंत्री जरी या प्रकरणात बदनाम झालेल्या असल्या तरी त्या एकट्याच या रोगाची शिकार नाहीत तर हा रोग खूप मोठ्या स्वरूपात पसरलेला आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणतीही प्रतिकूल परिस्थिती आपल्या फायद्यासाठी कशी फिरवायची हे या राजकारणी मंडळींना बरोबर समजते. त्यामुळे उद्या या मुख्य मंत्र्यांनी आपली झलेली ही बदनामी आपला राजकीय फायदा करून घेण्यासाठी वापरली व त्यात त्या यशस्वी झाल्या तर आश्चर्य वाटायला नको. त्यांनी गेल्या दोन दिवसात केलेली वक्तव्ये ऐकली तर त्यांच्या मनातील मनसुबा काय असेल हे कळणे काही फारसे अवघड नाही.
8 सप्टेंबर 2011
Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “वेड्यांच्या इस्पितळाकडे

  1. आतापर्यंत विकिलिक्सने जे कागदपत्र उघड केले त्यांवरून पुरेशी हुल्लड माजली नाही, म्हणून त्यांच्या मदतीला भारतीय पक्षकार धावले इतकेच.

    Posted by मनोहर | सप्टेंबर 10, 2011, 5:00 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: