.
ताज्या घडामोडी Current Affairs, Science

मिर्च मसाला


पंधरा वीस वर्षांपूर्वी मिर्च मसालाया नावाचा एक सुंदर चित्रपट पाहिला होता. या चित्रपटातील शेवटचा क्लायमॅक्स सीन तर मला अजूनही स्पष्टपणे आठवतो. या चित्रपटाची नायिका व तिच्या सहकारी कर्मचारी महिला, मिरचीच्या कुटाचा इतका प्रभावी उपयोग त्यांच्यावर बळजबरी करू पाहणार्‍या सरकारी अंमलदार व त्याचे सैनिक यांच्या विरुद्ध या चित्रपटात करतात की स्वसंरक्षणासाठी मिरचीचे कूट हे किती अमोघ शस्त्र आहे हे आपल्या डोक्यात चांगलेच ठसते.

कदाचित या चित्रपटापासून स्फूर्ती घेऊन भारताच्या संरक्षण मंत्रालयाशी संलग्न असलेल्या संशोधन प्रयोगशाळातील संशोधकांनी मिरचीचे कूट वापरलेले स्टन ग्रेनेड्स‘ (chilli stun grenade) निर्माण करण्यात यश मिळवले आहे. या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की या ग्रेनेडचा अतिरेक्यांच्या विरूद्ध अतिशय प्रभावी उपयोग करणे शक्य आहे. या ग्रेनेड्सचा उपयोग दंगेखोर, अनियंत्रित लोकांच्या समूहावर नियंत्रण आणण्यासाठी सुद्धा होऊ शकतो. या ग्रेनेड्समुळे समोरचा माणसाला कोणतीच जखम होत नाही किंवा तो मृत्युमुखीही पडू शकत नाही. तो फक्त बधीर होतो त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी असे शस्त्र उपयुक्त ठरावे. याच प्रकारचे स्प्रे सुद्धा या शास्त्रज्ञांनी तयार केले आहेत की जे स्त्रियांना स्वसंरक्षणासाठी अतिशय उपयुक्त आहेत. मिरचीच्या बियांवर प्रक्रिया करून ते या ग्रेनेड्समधे वापरण्यात आले आहे.

जगभरात मिरचीचे अनेक प्रकार मिळतात. या सर्व प्रकारच्या मिरच्या काही साख्याच तिखट नसतात. भोपळी मिरची सारखे प्रकार तर अजिबातच तिखट नसतात. या तिखटपणाचे प्रमाण म्हणून जगात सगळीकडे स्कोव्हिल स्केल‘ (Scoville scale) हा मापदंड वापरला जातो. कोणत्याही मिरचीचा तिखटपणा हा त्या मिरचीत असणार्‍या कॅप्सायसिन ‘ (Capsaicin ) या रासायनिक पदार्थाच्या प्रमाणावर अवलंबून असतो. या कॅप्सायसिनमुळे आपल्या त्वचेवरची आणि विशेषेकरून घशातल्या नर्व्हजची टोके अतिशय उद्दिपित होतात व आपल्याला तिखटपणाची संवेदना प्राप्त होते. या शुद्ध स्वरूपातल्या कॅप्सायसिनला स्कोव्हिल स्केलवर 16 कोटी गुण मिळतात तर भोपळी किंवा ढोबळी मिरची(Bell pepper) मधे या कॅप्सायसिनचे प्रमाण नगण्य असल्याने या मिरचीला स्कोव्हिल स्केलवर शून्य गुण मिळतात. मेक्सिको मधली हालापिनो किंवा हंगेरीयन पाप्रिका या मिरच्यांना 2500 ते 8000 गुण मिळतात. जगप्रसिद्ध टॅबॅस्को या सॉसमधे वापरलेल्या मिरच्यांना या स्केलवर 30000 ते 50000 गुण मिळतात. आपल्या भारतीय व थाई मिरच्यांना 50000 ते 100000 गुण मिळतात. दक्षिण अमेरिकेमधे अतिशय तिखट म्हणून प्रसिद्ध असलेली हाबानेरू मिरची आणि आपली गुंटुरची मिरची यांना सारखेच म्हणजे 1 लाख ते 3.5 लाख गुण या स्केलवर मिळतात.

मात्र या सर्व मिरच्यांची तिखटपणातली सम्राज्ञी म्हणून शोभेल अशी एक मिरची भारताच्या इशान्येला असलेल्या आसाम, मेघालय वगैरे राज्यांत पिकते. ही मिरची भूत जोलोकियाया नावाने ओळखली जाते व तिला स्कोव्हिल स्केलवर अशक्य वाटणारे 10 लाख गुण मिळतात. नैसर्गिक स्वरूपात मिळणारे हे सर्वात तिखट शेत उत्पादन आहे. या मिरचीचा तिखटपणा हा अत्युच्च प्रमाणातला असल्याने जर अशा मिरच्यांचा एक घोस सैनिकांच्या तंबूबाहेर टांगून ठेवला तर त्याच्या वासाने कोणतीच वन्य श्वापदे त्या तंबूच्या जवळपास फिरकत नाहीत. तसेच या मिरचीचा अगदी थोडा अंश अन्नात मिसळला तरी ते अन्न रुचकर लागते व अतिशय थंड प्रदेशात काम करत असलेल्या सैनिकांना त्याचा चांगलाच फायदा होतो असेही संशोधकांचे म्हणणे आहे.


भारतीय संशोधकांनी तयार केलेल्या स्टन ग्रेनेडमधे या भूत जोलोकिया मिरचीच्या बियांचाच वापर केलेला आहे. संशोधकांच्या मते या ग्रेनेडच्या विस्फोटाच्या जवळ जे कोणी असतील त्यांचे डोळे लगेचच तांबडे भडक होऊन त्यातून पाणी येऊ लागेल. तसेच त्यांना ओकार्‍या सुरू होतील.अर्थात काही महाभाग असे आहेत ज्यांच्यावर या मिरचीचा काहीच परिणाम होत नाही. मागच्या वर्षी जोरहाट येथील एक महिला अनदिता दत्त तामुली यांनी शंभर दोनशे लोकांसमोर 51 भूत जोलोकिया मिरच्या खाऊन दाखवल्या होत्या. अशा लोकांच्यावर या स्टन ग्रेनेडचा काहीच परिणाम होणार नाही हे नक्की. परंतो हे असे लोक अत्यंत तुरळकच असल्याने बहुसंख्य अतिरेकी, दंगेखोर यांच्यावर नियंत्रण ठेवण्यास हे शस्त्र अतिशय उपयोगी पडेल असे त्याच्या संशोधकांना वाटते.


26 मार्च 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

One thought on “मिर्च मसाला

  1. All north-east items are exotic. Pineapples are very sweet. There is a voilet colored rice which has fantastic sweet scent is used to make kheer.

    Posted by Arun | मार्च 26, 2010, 3:15 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: