पुण्याच्या पश्चिम भागात असलेले कर्वेनगर हे पुण्याचे एक उपनगर. हे उपनगर म्हणजे मूळचे ‘ हिंगणे बुद्रुक ‘ हे खेडेगाव. या खेडेगावातच महर्षि अण्णासाहेब कर्व्यांनी इ.स. 1896मधे विधवांच्या शिक्षणासाठी आपली संस्था सुरू केली. आज ही संस्था कर्वे स्त्री शिक्षण संस्था म्हणून परिचित आहे. या संस्थेचा परिसर प्रशस्त आणि अतिशय देखणा आहे. संस्थेत प्रवेश करताना आपल्याला प्रथम दिसते ते संस्थेचे भव्य पटांगण. या पटांगणाच्या एका कोपर्यात दोन छोटेखानी पण नीटस वास्तू उभ्या असलेल्या आपल्याला दिसतात. यातली कौलारू वास्तू आहे ती अण्णासाहेब कर्वे, त्यांच्या पत्नी बाया व संस्थेतील पहिल्या आजन्मसेविका व बाया कर्वे यांच्या भगिनी पार्वतीबाई आठवले या सर्वांच्या समाधी असलेली मेघडंबरी.
या मेघडंबरीत उजव्या बाजूला आहे अण्णासाहेब कर्वे यांचा एक छोटासा पण पूर्णाकृती पुतळा.
तर दुसर्या बाजूला आहेत बाया व पार्वतीबाई या भगिनीद्वयींच्या समाधी.
या मेघडंबरीच्या शेजारीच एक अतिशय नीटस व दगडी बांधकाम केलेली इमारत आपले लक्ष लगेच वेधून घेते. अण्णासाहेब कर्व्यांचे जीवनकार्य सोप्या भाषेत समजावून सांगणारी मोठी पॅनेल्स, अण्णांना मिळालेली गौरवचिन्हे, ते वापरत असलेल्या वस्तू आणि अण्णांचे सहकारी असलेल्या व्यक्तींचे फोटो, यांनी हे संग्रहालय मोठे प्रदर्शनीय झाले आहे.
फाटकातून आत शिरल्याबरोबर आपल्याला दिसते अण्णांची सही असलेली संग्रहालयाची पाटी.
येथून आत शिरल्यावर पादत्राणे काढून आत जाण्याची प्रथा आहे. आतली स्वच्छता व एखाद्या देवालयाएवढेच महत्व असलेल्या या वास्तूत शिरताना, ही पादत्राणे काढण्याची प्रथा मोठी औचित्यपूर्ण वाटते.
अनेक पॅनेल्सवर अण्णासाहेबांच्या जीवनकार्याबद्दल अतिशय सोप्या भाषेत माहिती दिलेली आहे.
अण्णासाहेबांना मिळालेला भारतातील सर्वोच्च पुरस्कार ‘ भारत रत्न‘
पुणे विद्यापीठाने दिलेली माननीय डॉक्टरेट.
महापालिका, विद्यापीठे या सारख्या अनेक सार्वजनिक संस्थाकडून अण्णासाहेबांना मिळालेल्या मानपत्र व मानचिन्हांपैकी काही या शो केसमधे मांडून ठेवलेली दिसतात.
अण्णासाहेबांचे कार्य जरी हिमालयासारखे उत्तुंग असले तरी स्वत: ते अगदी साधीसुधी सामान्य व्यक्ती होते. त्यांचा चष्मा व टोपी.
हे संग्रहालय पाहून झाल्यावर मन आपोआपच विनम्र होते व या महामानवाला मनोमन प्रणाम करूनच आपण या संग्रहालयातून बाहेर पडतो.
23 एप्रिल 2010
पुण्यातले महर्षि कर्वे संग्रहालयाची घर बसल्या सफर घडवल्याबद्दल धन्यवाद.
बघुया प्रत्यक्ष जाण्याचा योग कधि येतो.
आम्ही लॅंड्स्केप साठी दोन तिनदा ह्या संस्थेत गेलोय पण आपण दाखवलेला भाग पहायचा राहीला… कदाचित आम्ही रविवारीच जात असल्याने तेव्हा हे बंद असावे. परत गेलॊ की आवर्जून पाहीन. आपण वर्णन केल्या प्रमाणे एकूण परिसर मात्र अत्यंत देखणा व प्रसन्न करणारा आहे. चित्रमय माहीती बद्दल धन्यवाद.
पुण्यातले महर्षि कर्वे संग्रहालयाची घर बसल्या सफर घडवल्याबद्दल धन्यवाद.
बघुया प्रत्यक्ष जाण्याचा योग कधि येतो.
सोनाली ताईंशी सहमत.
हे संग्रहालय कोणी डिझाइन केले आहे? कल्पना कोणाची? थोडी माहीती वाचायला नक्की आवडेल.
सहज
Namaskar, WOW!!! Thanks a lot for making it possible for us to have this heart lifting tour sitting here in California. I felt very honored, humbled & proud to visit such a great humanitarian!!! Once again with a lot of Gratitude for sharing this. Plus Congratulations & Best Wishes for past and future deeds such as this!! Keep it UP – the sharing uplifting things with the world in general!!!
tya divashi tu clubmadhe vishwas deval barobar boltana aaikale. aaj tuza blog pahila va pahayalach pahije ase thikan aaplya gharchya agadi javal aahe te samajle.
dhanyavad