.
Travel-पर्यटन

लडाखचा फुलोरा


भारताच्या उत्तर सीमेवर असलेला लडाख हा प्रदेश मोठा वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतीय उपखंडातील कोणतीही भौगोलिक वैशिष्ट्ये येथे दिसतच नाहीत. हा प्रदेश महाविशाल व महाकाय अशा पर्वतराजींनी पूर्णपणे वेढलेला असला तरी या पर्वतांवर झाडे झुडपे अभावानेच दिसतात किंवा दिसतच नाहीत. या पर्वतांच्यापैकी जी पर्वत शिखरे, हिम रेषेच्या वरच्या उंचीवर आहेत, त्यांच्यावर बाराही महिने पांढरे शुभ्र हिम पडलेले दिसते. ते सोडले तर बाकी सर्व पर्वतरांगा, उघड्या व बोडक्या दिसतात. मात्र बारकाईने बघितले तर प्रत्येक पर्वतावर एका निराळ्याच रंगाची छटा दिसून येते. हिरवट शेवाळी, जांभ्या दगडासारखा जांभळा, लालसर किंवा नारिंगी छटा असलेला आणि लामायुरू जवळ असलेला व चांद्रभूमी या नावाने ओळखला जाणारा पिवळट पर्वत हे सगळे एवढे खास व वैशिष्ट्यपूर्ण दिसतात की त्यांच्या माथ्यांवर वृक्ष झाडे दिसत नाहीत यात काहीतरी चुकल्यासारखे दिसते आहे असे वाटतच नाही.

या अशा डोंगर उतारांच्यावर, खुरटी, बारीक पानांची, अनेक झुडपे जवळ जाऊन बघितले की दिसू लागतात. उन्हाळ्यात या झुडपांच्या आणखी जवळ जाऊन बघितले की निळी, गुलाबी, लाल अशी अनेक रानफुले या झुडपांवर फुललेली दिसू लागतात. इथल्या लडाखी भाषेत, यांना sakalzang-mentok,kalzang-mentok, कालझान्ग मेंटॉक (निळ्या फुलाचे), sulu-mentok, सुलू मेंटॉक (गुलाबी फुलांचे) ,tesma-mentok, टेस्मा मेंटॉक( फिक्या जांभळ्या फुलाचे) luku-mentok, लुकू मेंटॉक(पिवळ्या फुलाचे) झुडुप असेच म्हटले जाते. वनस्पतीशास्त्रज्ञांनी त्यांच्या परिभाषेत या फुलझाडांना काय नावे दिली आहेत? ते मला माहित नाही. पण लडाखी भाषेप्रमाणे मी त्यांना निळ्या फुलाची, पिवळ्या फुलाची असेच म्हणणे जास्त पसंत करीन यात शंकाच नाही.

या वालुकामय पर्वतांच्या उतारांच्यावर, बुर्टसे (Burtse) या नावाचे एक झुडूप आढळते. या झुडपाचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी बर्फाच्छादित परिस्थितींमधे सुद्धा या झुडपाच्या वाळलेल्या फांद्या चटकन पेट घेतात व त्यांची कॅलॉरिफिक व्हॅल्यू इतकी अधिक असते की गिर्यारोहक व स्थानिक या झुडपाला पेटवून त्यावर अन्न शिजवू शकतात. आमच्या वाहनाच्या चालकाला मी या झुडपाबद्दल विचारले असताना त्याने जे झुडूप मला दाखवले त्याला मोठी छान निळी फुले आलेली दिसली. आता निळ्या फुलांनी फुललेले हेच ते बुर्टसे झुडूप नक्की आहे का? हे काही मला सांगता येणार नाही हे मात्र खरे!

मात्र या उघड्या बागड्या वालुकामय वाळवंटी पर्वत उतारांवरून तळाला असलेल्या दर्‍यांच्या पर्यंत आपण पोचलो की चित्र एकदम पालटून जाते. हिरव्यागार पर्णसंपदेने नटलेली पॉपलर व विलो यांची उंच झाडे, हिरवीगार शेते, मधूनच दिसणारी व पिवळ्या धम्मक फुलांनी फुललेली मोहरीची शेते व त्यातून खळखळ वाहणारे निर्झर हे सगळे पाहून, थोड्या काळापूर्वी आपण एका वाळवंटी पर्वत उतारावर होतो याची आठवणही मनाला होणे कठिण बनते. इतका मोहक व सुंदर निसर्ग या वाळवंटी दर्‍यांच्या तळाला आपले वैभव कसा उधळताना दिसतो आहे याचे एक प्रकारचे आश्चर्य मनाला वाटल्याशिवाय रहात नाही.

या शेतांच्या बांधांच्यावर, घरांच्या, झोपड्यांच्या बाजूला, अनेक नितांत सुंदर फुले फुललेली दिसतात. गुलाब तर सदासर्वदा एखाद्या राजासारखा आपला दिमाख दाखवतच असतो पण त्याच्या जोडीला जोड असलेली इतरही अनेक फुले मनाला आल्हाद देत रहातात.

लडाखचा फुलोरा मला जसा जमला तसा मी कॅमेर्‍याने टिपला. ही फुले प्रत्यक्षात बघताना मला जो अवर्णनीय आनंद मिळाला त्याचा काही हिस्सा तरी वाचकांच्या पर्यंत या छायाचित्रांतून पोचावा हीच इच्छा.

12 जुलै 2011

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

5 thoughts on “लडाखचा फुलोरा

 1. nice 1 very beautiful, pl see this link
  http://en.wikipedia.org/wiki/Valley_of_Flowers_National_Park
  my parents recently visit this place.

  Posted by prasannakulkarni | जुलै 12, 2011, 4:15 pm
  • प्रसन्न –

   तुम्ही दिलेल्या दुव्याबद्दल धन्यवाद. Valley of Flowers ही फुलांसाठी प्रसिद्धच आहे. लडाखचे तसे नाही. लडाख म्हटले की उघडे बोडके डोंगर व वाळवंट हेच आपल्या नजरेसमोर येते. असे असूनही या वाळवंटात फुललेली फुले म्हणजे एक नैसर्गिक चमत्कार वाटतो. म्हणून या फुलांची छायाचित्रे ब्लॉगवर टाकावीत असे मला वाटले.

   Posted by chandrashekhara | जुलै 13, 2011, 8:56 सकाळी
   • tumhi aho jao naka karu o, tumhi mazya ajobanchya wayache ahat.
    tumche floweres che snaps khup chan ahet, & how to add watermarks to photos ?

    Posted by prasannakulkarni | जुलै 13, 2011, 9:11 सकाळी
   • प्रसन्न
    तुझे वय माहीत नसल्याने माझ्या अहो-जाओ ने तुला अवघड वाटेल हे माझ्या लक्षात आले नाही. मी जरा जुन्या पठडीतला असल्याने समोरच्या माणसाला एकेरीत संबोधणे मला जड जाते त्यामुळे शक्यतो मी अहो-जाओ मधेच असतो. मी Watermarks माझ्या छायाचित्रांवर टाकत नाही तर कॉपीराईट टाकतो. हे सगळे करण्यासाठी सॉफ्टवेअर्स मिळतात. मी paint.net हे सॉफ्टवेअर वापरतो. माझा या सॉफ्टवेअरचा अनुभव चांगला आहे.

    Posted by chandrashekhara | जुलै 13, 2011, 9:26 सकाळी
 2. Thnks for u r reply , I will use paint.net for for my photos

  Posted by prasannakulkarni | जुलै 13, 2011, 9:30 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: