.
ताज्या घडामोडी Current Affairs

वर्ल्ड कप आणि नंतरचा गोंधळ


अखेरीस वर्ल्ड कपचा चकवा काल रात्री एकदाचा संपला. गेले काही दिवस माध्यमांनी नुसता उच्छाद आणला होता. बातम्यांच्या मधे वर्ल्ड कप, चर्चा सत्रे सुद्धा फक्त वर्ल्ड कप बद्दलची. एका क्रीडास्पर्धेला किती महत्व द्यायचे? टीव्ही वाहिन्यांनी तर ताळ तंत्र सोडूनच दिले होते. ही स्पर्धा खूप रंगली बीसीसीआय (BCCI) या संस्थेकडून पगार घेत असलेल्या व अंगावरच्या कपड्यांवर सहारा असे नाव छापून घेऊन खेळणार्‍या संघाने, शेवटच्या तीन सामन्यात उत्कृष्ट खेळ केला व ही स्पर्धा जिंकली. हे सामने बघायला खूप मजा आली. वगैरे बाबतीत दुमत असण्याचे काहीच कारण नाही. आज सकाळी सहज बीसीसीआय हा खरोखर काय प्रकार आहे हे बघावे म्हणून जालावर जरा शोध घेतला. जी माहिती कळली ती मोठी रोचक निघाली.

The Board of Control for Cricket in India (BCCI), headquartered at Mumbai, is the national governing body for all cricket in India. It’s not the apex governing body in India. The board was formed in December 1928 as BCCI replaced Calcutta Cricket Club. BCCI is a society, registered under the Tamil Nadu Societies Registration Act. It often uses government-owned stadiums across the country at a nominal annual rent. It is a “private club consortium”. Basically to become a member of a state-level association, one needs to be introduced by another member and also pay an annual fee. The state-level clubs select their representatives (secretaries) who in turn select the BCCI officials. BCCI are not required to make their balance sheets public. In the past, tax exemptions were granted to BCCI on the grounds as promoting cricket was a charitable activity but for the last three years the IPL has questioned this.

As a member of the International Cricket Council (ICC), it has the authority to select players, umpires and officials to participate in international events and exercises total control over them. Without its recognition, no competitive cricket involving BCCI-contracted Indian players can be hosted within or outside the country.

कलकत्ता क्रिकेट क्लबचा उत्तराधिकारी असलेले हे बोर्ड म्हणजे तामिळ नाडू सोसायटीज रजिस्ट्रेशन कायद्याच्या अंतर्गत पंजीकरण झालेली एक सोसायटी आहे. नाममात्र भाड्याने ही सोसायटी सरकारी मैदाने भाड्याने घेऊन त्यावर सामने भरवत असते. प्रत्यक्षात ही सोसायटी अनेक खाजगी क्लबांनी मिळून बनवलेली आहे. आपला जमाखर्चाचा अहवाल सार्वजनिक करण्याचे कोणतेही बंधन या सोसायटीवर नाही, ही संस्था धर्मादाय संस्था आहे या कारणासाठी. या संस्थेला आयकर भरावा लागत नाही. परंतु गेली 3 वर्षे चालू असलेली आयपील स्पर्धा ही संस्था धर्मादाय असून कशी भरवते? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

ही सर्व माहिती येथे बारकाईने देण्याचे कारण म्हणजे वरील सर्व माहितीनुसार बीसीसीआय ही संस्था भारत सरकारने पुरस्कृत केलेली किंवा शासकीय संस्था असल्याचे दिसत नाही. आता साहजिकच असा प्रश्न पडतो की बीसीसीआय च्या संघाला भारताचा अधिकृत संघ या नावाने का ओळखले जाते? मला तरी उत्तर सापडले नाही.

अर्थात हा वरील मुद्दा हा माझ्या लेखाचा विषय नाही. मला सांगायचे आहे हे कालचा सामना संपल्यावर जे काय घडले त्या बद्दल. रात्री 10-45 च्या सुमारास सामना संपला. काल दिवसभर रस्त्यावर सामसूमच होती. संध्याकाळी रस्त्यवरून चारचाकी चालवताना आपण 1950 किंवा 1960 सालच्या पुण्यात वाहन चालवतो आहोत की काय असा भास होण्यासारखी एकूण परिस्थिती होती. नंतर सुद्धा वाहनांचे, त्यांच्या भोंग्यांचे, कसलेच आवाज येते नव्हते. एकूण संध्याकाळ मोठी शांत व आल्हादकारक होती यात शंकाच नाही.

बीसीसीआय च्या संघाने रात्री 10.45 च्या सुमारास सामना जिंकला व काही मिनिटात परिस्थिती पालटली. रस्ते अचानक तुडूंब भरून वाहू लागले. दुचाक्या, चारचाक्या यामधून प्रामुख्याने तरूण वर्ग बाहेर पडू लागला व चित्र विचित्र आवाज, शिट्या यांनी आसमंत दुमदुमून गेले. हजारो फटाके वाजू लागले. वर आकाशात आतशबाजी सुरू झाली. मधून मधून काही घोषणा ऐकू येत होत्या. जरा लक्ष देऊन ऐकल्यावर या घोषणा जय शिवाजी! जय भवानी!” किंवा शिवाजी महाराज की जय!” या आहेत हे लक्षात आले. मला जरा गोंधळ्यासारखे झाले. क्रिकेट सामना व शिवाजी महाराज किंवा भवानी देवी यांचा काय बरे संबंध असावा! असा विचार केला. परंतु तसे काही कारण दिसले नाही.

अर्धा तास हा गोंधळ कमी होईल म्हणून वाट बघितली. गोंधळ कमी होण्याचे काही नामनिशाण दिसले नाही. वरच्या मजल्यावर जाऊन खिडकीतून डोकावून बघितले. दुचाकी, चारचाकी मधली मंडळी, नुसती ओरडाआरड करत गोल गोल फिरत होती. हा प्रकार रात्री एक दीड पर्यंत बहुदा चालू असावा. मला नक्की कळले नाही कारण सुदैवाने मला झोप लागली.

सकाळी जाग आल्यावरही, “ही मंडळी असे का करत होती?” हा विचार काही मनातून जाईना. माणसाच्या भावना जेंव्हा पराकोटीच्या होतात त्याच वेळी तो असे वर्तन करतो. मग एका क्रीडा सामन्याने भावना अशा टोकाला कशा जाऊ शकतात? हे कोडे मोठे अभ्यास करण्याजोगे आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे टीव्ही आणि माध्यमे आहेत याबद्दल शंकाच नाही. या माध्यमांनी गेला महिना दीड महिना ताळतंत्र सोडून जे महत्व या सामन्यांना दिले आहे त्या मुळेच दर्शकांच्या भावना एवढ्या टोकाला जाऊ शकत असल्या पाहिजेत. जो संघ देशाचा अधिकृत संघ सुद्धा नाही त्या संघाच्या चांगल्या प्रदर्शनाचा आणि देशाबद्दलच्या अभिमानाचा खरे म्हणजे संबंध सुद्धा येऊ नये. परंतु प्रत्यक्षात मात्र हा क्रिकेटचा सामना म्हणजे राष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असल्या सारखे तरूण वर्गाला का वाटावे? कालच्या सामन्यात हा सामना मुंबईला म्हणजे महाराष्ट्रात खेळला गेला व इतिहासातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू असे ज्याच्याबद्दल म्हटले जाते तो सचिन तेंडुलकर, महाराष्ट्रीय आहे एवढाच खरे म्हणजे महाराष्ट्राचा संबंध होता. तरी सुद्धा, तरूण वर्ग शिवाजी आणि भवानी संबंधित घोषणा का बरे करत असावा? बीसीसीआय संघाचा सामना व देशप्रेम यांचा कसा संबंध जोडता येतो? प्रश्नच प्रश्न! उत्तरे मला तरी न मिळणारी! न सापडणारी!

3 एप्रिल 2011

 

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

8 thoughts on “वर्ल्ड कप आणि नंतरचा गोंधळ

 1. हेहेहे तुमचे म्हणणे तार्किक आहे सर पण म्हणुनच क्रिकेट ला भारतात धर्म म्हणत असावेत!!!!, अन धर्मात तर्क शक्यतो लाऊ नये अशी एक कॉरोलरी समजा वाटल्यास (शुद्ध धर्म नाही तरी कर्मकांडांना तरी तर्क लागु होत नाही ब~याच अंशी) आता हे सेलिब्रेशन म्हणजे एक प्रकारचे क्रिकेट धर्माचे कर्मकांडच समजा हवे तर!!!! अन हो त्या तरुण मंडळीत काल रात्री फ़र्ग्युसन कॉलेज रोड वर मी पण होतोच हो!!!! पार अडीच साडेतीन पर्यंत!!!!!!

  Posted by Gurunath | एप्रिल 3, 2011, 4:36 pm
  • बीसीसीआय ची माहिती प्रथमच वाचली. मला वाटतं, आरडाओरडा करुन आपला आनंद व्यक्त करणे ह्याला महत्त्व असावे, आरडाओरडा करायचा तर काहीतरी शब्द तर हवेतच ना? मग शिवाजी महाराज, भवानी सगळं आठवतं….

   Posted by Mohana | एप्रिल 3, 2011, 6:20 pm
 2. या विश्वचषक स्पर्धेत खेळलेला, भारत हे नाव घेतलेला संघ हा देशाचा अधिकृत संघच नव्हता. तसे बी.सी.सी.आय. ने सर्वोच्च न्यायालयात जाहीर केलेले आहे. तसे असून ही स्पर्धा जिंकल्यावर कसली आली देशाची अस्मिता आणि त्यातून कसली होणार क्रिकेट डिप्लोमसी ? पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचा एकूण खेळ आणि पराभव म्हणजे हा सामना फिक्स केल्याचे दृश्य दिसत होते. लोकसत्ता या वृत्तपत्राने तर आपल्या पानांवर या संबधीच्या बातम्या देतांना झिंग असा शब्द वापरला होता. ही झिंग उतरते ना उतरते, तोच आय.पी.एल. या दुस-या आखाड्याचे सामने सुरू होत आहेत. आपण किती भरकटत जातो, याचे आणखी कोणते उदाहरण द्यावे ?

  Posted by mangesh nabar | एप्रिल 3, 2011, 6:21 pm
 3. problem kay ahe tumacha?
  lok enjoy karat ahet na ? Deshasathi changali gosht ch zaliye na? sagala desh ekatra aala hota yasathi.
  Etakach tras hotoy tar je “adhikrut” nivadun dilele lok bhrashtachar karateyt tyana hana don char..
  ugich apala kahitari..
  ani tumach mhanane asa ahe ka ki Sachin Tendulkar ha ek bhadotri kheladu ahe? karan to Bharatacha sangh ch nahiye …
  “कालच्या सामन्यात हा सामना मुंबईला म्हणजे महाराष्ट्रात खेळला गेला व इतिहासातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू असे ज्याच्याबद्दल म्हटले जाते तो सचिन तेंडुलकर, महाराष्ट्रीय आहे एवढाच खरे म्हणजे महाराष्ट्राचा संबंध होता. ”
  yala kay arth ahe??
  tasa baghitala tar mag Jammu Kashmir shi apala kay sambandh ahe?
  tari apale jawan tithe shahid hotat na??
  asale bolg lihinyapeksha anandat sahabhagi wha..ani te jamat nasel tar hya goshti baghu naka. tras karun gheu naka ani dusaryala hi deu naka plz.
  Jay hind..Jay Maharashtra..

  Posted by Adnyat | एप्रिल 3, 2011, 9:32 pm
 4. Who Cares! This is the game we love and the players in the team are the best INDIAN players to play this game.
  This is about Passion. The same passion you can see for club football matches in Europe or Kolhapur and Baseball in USA or Japan. The team may not be the official indian govt team but players always say that they play for the country. And BBCI is doing much better for the sport than IOA (the official Indian govt body, i guess.)

  Posted by Harshad | एप्रिल 4, 2011, 12:16 सकाळी
 5. > जो संघ देशाचा अधिकृत संघ सुद्धा नाही त्या संघाच्या चांगल्या प्रदर्शनाचा आणि देशाबद्दलच्या अभिमानाचा खरे म्हणजे संबंध सुद्धा येऊ नये.
  >—–

  भारताच्या क्रिकेट संघाला अनधिकृततेचा शिक्का लावण्यात मला अर्थ दिसत नाही. कदाचित १९२५-३० सालापासून हा क्लब त्याच्या वेगवेगळ्या अवतारात देशाचं प्रतिनिधित्व करत असेल. त्या वेळी तर ‘देशाचं सरकार’ नांवाचा प्रकारच नव्हता. ज़र BCCI–नी मनमानी केली तर त्यांच्या कारभाराला आह्‌वान देता येईल आणि मग तो निकाल न्यायालयात होऊ शकेल.

  कुठल्या एका १७८६-च्या कायद्यानुसार ब्रिटनमधे रविवारी खेळ बेकायदेशीर आहेत, पण १९८२ पासून विम्बल्डन अन्तिम सामना (पुरुषांचा) रविवारी होता. या तांत्रिक बाबीवरून ते विजेतेपद बेकायदेशीर ठरवण्यात काय अर्थ राहील?

  देशाभिमान अनेक अलिखित गोष्टींशी निगडित असतो. फ़ूटबॉलचा भारतीय संघ अधिकृत असला तरी लोक त्याच्यात रस घेतीलच असं नाही. मात्र भारत तो विश्वचषक जिंकला तर अनेकांना फ़ूटबॉलबद्‌दल अचानक प्रेम निर्माण होईल. हा लोकांचा मूर्खपणा. ‘तरवारीच्या आधारावर ज़गणारे तरवारीनीच मरतील’ या उक्तीनुसार क्रिकेटवर आचरत प्रेम करणारे त्या आधारेच पुढे गोंधळ घालतील. देश सामना हरल्यावर मद्यपान करून रस्त्यावरच्या कार ज़ाळायच्या वगैरे प्रकार युरोपात अनेकदा घडतात. तो दिवस आपल्या इथे दूर नाही कारण आपण भारतीय तर त्यांच्या अनुकरणात विशेष धन्यता मानणारे आहोत.

  तो अधिकर्‍र्‍तपणाचा अनावश्यक तांत्रिक मुद्‌दा सोडून बाकी पोस्टशी मी सहमत आहे.

  १९७१ साली इंदोरला एका चौकात वाडेकर-गौरवार्थ १०-१५ फ़ूट उंच बॅट उभारणार्‍या लोकांनी तीन वर्षांनन्तर बॅटला डाम्बर फासलं, आणि वाडेकरला मुंबईत इतका त्रास दिला की त्यानी क्रिकेटला रामराम ठोकला. तेव्हा ३६-३७ वरच्या सचिन तेंडुलकर या पोरट्याला भारतरत्न देण्याची मागणी करणारे विद्‌वान उद्या एखाद्‌या भंपक कारणावरून त्याच्या तोंडाला काळं फासायला कमी करणार नाहीत. अर्थात लोकांना खूश करायला राजीव गांधी, भारताबद्दल बाहेर गरळ ओकणारे सरहद्द-गांधी, ऐश्वर्या राय यांना भारत-रत्न, पद्मश्री देण्याची आपली परंपरा आहेच. सचिन तेंडुलकर आणि राहुल गांधी यांना संयुक्तपणे भारतरत्न देण्यात यावं, म्हणजे सगळे लोक पुन्हा आनन्दी होऊन रस्त्यावर ‘शिवाजी महाराज की जय’, ‘महात्मा गांधी की जय’ आरोळ्या ठोकत स्वत:ची काही घटका करमणूक करू शकतील.

  Posted by Anonymous | एप्रिल 4, 2011, 2:30 सकाळी
 6. > इतिहासातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू असे ज्याच्याबद्दल म्हटले जाते तो सचिन तेंडुलकर
  >
  ???????

  ब्रॅडमन आणि जिम स्वॉण्टन (E W Swanton) सोबर्सला इतिहासातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू मानत. सोबर्सची निव्वळ फलंदाज़ म्हणून सरासरी (५७.७) तेंडुलकरपेक्षा जास्त आहे.

  वैद्‌यकीय शास्त्रातल्या प्रगतीमुळे क्रीडापटू खूप काळ खेळू शकतात. बॅरी बॉण्ड्‌स, रॉजर क्लेमेन्स ही नांवे उदाहरण म्हणून घ्यावीत. तेंडुलकरला ३-४ वर्षांपूर्वी कसला तरी (पाठ की कोपर) त्रास होता. असा त्रास २५-५०-७५ वर्षांपूर्वी होता तर तो एव्हाना निवृत्त होऊन घरी बसला असता. ब्रॅडमन, सोबर्स, पॉण्टिंग हे दीर्घकाळ देशाचे कॅप्टन होते, पण गांगुलीमुळे ती कटकट तेंडुलकरच्या माथी आली नाही, हा नशीबाचा भागही आहेच. तरी त्याला राहुलजींबरोबर भारतरत्न मिळाल्यास ते सध्याच्या देशातल्या (movie-masti-magic and Tendulkar-masti-magic) वातावरणाला फार शोभून दिसेल. त्यांच्याबरोबर अमिताभ बच्चनलादेखील अनेक वर्षे लोकांचे मनोरंजन केल्याबद्दल भारतरत्न देण्यास हरकत नसावी. यांत शिवाजी, महात्मा गांधी, सावरकर अशी नांवे टाकून २०११-च्या विश्वचषकाची आठवण म्हणून ११ ज़णांच्या क्रिकेट टीमलाच संयुक्त भारतरत्न-धमाका देण्याबद्दलही विचार करण्यात यावा.

  – नानिवडेकर

  Posted by Anonymous | एप्रिल 4, 2011, 2:50 सकाळी
 7. दी हिंदू या वृत्तपत्रातील ही बोलकी प्रतिक्रिया येथे द्यावीशी वाटली, म्हणून उद्घृत करत आहे :-
  Although I did not get caught in the cricketing frenzy, I nonetheless celebrated and danced — to the utter surprise and dismay of my 12-year-old son — when India won the World Cup. My son, born in the U.K., considers himself British and maintains he has nothing to do with India. But he asked me: “How many runs do we need to win?” Yes, WE. He and I and the huge crowd. I, who realised at that moment, once an Indian always an Indian; he, who de-conflicted in his mind that indeed he has something to do with India.

  In the final reckoning, the mass hysteria over a game I held in contempt, not because of the game itself but because of the false pretensions and priorities it attached to our psyche, has in a rather facetious fashion, enthralled and entertained me. More positively, my young son understood that the world is not all black and white, that order has its origins in chaos, and that it is generally preferable to pause and consider before declaring allegiance.

  Gopinath Chandroth,

  Hampshire

  Posted by mangesh nabar | एप्रिल 4, 2011, 2:51 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: