.
History इतिहास, Uncategorized

द ग्रेट बेन्ड


तिबेटमधल्या कैलाश पर्वताजवळच्या व 18000 फूट उंचीवर असलेल्या एका गोठलेल्या सरोवरातून, तीन अतिशय महत्वाच्या नद्या उगम पावतात. त्यातली एक म्हणजे सिंधु नदी. ही नदी वायव्येकडे वहात जाते. दुसरी सतलज नदी दक्षिणेकडे वहात जाते. कैलाश जवळच उगम पावून पण पूर्व दिशेला वहात जाणारी तिसरी महत्वाची नदी म्हणजे यारलुंग त्सांगपो किंवा ब्रह्मपुत्रा नदी. ब्रह्मपुत्रा नदी 1800 मैल लांब आहे. उगमस्थानापासून ही नदी पूर्वेकडे तिबेटच्या पठारावरून वहात जाते या सर्व भागात या नदीच्या पात्राला असलेला उतार 15 फूट प्रति मैल एवढाच आहे.

अरुणाचल प्रदेशाच्या सीमेलगत आल्यानंतर ही नदी एकदम घूम जाव करून उत्तर दिशेने वाहू लागते. हा भाग हिमालय पर्वतरांगांच्या पूर्व भागात मोडतो. या ठिकाणी ही नदी एकदम 15000 फूटाची उडी घेते. ‘ नामच्या बारवा ग्याला पेरी या एकमेकापासून फक्त 13 मैल अंतरावर असलेल्या दोन पर्वतशिखरांच्यामधे असलेल्या ज्या दरीतून ही नदी वाहते त्या ठिकाणी या दरीची खोली 3 मैल एवढी आहे. यामुळेच या ठिकाणाला नद्यांमधले एव्हरेस्ट असे म्हटले जाते. या नंतर ही नदी परत एकदा दक्षिणेकडे घूम जाव करते व अरुणाचल प्रदेशाकडे कूच करते. या सर्व भागाला ग्रेट बेन्ड असे नाव पडले आहे.

नदीचा ग्रेट बेन्ड या भागातला प्रवाह एखाद्या सिंहमुखासारखा दिसतो असे तिबेटी लोक मानतात व तो अत्यंत पवित्र व देवांचे वसतिस्थान असल्याची त्यांची समजूत आहे. हा सिंह तिबेटी लोकांचे सर्व संकटापासून संरक्षण करतो असेही मानले जाते. या सिंहमुखाच्या भागात नदीच्या पात्राला असलेला उतार 50 ते 200 फूट प्रति मैल एवढा असल्याने नदीच्या पात्राला प्रचंड ओढ असते. हा सर्व परिसर अतिशय दुर्गम व निबिड अरण्यांनी भरलेला असल्याने अगदी आतापर्यंत, फारसे गिर्यारोहक या भागात कधी आले नाहीत. चीनने 1990 नंतर हा भाग परदेशी पर्यटकांना खुला केल्यावर, पै या गावापर्यंत गिर्यारोहक पोचले. काही चिनी गिर्यारोहकांना 2007 2008 मधे या भागात असलेले 4 धबधबे शोधून काढण्यात यश मिळाले.

दडलेले धबधबे असलेला नदीचा भाग गूगल अर्थवरून

दडलेला धबधबा

दडलेला आणखी एक धबधबा

या भागात जाणे, आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना शक्यच होणार नाही. गूगल अर्थ व भारतीय अवकाश संस्थेच्या भुवन या साईटवर मिळालेल्या चिंत्रांच्यावरून या प्रदेशाच्या दुर्गमतेची चांगलीच कल्पना येते.

पो  त्सांगपो व यारलुंग त्सांगपो नद्यांचा संगम गूगल अर्थ वरून

ग्रेट बेन्डच्या उत्तर भागाचा फोटो

ग्रेट बेन्डच्या उत्तर भागाचे उपग्रहाचे चित्र भुवन वरून

या ग्रेट बेन्ड भागाला आता दुसर्‍याही एका विवादामुळे प्रसिद्धी मिळाली आहे. चिनी सरकारने तिबेटमधल्या नद्यांचे पाणी चीनच्या इतर भागात वळवण्याचा एक मोठा प्रकल्प हातात घेतला आहे. त्या प्रकल्पांतर्गत ब्रह्मपुत्रेचे पाणी ग्रेट बेन्ड नंतर परत चीनकडे वळवण्याचा त्या देशाचा बेत आहे अशा बातम्या प्रसृत झाल्या आहेत. चीनने या बातम्यांचे जरी खंडन केलेले असले तरी भारत आणि बांगलादेश यांच्यासाठी ही धोक्याची मोठी घंटा आहे.

25 एप्रिल 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

3 thoughts on “द ग्रेट बेन्ड

 1. खूपच छान माहीती दिलीय ! फोटों मुळॆ मजा आलीय. शिवाय ह्या भागाचा आपला नेहमीचा नकाशाही देता आला तर चांगले होईल.

  Posted by sureshpethe | एप्रिल 25, 2010, 7:26 pm
 2. खरच खुपच छान !! किती सुंदर !!
  खुप नवीन माहिती मिळाली .
  या बद्यल ” अभिनंदन ” भविष्यातील उत्तामोत्तम लिखाणासाठी हार्दिक शुभेच्छा
  ज्योतिष्य विषयक लिखाण करावे ही विनंती .

  संजय बरबडे यवतमाळ

  Posted by SANJAY BARBADE | जून 16, 2010, 1:22 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: