.
People व्यक्ती

एका गांडुळाची ट्विटर कथा


काही काही वेळांना सत्य सांगणेही, ते सांगणार्‍याला मोठे अडचणीत आणते. साधारण एक दीड वर्षापूर्वी त्या वेळचे भारताचे उपपरराष्ट्रमंत्री श्री. शशी थरूर यांनी ट्विटरवर, विमानांमधे जो इकॉनॉमी वर्ग असतो त्याला गुरेढोरे वर्ग असे संबोधून एक हलकल्लोळ उडवून दिला होता. आता ज्यांनी कोणी या वर्गाने प्रवास केला आहे (स्वत:च्या पैशांनी विमानप्रवास करणारे सर्वच जण याच वर्गाने प्रवास करतात) ते लगेच मान्य करतील की या इकॉनॉमी वर्गामधे, ज्या पद्धतीने प्रवाशांना कोंबलेले असते ती बघता या वर्गाला गुरेढोरे वर्ग म्हणणे अगदी सयुक्तिक आहे. पण हे सत्य, श्री. शशी थरूर यांनी जाहीर रित्या सांगितल्याने ते अडचणीत आले होते. हे वादळ मिटल्यावर सुद्धा, शशीजींची ट्विटरवरून सत्य सांगण्याची हौस काही मिटली नाही. IPL च्या नवीन टीम्सच्या लिलावांच्या दिवसात त्यांनी परत एकदा चिवचिव (Twit) केलीच. या चिवचिवीतून अनेक वाद निष्पन्न होत गेले. शेवटी या वादात श्री. थरूर व श्री ललित मोदी या दोघानांही पदच्युत व्हावे लागले. हा सगळा इतिहास सर्वांना माहितीच आहे.

ट्विटरवर सत्य सांगण्याचा महिमा असा जबरदस्त आहे. रशियामधे मॉस्को शहराच्या उत्तरेला त्वेर ओब्लास्त हा प्रांत आहे. व्होल्गा व त्वेरत्सा या नद्यांच्या संगमाजवळ अंदाजे 60000 वस्ती असलेले त्वेर हे गाव या प्रांताची राजधानी आहे. या त्वेर प्राताचे गव्हर्नर व सध्या सत्तेवर असलेल्या युनायटेड रशिया या पार्टीचे एक कार्यकर्ते, 47 वर्षाचे श्री डिमित्री झेलेनिन ( Dmitry Zelenin) हे असेच आपल्या एका चिवचिवीमुळे मोठ्या अडचणीत आले आहेत. रशियाच्या परराष्ट्र धोरण विभागाचे एक सल्लागार श्री सर्जेई प्रिखोड्को(Sergei Prikhodko) यांनी तर श्री झेलेनिन यांना मूर्ख, मठ्ठ अशी विशेषणे बहाल केली आहेत.

हा सगळा प्रकार सुरू झाला रशियाचे अध्यक्ष श्री, डिमिट्री मेड्वेडेव्ह ( Dmitry Medvedev) यांनी जर्मनीचे अध्यक्ष श्री ख्रिस्तियन वुल्फ(Christian Wulff) यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या एका शाही खान्यानंतर. जर्मनीचे अध्यक्ष सध्या रशियाच्या अधिकृत दौर्‍यावर आहेत. श्री डिमिट्री झेलेनिन या शाही खान्याला गव्हर्नर असल्याने निमंत्रित होते. या समारंभानंतर श्री. झेलेनिन यांनी ट्विटरवर एक चिवचिव पाठवली. या चिवचिवीत, श्री.वुल्फ यांना दिलेल्या शाही खान्याच्या वेळी जे भोजन देण्यात आले होते त्यासंबधी श्री. झेलेनिन यांनी लिहिले होते.

“ बीफ आम्हाला जिवंत गांडुळांच्या सह वाढले गेले. सॅलडमधे असलेली लेट्युसची पाने एकदम ताजी असल्याबद्दलची खात्री देण्याची ही पद्धत अगदी अभिनव होती.” (“The beef came with live worms, That’s an original way to show that the lettuce leaf is fresh.”) या चिवचिवी बरोबर श्री. झेलेनिन यांनी त्यांच्या जेवणाच्या प्लेटचा व भोजनगृहाचा आपल्या सेलफोनवरून काढलेला फोटो ही जोडला होता.

आपली विनोदबुद्धी किती तीक्ष्ण आहे हे दाखवण्याचा श्री झेलेनिन यांचा हा प्रयत्न, दुर्दैवाने रशियाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या फारसा पचनी पडला नाही. परराष्ट्र धोरण विभागाचे सल्लागार, श्री सर्जेई प्रिखोडो म्हणतात की

” मी हा बेजबाबदारपणा व मूर्खपणा याबद्दल बोलूही इच्छित नाही. मला फक्त एवढेच दु:ख होते आहे की मठ्ठपणा आणि मूर्खपणा या बद्दल एखाद्या गव्हर्नरांची हकालपटी करणे शक्य होईल असा कोणताही नियम सध्या अस्तित्वात नाही. “

वरिष्ठ अधिकार्‍यांच्या अशा प्रकारच्या प्रतिसादांनंतर श्री झेलेनिन यांनी आपली चिवचिव व फोटो ट्विटर वरून काढून टाकली. परंतु त्यांनी असे करण्याआधीच रशियामधल्या ब्लॉगर्सनी ही चिवचिव व फोटो जगभर प्रसृत केली होती.

क्रेमलिनमधले मुख्य आचारी( Chef) श्री ऍनॅटोली गाल्किन यांच्या मते प्लेटवर गांडूळ सापडल्याचा हा दावा, तद्दन खोटारडेपणा व मूर्खपणा आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे क्रेमलिनच्या स्वैपाकघरातून टेबलावर जाणारा प्रत्येक पदार्थ अत्यंत कसोशीने तपासला गेलेला असतो. तर रशियन राष्ट्रपतींच्या कार्यालयाचे व्यवस्थापन बघणारे अधिकारी श्री व्हिक्टर ख्रेकॉव्ह हे म्हणतात की आम्ही क्रेमलिनमधली सर्व स्वैपाकघरे तपासत आहोत. त्यांच्या मते हा फोटो बनावट आहे कारण या फोटोत आजूबाजूला दिसणार्‍या गोष्टी व टेबल क्लॉथ हे अस्सल व मूळ गोष्टींबरोबर जुळत नाही. फोटोमध्ये दिसणारी प्लेट एका क्रीम कलरच्या व डिझाईन असलेल्या टेबलावर ठेवलेली दिसते आहे. तसेच श्री झेलेनिन यांनी छताला झुंबरे असलेल्या एका मोठ्या भोजनगृहाचेही चित्र आपल्या चिवचिवीसोबत जोडले होते.

रशियातल्या ब्लॉगर्सनी श्री झेलेनिन यांच्या चिवचिवीची तुलना विनोदाने सर्जेई आइनस्टाइन यांच्या 1925 सालच्या ‘ बॅटलशिप पॉटेम्किन ‘ या चित्रपटाशी केली आहे. या चित्रपटात, 1905 साली, या बोटीवरील खलाशी, जेवणात दगड सापडल्याने बंड करतात असे दाखवले होते.

ट्विटरवरची चिवचिव हा वादाचा मुद्दा बनल्याचा रशियामधला हा काही पहिलाच प्रसंग नाही. रशियाचे अध्यक्ष श्री, डिमिट्री मेड्वेडेव्ह यांनी या वर्षीच्या जून महिन्यात आपला क्रेमलिनरशिया हा पहिला ट्विटर अकाउंट उघडला आहे व त्यात ते नियमाने चिवचिव व फोटो टाकत असतात. मात्र मागच्या महिन्यात किरॉव्ह या प्रांताचे गव्हर्नर निकिता बेल्याख यांनी मीटींग चालू असताना मधेच चिवचिव पोस्ट केल्याबद्दल एखाद्या शाळामास्तराने विद्यार्थ्याची कानउघाडणी करावी त्या पद्धतीने ” श्री निकिता बेल्याख यांना काही जास्त उपयुक्त उद्योग आहे असे दिसत नाही.” अशी टिप्पणी श्री बेल्याख यांच्यावर अध्यक्षांनी केली होती.

एकंदरीत पहाता ट्विटरवरची चिवचिव व सरकारी उच्चपदस्थ यांचे नाते काही जुळत नाही असे दिसते. भारतातले श्री. थरूर व ललित मोदी याला नक्की दुजोरा देतील असे मला वाटते.

15 ऑक्टोबर 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

One thought on “एका गांडुळाची ट्विटर कथा

  1. plz write on liu xeyao bo

    Posted by zuber bijapure | ऑक्टोबर 17, 2010, 9:57 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: