.
ताज्या घडामोडी Current Affairs

पुणे आणि पाणी कपात


अलीकडे जवळ जवळ प्रत्येक वर्षी, जून किंवा जुलै महिन्यांत, पुण्याच्या पाणी पुरवठ्यामधे कपात होणार अशी बातमी कधीतरी हमखास प्रसृत केली जाते. पुण्यातले लोक कसे जास्त पाणी वापरतात, पाण्याची कशी नासाडी करतात वगैरे विषय मग मोठ्या चवीने चर्चिले जातात. मग एकदम अचानक पाऊस बरसू लागतो. तो इतका बरसतो की अगदी नकोसा होऊ लागतो. हा असा पाऊस, आठ दहा दिवस जरी बरसला तरी पुण्याला पाणी पुरवठा करणारी धरणे केंव्हाच पूर्ण भरतात. इतकेच नाही तर जादा पाणी नदीत सोडायला सुरवात होते व नदीला पूर येतो. पाणी कपातीची चर्चा, पुढच्या वर्षीच्या जूनजुलै पर्यंत, केंव्हाच बासनात बांधून ठेवली जाते. हे असे अनेक वर्षे मी बघतो आहे. मी लहान असताना पिण्याचे पाणी साठवण्यासाठी फक्त खडकवासल्याचे धरण होते. नंतर पानशेतचे झाले. ते 1961 मधे फुटले. त्यानंतर किमान 3 आठवडे तरी पुण्यात नळांना पाणीच नव्हते. परंतु पुण्याने त्याही परिस्थितीत मार्ग काढला. पानशेत धरण परत बांधले गेले. त्यानंतर त्याच्या शेजारीच वरसगावचे धरण झाले. ही दोन्ही धरणे कोणत्याही मापदंडाने खरोखरच विशाल आहेत यात शंकाच नाही. या नंतर टेमघरचे धरण झाले. मागच्याच वर्षी या टेमघर धरणाची उंची वाढवण्यात आली आहे. एवढी जलसंपत्ती पुण्यासाठी राखीव असताना ही पाणी कपातीची घोषणा दर वर्षी का करावी लागते? आहे ते पाणी पुरवून का वापरले जात नाही? असे प्रश्न सगळ्यांनाच पडतात. परंतु समाधानकारक उत्तर कोणीच देऊ शकत नाही.

काही जण म्हणतात की पुण्याची लोकसंख्या वाढल्यामुळे असे झाले. प्रथमदर्शी तरी हा मुद्दा योग्य असावा असे वाटते.

पुण्याच्या पाण्याचे हे गौडबंगाल तरी काय आहे? हे शोधून काढण्यासाठी मी आंतरजालावर शोध घेतला. त्यात जी माहिती मला मिळाली ती मोठी रोचक आहे.

उदंड झाले पाणी स्नानसंध्या करावया!

पुण्याजवळच्या धरणांची उपयुक्त पाणी साठवण्याची क्षमता अशी आहे.

खडकवासला– 1.97 TMC (थाउजंड मिलियन क्यूबिक फूट)

पानशेत – 10.65 TMC

वरसगांव– 12.82 TMC

टेमघर– 1.5 TMC + 1.5 TMC

या सगळ्या उपयुक्त पाणी साठ्याची बेरीज केली तर एकूण क्षमता येते 28.5 TMC.

.. 1950 मधे, म्हणजे पानशेत धरण पूर्ण होण्याअगोदर, पुण्याची लोकसंख्या होती अंदाजे 6 लाख. म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी 0.33 TMC एवढी क्षमता उपलब्ध होती. आता पुण्याची लोकसंख्या अंदाजे 46 लाख आहे म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी आता 0.62 TMC एवढी क्षमता उपलब्ध आहे. या आंकड्यावरून एक गोष्ट तर नक्कीच सांगता येते की पुण्याची लोकसंख्या वाढल्यामुळे पाण्याची टंचाई होते आहे या मुद्यात काही दम नाही कारण प्रत्येक व्यक्तीसाठी उपलब्ध पाणी 1950 च्या मानाने दोन पट तरी वाढले आहे. यावर असे म्हणता येईल की पाण्याची ही क्षमता असली तरी प्रत्यक्ष उपलब्ध पाणी किती होते? ते कदाचित कमी असेल. अगदी मागच्याच वर्षाचे उदाहरण घेऊ. मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत सर्व धरणे पूर्ण भरलेली होती म्हणजेच 9 महिन्यांपूर्वी 28.5 TMC पाणी उपलब्ध होते. आजचा धरणांच्यातला साठा फक्त 1.3 TMC एवढाच आहे. म्हणजे पुणेकरांनी 27.2 TMC पाणी वापरले का? असे असले तर पुणेकर पाण्याची प्रचंड नासाडी करतात असे म्हणणे योग्य ठरावे. परंतु पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणते की ते इरिगेशन खात्याकडून वर्षाला फक्त 14 TMC पाणी उचलते म्हणजे ऑक्टोबर 09 मधे उपलब्ध असलेल्या 28.5 TMC पाण्यापैकी, 9 महिन्यात पुणे कॉर्पोरेशनने अंदाजे 10.5 TMC पाणी( 14/12*9) फक्त उचलले असणार. याचा स्पष्ट अर्थ होतो की इरिगेशन खात्याने गेल्या 9 महिन्यात 18 TMC पाणी दुसर्‍या कोणत्या तरी उपयोगासाठी पुरवले आहे.

आता या गौडबंगालाचे थोडे फार स्वरूप तुमच्या लक्षात येऊ लागले असेलच. हे पाणी जाते कुठे? याचे उत्तर सोपे आहे. इरिगेशन खाते हे पाणी पुण्याच्या Downstream तालुक्यांमधल्या शेतजमिनींना व इतर उद्योगांना पुरवते आहे. आता हे Downstream तालुके कोणते तर पुरंदर, दौंड, बारामती व इंदापूर. यापैकी पुरंदर तालुक्यात भाटगर व वीर ही दोन धरणे आहेत. इंदापूर जवळ उजनीचे महाविशाल धरण आहे. या उजनी धरणातून इंदापूर, बारामती व दौंड या तालुक्यातल्या शेतजमिनींना पाणी पुरवठा करण्याची कल्पना होती. परंतु उजनीचे पाणी विषारी बनले आहे. ते शेतांना दिले तर शेते पिके जळून जातील अशी भिती वाटत असल्याने शेतकरी हे पाणी उचलायला नकार देत आहेत. मग आता त्याच्यावर मार्ग कोणता? तर पुण्याजवळच्या धरणांचे पाणी या तालुक्यांना द्यायचे. बारामतीजवळ आता अनेक दूध व फळे यावर प्रक्रिया करणारे कारखाने उभे राहिले आहेत. डिस्टिलरी उभ्या राहिल्या आहेत. या कारखान्यांना चांगले व शुद्ध पाणी सतत लागते. हे पाणी कोठून आणायचे? अर्थातच पुण्याजवळच्या धरणांच्यातून.

मी जर इरिगेशन खात्याचा मुख्य अभियंता असतो तर मी काय केले असते? असा प्रश्न मला पडला. मी गेल्या ऑक्टोबर मधे जेंव्हा धरणे पूर्ण भरलेली होती त्यावेळी असे ठरवले असते की पुण्याला लागणारे 14 TMC पाणी मी राखीव ठेवून बाकीचे 14.5 TMC पाणी शेतजमिनी, प्रक्रिया कारखाने यांना पुरवायचे. कदाचित जे कोणी सध्या या पदावर असतील त्यांनीही असा विचार केला असल्याची शक्यता आहेच. मग माशी कुठे शिंकली? 9 महिन्यात फक्त 10.5 TMC पाणी उपयोगात आणल्याबरोबर पुण्याला पाणी टंचाई कशी भासू लागली? अर्थ स्पष्ट आहे. बोलविता धनी कोणी निराळाच आहे. त्याला पुण्याला पाणी मिळेल की नाही यापेक्षा Downstream उपभोक्त्यांची जास्त काळजी आहे.

पाऊस जूनजुलै मधे पडेलच तेंव्हा धरणे परत भरतीलच! मग पुण्याला भरपूर पाणी मिळेलच! पुणेकरांची काळजी आधीपासून कशाला करत बसायची.

जर पाऊस नाहीच पडला बघू. 1961 सालासारखा, पुणेकर सामना करतीलच पाणी कपातीचा!

20 जुलै 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

12 thoughts on “पुणे आणि पाणी कपात

 1. पुण्याला पाणीपुरवठा करणारी धरणे कुणाच्या अखत्यारीत येतात? ती पुणे महापालिकेच्या अखत्यारीत नसण्याची कारणे काय?

  Posted by मनोहर | जुलै 20, 2010, 10:20 pm
  • पुण्याला पाणी पुरवठा करणारी धरणे इरिगेशन खाते म्हणजे राज्य सरकारच्या अख्यत्यारीत येतात. पाण्याचे वाटप कसे करायचे याचे पूर्ण अधिकार त्यांनाच असतात.

   Posted by chandrashekhara | जुलै 21, 2010, 8:35 सकाळी
 2. उच्च ! मुळावर घाव घालणारा लेख. धन्यवाद!

  Posted by मी मराठी | जुलै 21, 2010, 11:25 सकाळी
 3. मुख्य मुद्दा असा आहे. की पाणीप्रश्न नेहमी निर्माण होतो. पण तो प्रश्न सोडवण्यापेक्षा दर वेळी पाणीकपात करतात. तुमचा लेख खूपच माहितीपूर्ण आहे. आणि ज्ञानवर्धक सुद्धा. पाणी नाही तर काहीच नाही हे साधे कळत नाही भाई/दादांना? सगळीकडे नुसतेच राजकारण!!!

  Posted by हेमंत आठल्ये | जुलै 21, 2010, 1:14 pm
 4. पुण्यातले लोक पाण्याची नासाडी करतात हे काही प्रमाणात खरे आहे. पण ही नासाडी झोपड्पट्टीवाले जास्ती करतात. कारण कुठल्या तरी नगरसेवकाच्या कृपे मुळे त्यांना मोफत नळ कनेक्शन मिळालेले असते. कर्वे रोड वर sndt समोर जी वसाहत आहे तिथे जेव्हा केव्हा बघावं तेव्हा नळ धो धो वहात असतात.

  Posted by लीना पटवर्धन | जुलै 21, 2010, 7:45 pm
 5. निरीक्षण आणि मांडलेले वास्तव चित्र हे पूर्णत: योग्य आहे आणि मुळावरची उपाययोजना करायला आपले राज्यकर्ते कधीही तयार नाहीत हे यातून डोकावते..

  Posted by मुक्त कलंदर | जुलै 21, 2010, 11:11 pm
 6. उजनी चे पाणी विषारी का बनले आहे? त्यावर काहीच उपाययोजना राबवली जात नाहिये का?

  Posted by लीना पटवर्धन | जुलै 22, 2010, 1:21 pm
  • लीना

   उजनीचे पाणी विषारी बनायला खरे म्हणजे पुणे महानगरपालिका व मुळा मुठा नदीच्या काठाला असलेले कारखाने जबाबदार आहेत. सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता नदीत सोडून दिले जाते. या पाण्यातील घाण य्जनी धरणात साचून ते विषारी बनले आहे. या विषयावरचे माझे ब्लॉगपोस्ट आपण वाचू शकता.

   Posted by chandrashekhara | जुलै 22, 2010, 1:42 pm
 7. अरे बाप रे … म्हणजे आता दादा भाई पूण्याच्या मुळावरच उठले की काय ?

  तिकडे उसासाठी पाणी पाठवल्या जाते का ?

  Posted by vijay | जुलै 26, 2010, 7:58 सकाळी
 8. लेख आवडला. मात्र दोन शंका आहेत. पुण्याला मिळणारे १४ युनिट्स पाणी हे पुण्याची एकूण गरज बघूनच ठरवले आहे. त्यानंतर धरणात त्याव्यतिरिक्त किती पाणी आहे, त्याचा वापर कोण कसं करतो हा पुण्याचा प्रश्न नाही. आपला संबंध फक्त १४ युनिट्स पाण्याशी आहे. त्यात कर काटछाट करत असतील तर मग चुकीचे आहे. दुसरा मुद्दा असा की तुम्ही म्हणता, की पुण्याने गेल्या ९ महिन्यात १४*(९/१२) युनिट पाणी उचलले. हे गृहीतक मला जरा शंकास्पद वाटते. पुण्यामध्ये होणारी पाण्याची गळती आणि चोरी यामुळे एकूण वाया जाणारे पण ३०% पेक्षा जास्त आहे. म्हणजेच पुण्यच रोजचा पाणी पुरवठा आहे त्याच दराने चालू ठेवायला महापालिकेने १४ युनिट पाणी ९ म्ह्हीन्यातच संपवत नाही आणले कशावरून? १४ युनिट पाणी कोणत्या रेटने संपवायचे हे तर महापालिकेच्या हातात आहे. माझी शंका तिथेच आहे. दर महिन्याला किती पाणी उचलले आणि ते १४/१२ पेक्षा किती कमी जास्त आहे याची आकडेवारी जाणून घेणे जास्त गरजेचे. तिथे खरी गोची असावी. १४ वगळता उरलेल्या पाण्याशी आपला संबंध नाही.

  Posted by Nikhil Sheth | जुलै 30, 2010, 11:26 pm
  • निखिल
   पुण्याला किती पाणी पुरवठा केला याचे आकडे इरिगेशन खाते व पुणे महानगर पालिका या दोन्ही संस्थानी प्रसिद्ध केले आहेत. पुणे महानगरपालिकेच्या मते नागरिकांना वर्षभरात फक्त 11 TMC पाणी पुरवले जाते. इरिगेशन खात्याच्या म्हणण्याप्रमाणे 14 TMC पाणी पुणे महानगरपालिका उचलते. आपण म्हणता ते गळती व चोरी यामुळे वाया गेलेले पाणी या दोन्ही आकड्यातला फरक किंवा 3 TMC एवढे पाणी आहे. ऑक्टोबर नोव्हेंबर 2009 मधे धरणे पूर्ण भरली होती. तेंव्हापासून ते ऑक्टोबर नोव्हेंबर 2010 पर्यंत पुण्याचा 14 TMC चा स्टॉक इरिगेशन खात्याने धरणांच्यात आरक्षित करून ठेवणे आवश्यक होते. तसे न करता एप्रिल मे मधे हे पाणी Downstream ग्राहकांना पाऊस वेळेवर पडेलच या समजुतीने देऊन टाकले. त्यामुळे धरणे कोरडी पडली व पुण्यावर पाणी कपातीची वेळ आली. माझ्य्य लेखात मी फक्त 14 TMC पाण्याबद्दलच सांगत आहे. अतिरिक्त पाणी इरिगेशन खात्याने कोणालाही दिले तरी पुणेकरांना काहीच तक्रार नाही.

   Posted by chandrashekhara | जुलै 31, 2010, 9:59 सकाळी

Trackbacks/Pingbacks

 1. पिंगबॅक पुणे आणि पाणी कपात | indiarrs.net Classifieds | Featured blogs from INDIA. - जुलै 23, 2010

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: