.
Environment-पर्यावरण

आगंतुक पाहुणी


1950 च्या दशकात भारतामधे धान्यांची अभूतपूर्व टंचाई जाणवू लागली होती. खुल्या बाजारात धान्य मिळतच नसे. रॅशनिंगच्या दुकानातूनच मिळेल तो गहू तांदूळ घ्यावा लागे. या वेळी अमेरिकेने भारताला PL 480 या कार्यक्रमाच्या अंतर्गत फुकट गहू देण्याचे मान्य केले. हा गहू अतिशय निकृष्ट दर्जाचा असे पण Beggars can’t be choosers या म्हणीप्रमाणे भारताला दुसरा काहीच विकल्प त्या वेळी नव्हता. सध्या मुबलक प्रमाणात सिहोर सारख्या जातीच्या गव्हाच्या पोळ्या आपण खातो. आजच्या पिढीला त्या वेळच्या लाल गव्हाच्या पोळ्या खाण्याची कल्पना सुद्धा बहुतेक सहन होणार नाही.

हा आयात होणारा PL480 गहू पोत्यांच्यात भरून वगैरे येत नसे. बोटींमधे तो नुसताच भरलेला असे व भारतीय बंदरावर तो एखाद्या खनिजासारखा उतरवला जाई. या गव्हाबरोबर भारतात आणखी एका पाहुण्याचेही आगमन झाले होते. पुढची एक दोन दशके या पाहुण्याने भारतात अगदी उच्छाद मांडला होता. हा पाहुणा म्हणजे एक प्रकारचे गवत होते. याला कॉन्ग्रेस किंवा गाजर गवत असे नाव भारतात पुढे पडले. या गाजर गवताचे बी, PL 480 गव्हाबरोबर भारतात आले व या गवताने आपली माळराने, रिकाम्या जागा अगदी उकिरड्यापर्यंत सगळीकडे ठाण मांडले.


या गाजर गवताचे खरे नाव आहे parthenium व हे गवत मूळचे अमेरिकेचे रहिवासी. पण भारतातला मुक्काम त्याला चांगलाच भावला.पुढची काही दशके जिकडे तिकडॆ हे गवत फैलावले. या गवताने आपल्याकडच्या मूळ गवतांची हकालपट्टीच केली. या गवताला पांढरी फुले येतात. या फुलांची व गाजर गवताची सुद्धा माणसांना आणि जनावरांना प्रचंड ऍलर्जी आहे असे आढळून आले. अंगावर पुरळ येणे, डोळ्यातून पाणी येणे, दमा लागणे वगैरे सारखी लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसत असत.

शेती तज्ञांनी अनेक उपाय करून या गवतावर शेवटी नियंत्रण मिळवले आहे. आता हे गाजर गवत अधून मधून क्वचित दिसते.


या गाजर गवताची मला आठवण झाली कारण आजच असे वाचनात आले की नेपाळ मधल्या अतिशय निसर्गरम्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या चितवन राष्ट्रीय उद्यानात अशाच एका आगंतुक पाहुणीचे आगमन झाले आहे. हे उद्यान, गेंडा या प्राण्याचे नेपाळमधले वसतीस्थान मानले जाते. या पार्क मधे ब्राझिलमधल्या व एका वेलीसारख्या वाढणार्‍या Mikenia Micrantha या तणाचे काही वर्षांपूर्वी असेच आगंतुक आगमन झाले. चितवन राष्ट्रीय उद्यानाला UNESCO चा हेरिटेज उद्यान दर्जा मिळालेला आहे व नेपाळला येणार्‍या पर्यटकांचे ते एक अतिशय आवडते स्थान आहे. या उद्यानाचे सुमारे 20% क्षेत्रफळ तर गेंडे ज्या भागात आढळून येतात त्या भागाचे 50% क्षेत्रफळ या वेलीच्या आवरणाखाली झाकले गेले आहे.


या वेलीला मिनिटाला एक मैल वाढणारीअसे टोपण नाव आहे. ही वेल इतक्या शीघ्र गतीने पसरते की बघता बघता सर्व परिसर व्यापून टाकते. गवत , झुडपे आणि मोठी झाडे सुद्धा या वेलीच्या आवरणाखाली पूर्ण झाकली जातात व काही दिवसानी नष्ट होतात. यामुळे हरणांसारख्या प्राण्यांचे खाद्य असलेले गवत त्यांना मिळत नाही. ही वेल ज्या भागात पसरली आहे तिथे हरणे दिसतच नाहीत. हरणांच्या निघून जाण्याने खाद्य साखळी तुटली आहे व त्याचा परिणाम इथल्या वाघांच्या संख्येवरही होऊ लागला आहे. या वेलीमुळे झाडावर पक्षांना घरटी बांधणे शक्य होत नाही त्यामुळे पक्षी संख्याही रोडावत चालली आहे.


ही वेल प्रथम पूर्व नेपाळमधल्या एका पक्षी अभयारण्यात दिसली होती. व त्या ठिकाणी या वेलीने पर्यावरणाची अभूतपूर्व हानी केली आहे. ही वेल भारतातून आली असावी असे नेपाळी उद्यान अधिकार्‍यांना वाटते आहे. त्यांच्या मताने ही वेल भारतात दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी सैनिकी छावण्या लपवण्यासाठी ब्राझिलहून आणली गेली होती. आता मात्र या वेलीने चितवन राष्ट्रीय उद्यानाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण केला आहे. अधिकार्‍याना कोणतेही रासायनिक किंवा जैविक प्रतिबंधात्मक उपाय करावे असे वाटत नाही कारण या उपायांनी या उद्यानाच्या इकोसिस्टिमलाच हानी होईल असे त्यांना वाटते. हाताने वेली उपटणे या सारखे उपाय हे अधिकारी करत आहेत परंतु यामुळे या वेलीचा प्रसाराला कितपत रोक बसेल हे सांगणे कठिण दिसते. ही वेल आता उद्यानाच्या बाहेर पडून पश्चिम नेपाळमधे सुद्धा आता पसरू लागली आहे.

या वेलीच्या प्रसारावर उपाय सापडला नाही तर थोड्याच दिवसात नेपाळमधली वनश्री गुदमरून टाकणार्‍या Mikenia Micrantha च्या आवरणाखाली झाकली जाऊन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे असेच म्हणावे लागेल.

20 मार्च 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: