.
Musings-विचार

अर्थकारणाचे कोडे


मागच्या आठवड्यात मी एक बातमी वाचली. ही बातमी वाचून अक्षरश: तोंडात बोट घालायचेच बाकी राहिले होते. त्या बातमी प्रमाणे कलकत्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेचा MBA हा अभ्यासक्रम पूर्ण करून या शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस उत्तीर्ण होऊन बाहेर पडणार्‍या एका विद्यार्थ्याला, दक्षिण मध्य एशिया मधल्या एका बॅन्केने 1.6 कोटी रुपये (साडेतीन लाख अमेरिकन डॉलर्स) वार्षिक पगार देऊ केला आहे. मी जेंव्हा पुढे वाचले की हा जॉब घेणार्‍याला लंडन किंवा सिंगापूर येथे रहावे लागणार आहे तेंव्हा मी मनाची अशी समजूत करून घेतली की या ठिकाणांचे राहणीमान खूप महाग असल्याने हा पगार ठीक असावा. परंतु याच बातमीत पुढे होते की भारतातला जॉब करण्यासाठी दुसर्‍या एका विद्यार्थ्याला 60 लाख रुपये वार्षिक पगार देऊ केला गेला आहे तेंव्हा मात्र मन थक्क झाले. कॉलेजातून पदव्युत्तर पदवी घेऊन बाहेर पडणार्‍या व कोणताही प्रत्यक्ष अनुभव नसलेल्या विद्यार्थ्याला महिन्याला 5 लाख रुपये पगार मिळू शकतो यावर माझा तरी विश्वास बसणे कठिणच होते.


पण बातमी तर खरीच होती. यातून एकच गोष्ट लक्षात आली की सध्याच्या जॉब मार्केटबद्दल मी पूर्ण अज्ञानी आहे. या नंतर आज अशी बातमी आली आहे की भारतातले पगार या वर्षी सरासरीने 10.6 टक्के वाढतील. आता हा आकडा कसा काढतात ते मला माहिती नाही पण TCS या एका मोठ्या IT कंपनीच्या प्रमुख आर्थिक अधिकार्‍याने पण पगार निदान 10 % तरी वाढतील असे विधान केलेले असल्याने या आकड्यात बरेच सत्य असावे. TCS कंपनी तर पगार वाढवणार आहेच पण या शिवाय इतरही काही सुविधा कर्मचार्‍यांना देण्याचा विचार करत आहे असे या अधिकार्‍याच्या विधानांच्यावरून वाटते.

अर्थशास्त्रातले एक मूलभूत तत्व आहे. या तत्वाप्रमाणे, बाजारातल्या वस्तूंच्या किंमती उपभोक्त्यांच्या कडे उपलब्ध असलेल्या अतिरिक्त पैशांच्यावर अवलंबून असतात. जर असे भलेथोरले व गलेलठ्ठ पगार लोकांना त्यांच्या करिअरच्या सुरवातीस जर आता मिळत असतील आणि एवढी मोठी सरासरी पगारवाढ जर होणार असेल तर बाजारात अतिरिक्त पैसा कितीतरी जास्त प्रमाणात उपलब्ध होणार व त्या मानाने वस्तूंच्या किंमतीही वाढणार हे कोणीही सांगू शकेल. गेल्या काही महिन्यात अन्नधान्याच्या किंमती अफाट प्रमाणात वाढल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यातच ही भाव वाढ 17.8 टक्के झाली आहे. सर्व वस्तूंचा विचार केला तर किंमती 9.9 टक्यांनी वाढल्या आहेत. एकीकडे सरकार म्हणते की औद्योगिक उत्पादन वाढत चालले आहे. GDP दर परत 7% वर पोचला आहे. शेअर मार्केट बरेच वर चढले आहे. म्हणजे बाकी लक्षणे तर उत्तम म्हणता येतील अशी आहेत. मग महागाईचा दर एवढा जास्त का आहे? या परिस्थितीत जर काही लोकांचे उत्पन्न आणखी एवढ्या प्रमाणात वाढणार असले तर त्याचा परिणाम किंमती अधिक वाढण्यात होणारच होणार.

आता या सगळ्यामुळे समाजावर काय परिणाम होईल ते बघायला गेले तर चित्र काही फारसे आशादायक वाटत नाही. ज्यांचे उत्पन्न पगारवाढीमुळे वाढले आहे, त्यांची क्रयशक्ती किंमत वाढीमुळे आहे तशीच राहणार आहे यात शंकाच नाही. पण ज्येष्ठ नागरिक, छोटे उद्योजक आणि व्यापारी या लोकांचे उत्पन्न वाढणारच नसल्याने त्यांची क्रयशक्ती दिवसेंदिवस कमी कमी होत जाणार. आपल्या संचित धनाच्या व्याजावर जगणारे खूप ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांना मिळणारे व्याज दर कमी झाले आहेत. पण किंमती आणि विशेषकरून अन्नधान्य किंमती वाढत चालल्या आहेत. अशा परिस्थितीत त्यांना तर दुहेरी फटका बसणार आहे.

कुठेतरी काहीतरी चुकतेय! जेंव्हा बाजारात खूप अतिरिक्त पैसे उपलब्ध असतात त्या वेळी त्या पैशांमुळे महागाई वाढू नये, शेअर मार्केटचा फुगा फुगत जाऊ नये म्हणून सरकार कर्जावरचे व्याज दर वाढवते व बॅन्काकडचा अतिरिक्त पैसा काढून घेते. सध्या व्याज दर कमी आहेत. बाजारात अतिरिक्त पैसा फारसा नाही. मग महागाई दर एवढा वाढतो का आहे? माझ्या मते याला दोन कारणे असावीत. एकतर खूप मोठ्या प्रमाणात परदेशी पैसा भारतीय स्टॉक मार्केटमधे आला आहे. हा पैसा स्टॉक मार्केटचा फुगा कारण नसताना फुगवतो आहे. आणि दुसरे कारण म्हणजे आर्थिक मंदी संपली अशी जी हवा निर्माण झाली आहे त्यामुळे बाजारातील वस्तूंची मागणी कारणाशिवाय वाढली आहे. पण कुठेतरी या आर्थिक परिस्थितीला सत्याचा सामना करावा लागेलच. त्यावेळी जर हा फुगा फुटला तर मात्र बर्‍याच गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वाटते.

सामान्य माणसांनी अशा परिस्थितीत जैसे थे परिस्थिती ठेवून गाठीला असलेला थोडाफार पैसा खर्च न करता सांभाळून ठेवणे गरजेचे आहे असे मला तरी वाटते.

मार्च 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

3 thoughts on “अर्थकारणाचे कोडे

 1. I agree to most of your points..Just few more points I would like to add
  1)The MBA graduates are not always freshers,There are many persons who have Work Experience.
  2)Stock Market can be a Indiacator of the National Sentiments,but does not have too much bearing on inflation.
  3)Inflation is mostly a monetory phenomenon ,but this time it is belived to high in Grains section because of Suppy side constraints.There are 2 reasons stated for this
  i) Global Rise in Prices
  ii) Inefficent and mismanagaging the food grains storage and distribution by government.

  Posted by Smit Gade | मार्च 19, 2010, 9:08 सकाळी
 2. भारतातील लोकसंख्येच्या तुलनेत या लोकांची संख्या नगण्य आहे.

  Posted by मनोहर | मार्च 19, 2010, 10:55 pm
 3. मध्यम वर्गामध्ये आता तीन पोटप्रकार झाले आहेत. १५-३०हजार मासिक उत्पन्न, ३०ते ६०ह.मासिक उत्पन्न,६० ते १लाख मासिक उत्पन्न. यापैकी १५ते ३०ह.उत्पन्न असणारे कसं तरी बर्‍यापैकी जिवन जगू शकतील,पण ज्यांचं उत्पन्न ५ते १०ह.असेल किंवा यापेक्षाही कमी असेल त्यांना कसं जगायचं, मासिक तोंडमिळवणी कशी करायची असे प्रश्न पडणार्च.या वर्गातील लोकांना धड गरीबासारखं ही जगता येत नाही आणि धड मध्यमवर्गासारख पण जगता येत नाही.अत्यंत विचित्र अवस्थेत हे लोक सापदले आहेत या महागाईमुळे.
  आपण म्हणता त्याप्रमाणे सेवानिवृतांचे हाल विचारायलाच नको अशी अवस्था आताच आली आहे.वयाच्या वाढीबरोबर शरीराच्या तक्रारी वाढत जातात आणि हातात उपचाराला पैसा अपुरा ,करणार काय? असो.

  Posted by savadhan | एप्रिल 3, 2010, 1:23 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: