.
Musings-विचार

स्वप्न उद्याचे


एखाद्या प्रथितयश डॉक्टरांच्या मुलाने आपण मोठेपणी डॉक्टर होणार म्हणून सांगितले किंवा एखाद्या बड्या सरकारी अधिकार्‍याच्या मुलीने मोठेपणी सरकारी अधिकारी बनण्याची आपली इच्छा प्रदर्शित केली तर त्यात नवल वाटण्यासारखे काही नाही. ही मुले आपल्या आईवडीलांच्या पाठबळावर, पैशांच्या आणि इतरही, आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करतीलच. या बाबत माझ्या मनात तरी संदेह नाही. परंतु दिवसभर रस्त्यावरचा कचरा, फाटके तुटके कागद वेचून, दिवसाकाठी चाळीस ते पन्नास रुपये कमावणार्‍या एखाद्या महिलेच्या मुलांनी जर असे काही मोठेपणाचे स्वप्न पाहिले तर किती लोक त्यावर विश्वास ठेवतील? बहुतेक वेळा त्यांची हेटाळणीच होण्याची शक्यता जास्त.

पुण्यातल्या या कचरा वेचणार्‍या महिलांची एक संघटना आहे. या संघटनेचे नाव आहे, कागद कांच पत्रा कष्टकरी पंचायत‘. या संघटनेने पुण्यामधे नुकताच या कचरा वेचणार्‍या आईवडीलांच्या मुलांसाठी एक बालमेळा आयोजित केला होता. या मेळाव्याला तब्बल अडीचशे ते तीनशे मुले उपस्थित राहली होती. या मुलांच्यापैकी जी 13 वर्षे वयाच्या खाली होती त्यांना या मेळाव्याच्या आयोजकानी तुम्हाला मोठेपणी कोण व्हावेसे वाटते“? असा एक प्रश्न विचारला होता व त्याचे उत्तर लेखी द्यायला सांगितले होते. 230 मुलांनी उत्तर दिले. त्यापैकी 120 मुलांना डॉक्टर किंवा पोलिस व्हायचे आहे. बाकीच्या मुलांना शिक्षक, इंजिनीयर किंवा पायलट व्हायचे आहे.


या संघटनेच्या एक सभासद श्रीमती लक्ष्मी नारायण यांनी मुलांच्या या प्रतिसादाबद्दल जो खुलासा केला आहे तो माझ्या मते खूप महत्वाचा आहे. त्यांच्या मताने या मुलांच्या एकूण विचारसरणीतच आता खूप मोठा बदल झाला आहे आणि या बदलाचे प्रमुख कारण या मुलांना आता शालेय शिक्षणापासून वंचित रहावे लागत नाही हेच आहे. ही मुले काही शिशुवर्गातील नाहीत. ती शाळेत जाणारी मुले आहेत आणि आपल्या पालकांच्या परिस्थितीची त्यांना पूर्ण जाणीव आहे. अतिशय वाईट अशा गरिबीतूनच ही मुले वर आली आहेत, त्यांना शिक्षण क्षेत्रात असलेल्या जीवघेण्या स्पर्धेची आणि येणार्‍या प्रचंड खर्चाचीही कल्पना आहे आणि तरीही हे विशेष आहे की ही मुले पहात असलेली स्वप्ने, व या मुलांच्या आशा आकांक्षा या इतर दुसर्‍या सधन पालकांच्या मुलांसारख्याच आहेत. नम्रता या मुलीने या मेळाव्याच्या वेळी एक भाषण केले. तिचे भाषण या मुलांच्या भावनांचे प्रातिनिधिक ठरावे असे मला वाटते. ती म्हणाली की माझी आई रस्त्यावरचा कचरा गोळा करते. पण मी शाळेत जावे म्हणून ती नेहमीच आग्रही असते. रस्त्यावर कोठेही कोरे किंवा पाठकोरे कागद किंवा टाकून दिलेल्या वह्या मिळाल्या की ती ते कागद किंवा वह्या मला गृहपाठ करता यावा म्हणून घरी घेऊन येत असे. मी माझे शिक्षण पूर्ण करून शिक्षक होणार आहे.”

या कचरा वेचणार्‍यांची कागद कांच पत्रा कष्टकरी पंचायत‘. ही संघटना पूर्णपणे या लोकांच्या पैशांतूनच उभी राहिलेली आहे. या संघटेनेचे पुण्यात 3500 सभासद आहेत व दर वर्षी प्रत्येक सभासद 25 रुपये वर्गणी देतो. या संघटेनेचे स्वत:चे भंगार खरेदी विक्रीचे दुकान असल्याने सभासद महिलांनी वेचलेल्या कचर्‍याला चांगला भाव मिळतो. 1997 मधे या पंचायतीने पतपेढी सुरू केली. सभासदाने दर महिन्याला 50 रुपये अशा पद्धतीने 6 महिन्यासाठी पैसे भरले की अडीअडचणीला तो सभासद त्याने भरलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम 2% व्याजाने कर्ज म्हणून घेऊ शकतो.

ही संघटना सभासद महिलांच्या मुलांनी शिक्षण घ्यावे यासाठी सतत प्रयत्नशील आहे. हा बालमेळावा या प्रयत्नांचाच एक भाग होता.या संघटनेच्या पाठबळावर सभासद कचरा वेचणार्‍या महिला निदान आपल्या मुलांच्या बाबतीत तरी भविष्यकालातील स्वप्ने खासच बघू लागल्या आहेत. या बाल मेळाव्याला आलेल्या काही मुलांनी तर हवाई सुंदरी, गायक, कलाकार, समाज सेवक, संगणक तज्ञ, सैनिक, वकील, शेतकरी, नर्तकी आणि बॉक्सर यासारखे व्यवसाय करणार असेही सांगितले.

एक दोन मुलांनी तर आपण चांगला माणूस बनणार किंवा महत्वाची व्यक्ती बनणार असे सांगून सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला. स्वत: अशिक्षित असून आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी एवढी तळमळणारी आई मिळाल्यावर कोणते मूल तिची इच्छा पूर्ण करणार नाही? ही मुले त्यांचे शिक्षण पूर्ण करून चांगली नोकरी किंवा व्यवसाय करतीलच. माझी तर याबद्दल खात्रीच झाली आहे.

25 फेब्रुवारी 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

5 thoughts on “स्वप्न उद्याचे

 1. आपला लेख वाचुन नवीन माहीती मिळाली. ज्यांनी उद्द्द्याची स्वप्ने पाहीलि आहेत त्या सर्व मुलांना मनापासुन शुधेछ्छा. त्यांनी पाहीलेली स्वप्ने प्रत्येक्षात येवोत हिच प्रार्थना.

  Posted by sudhir | फेब्रुवारी 25, 2010, 5:20 pm
 2. खुप सुंदर माहिती, मुलांच्या मानसिकतेतला हा स्वागतार्ह बदल…

  Posted by आनंद पत्रे | फेब्रुवारी 25, 2010, 11:20 pm
 3. Small changes that happens at the bottom has the capacity larger upheavels………….

  Hope at some point in time our schools start thinking about creating a syllabus for the student who wants to become a good human being !

  Posted by Aashish | फेब्रुवारी 26, 2010, 11:01 सकाळी
 4. I was glad to know that these cildren were able to realise that the world exists beyond the limits of their undestanding.

  Posted by manohar | फेब्रुवारी 27, 2010, 3:54 pm
 5. १९९० पासून मी झोपडपट्टीतील लोकांसाठी कामकरत आहे. मोफत प्रशिक्षण वर्ग घेत आहोत. या मुलांना योग्य संधी मिळाली तर काही मुले अक्षरशः भरारी मारतात,पण सगळिच तशी नसतात हे ही खरे आहे. मोफत प्रशिक्षण —-खालील दुव्यावर अवश्य वाचा !

  Posted by savadhan | मार्च 1, 2010, 2:52 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: