.
Musings-विचार

सुखी आयुष्याचा मूलमंत्र


1980च्या सुमारास चिनी सरकारने, त्यांच्या मताने असलेला, सुखाचा एक मूलमंत्र लोकांना दिला. हा मूलमंत्र होता एक कुटुंब एक मूल ‘ . ताबडतोब हे सरकारी अधिकृत धोरण म्हणून ठरवण्यात आले व त्याची अंमलबजावणी प्रचार व दडपशाही या दोन्ही मार्गांनी सुरू झाली. चिनी शहरांच्यातील नागरिकांना प्रत्येक गोष्टीसाठी परवाना घ्यावा लागतो. त्यामुळे या हुकुमाची अंमलबजावणी करणे सुलभ गेले. खेडेगावातून सरकारी नर्सेस फिरू लागल्या व कोणी स्त्री दुसर्‍यांदा गर्भवती आहे असे आढळले की त्या गर्भाची निर्घृणपणे भ्रूणहत्या केली जाऊ लागली. कोणत्याही देशाची लोकसंख्या वाढ कशी होते आहे हे जाणून घेण्यासाठी एक संख्या फार महत्वाची समजले जाते. या संख्येला प्रजनन दर(Fertility Rate) असे म्हटले जाते. हा प्रजनन दर म्हणजे देशातील प्रत्येक प्रजननशील महिलेला सरासरी किती मुले आहेत याचा आकडा असतो. चीनमधला हा प्रजनन दर या धोरणानंतर नाट्यमय रित्या 1.75 पर्यंत खाली आला.

भारत सरकारने 1975च्या आपत्कालीन स्थितीमधे, प्रजनन दर खाली आणण्यासाठी कै. संजय गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली बळजबरीने नसबंदी करण्याचा एक अचरट कार्यक्रम करून बघितला. परंतु या कार्यक्रमाचे परिणाम कॉन्ग्रेसचे सरकार पडण्यात झाल्याने हा कार्यक्रम सोडून देण्यात आला. या नंतर भारताचा प्रजनन दर 2010 पर्यंत तरी 2.1 व्हावा असे सरकारी धोरण आखण्यात आले. हे धोरण पूर्णपणे यशस्वी झाले नसले तरी 1950 मधे असलेला 6 हा प्रजनन दर 2009 मधे 2.68 पर्यंत खाली आला. या धोरणासाठी, भारत सरकारने हम दो हमारे दो अशी एक घोषणा लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. भारत सरकारने 2.1 हा दर कोठून ठरवला असे साहजिकच वाटेल. परंतु 2.1 हा प्रजनन दर, कोणत्याही राष्ट्रासाठी अतिशय महत्वाचा समजला जातो कारण हा प्रजनन दर असलेल्या राष्ट्राची लोकसंख्या स्थिर रहाते आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे निरनिराळी कामे करण्यासाठी त्या राष्ट्राकडे तरूण वर्ग उपलब्ध रहातो.


सध्या अनेक प्रगत राष्ट्रांचा, हा प्रजनन दर 1.2 च्या आसपास पोचला आहे. या राष्ट्रांच्यातील तरुणांचे प्रमाण कमी झाल्याने त्यांना अडचण निर्माण होणार आहे. चीनमधला प्रजनन दर 1.7 झाल्याने साहजिकच आणखी 50 वर्षानंतर काय होईल या काळजीत तिथले अधिकारी पडले आहेत. एक मूल हे धोरण त्यामुळे बहुदा बदलले जाईल अशी चिन्हे दिसत आहेत. असे समजले जाते की भारतामधला प्रजनन दर, 2040 किंवा 2050च्या सुमारास 2.1च्या आसपास येईल. त्यामुळे पुढच्या काही दशकात भारतातल्या तरुणांच्या संख्येत प्रथम लक्षवेधी वाढ होऊन ती नंतर स्थिर होईल.

देशाच्या लोकसंख्येवर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी कुटुंबात किती मुले असावीत? हे सरकारने सांगणे हा लोकसंख्येच्या समस्येचा फार तर एक भाग म्हणता येईल. परंतु कुटुंबाच्या मानसिक व शारिरिक आरोग्याच्या दृष्टीने किती मुले असावीत हेही पाहणे तितकेच महत्वाचे वाटते. चीनमधल्या, एक मूल धोरणामुळे, तिथल्या सामाजिक परिस्थितीवर कसे दुष्परिणाम झाले आहेत. याची काही उदाहरणे माझ्या याया लेखांच्यात दिलेली आहेत.

कुटुंबातील मुलांच्या संख्येवर त्या कुटुंबातील इतर व्यक्तींचे आरोग्य कसे अवलंबून असते या बद्दलचे महत्वाचे संशोधन निष्कर्ष London School of Hygiene and Tropical Medicine मधल्या एका अभ्यासामुळे प्रकाशात आले आहेत. Lead researcher Emily Grundy यांच्या नेतृत्वाखाली संशोधन करणार्‍या एका गटाने जागतिक पातळीवरच्या 15 लाख व्यक्तींकडून या अभ्यासासाठी माहिती गोळा केली. या अभ्यासातून काही अत्यंत रोचक गोष्टी समोर येतात.

  • कॅन्सर, हृद्रोग किंवा दारूचे व्यसन यासारखे गंभीर आजार एखाद्या व्यक्तीला होण्याचा धोका केवळ माता किंवा पिता बनण्याने कमी होतो. मात्र ती व्यक्ती दोन मुलांची माता किंवा पिता बनलेली असली पाहिजे.
  • मुले नसलेली किंवा एकच मूल असलेली अशा दोन्ही व्यक्तींची या सर्व आजारांची शिकार होण्याची शक्यता सारखीच आहे,.
  • मात्र मुलांची संख्या दोन पेक्षा जास्त असली तर मातृत्व किंवा पितृत्व प्राप्त झाल्याचे चांगले परिणाम, या मुलांना वाढवताना येणारे ताण तणाव, सामाजिक परिस्थिती आणि कमी दर्जाची जीवनशैली या दुष्परिणामांमुळे रद्द होतात. व अशा व्यक्ती शून्य किंवा एक मूल असलेल्या व्यक्तींच्या प्रमाणेच या गंभीर आजारांचे बळी ठरू शकतात.

या निरिक्षणाचे कारण देताना एमिली ग्रंडी या म्हणतात की दोन मुलांचे आईबाप, मुलांची जबाबदारी अंगावर असल्याने स्वत:च्या आरोग्याची योग्य ती काळजी घेताना आढळून येतात. कमी मुले असलेले आईबाप याबाबत बेफिकीरपणे वागतात व नंतर या गंभीर आजाराला बळी पडतात तर जास्त मुलांचे आईबाप मुलांना वाढवण्याच्या ताण तणावात स्वत:च्या आरोग्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतात व नंतर गंभीर आजाराला बळी पडतात.

भारतीय कुटुंबांच्यात अजून तरी, 2 मुले व्हावी अशीच सर्व साधारण इच्छा दिसते आहे. आर्थिक आणि इतर कारणासाठी एक मूल पुरे असे म्हणणारी काही जोडपी शहरांच्यातून आता दिसू लागली आहेत. ही निरिक्षणे अशा जोडप्यांसाठी नक्कीच महत्वाची आहेत असे वाटते. अर्थात शेवटी निर्णय त्यांनाच घ्यायचा आहे.

29 मार्च 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

One thought on “सुखी आयुष्याचा मूलमंत्र

  1. sahi lihilay…. patanyasarakh aahe logically… nashib bharatache… dusar kaay ?

    Posted by vijay | एप्रिल 5, 2010, 9:48 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: