.
Environment-पर्यावरण

प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधून हाय फॅशन


मागच्या दोन महिन्यांपूर्वी, पुणे महानगरपालिकेने घेतलेला एक निर्णय व त्याची लगेच सुरू केलेली कार्यवाही याचे पुण्यातल्या सर्व सुबुद्ध नागरिकांनी स्वागतच केले आहे. हा निर्णय होता प्लॅस्टिकच्या पिशव्य़ांच्या वापरावर घातलेली संपूर्ण बंदी. महिन्याभरातच या बंदीचे चांगले परिणाम पुण्यात दिसू लागले आहेत. रस्त्याच्या कानाकोपर्‍यांना एखादे ठिगळ लावावे तशा दिसणार्‍या या पिशव्या आता अदंष्य झाल्या आहेत आणि कचरा खात्याच्या मताप्रमाणे प्लॅस्टिकच्या कचर्‍यात कित्येक टनांची घट झाली आहे.

असे जरी असले तरी दूध, तेल, तूप वगैरे सारखे पदार्थ अजूनही प्लॅस्टिकच्या पिशव्यांच्यातूनच वितरण होतात. या पिशव्या जरी जाड असल्या व प्रक्रिया करून यातले प्लॅस्टिक पुन्हा वापरण्याजोगे असले तरी या पिशव्यांचा कचरा हा होतोच. त्याशिवाय अनेक खाद्यपदार्थ प्लॅस्टिकच्या पिशव्यांच्यातच पंकबंद करून येतात. या सर्व पिशव्या शेवटी कचर्‍यातच जातात. तसेच घाऊक प्रमाणातले पदार्थ अलीकडे ज्यूटच्या पोत्यात न भरता प्लॅस्टिकचे आवरण असलेल्या पोत्यांच्यातून भरले जातात. या पोत्यांना पाऊस पाणी लागले तरी आतल्या पदार्थाची हानी होत नाही. फाटत नसल्यामुळे सांड लवंड होत नाही. त्यामुळे ही पोती साहजिकच अतिशय लोकप्रिय झाली आहेत. परंतु नंतर ही पोती कचर्‍यात फेकली जातात. प्लॅस्टिकचे पाऊच व पोती यांना अजूनतरी योग्य असा दुसरा पर्याय न मिळालामुळे यांचा वापर थांबवता येणे कठिण दिसते.


प्लॅस्टिकचे पाऊचेस व पोती यांचा हा वाढता प्रॉब्लेम काही फक्त पुण्याला किंवा भारतालाच भेडसावतो आहे असे काही नाही. जगातील सर्व देशांना आणि विशेषेकरून विकसनशील देशांना, ज्यांच्याजवळ या कचर्‍याची विल्हेवाट लावण्याची कार्यक्षम यंत्रणा नाही, हा प्रॉब्लेम कमी किंवा जास्त प्रमाणात भेडसावतोच आहे. आपल्याकडे पिण्याचे शुद्ध पाणी पेटया प्रकारच्या प्लॅस्टिकच्या बाटल्यांमधून मिळते. घाना देशात असे पाणी प्लॅस्टिकच्या पाऊचेस मधून विकले जाते. रस्त्यारस्त्यावर कडेला एका टोपलीत असे पाउच विकणारी मंडळी दिसतात. जाणारे येणारे पांथस्थ हे पाऊच खरेदी करून पाणी पितात व पाऊच अर्थातच रस्त्यावर फेकून देतात. घानाची राजधानी अकारा मधले 30 लाख नागरिक या पाऊचेस चा एवढा कचरा करतात की एकूण प्लॅस्टिकच्या कचर्‍यापैकी 85 % टक्के तरी कचरा या पाऊचेस चा असतो. यापैकी फक्त 5% पाउचेस रीसायकल होतात.


अकारामधील एक नागरिक स्टुअर्ट गोल्ड व त्याचा एक भागीदार यांना या प्लॅस्टिकच्या पाउचेस पासून काही उत्पादन करता येईल असे वाटले व त्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. थोड्याच दिवसात या पाऊचेसपासून बनवलेल्या पर्सेस, स्कूल बॅग्स, टोट पद्धतीच्या बॅग्स बनवण्यात त्यांना यश आले. मग त्यांनी ट्रॅशी बॅग्सम्हणून एक कंपनी स्थापन केली व त्याच्या मार्फत हे उत्पादन घेण्यास सुरवात केली. आज या कंपनीत 60 लोक कामाला आहेत. या शिवाय अनेक लोकांना प्लॅस्टिक पिशव्या गोळा करण्यासाठी ही कंपनी पैसे देते. गेल्या दोन वर्षाच्या उत्पादनात या कंपनीने 1 कोटी प्लॅस्टिक पाऊचेस चा तरी कचरा अकारा च्या रस्त्यांवरून उचलला आहे. या कंपनीने वाणी सामान आणण्यासाठी तयार केलेली स्मार्ट बॅग 12 अमेरिकन डॉलर्सना विकली जाते. आपल्या पिशव्या अमेरिकेत निर्यात करण्याचा ही कंपनी प्रयत्न करत आहे. स्टुअर्ट गोल्ड व त्यांचे भागीदार यांना असे वाटते की जर ते या बॅग्स निर्यात करू शकले तर घानाचा प्लॅस्टिक कचरा कमी होण्यास बरीच मदत होईल.


आफ्रिकेतलाच आयव्हरी कोस्ट हा देश जगातील प्रथम क्रमांकाचा चॉकलेट उत्पादक देश आहे. अर्थातच चॉकलेटला लागणारा कच्चा माल किंवा कोको बिया या देशात कोट्यावधी टनामधे येतात. या सर्व बिया ज्यूटच्या पोत्यात पॅक केलेल्या असतात. ही ज्यूटची पोती हा या देशातील सर्वात मोठा कचरा आहे. आयव्हरी कोस्टची राजधानी अबिद्जान हे एक गजबजलेले बंदर असल्याने येथे या पोत्यांच्या कचर्‍याचा प्रॉब्लेम विशेष भेडसावतो आहे. अबिद्जान शहराचे एक उपनगर ट्राइशव्हिल येथे माई डिझाइन्स या नावाचे एक छोटेसे दुकान आहे. हे दुकान आहे Maimouna Camara Gomet या महिलेच्या मालकीचे. या गोमेटताई शिवण काम हा विषय घेऊन पदवीधर झालेल्या आहेत. कोको बिया ज्या पोत्यांच्यात भरलेल्या असतात त्या पोत्यांच्या कापडापासून अतिशय फॅशनेबल असे कपडे त्यांनी डिझाईन केले व ते 2003 मधे दिवो शहरात झालेल्या फॅशन डिझाईन प्रतियोगितेमधे प्रथम सादर केले.

गोमेटताई हे कपडे पोत्यांच्या नैसर्गिक रंगात, डार्क ब्राऊन व गडद निळा अशा तीन रंगात बनवतात. पारंपारिक आफ्रिकन दागिने या कपड्यांवर खुलून दिसतात असे तिथल्या ग्राहकांचे म्हणणे आहे.


कचरा म्हणून फेकून दिलेल्या वस्तूंपासून ग्राहकोपयोगी उत्पादने करणे कसे शक्य आहे याची ही दोन उदाहरणे आहेत. आपल्याकडच्या एखाद्या सृजनशील व्यक्तीला जर अशी स्फुर्ती आली तर आपल्याकडचा प्लॅस्टिकचा कचराही कमी होऊ शकेल. काय सांगावे पुण्यातल्या महिलांच्या हातात चितळेचितळेचितळे असे छापलेल्या प्लॅस्टिकच्या शॉपिंग बॅग्स, कदाचित पुढे दिसूही लागतील.

5 फेब्रुवारी 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

4 thoughts on “प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधून हाय फॅशन

 1. Khupach Chaan!

  Posted by Ashish | मार्च 5, 2010, 3:24 pm
 2. गेले काही दिवस मी प्लास्टिकच्या पुनर्वापरासंबंधी यूटयुबवरील व्हिडीओ पहात आहे. त्यातही सुंदर माहिती दिलेली असते.

  Posted by कांचन कराई | मार्च 5, 2010, 4:10 pm
 3. माहिती खूपच उपयुक्त व रंजक होती! आपल्याकडे प्लास्टिक कचऱ्याचा वापर रस्ते बांधण्याच्या कामी होऊ शकतो असे मध्यंतरी वाचनात आले होते. अर्थात ते कितपत व्यवहार्य आहे ते अद्याप माहित नाही. पण प्लास्टिकचा पुनर्वापर करून त्यापासून विविध वस्तू बनवून प्लास्टिक कचरा कमी करण्याचे उपक्रम अधिकाधिक व्हायला हवेत.
  तुम्ही दिलेल्या तरटाच्या/ गोणपाटाच्या फॅशनची माहितीही लाजवाब! फार पूर्वी माझे वडील कधीतरी मजेत म्हणायचे, ”कपड्यांचं असं काय आहे, आणायचा गोणपाट आणि शिवायचे दोन-चार कपडे! ” इथे ती कल्पना सत्यात उतरलेली दिसते!

  — अरुंधती

  Sing, Dance, Meditate, Celebrate!
  http://iravatik.blogspot.com/

  Posted by अरुंधती | मार्च 5, 2010, 7:47 pm
 4. it’s really very nice .

  Posted by swati | जून 25, 2010, 10:44 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: