.
Science

मृत्यूपूर्वीचे काही क्षण


लखमिर चावला हा वॉशिंग्टनमधील जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर मधे संशोधन करणारा एक शास्त्रज्ञ आहे. शल्यक्रियेच्या वेळी वगैरे भूल देतात त्या विषयातला तो तज्ञ (anaesthesiologist) आहे. हा लखमिर एका अनोख्या विषयाबद्दल सध्या संशोधन करतो आहे. कोणत्याही मानवी शरीराचा मृत्यू होण्याआधीचे काही क्षण किंवा मिनिटे त्या शरीरात किंवा विशेषेकरून मेंदूमधे काय घडते याचा शोध तो घेतो आहे. या आपल्या संशोधनासाठी लखमिर electroencephalograph (EEG) हे मेंदूची ऍक्टिव्हिटी मोजणारे उपकरण वापरतो आहे.

आपल्या संशोधनात लखमिरला असे आढळून आले आहे की मृत्यूपूर्वी 30 सेकंद ते 3 मिनिटे या कालावधीत पेशंट्सच्या मेंदूच्या ऍक्टिव्हिटीमधे प्रचंड वाढ झालेली आढळते. ही ऍक्टिव्हिटी एखाद्या जागृत मेंदूच्या ऍक्टिव्हिटीएवढी असते. प्रत्यक्षात तो पेशंट त्या वेळी अतिशय शांत रित्या झोपलेला असतो. Journal of Palliative Medicine या मासिकात लिहिलेल्या लेखात लखमिरने अशा 7 पेशंट्सचे वर्णन केले आहे. मात्र अशा 50 पेशंट्सच्या बाबतीत हेच बघितल्याचे त्याने लेखात नमूद केले आहे.

मृत्यूच्या दारापर्यंत जाऊन परत आलेल्या अशा अनेक लोकांबाबत आपण ऐकतो, वाचतो. आपले त्या क्षणांचे अनुभव सांगताना असे लोक आपण खूप दैदिप्यमान प्रकाश बघितल्याचे किंवा शरीरातून बाहेर पडून हवेत तरंगत असल्याचा अनुभव आल्याचे सांगतात. काही लोक जुन्या आठवणी आल्याचे सांगतात. या सगळ्या अनुभवांचा आणि लखमिरच्या संशोधनाचा परस्पर काहीतरी संबंध असला पाहिजे असे त्याचे म्हणणे आहे.

या मृत्यूपूर्वीच्या क्षणी त्या शरीराची वैद्यकीय अवस्था काय असते? या बाबत सांगताना लखमिर म्हणतो की या कालात मेंदूचा रक्त पुरवठा कमी कमी होत जात असतो व त्या रक्तातील प्राणवायूची पातळीही कमी कमी होत असते व त्यामुळे मेंदूला होणारा प्राणवायूचा पुरवठा कमी होत असल्याने मेंदू सर्व पेशींना एक जोरदार विद्युत झटका देतो. या झटक्यामुळे (impulse) त्या पेशंटला अनेक प्रकारचे भास व संवेदना झाल्याचे भासू लागते.

लखमिर चावलाचे हे संशोधन मला फार रोचक वाटले. मेंदूला होणार्‍या रक्त पुरवठ्यातील प्राणवायूची पातळी कमी झाल्याने, सर्व पेशींना एक जोरदार झटका देण्याची जर मेंदूची प्रतिक्षिप्त क्रिया (Reaction) असली तर ती मृत्यूपूर्वीच फक्त घडते असे समजण्याचे काहीच कारण नाही. केंव्हाही अशी परिस्थिती निर्माण झाली तरी मेंदूची प्रतिक्रिया तीच असणार असे मला वाटते. काही वेळा माणसाला अमानवी किंवा अतींद्रिय संवेदना होतात, भविष्याची चाहूल लागते असे म्हणतात. या संवेदनांचे कारण ही फिजिऑलॉजिकल प्रतिक्रिया असू शकते.

पुराण काळी तप केल्याने परमेश्वर प्रगट झाला. किंवा कोणा मानवाला साक्षात्कार झाल्याने तो प्रेषित झाला. कोणा बाबाला देव स्वप्नात येऊन भेटला अशा गोष्टी वाचण्यात येतात. बहुतेक वेळा या गोष्टी कपोलकल्पित असतात किंवा ते कोणीतरी रचलेले एक थोतांड किंवा षडयंत्र असते हे मान्य केले तरी काही असे अनुभव सत्य असण्याची पूर्ण शक्यता मला वाटते. असा अनुभव आलेल्या लोकांना झालेल्या साक्षात्काराचा खुलासा, मेंदूला होणारा कमी रक्त पुरवठा व त्याच्या अनुषंगाने कमी झालेली प्राणवायूची पातळी यावर त्यांच्या मेंदूने दिलेली फिजिऑलॉजिकल प्रतिक्रिया म्हणता येणे शक्य आहे का? याचा अभ्यास होणे जरूरीचे वाटते.

आपण असे नेहमी पाहतो की काही सर्व साधारण व समजुतदार लोक आयुष्यात घडलेल्या कोणत्या तरी मानसिक किंवा शारिरिक आघातानंतर एकदम कोणत्या तरी बाबाच्या किंवा पंथाच्या कच्छपी लागलेले दिसतात. त्यांच्यात झालेल्या या अचानक बदलामागे या प्रकारची फिजिऑलॉजिकल प्रतिक्रिया हेच कारण असू शकेल का?

डॉक्टर लखमिर चावला यांच्या संशोधनाने आतापर्यंत आपणाला अगम्य व अतर्क वाटणार्‍या अनेक मनोव्यापारांच्या मागे काय कारण असू शकेल हे शोधून काढण्याच्या प्रयत्नांना एक नवीन दिशा मिळाली आहे असे वाटते. कदाचित पुढे मागे या मागची कारण परंपरा आपल्याला समजेल अशी आशा करायला हरकत नाही.

3 जून 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

5 thoughts on “मृत्यूपूर्वीचे काही क्षण

 1. Faarach chhaan thought process…
  Avadale.

  Nachiket

  http://gnachiket.wordpress.com

  Posted by ngadre | जून 3, 2010, 10:24 सकाळी
 2. khoop mahitipurn post. tumache wichar aawadle widyan aani chamtkar yachi saangad ghanyacha prayatn stutya.

  Posted by sonalw | जून 3, 2010, 5:11 pm
 3. मृत्यूपूर्वी मेंदूला होणारा प्राणवायूचा पुरवठा कमी झाल्याने मेंदू सर्व पेशीना जोरदार विद्युत झटका देतो ही क्रिया जर नेणिवेच्या कक्षेतील प्रतिक्षिप्त क्रिया असेल तर ती जाणिवेच्या कक्षेत आणणे अशक्य नाही असे मला वाटते.

  Posted by मनोहर | जून 3, 2010, 10:55 pm

Trackbacks/Pingbacks

 1. पिंगबॅक Tweets that mention मृत्यूपूर्वीचे काही क्षण « अक्षरधूळ -- Topsy.com - जून 3, 2010

 2. पिंगबॅक मृत्यूपूर्वीचे काही क्षण | indiarrs.net Featured blogs from INDIA. - जून 3, 2010

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: