.
Musings-विचार

बॅकपॅक


माझ्या रोजच्या जाण्यायेण्याच्या मार्गावर, मला दोन कॉलेजांचा परिसर लागतो. या परिसराच्या जवळ गेले की निरनिराळ्या वेषभूषेतील तरूण व तरूणी जा ये करताना नेहमी दिसतात. या सगळ्या मंडळींच्या फॅशन्स निरनिराळ्या असतात. कपडे निरनिराळे असतात. पण सर्वांच्या जवळ एक ऍक्सेसरी मात्र कॉमन फॅक्टर असावा तशी दिसते. प्रत्येकाच्या पाठीवर किंवा खांद्यावर, बॅकपॅक ही दिसतेच दिसते. ही बॅकपॅक पिशवी सध्याच्या तरूणाईचे ओळखचिन्ह आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये. साधारण अनेक रंगात उपलब्ध असलेली ही अनेक खिशांची पिशवी, बहुदा नायलॉन सारख्या वॉटरप्रूफ कापडापासून बनवलेली असते. लांबी कमीजास्त करता येईल असे दोन पट्टे या पिशवीला शिवलेले असल्याने ती खांद्यावरही अडकवता येते किंवा पाठीवरही घेता येते. पाठीवर घेतली की दोन्ही हात रिकामे रहातात. त्यामुळे दुचाकीधारकांमधे ही पिशवी खूपच लोकप्रिय झाली आहे.


मला आठवते की मी जेंव्हा पहिल्यांदा दुचाकी खरेदी केली तेंव्हा मोटर सायकलपेक्षा स्कूटरला जास्त पसंती दिली होती कारण स्कूटरला सामान ठेवण्याचा कप्पा असल्याने सामान ठेवता येत असे. मोटर सायकल्सना अशी काहीच सोय तेंव्हा नव्हती. आता मोटर सायकलचे चालक ही बॅकपॅक पाठीवर घेत असल्याने त्यांचे हात मोटर सायकल चालवायला मोकळेच राहतात. बॅकपॅकची उपलब्धता ही मोटर सायकल्सची लोकप्रियता, स्कूटर्सपेक्षा जास्त होण्याचे प्रमुख कारण असावे असे मला तरी वाटते.


दुसर्‍या महायुद्धापासून, लढणार्‍या सैनिकांच्या पाठीवर एक खाकी कॅनव्हास कापडापासून बनवलेली पिशवी असते. या पिशवीला हॅवरसॅक असे नाव आहे. या पिशवीत सैनिकांचे रॅशन, दारूगोळा, औषधे व कपडे असे सर्व काही रहात असे. या हॅवरसॅकला सध्याच्या बॅकपॅक पिशव्यांची आजी असे म्हटले तरी चालेल. मी शाळेत असताना माझ्या वडिलांची इच्छा असे की मी अशी सैनिकी हॅवरसॅक माझे दप्तर म्हणून वापरावी. त्यामुळे कदाचित असेल, पण मला हॅवरसॅक हा प्रकार कधीच आवडला नाही. आताच्या बॅकपॅक जरी झकपक दिसत असल्या तरी मूळ प्रकार तोच असतो. लहान मुलांना घेऊन प्रवास करायचा असला तर ही बॅकपॅक खूपच सोईस्कर पडते यात शंकाच नाही. पण विमान प्रवासात अगडबंब बॅकपॅक पाठीला लावलेल्या या आया किंवा बाप तुमच्या पुढेमागे असले की जरा जपूनच रहावे लागते. वरच्या लगेज रॅकमधून ती बॅकपॅक दहा वेळा खाली वर केली जाते. आपण आंग चोरून बसलो असलो तर ठीक नाहीतर एखादा दणका तरी खावाच लागतो. त्यातून तुम्ही जर अशा बॅकपॅक धारक व्यक्तीबरोबरच प्रवास करत असलात तर विचारायलाच नको. पुढच्या कप्प्यातले बेबी वाईप्स काढून द्या. मधल्या कप्प्यातला पाण्याचा सिपर काढा किंवा तळाच्या आडव्या कप्यातले डायपर्स काढून द्या. डोके भंडावून जाते.

पण या बॅकपॅक्सची नवीन ब्रॅन्ड इमेज मात्र अगदी खराब झाली आहे. मागच्या वर्षीच्या मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्यातला जिवंत सापडलेला एकुलत्या एक दहशतवादी अजमल कसाब याचे कोणते चित्र तुमच्या डोळ्यासमोर येते? अर्थातच पाठीला बॅकपॅक लावलेला हा दहशतवादी, त्याच्या AK 47 रायफल मधून गोळीबार करत असल्याचे. परवाच्या पुण्याच्या दहशतवादी बॉम्ब स्फोटात वापरलेली पिशवी म्हणे लाल रंगाची बॅकपॅकच होती. या दोन घटनांमुळे बॅकपॅक लावलेली पिशवी कुठे पडलेली दिसली की आजूबाजूच्या लोकांचे धाबे दणाणते.


बॅकपॅक पिशव्यांच्या वर बंदी घालणे शक्य होणार नाही परंतु निदान त्यांचा आकार एका विविक्षित आकारापेक्षा लहान असला पाहिजे असे काहीतरी नियम झाले तर ते योग्य ठरावे. पण रस्त्यावर, हॉटेलमधे किंवा प्रवासात आजूनाजूला कोणी बॅकपॅक धारक व्यक्ती आली तर आता इतर लोकांना चैन पडणार नाही हे मात्र खचित.

22 फेब्रुवारी 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “बॅकपॅक

 1. >>बॅकपॅक पिशव्यांच्या वर बंदी घालणे शक्य होणार नाही परंतु निदान त्यांचा आकार एका विविक्षित आकारापेक्षा लहान असला पाहिजे असे काहीतरी नियम झाले तर ते योग्य ठरावे.

  100 % sahamat tumachya mataashi.

  kharokhar tumhi chaan lihataa 🙂

  aavadale tumace lekhan !

  tumhi ekada aamachi website paahun ghye tumhaala nakkich aawadale niyamit lihanyasathi.

  http://www.mimarathi.net

  Posted by raj jain | फेब्रुवारी 22, 2010, 10:12 pm
 2. applications of a product r a fn of d ingenuity of individuals;der hv been enuf idiots who strapped demselves with xplosives!
  And wat abt d brilliant sardars ( oxymoron?) who churn lassi in Washing Machines….

  Bans r futile. Period.

  Maybe u cn sposnsor s trip to AHD and u cn hv ur limbu -pani in a more relaxed way!!

  cheers!

  Posted by vivek damle | फेब्रुवारी 26, 2010, 9:05 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: