.
History इतिहास

रशियन झारच्या खजिन्याचे रहस्य


पहिल्या महायुद्धाच्या वेळी, रशियन साम्राज्याचा त्या वेळचा झार, दुसरा निकोलस याने, आपला खजिना जर्मन सैनिकांच्या हातात पडू नये म्हणून राजधानी सेन्ट पीटर्सबर्ग मधून, मॉस्कोच्या पूर्वेला असलेल्या काझन या ठिकाणी हलवला होता. या खजिन्यामधे 500 टन नुसते सोनेच होते. 5000 पेटारे आणि 1700 पोती यात हा खजिना भरलेला होता व एका अंदाजाप्रमाणे त्याची किंमत 650 मिलियन रूबल्स एवढी तरी होती पहिले महायुद्ध संपण्याच्या आधीच, रशियामधे 1917 सालच्या ऑक्टोबर महिन्यात बोल्शेव्हिक क्रांती लेनिनच्या नेतृत्वाखाली झाली. ही क्रांती करणारे बोल्शेव्हिक सैनिक व झारशी एकनिष्ठ असलेले रशियन अधिकारी व सैन्य यांच्यातील यादवी युद्ध 1922 पर्यंत चालू होते. 1922 मधे बोल्शेव्हिक पक्षाने संपूर्ण रशियावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. या यादवी युद्धाच्या दरम्यान म्हणजे 1919 साली झारच्या पक्षाचा एक वरिष्ठ सेनाधिकारी, ऍडमिरल अलेक्झांडर कोलचेक याने उरल पर्वतच्या भागात झेक सैनिकांच्या मदतीने उठाव केला व काझन शहरातून बोल्शेव्हिक सैनिकांना तेथून हुसकावून लावले. त्याच्या साथीला असलेल्या झेक सैनिकांना, ‘व्हाईट गार्डसअसे नाव पडले आहे.


दुसर्‍या निकोलसच्या खजिन्याचा बराचसा हिस्सा, ऍडमिरल कोलचेव्ह व त्याचे व्हाईट गार्डस यांच्या हातात पडला. हा खजिना हलवण्यासाठी या सैनिकांना 40 रेल्वे वॅग न्स वापराव्या लागल्या. ऍडमिरल कोलचेव्ह व त्याचे सैनिक यांनी हा खजिना कुठे हलवला हे गूढ गेली 90 वर्षे तरी रशियन इतिहास संशोधकांना सोडवता आलेले नाही. काझनमधल्या विजयानंतर, झारच्या नाविक दलात ऍडमिरल असलेल्या कोलचेव्हने, बोल्शेव्हिक सैनिकांच्या विरूद्ध सर्वांनी लढावे म्हणून प्रयत्न केले व स्वत:ची हुकुमशाही राजवट, उरल पर्वताच्या भागात प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला त्यात यश आले नाही व रेड गार्डस बरोबरची लढाई तो हरला व त्यांच्या तावडीत सापडला. यानंतर त्याला गोळ्या घालून ठार करण्यात आले. कोलचेव्हबरोबरच्या झेक सैनिकांनी निकोलसचे सोने असलेल्या रेल्वे वॅगन्स कुठे व कशा हलवल्या हे आतापर्यंत न समजलेले गूढ आहे. या व्हाईट गार्डस चा युद्धात पराभव झाल्यावर आपल्याला झेकोस्लिव्हाकियाला परत जाऊ देण्यासाठी त्यांनी त्यांच्या जवळ असलेले काही सोने मॉस्को मधल्या सरकारला देऊ केले व त्याच्या बदल्यात रशियातून पळ काढण्यात ते यशस्वी झाले.

बाकीच्या सोन्याची या व्हाईट गार्डसनी कशी विल्हेवाट लावली असवी या बद्दल अनेक तर्ककुतर्क गेली 90 वर्षे केले गेले आहेत. काही लोकांच्या मताने हे सोने या झेक सैनिकांनी चोरट्या मार्गाने झेकोस्लोव्हाकियाला नेले असावे. 1920 च्या सुमारास झेकोस्लोव्हाकिया देशात आलेली अचानक सुबत्ता या सोन्यामुळेच होती. काही लोकांच्या मते, हे सोने या झेक गार्डसनी जपान व इंग्लंड मधल्या बॅन्कात ठेवले असावे.


रशियाच्या पूर्व भागात व सैबेरियाच्या दक्षिणेला, लेक बैकल म्हणून एक विशाल जलाशय आहे. जगातील गोड्या पाण्याचा हा सर्वात मोठा जलाशय आहे असे मानले जाते. कोलचेव्हच्या उठावाच्यावेळी हा लेक संपूर्ण गोठलेला होता. काही लोकांच्या मताने, व्हाईट गार्डसनी सोन्याने भरलेल्या रेल्वे वॅगन्स, या गोठलेल्या लेक बैकल वरून ओढत नेण्याचा प्रयत्न केला परंतु त्या वजनाला अतिशय जड असल्याने या जलाशयाच्या पृष्ठभागावरचा बर्फाला भेगा पडून तो फुटला व या सर्व वॅगन्स लेक बैकलमधे बुडल्या असाव्यात. या कथेला सत्याचा थोडा आधार आहे. 1904-1905 मधल्या रशियाजपान युद्धात या लेक बैकलच्या पृष्ठभागावर रेल्वेचे रूळ टाकण्यात आलेले होते.


गेली 2 वर्षे, रशियाच्या मिरया शास्त्रीय संशोधनासाठी वापरल्या जाणार्‍या दोन पाणबुड्या, लेक बैकलमधे संशोधन कार्य करत आहेत. या मिर पाणबुड्या, त्यांनी काही वर्षांपूर्वी टायटॅनिकया बुडलेल्या जहाजाच्या शोधून काढलेल्या अवशेषांमुळे, एकदम प्रसिद्धिच्या झोतात आल्या होत्या. सर्वसाधारणपणे या पाणबुड्या अटलांटिक व हिंदी महासागरात संशोधन करत असतात. या मिर पाणबुड्यांना, निकोलसच्या सोन्याची ही दंतकथा सत्य आहे का हे पडताळून पाहण्याची नामी संधीच मिळाली आहे.

लेक बैकलचे संशोधन पूर्ण होण्याच्या अवस्थेत आलेले असताना, अचानक मागच्या आठवड्यात या पाणबुड्यांना, रेल्वेच्या पुलावर वापरतात त्या पद्धतीचे मोठे लोखंडी गर्डर आढळून आले. पृष्ठभागापासून 400 मीटर खाली एका उताराच्या भागावर जास्त शोध घेतला असता ते गर्डर एखाद्या रेल्वे वॅगनचा भाग असावेत असे वाटले. यानंतर थोड्याच वेळात या पाणबुडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात चमचम करणार्‍या सोन्याच्या कांबी या पाणबुडीचा चालक बेअर स्त्र्येनॉव्ह व त्याचे दोन सहकारी यांना आढळून आले. स्त्र्येनॉव्ह हा लेक बैकलच्या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी काम करणारा एक शास्त्रज्ञ आहे.

स्त्र्येनॉव्हचा एक सहकारी रोमन फॉनिन हा म्हणतो की या सोन्याच्या कांबी लेकच्या तळावर असलेल्या चिखलात एवढ्या रुतून बसलेल्या अहेत की त्या बाहेर काढणे आम्हाला शक्य झाले नाही. परंतु या आठवड्यात आणखी काही पाण्याखालच्या डाईव्ह्स घेऊन, दुसरा निकोलस या झारच्या सोन्याचे गूढ आम्ही सोड्वणारच आहोत.

मात्र त्याला असे वाटते की हे सोने जरी बाहेर काढण्यात यश मिळाले तरी व्हाईट गार्डस व सोने यांची दंतकथा काही लोक विसरणार नाहीत. उलटी ती त्यांच्या जास्तच स्मरणात राहण्याची शक्यता आहे.

4 सप्टेंबर 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “रशियन झारच्या खजिन्याचे रहस्य

  1. काका….खुप रंजक माहिती आहे….या खजिन्याविषयी फ़क्त दंतकथाच ऐकल्या होत्या…..याचा शोध लागला तर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे नक्कीच सर्वांच्या स्मरणात राहतील

    Posted by मनमौजी | सप्टेंबर 4, 2010, 6:16 pm

Trackbacks/Pingbacks

  1. पिंगबॅक Tweets that mention रशियन झारच्या खजिन्याचे रहस्य « अक्षरधूळ -- Topsy.com - सप्टेंबर 4, 2010

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: