.
Health- आरोग्य

मेदवृद्धी बरोबरचे युद्ध


माझ्या पिढीतल्या आमच्या कुटुंबियांमधे, मी वयाने सर्वात मोठा आहे. माझे इतर मामे, मावस, आते वगैरे नातेवाईक माझ्यापेक्षा दहा, बारा, पंधरा वर्षांनी तरी लहान आहेत. ही सगळी मंडळी आता चाळीशीच्या, पन्नाशीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहेत. काही दिवसापूर्वी आम्ही सर्व भावंडे काहीतरी समारंभाच्या निमित्ताने एकत्र जमलो होतो. मला त्या वेळी एक गोष्ट अतिशय प्रकर्षाने जाणवली. माझ्या बहुतेक भावांची पोटे प्रचंड वाढलेली होती तर त्यांच्या बायका व माझ्या बहिणी अस्ताव्यस्त लठ्ठ झालेल्या होत्या. आता हा लठ्ठपणा काही आमच्याच कुटुंबियांमधली विशेष गोष्ट नाही. जगभरच्या मध्यमवयीन किंवा ज्येष्ठत्वाकडे झुकणार्‍या व्यक्तींना, वयाबरोबरच वाढणारा लठ्ठपणा किंवा मेदवृद्धी हाच प्रॉब्लेम सतत भेडसावत असतो. हा वाढता मेद आपल्याबरोबरच अनेक मित्रांना घेऊन येत असतो. उच्च रक्तदाब, मधुमेह, सांधेदुखी वगैरे मित्रमंडळी या मेदाच्या आश्रयाखाली मोठ्या आनंदाने आपल्या शरीरात वावरतात. मध्यमवयीन स्त्रियांसाठी तर हा मेदवृद्धीचा प्रॉब्लेम एक शाप बनल्यासारखा झाला आहे.

या मध्यमवयातल्या मेदवृद्धीबद्दल एक अतिशय विस्तृत स्वरूपातला अभ्यास Brigham and Women’s Hospital and Harvard Medical School in Boston या वैद्यकीय संस्थेचे एक डॉक्टर इमिनली व त्यांचे सहकारी यांनी केला आहे. या अभ्यासाचा अहवाल त्यांनी नुकताच Journal of the American Medical Association या मासिकात प्रसिद्ध केला आहे. या अभ्यासासाठी डॉक्टर ली यांनी 34000 निरोगी अमेरिकन महिला निवडल्या होत्या. या महिलांचे सरासरी वय 54 वर्षे होते. हा अभ्यास डॉक्टर ली यांनी 1992 साली सुरू केला. पहिल्या वर्षी, प्रत्येक आठवड्याला या महिलांचे वजन व त्यांनी किती तास व्यायाम केला याची नोंद केली गेली. यानंतर प्रत्येक 3 वर्षांनी या नोंदी प्रत्येक महिलेच्या बाबतीत केल्या गेल्या.

या अभ्यासातून काही रोचक गोष्टी नजरेसमोर आल्या आहेत.

 • या पंधरा वर्षात या 34000 महिलांचे वजन सरासरीने 2.5 किलोने वाढले होते.
 • फक्त 13 % महिलांचे वजन या 15 वर्षाच्या कालात वाढले नाही. व या गटात नियमित रित्या सरासरीने आठवड्याला 7 तास तरी व्यायाम करणार्‍या महिला बहुसंख्य होत्या. फक्त या गटात महिलांनी आठवड्यात केलेला व्यायाम व त्यांच्या वजनातील वाढ यांच्यात काही संबंध आहे हे दिसले.
 • ज्या महिला लठ्ठ होत्या त्यांच्या वजनावर कितीही व्यायाम केला तरी काहीही परिणाम होत नाही असे आढळले आहे.

या निष्कर्षांवरून डॉक्टर ली यांनी असे अनुमान काढले आहे की वजन वाढणारच नाही याची काळजी प्रत्येक मध्यमवयीन स्त्रीने घेणे आवश्यक आहे. एकदा वजन वाढले की फक्त व्यायामाने ते उतरवता येत नाही. त्याच्या साठी नियंत्रित आहार घेणेही आवश्यक बनते. वजन वाढू नये यासाठी प्रत्येक महिलेला आठवड्याला किमान 7 तास तरी भरभर चालणे, सायकल चालवणे यासारखे व्यायाम करणे आवश्यक आहे.

या अभ्यासावरून, मध्यमवयीन महिलांना व्यायामाची किती आवश्यकता आहे हे स्पष्ट होतेच आहे. हा व्यायाम केला नाही तर वजन वाढतच जाणार हे उघड आहे. आपल्याकडच्या चाळीशी पन्नाशीच्या महिला ज्या प्रमाणाबाहेर लठ्ठ व बेढब होतात त्याचे कारण नियमित व्यायामाचा अभाव हेच आहे. या वयात या महिलांना खूप जबाबदार्‍या असतात. वेळ मिळत नाही या सगळ्या कारणात बरेच तथ्य आहे हे ही खरे. परंतु आपल्यासाठी हा वेळ जर या महिलांनी काढला नाही तर आणखी दहा पंधरा वर्षांनी शरीर लठ्ठ होऊन अनेक व्याधींना आमंत्रण दिल्यासारखेच होणार आहे हे लक्षात ठेवण्याची गरज आहे असे मला वाटते.

24 मार्च 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

4 thoughts on “मेदवृद्धी बरोबरचे युद्ध

 1. खरे आहे. पण त्यात वजन कमी करण्याचे उपाय पण चर्चिले असतील ना?
  नुसता व्यायाम उपयोगाचा ठरत नाही.

  Posted by Ashwini | मार्च 24, 2010, 4:09 pm
  • अश्विनी

   या डॉक्टरांच्या मताप्रमाणे ज्या मध्यमवयीन महिलांच्या अंगात लठ्ठपणा शिरलेला आहे त्यांनी कितीही व्यायाम केला तरी त्यांचा लठ्ठपणा कमी होत नाही. त्यांनी आहार नियंत्रण पण करण्याची आवश्यकता असते.

   Posted by chandrashekhara | मार्च 24, 2010, 4:56 pm
 2. A healthy body does not retain excess food and there are no chances of being fat. But when body retains excess food, fattening is the result. I think that retaining of excess food is because of change in posture caused by ailments, accidents, working pattern, mental fatigue and pregnency in woman. Thus the exercise is to be done for restoring the posture and not for weight loss only

  Posted by manohar | मार्च 26, 2010, 10:41 pm

Trackbacks/Pingbacks

 1. पिंगबॅक Tweets that mention मेदवृद्धी बरोबरचे युद्ध: -- Topsy.com - मार्च 24, 2010

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: