.
अनुभव Experiences

गायीचे उड्डाण व इतर सुरस आणि चमत्कारिक कथा


माझ्या नातीच्या बडबड गाण्यांच्या(Nursery Rhymes) एका पुस्तकात एक बडबड गाणे आहे.

Hey diddle diddle,

The Cat and the fiddle,

The Cow jumped over the moon,

The little Dog laughed to see such sport,

And the Dish ran away with the Spoon.

या गाण्याच्या शेजारी चंद्रावरून उड्डाण करणार्‍या एका गाईचे चित्र छापलेले आहे. माझ्या नातीची मधून मधून ऑर्डर येते की हे पुस्तक वाचून दाखव म्हणून. या प्रत्येक वेळी मला असे वाटते की हे गाणे म्हणजे मानवी कल्पनाशक्तीची मर्यादा असावी. गाय हा प्राणी जास्तीत जास्त एखादा पाय वगैरे उचलत असावा. गाईने उडी मारली असे कोणी सांगितले तर काय लोणकढी मारतो आहे असेच बहुदा सगळ्यांना वाटेल. त्यामुळे गाईच्या उड्डाणाबद्दल काही लिहिले तर ती एक सुरस व चमत्कारिक कथा असल्याचेच सर्वांना वाटेल, अगदी अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक कथांसारखी! यात मला तरी तिळमात्रही शंका वाटत नाही.

त्यामुळेच, जर्मनी मधल्या बव्हेरिया प्रांतातील, लाऊफेन (Laufen) या गावातल्या एका शेतकर्‍याची मुलगी रेजिना मायर (Regina Mayer) आणि तिची गाय यांची गोष्ट जेंव्हा मी वाचली तेंव्हा माझा काही त्यावर विश्वास बसला नाही आणि वाचकांचाही सुरूवातीस बसेल असे मला वाटत नाही.

ही सगळी कथा सुरू झाली रेजिनाच्या नवव्या वाढदिवसापासून! आपल्या वाढदिवसाचे प्रेझेंट म्हणून आपल्या आईवडीलांनी आपल्याला एक घोडा आणावा अशी या रेजिनाची अतिशय इच्छा होती. पण तिच्या आईवडीलांनी त्याला चक्क नकार दिला. रेजिनाची साहजिकच खूप निराशा झाली. त्यावेळी रेजिनाला लिलीया नावाचे एक गाईचे पारडू वडिलांनी दिले होते. रेजिनाने असे ठरवून टाकले की लिलीला घोड्यासारखे शिकवायचे. अर्थातच रेजिनाचे सर्व प्रयत्न पूर्णपणे वाया गेले. ‘लिलीने कोणतेही शिक्षण घेण्याचे नाकारले व आपला गायपणा पूर्ण सिद्ध केला.

लिलीला शिक्षण देण्याचे आपले सर्व प्रयत्न संपूर्ण फसले आहेत हे लक्षात आल्यावरही रेजिनाने आपला गाईला शिक्षण देण्याचा हेका काही सोडला नाही. मायर कुटुंबाच्या गोठ्यात, 2 वर्षे वयाची व ल्यूना (Luna) नावाची एक गाय आहे. रेजिनाने मग तिच्याकडे आपला मोर्चा हलवला. ही ल्यूना गाय पहिल्यापासूनच जरा निराळीच होती. तिने रेजिनाला सहकार्य द्यायला सुरूवात केली. रेजिनाने तिच्या पाठीवर घोड्याचे खोगीर चढवले व तिच्या पाठीवर बसून स्वारी करायला सुरूवात केली. आता ल्यूना गाईला “go,” “stand” or “gallop” या सारख्या सूचना समजू लागल्या आहेत अर्थात यासाठी तिचा मूड असावा लागतो ही गोष्ट वेगळी.

काही दिवसांनंतर रेजिनाला गाईच्या पाठीवर बसून नुसते इकडे तिकडे फिरण्याचा कंटाळा आला व तिने छोटे छोटे अडथळे कसे पार करायचे हे ल्यूना गाईला शिकवायला सुरूवात केली. ल्यूनाने हे कसब लवकरच आत्मसात केले व त्यानंतर ती अडथळ्यांवरून उड्याही मारायला शिकली. रेजिनाला या उडीसाठी आवश्यक असणारी प्रत्येक हालचाल तिला दाखवायला लागली व प्रत्येक हालचाल तिने शिकावी म्हणून गाजरे व साखर यांची लाच द्यावी लागली. आज ल्यूना 3 फूटापर्यंतच्या अडथळ्यांवरून सहजपणे उडी मारू शकते.

रेजिनाच्या मताने, ल्यूनाला आपण घोडाच आहोत असे वाटते कारण ती सतत इतर घोड्यांच्या मागे मागे असते. मात्र इतर घोड्यांना ती फारशी आवडत असल्याचे दिसत नाही. गोठ्यातल्या इतर गाईंनाही ल्यूना आवडत नाही आणि त्या गाई तिला मधून मधून लाथांचा खुराक देत असतात.

स्वित्झर्लंडमधल्या झुरिच शहराजवळ असलेल्या Adliswil या गावामधे गाईंना शिक्षण देण्यासाठी एक गाईंची शाळाआहे. या शाळेत गाईंना उड्या मारणे, जमिनीवर गुंडाळून ठेवलेली जाजमे आपल्या नाकाने सरळ करणे वगैरे सारखी बारीकसारीक कामे शिकवली जातात. रेजिनाने या शाळेला फोन करून, ल्यूनाने अडथळे ओलांडण्यासाठी उड्या मारणे वगैरे हे तिच्यासाठी धोकादायका नाही ना? हे विचारून घेतले आहे. तसेच ल्यूनाच्या पशु वैद्याने गाईंनी उड्या मारण्यात काहीही धोकादायक नाही हे मान्य केले आहे.

रेजिनाच्या मित्रमैत्रिणींनी प्रथम रेजिनाच्या या चमत्कारिक छंदाबद्दल तिची बरीच चेष्टा मस्करी केली होती. आता मात्र ल्यूनावर स्वारी करण्यासाठी सगळ्यांची चढाओढ असते. रेजिनाची चिकाटी बघून शेवटी तिच्या वडिलांनी आता तिच्यासाठी एक घोडा खरेदी करावयाचे ठरवले आहे.

यापुढे केंव्हाही माझ्या नातीला मी हे डिडल डिडल!’ हे बडबडगाणे वाचून दाखवीन, त्यावेळी मला रेजिना आणि तिची ल्यूना गाय नक्की आठवतील. अगदी चंद्रावरून नसले तरी पृथ्वीवर केलेले तिचे उड्डाण लक्षात राहण्यासारखे खचित आहे.

19 एप्रिल 2011

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

3 thoughts on “गायीचे उड्डाण व इतर सुरस आणि चमत्कारिक कथा

 1. Once again, you have confirmed what a treasure trove of information your blog is!! I love this blog!

  Posted by Nikhil Bellarykar | एप्रिल 19, 2011, 4:04 pm
 2. > गाय हा प्राणी जास्तीत जास्त एखादा पाय वगैरे उचलत असावा.
  >
  सॅन होजे-ज़वळ East Bay Regional Park District च्या अनेक जंगलांत गाईंना प्रवेश आहे. गाय चढावावर किंवा उतारावर काय वेगानी धावते हे ते पाहिल्यावरच लक्षात येतं. आपण गोठ्यातल्या गायीचं फार गरीब रूप पाहिलं असतं. त्यातून तिचं वासरू ट्रेलच्या दुसर्‍या बाज़ूला असेल तर महासंकट.

  इथले सगळे लोक आपल्याला त्रास देणारे नाहीत हे या मूर्ख प्राण्याच्या लक्षात कसं येत नाही, असा मला प्रश्न पडतो. पण त्यांची ज्या संख्येनी रोज़ हत्या होते ते पाहता गोर्‍या जगातल्या गायीच्या रक्तात माणसांबद्‌दलचा अविश्वास खोलवर रुज़ला असणारच. पूर्वीचे जन्म भारतात आर्यांच्या कळपात झालेली अमेरिकन गायच काय ती माझ्यासारख्या गरीब माणसावर विश्वास ठेवणार. आणि भारतातल्या मारकुट्या गायी पूर्वजन्मीच्या युरोप-अमेरिकेतल्या काऊ-ज़ असणार.

  – नानिवडेकर

  Posted by Anonymous | एप्रिल 20, 2011, 9:17 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: