.
फोटोब्लॉग PhotoBlog

वसंत फुलोरा- एक फोटोब्लॉग


उन्हाळा पुण्यामधे आता चांगला स्थिरावतो आहे. गेले काही दिवस त्याचे तळ्यात का मळ्यात चालू होते. एखादा दिवस तपमापकाचा पारा चाळीशीच्या उंबरठ्यावर पोचतो न पोचतो तो पुढचे दोन दिवस तो पस्तिशीतच रेंगाळत राही. एकदा संध्याकाळ झाली की पश्चिमेकडून थंडगार वारे सुटत व दिवसाचा रखरखीतपणा पळून जाई. पण आता हवा बदलणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

मी रोज सकाळी फिरायला जातो. काल सकाळी फिरायला जात असताना सहज आकाशाकडे नजर गेली. गेले काही दिवस निष्पर्ण वृक्ष आणि फांद्याना लटकणारी केविलवाणी पाने बघायची नजरेला सवय झाली होती. काल एखादी जादूची कांडी फिरावी तशा परवापरवा पर्यंत निष्पर्ण दिसणार्‍या फांद्या फुलांनी नुसत्या डवरल्या होत्या. आज सकाळी फिरायला निघालो तो कॅमेरा घेऊनच.

मधुमालती (Rangoon Creeper)

बहावा( Indian Labernum )

झाकरंडा ( Jacaranda )

पांढरा चाफा (Frangipani)

लाल चाफा(Frangipani)

बोगनवेल ( Bougainvillea)

4 एप्रिल 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

8 thoughts on “वसंत फुलोरा- एक फोटोब्लॉग

 1. खूप छान! सक्काळी सक्काळी फिरायला जातांना अलिकडेच मलाही ह्यांचे सुखद दर्शन घडले होते व मी त्याची पोस्ट करायच्या विचारात होतोच. तुम्ही नंबर पटकावला इतकेच !!

  Posted by सुरेश पेठे | एप्रिल 4, 2010, 3:58 pm
  • सुरेशराव, तुम्ही देखिल पोस्ट करा की. प्रत्येक फुलझाड वेगळे असते. शिवाय ते टिपणार्‍याची नजर तर रोज वेगळी असते. आणि तसे असते तर प्रेमावर कालिदासा नंतर कोणी काही लिहीलेच नसते. थोडक्यात असे की तुमचा ह्याच विषयावरचा post पहायला आम्ही सगळे आतूर आहोत. go ahead.

   -शरदमणी

   Posted by sharadmani | एप्रिल 5, 2010, 2:27 pm
 2. excellent

  Posted by leena | एप्रिल 4, 2010, 4:01 pm
 3. Aapki marathi to nahin samajh saka par aapke chitron mein vasanti phoolon ki bahar se man khush ho gaya.

  Posted by Manish Kumar | एप्रिल 4, 2010, 4:40 pm
 4. madhumalticha photo khup chhan alay…
  mi pan saddhya jamel tya sakali punyatli Phoola (yogya tya arthane) anubhavat aani tipat aahe… Camera chi battery sampte pan punyat sakali firnyalayak jaga sampat nahit… Puna sakali kharach khup chhan asta kuthlyahi Rutu madhye…

  Posted by Nitin Mule | एप्रिल 4, 2010, 8:26 pm
 5. बहावा कुठेशी आहे हा ?
  पुण्यात फुललेल्या बसंताबद्दल मी बरेच लिहिले आहे, कृपया माझा ब्लॉग पहाल काय.

  Posted by harekrishnaji | एप्रिल 6, 2010, 8:52 सकाळी
  • हरेकृष्णजी

   हा बहावा लॉ कॉलेज रस्त्यावरचा आहे. पण पुण्यात विशेषेकरून पश्चिम भागात बहावाचे वृक्ष अनेक जागी बघायला मिळतील. भोंडॆ कॉलनीतला बहावा असाच सुंदर फुलला आहे असे कळले.

   Posted by chandrashekhara | एप्रिल 6, 2010, 4:30 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: