.
Musings-विचार

मराठी ब्लॉगिंगचे माझे एक वर्ष


परवा गप्पागोष्टी करत असतांना माझा मुलगा मला सहजपणे म्हणाला की बाबा तुझे ब्लॉग वाचायला आता पूर्वीसारखी मजा येत नाही.” त्याचे शब्द ऐकून मी जरा चमकलोच. स्पष्ट सांगायचे तर खरे म्हणजे मला थोडेसे वाईटही वाटले. मी त्याला मग विचारलेच की तो असे का म्हणतो आहे? त्याच्या मते माझे ब्लॉग अजूनही वाचनीय असतात, विषय नवीन असतात, तरी पूर्वीचे ब्लॉग वाचल्यावर जे समाधान, मजा वाटायची ती आता का कोण जाणे तितकीशी वाटत नाही. त्याचे हे मत ऐकल्यावर मी साहजिकच थोडाफार अंतर्मुख झालो. आपल्या ब्लॉग्सची गुणवत्ता कमी होते आहे हे मनाला लागून राहिले.

या ब्लॉग्सच्या प्रांगणात मी तसा काही नवीन किंवा अनभिज्ञ आहे असे म्हणता येणार नाही. मी माझा इंग्रजीमधला पहिला ब्लॉग सुलेखाब्लॉग्सच्या (http://chandrashekhar.sulekha.com/default.htm) माध्यमातून नोव्हेंबर 2005 मधे लिहिला होता. तेंव्हापासून आजपर्यंत मी इंग्रजीमधून ब्लॉगिंग करतोच आहे. माझा मराठी ब्लॉग मी जानेवारी 2009 मधे वर्डप्रेसच्या माध्यमातून सुरू केला खरा, परंतु निरनिराळ्या तांत्रिक अडचणींमुळे मे किंवा जून महिन्यानंतरच खर्‍या अर्थाने मी ब्लॉगपोस्ट्स मराठीतून लिहिण्यास सुरवात केली.

सुलेखावरचे माझे जुने इंग्रजी ब्लॉग्स आणि अक्षरधूळ सुरू करण्याआधीचे माझे मराठी लेख( जे मी अक्षरधूळवर टाकले आहेतच.) यांची पुस्तके बनवून मी आंतरजालावर टाकली आहेत. या पुस्तकाना सत्तर हजारांवर हिट्स मला 8 ते 10 महिन्यात मिळाले आहेत. म्हणजेच हे लेखन वाचकांना आवडले आहे. या लेखनाच्या बरोबर गेल्या काही महिन्यातल्या लेखनाची तुलना करावी म्हणून मी असा विचार केला की नवीनतम लेखांचे जर आता एखादे पुस्तक बनवायचे असले तर कोणते लेख निवडावेत? जेंव्हा मी निवडलेले लेख हाताच्या बोटांनी मोजण्याच्या पलीकडे जाईनात, तेंव्हाच माझा मुलगा असे का म्हणतो आहे हे माझ्या ध्यानात आले. माझ्या ब्लॉग्सची गुणवत्ता कमी झाली आहे ही त्याची तक्रार खरीच आहे.

गुणवत्ता कमी होण्याची कारणे तरी काय असावीत? असा विचार मी साहजिकच करू लागलो. सुलेखाब्लॉग्स वरचे माझे जुने ब्लॉग्स चाळत असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली. त्या वेळी प्रत्येक महिन्यात मी एक किंवा फार तर दोन ब्लॉग्स लिहित आलो आहे. यातल्या जवळजवळ प्रत्येक ब्लॉगला मला तीन ते चार हजार वाचक लाभलेले आहेत. त्याच्या तुलनेने मी अक्षरधूळवर दर महिन्याला पंधरा ते वीस ब्लॉग तरी सरासरीने लिहित आलो आहे. म्हणजेच संख्या आणि गुणवत्ता यांचे नाते काही माझ्या ब्लॉग्सच्या बाबतीत तरी बहुदा जुळत नाहीये. मला आठवते की पूर्वी मला जेंव्हा एखाद्या विषयावर काही लिहावे असे वाटत असे किंवा काही लिहिण्याची उर्मी येई त्याच वेळी मी लेखन करत असे. आता अक्षरधूळवर काहीतरी लिहायचे ही एक सवय झाली आहे.

ब्लॉगला काही लोकांनी अनुदिनी असे नाव दिले आहे. हे नाव तितकेसे योग्य आहे असे मला तरी वाटत नाही. या नावामुळे डायरी लिहिणे आणि ब्लॉगपोस्ट लिहिणे यातला मूलभूत फरकच पुसला जातो आहे. ट्विटर किंवा गूगल बझ वर लिहिणे आणि ब्लॉग लिहिणे यात तसाच मूलभूत फरक आहे. कोणता सिनेमा बघितला? किंवा कोठे जेवलो? अशी पोस्ट्स ट्विटर किंवा बझवर दिली तरी चालतात. ती ब्लॉगपोस्ट म्हणून दिली तर हास्यास्पद दिसतील असे मला तरी वाटते. ब्लॉगवरचे लेखन हे शाश्वत स्वरूपाचे असते. त्यामुळे त्याचा दर्जाही तसाच हवा.

वर्डप्रेसवरून प्रसिद्ध होणार्‍या ब्लॉग्सची कोणत्या तरी पद्धतीने तुलना करून, श्रेष्ठतम ब्लॉग कोणता आहे किंवा कोणते पोस्ट अद्वितीय आहे या संबंधीची काही नावे वर्डप्रेसचे व्यवस्थापन प्रसिद्ध करत असते. (अर्थात या यादीत असलेल्या ब्लॉग्सबद्दल हे शब्द वापरणे जरा हास्यास्पदच आहे असे माझे वैयक्तिक मत आहे.) या यादीत आपले नाव झळकावे अशी जर इच्छा असली तर रोज एक ब्लॉगपोस्ट प्रसिद्ध करणे गरजेचे असते. ते केले नाही तर तुमचा ब्लॉग या यादीतून बाहेर फेकला जातो. आपले नाव या यादीत झळकत रहावे अशी प्रत्येक ब्लॉगरच्या मनात इच्छा ही स्वाभाविकपणेच असते. यामुळेच बहुदा काहीही करून मी माझे ब्लॉगपोस्टस रोज अपलोड करतो आहे. यामुळे गुणवत्ता खालावत चालली आहे याकडे बहुदा माझे पाहिजे तेवढे लक्ष गेले नसावे.

ब्लॉगपोस्टला येणारे प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया हा असाच एक वादाचा मुद्दा. पुष्कळ ब्लॉगर्स असे मानतात की त्यांच्या ब्लॉगला येणार्‍या प्रत्येक प्रतिसादाला त्यांनी उत्तर हे दिलेच पाहिजे. मला हे पटत नाही. ब्लॉगपोस्ट ही काही चॅट पेटी नव्हे. त्यासाठी ट्विटर किंवा बझ सारखी माध्यमे उपलब्ध आहेत. ब्लॉग लेखकाने आपले म्हणणे ब्लॉगमधे लिहिलेलेच असते. त्यात असणारी चूक कोणी दर्शविली किंवा नवीन कोणता मुद्दा उपस्थित केला तर लेखकाने जरूर उत्तर दिले पाहिजे. अन्यथा ब्लॉग छान आहे या प्रतिसादाला उत्तर देणे मला तरी योग्य वाटत नाही.

आपल्या ब्लॉगपोस्टची गुणवत्ता कशी सुधारावी? यासाठी काही पाउले उचलावी असे मला वाटते आहे. प्रथम म्हणजे यापुढे मी जेंव्हा मला लिहावेसे वाटेल तेंव्हाच ब्लॉगपोस्ट लिहिणार आहे. दुसरे म्हणजे वर्डप्रेस व्यवस्थापनाच्या या श्रेष्ठतम आणि अद्वितिय ब्लॉग्सच्या याद्या मी माझ्या संगणकाच्या पडद्यावरून काढून टाकणार आहे. आणि मुख्य म्हणजे ब्लॉग लिहिला तरी तो नंतर मी प्रसिद्ध करणार्‍या माझ्या नव्या पुस्तकात घालण्याच्या योग्य आहे असे मला वाटले तरच मी तो प्रसिद्ध करणार आहे.

ब्लॉग्सची संख्या व त्यामुळे येणारे जास्ती हिट्स यापेक्षा जास्त गुणवत्तेचे ब्लॉग लिहिण्यालाच मी आता प्राधान्य द्यायचे ठरवले आहे. माझ्या मराठी ब्लॉगला एक वर्ष पूर्ण झाल्यावर निदान एवढे तरी आत्मचिंतन करणे मला गरजेचे वाटते.

22 एप्रिल 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

13 thoughts on “मराठी ब्लॉगिंगचे माझे एक वर्ष

 1. Blog hi chat peti nasali tari to ek sanvaad asto…… Aani THANK YOU asa rply tya sanvaadala susanvaad karat asto…..
  Tya DHANYAVAAD aani THANK YOU chya maage anmol bhavana astat….. !!! Mazya sathi tari mazya post aaleli pratyek pratikriya mahatvachi aste…karan tya comments ch mala enspire kartat navin navin posts takayala…………….!!!!!!!!

  Posted by Maithili | एप्रिल 22, 2010, 12:54 pm
 2. agadi yogy bolalaat..

  WordPress chi top list kontya criteria ne banate te malahi samjat nahi..

  Aho ek entry suddha nasalela hello world type kahitari lihilela blog pan tya list madhe asato..

  He sarv jau de..majha blog suddha asato kadhi kadhi…Wordpress la kahi choice ch rahilela nahi disat ajkal..

  Mhanaje bagha..

  Posted by ngadre | एप्रिल 22, 2010, 1:11 pm
 3. Baki comments chya baabtit Maithiliche patale..susanvaad..hmm..

  Aadmi sirf apni hee nahi, balki doosre ki chhati mein bhi zinda rehne ka saboot maangta hai..

  Posted by ngadre | एप्रिल 22, 2010, 1:16 pm
 4. ब्लॉग आवडला असे जर कुणी सांगत असेल, तर त्यावर ’धन्यवाद’ असा किमान प्रतिसाद देण्यात काहीच हरकत ऩसावी, असं मला वाटतं. मला माझ्या ब्लॉगवर आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेला स्वतंत्र उत्तर द्यायला आवडतं. कुणीतरी आवर्जुन येऊन आपला ब्लॉग वाचतं तर आपणही त्या व्यक्तीची दखल घेतली पाहिजे. आपण जे लिहितो त्यापेक्षा कैक पटीने जास्त अनुभव वाचकाकडे असू शकतो. वाचक तो प्रतिक्रियेद्वारे आपल्याशी वाटून घेऊन पहातो आणि आपण त्या प्रतिक्रियेला उत्तरच देत नाही, हा विसंवाद झाला. केवळ विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीच प्रतिक्रिया दिली तर इतर वाचकांची किंमत आपल्या लेखी काही नाही, असा वाचकांचा गैरसमज होऊ शकतो. वाचकांच्या प्रतिक्रिया ह्या आपल्या ब्लॉगला अधिक सुधारण्यासाठी मदतच करतात, त्यामुळे कुठल्याही प्रतिक्रियेला उत्तर द्यायला मला आवडतं.

  Posted by कांचन कराई | एप्रिल 22, 2010, 2:57 pm
 5. Agadi khara aahe. Jevha agadi manatun ekhada vishay suchto tevach chaan lihita yeta. Gele mahinabhar mala kahi chan suchatach nahiye. Mhanun navin post pan naahi.
  Pan ata niyamit wachakanni ani mitranni vicharayla suruwat keliy ki lihina band kela ka mhanun.
  Pan tharawlyapramane joparyant changla likhan hot naahi toparyant publish karnaar naahi.

  Very relevant topic for all bloggers. Thanks you.
  -Shantanu
  http://maplechipaane.blogspot.com

  Posted by Shantanu Deo | एप्रिल 22, 2010, 6:14 pm
 6. एक वर्ष पुर्ण झाल्याबद्दल अभिनंदन!!!
  त्या लिस्ट्स मला वाटतं हिट्स वरून ठरत असाव्या. एखाद्या हॅलो वर्ल्ड ला पण जर जास्त हिट्स मिळाले तर ते तिथे नक्की अद्वितिय पोस्ट म्हणुन दिसेल- आणि त्यामधे काही अर्थ नाही असे माझे मत आहे. मी तर गेल्या कित्येक महिन्यात ती लिस्ट पाहिलेली पण नाही.
  उत्तरं देण्याच्या बाबतीत, कदाचित मला वाट्तं की उत्तर द्यायला हवीत. अर्थात हा वैय्यक्तीक प्रश्न आहे म्हणा.

  इंग्रजी ब्लॉग ला भरपुर वाचक मिळतात, मराठी पेक्षा. इथे दिवसाला २००-३०० लोकं आले तरी खूप झाले. मला अजून एक गोष्ट लक्षात आलेली आहे, की लाईट रिडींग असेल तर ते जास्त वाचले जाते. तसेच कथा वगैरे लिहिल्या की हिट्स हजाराच्या वर पण जातात. हिट्स वाढवायच्या असतील तर कथा लिहाव्या ( मी अगदी कधी तरी लिहितो 🙂 )

  कमी लिहिलं की क्वॉलिटी इम्प्रुव्ह होते असे नाही. तुमचे विषय एकदम वेगळे असतात. कमी किंवा जास्त लिहिणे या पेक्षा मनापासून लिहिले तर ते आपोआप चांगले पोस्ट होते.

  एखाद्या इंग्लिश लेखाचे मराठी मधे लिखाण, एखाद्या वेळेस बरे वाटते, पण नेहेमी त्याच टाइपचे लिखाण वाचायला कंटाळवाणे होते.
  असो, पुन्हा एकदा अभिनंदन, आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

  Posted by महेंद्र | एप्रिल 22, 2010, 7:00 pm
 7. चंद्रशेखरजी, तुमच्या ब्लॉगला एक वर्ष पुर्ण झाल्याबद्दल अभिनंदन . आणि तुम्ही असेच सदैव “अक्षरधुळ” झटकत रहावे ही विनंती.

  माझ्या ब्लॉगींगच्या व्याख्येत चपखल बसणारा आणि म्हणुन मला सर्वाधिक आवडणारा मराठी ब्लॉग म्हणजे “अक्षरधूळ”. नेटभेट ईमासिकासाठी तुमचा लेख निवडताना आम्हाला सर्वाधिक त्रास होतो कारण सगळे लेख इतके उत्तम असतात की कोणता निवडावा हे समजतच नाही.

  विविध विषय, सखोल अभ्यास, आणि विषयाबद्दल स्वतंत्र मत या तीनही गोष्टी मला फक्त अक्षरधुळ आणि काय वाटेल ते या दोन ब्लॉग्ज मध्येच पाहण्यास मिळतात.

  कमेंट्सना उत्तर देण्याचे तुमचे Logic मला पण बहुतांशी पटते.

  पुन्हा एकदा अभिनंदन आणि इतका उत्तम ब्लॉग लिहिल्याबद्दल अनेक धन्यवाद.

  Posted by Salil Chaudhary | एप्रिल 22, 2010, 7:35 pm
 8. चंद्रशेखरजी, ब्लॉगला एक वर्ष पुर्ण झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन !! तुमच्या ब्लॉगचा मी नियमित वाचक आहे. अनेक नवनवीन विषय आणि त्यांचे वेगवेगळे पैलू बघायला मिळतात तुमच्या ब्लॉगवर.

  प्रतिक्रियांविषयी म्हणाल तर माझंही इतरांप्रमाणेच मत आहे. वाचक एवढा वेळ काढून आपलं लिखाण वाचतात, आवर्जून प्रतिक्रिया देतात तेव्हा निदान ‘धन्यवाद’ म्हणून एक उत्तर टाकायला काहीच हरकत नाही. कारण अनेक वेळी वाचकांनी प्रतिक्रिया दिल्या आणि त्यावर ब्लॉगरचं काहीच उत्तर आलं नाही तर वाचकाला उगाचच आपल्याकडे दुर्लक्ष केल्यासारखं वाटतं. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. गैरसमज नसावा.

  Posted by हेरंब | एप्रिल 22, 2010, 11:25 pm
 9. कशी गंमत आहे पहा. मी तुमचा ब्लॉग वाचायला सुरुवात केली ती पण त्याच्या पहिल्या वाढदिवसाला.
  आता एक एक करुन वाचेन सगळ्या पोस्ट.

  Posted by सोनाली | एप्रिल 23, 2010, 4:53 pm
 10. काका, “अक्षरधूळ”ला एक वर्ष झाल्याबद्दल अभिनंदन. मला तुमचा ब्लॉग अतिशय आवडतो. मराठी आंतरजालावरील अगदी मोजक्या उत्तम ब्लॉग्ज मधे तुमचा ब्लॉग आहे हे माझे मत.

  सहज

  Posted by सहज | एप्रिल 26, 2010, 7:54 सकाळी
 11. chandrashekhar, tumche lekhan vishay vegale asatat. nehamee kahee taree sangaNyacha uddesh tyat asato. blogging var amuk vishay lihava va lihu naye ase kahee ase mala taree vatat nahee. ethe haushee lokanchee sankhya jast asalee taree lekhanakade seriously pahaNare suddhaa aahet.
  tymche lekh vachneey asataat, do post when u really feel you cant stop without posting them! blog rank, vachak etc sathee na post karataa post it for your ownsake.
  best regards

  Sonali

  Posted by sonali joshi | एप्रिल 26, 2010, 8:41 pm
 12. Kaka, tumacha blog Utkrushta ahe!! please tyachi gunwatta kami ahe vagere mhanu nakaho! saddhyachya blog vishwat mala keval tumchach blog vaishishtyapurn , abhyaspurna vatato. tumhi roj lihilat tari te vegala asata, patyaa nastat! tyamule seriously don’t underestimate your blog. tumhi yahun chhan lihlat tar kay amhala lottery ch! pan je ahe te hi uttamch ahe!

  Posted by bhagyashree | एप्रिल 29, 2010, 9:40 सकाळी
 13. Just want to say what a great blog you got here!
  I’ve been around for quite a lot of time, but finally decided to show my appreciation of your work!

  Thumbs up, and keep it going!

  Cheers
  Christian, iwspo.net

  Posted by creerburips | मे 16, 2010, 3:25 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: