.
Health- आरोग्य

ऍपलचे वेठबिगारी– 2


आय पॅड, आय फोन व टॅबलेट संगणक यासारखी अतिशय लोकप्रिय उत्पादने निर्मिणार्‍या ऍपल या अमेरिकन कंपनीच्या उत्पादनांचे प्रत्यक्ष उत्पादन करणार्‍या फॉक्सकॉन या कंपनीतल्या कामगारांच्या आत्महत्यांमुळे, या कंपनीतील नवशिक्या कामगारांची केवढी आर्थिक पिळवणूक होते आहे याची माहिती काही आठवड्यांपूर्वीच बाहेर आली. ऍपलला होणार्‍या प्रचंड फायद्यामागे या कामगारांची ही पिळवणूक आहे, हे माध्यमांच्या लक्षात आल्याबरोबर तिथल्या नवशिक्या कामगारांचे पगार जवळपास तिपटीने वाढले. भारतात बाल कामगार आहेत म्हणून तिथल्या उत्पादनांवर बहिष्कार टाकला पाहिजे म्हणून नेहमी शंख करणार्‍या पाश्चात्य माध्यमांनी या बाबत फारशी ओरड केल्याचे ऐकिवात नाही. परंतु ते अपेक्षितच होते.

ऍपलच्या या उत्पादनांत जो स्पर्शपडदा किंवा टच स्क्रीन वापरला जातो तो प्रत्यक्षात फॉक्सकॉन सारखी एक दुसरी तैवानी कंपनीच बनवते. या कंपनीचे नाव आहे विनटेक (WinTek) . ही कंपनी जरी तैवानी असली तरी या कंपनीचे उत्पादन करणारे कारखाने, फॉक्सकॉन प्रमाणेच, चीन मधेच आहेत. या कंपनीच्या सुझॉव्ह (Suzhou) या गावातल्या कारखान्यात, ऍपलच्या निरनिराळ्या उत्पादनांसाठी टच स्क्रीन बनवले जातात. या कारखान्याच्या इमारतीत, दुसर्‍या मजल्यावर एक विभाग आहे. या ठिकाणी उत्पादनांचे भाग काही रसायने वापरून स्वच्छ करण्याचे काम चालते. कामगारांच्या माहिती प्रमाणे, या स्वच्छतेसाठी, n-hexane हे रसायन वापरण्यात येत होते. हे रसायन अतिशय विषारी असल्याने ते हाताळण्यासाठी योग्य मास्क, हातमोजे वगैरे वापरणे गरजेचे असते. हे रसायन कामगारांच्या आरोग्याला घातक असल्याने याच्या वापरावर चीनमधे बंदी आहे. मागच्या वर्षी, मास्क किंवा हातमोजे यांचा वापर न करता हे रसायन उपयोगात आणले गेल्यामुळे, या विभागातले 41 कामगार, चक्कर येणे किंवा बेशुद्ध होणे या सारख्या लक्षणांमुळे इस्पितळात दाखल केले गेले. त्यांच्या आजारपणाचे निदान केल्यावर त्यांच्या मज्जांना (Nerves) इजा झाल्याचे आढळून आले. हे सर्व कामगार अजूनही कामावर जाऊ शकलेले नाहीत. आता त्यांची तब्येत बरी असली तरी कंपवात, अवयव दुखणे या सारखी लक्षणे अजूनही दिसत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे कामगार कसल्या उत्पादनात गर्क होते त्याबद्दल विनटेक किंवा ऍपल यांनी काहीही सांगण्यास नकार दिला आहे. ऍपलने तर आपल्या उत्पादनांचे भाग सुझॉव्ह कारखान्यात बनतात की नाही हे सांगण्यास सुद्धा नकार दिला. वार्ताहरांनी इस्पितळात दाखल झालेल्या कामगारांना ऍपलची उत्पादने दाखवल्यावर त्यांनी या उत्पादनांचेच कोणते भाग ते हाताळत होते ते लगेच दाखवले. हे बहुतेक कामगार, वीस बावीस वर्षाचे असून त्यांची ही प्रथम नोकरीच होती. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बरेच आजारी कामगार स्वत:च्या घरीच पळून गेल्याने, आजारी पडलेल्यांचा खरा आकडा 41 पेक्षा बराच जास्त आहे.


विनटेक कंपनीचा आणखी एक कारखाना डॉंनगुआन( Dongguan) या गावात आहे. हा कारखाना Masstop LCD plant या नावाने ओळखला जातो. या कारखान्यात काम करणार्‍या कामगारांना आपण कोणत्या पार्टसचे उत्पादन करतो? ते कोणाला पुरवले जातात? वगैरे काहीच माहिती नाही. हे कामगार आठवड्याला 70 तास काम करतात व त्याबद्दल त्यांना महिन्याला 220 ते 366 अमेरिकन डॉलर्स एवढा पगार मिळतो. फॅक्टरीमधे 10000च्या वर कामगार आहेत व हे सर्व दूरच्या खेडेगावांच्यातून आलेले आहेत. यातले खूपसे बाल कामगारच आहेत. कामावर लागताना ते खोटी प्रमाणपत्रे देऊन कामाला लागतात. या कामगारांना बाहेरून आलेल्या कोणत्याही व्यक्तीशी बोलण्याची परवानगी नसते.


या Masstop LCD plant मधे जूनच्या पहिल्या आठवड्यात 9 कामगार अचानक आजारी झाले. चक्कर येणे व उलट्या होणे ही लक्षणे त्यांच्यात दिसून येत होती. कारखान्यात n-hexane रसायन वापरले जात होते अशी बातमी लगेच पसरली. विनटेकच्या खुलाशाप्रमाणे मात्र औद्योगिक ऍसिटोन या रसायनामुळे या कामगारांना विषबाधा झाली असावी. कारखान्याच्या वातानुकूलन यंत्रात बिघाड झाल्याने असे झाले असावे. अर्थात कंपनीच्या या खुलाशावर, कामगारांचा विश्वास बसलेला नाही. कंपनीने आता कामगारांना धमकी दिली आहे की जे कामगार कंपनीच्या अधिकृत खुलाशावर विश्वास ठेवणार नाहीत व अफवा पसरवतील त्यांना कामावरून कमी करण्यात येईल.


विनटेक कंपनी म्हणते की आम्ही सर्व कायदेकानूंचे योग्य पालन करत असतो. आम्हाला आमच्या सामाजिक जबाबदारीची जाणीव आहे व आमच्या कामगारांना एक सुरक्षित , आरोग्यदायी व बिनधोक असे वातावरण कारखान्यामधे देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.” माध्यमांच्या रिपोर्ट्स प्रमाणे खरी परिस्थिती वेगळीच आहे. सुझॉव्ह कारखान्यात काम करणारी व सध्या आजारी असलेली एक महिला कामगार म्हणते की ऍपलची उत्पादने आनंदाने वापरणार्‍या लाखो लोकांनी आमच्या स्वार्थत्यागांची नुसती आठवण जरी ही उत्पादने वापरताना ठेवली तरी आम्हाला बरे वाटेल.”

ऍपलसारख्या कंपन्यांनी आपली उत्पादने बनवून घेताना आपले कंत्राटदार काही बेकायदेशीर कृत्ये करत नाहीत ना? एवढे तरी तपासण्याची गरज आहे. आपल्या पायाखाली काय जळते आहे हे दडवून ठेवण्याचा त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी एक न एक दिवस ते उघडकीला आल्याशिवाय थोडेच राहणार आहे?

26 जून 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

12 thoughts on “ऍपलचे वेठबिगारी– 2

 1. Ekoon ek mudda patanya sarkha. Fakt ek sodun, direct apple che vethbigari ase mhanane jara extreme vatate. Apple cant directly control their suppliers.

  Posted by ngadre | जून 26, 2010, 4:56 pm
  • Apple can certainly control their contractors. They can set up standards and norms which are to be followed and can ensure that these are followed. The only hitch in this is that their contractors would expect higher prices from Apple. This would affect the company profitability. That is why Apple simply refuses even to acknowledge the fact that WinTek is their suppliers.

   Posted by chandrashekhara | जून 26, 2010, 8:03 pm
 2. उत्कृष्ट लेख।नवीन माहिती मिळाली

  Posted by sagar | जून 26, 2010, 11:24 pm
 3. अगदी बरोबर आहे. परंतु ज्या कंपनीत हे प्रकार घडले ती कंपनी वेगळी आणि ऍपल कंपनी वेगळी. जर एखादी वस्तू कमी किंमत मध्ये मिळत असेल तर ‘ऍपल’ काय कोणीही ती वस्तू घ्यायला तयार होईल. बाकी चीनी लोक आणि चीनी उत्पादनांचे कमी किंमत असण्याचे तुम्ही सांगितलेली कारणे असगडी बरोबर आहेत. आवडला !

  Posted by हेमंत आठल्ये | जून 27, 2010, 12:14 सकाळी
 4. Udaharan: tumhi,amhi,apan sarv gahu,tandul,dal ya padarthache consumer ahot.Kirana maal dukandar kinva malls he aapale suppliers.shetkari he tyaanche suppliers. Apan gahu khatana ya chainmadhe kuthe bal majuri, veth bigari hotey ka he pahat nahi. Pahoo shakat nahi. Na peksha gahu khanar nahi ase mhanoo shakat nahi.

  Ulat 38 Rs kile peksha 36 ne denara super market kinva discount mall shodhato.

  Mudda barobar pan Apple che veth bigari he title chook. Nahitar mag saare shetkari tumche amche vethbigari hoteel.

  Posted by ngadre | जून 28, 2010, 8:08 सकाळी
  • ngadre
   During my professional career, I have done outsourcing work for Indian Public sector companies of very large size. I have seen from a close distance, how much control is exercised by these principal work outsourcers on the contractors. This control is not only about the quality and quality of materials that are used for production but also about the labour. These companies check whether all labour laws regarding overtime, minimum wages are followed by the contractor or not?
   Extrapolating the same line of argument, I think it would be naive to think that Apple Inc. were not aware of the frauds carried out by their contractors. Legally it can be said that WinTek employees are not Apple employees and Apple is no way responsible for their misdeeds. However when we are talking about a company like Apple, which is considered as one of the world’s best corporate, no one can absolve them from the moral responsibility of the misdeeds of their contractors. Apple must and should have ensured that every contractor doing their work follows all rules and regulations and does not use dangerous chemicals without taking proper and adequate precautions.

   Posted by chandrashekhara | जून 28, 2010, 9:16 सकाळी
 5. Dear sir,
  I would beg to disagree on your conclusions which are akin to “Chor sodoon sanyashala fashee”.
  The occupational health of the workers is a responsibility of the employer and is supervised by the local law and the govt health authorities. I am sure that the respective govts are more worried than anybody else. I use Apple products with pride for last twenty five years, like apple II and AppleWorks. I. Am a proud owner of iPhone 3GS. Are you?

  Posted by Sushrutam | जुलै 3, 2010, 5:35 pm
  • Sushrutam
   I appreciate your sense of loyalty towards apple. I have no where questioned in my article about the quality and high standards followed by Apple in their manufacturing processes. The point which I am trying to raise here is that eventhough Apple could not be considered legally responsible for the misery of the workers, they bear full moral responsibility towards suffering of these poor people. However I respect and honour your differing views.

   Posted by chandrashekhara | जुलै 3, 2010, 8:11 pm
 6. bahurashtriya companya vikasanshil deshat kami pagar devun aapli utpadane tayar karun ghetat ani aaplya prasiddha navacha vapar karun hich utpandane bharamsat kimtila vikun raggad nafa kamavtat.

  Posted by balkrishnalotlikar | जुलै 4, 2010, 2:19 pm
 7. amazing suggestion by u sir.. any company which is having such a massive production should also look upon the illegal conditions that are followed in their process..though it is not binding on them there must be some importance given to morality,humanity..and at the of the day the employer is not mere working in ur organisation for money ,but there is always some sense of trust and belonging ..so u should also live upto that!!!!!!

  Posted by shraddha | नोव्हेंबर 22, 2011, 12:09 pm

Trackbacks/Pingbacks

 1. पिंगबॅक Tweets that mention ऍपलचे वेठबिगारी– 2 « अक्षरधूळ -- Topsy.com - जून 26, 2010

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: