.
अनुभव Experiences

पुणेकरांचे नियमपालन


पुण्याच्या लोकांची एक खासियत आहे. जगात किंवा भारतातल्या इतर शहरांमध्येसुद्धा, लोक जे नियम सहजतेने पाळतात ते पुणेकराना पाळणे केवळ अशक्य आहे असे पुणेकरांना नेहमीच वाटते. त्यामुळे पुणेकर हे नियम पाळत तर नाहीतच पण नियम पाळणे कसे अयोग्य आहे याचीही भली थोरली कारणे ते सयुक्तिकपणे देत असतात. जगात सर्व शहरांच्यातील दुचाकीस्वार हेल्मेट घालतात. अगदी भारतातही मुंबई, बंगलुरू, हैद्राबाद या सर्व ठिकाणी दुचाकीस्वारांना हेल्मेट घालणे बंधनकारक आहे व लोक हा नियम पाळतातच. मात्र पुण्यात हा नियम लागू करणे अजून कोणालाही शक्य झालेले नाही. बरं असे न करण्याची काही काही कारणे तर अफलातून असतात. “आधी रस्त्यावरचे खड्डे बुजवा आणि मग हेल्मेट सक्ती करा.”,”हेल्मेटमुळे घाम येतो व चष्म्यावर बाष्प साठते.”.” शेजारच्या गल्लीत जायला हेल्मेट कशालाअसली कारणे तर दिली जातातच पण सगळ्यात कळस म्हणजे स्कूटरवरून आम्ही चौघे जातो, सगळ्यांना कसे हेल्मेट परवडणार.” आता यावर काय बोलणार.


पुण्याचे रिक्षावाले काही कमी नाहीत मध्यंतरी त्यांच्यावर गणवेष आणि बिल्ला लावण्याची सक्ती केली. ही कशी अयोग्य आहे हे सांगताना रिक्षावाल्यांच्या फेडरेशनने दोन कारणे दिली. ” रिक्षा ड्रायव्हर्स हे समाज सेवक समजले जात नाहीत.” हे पहिले कारण आणि दुसरे म्हणजे मध्यंतरी रिक्षा भाड्यात केलेली 1 रुपयाची कपात ही अन्यायकारक असून रिक्षा भाडे परत वाढवणे आवश्यक आहे.” आता गणवेष व बिल्ला आणि या दोन गोष्टींचा काय संबंध आहे हे मला तरी उमजण्याच्या पलीकडचे आहे. असो!

पुण्यातले दुचाकीधारक हेल्मेट घालायला जरी तयार नसले तरी दुचाकी चालवणार्‍या स्त्रिया व अलीकडे काही पुरुष सुद्धा एका मोठ्या फडक्यात आपला संपूर्ण चेहरा गुंडाळून दुचाकी चालवताना दिसतात. या फडक्याने मान, केस व चेहरा संपूर्ण झाकला जातो व डोळ्यासमोर एक अरूंद पट्टी तेवढी उघडी रहाते. आता आश्चर्य असे की हे फडके बांधताना रस्त्यावर खड्डे असले तरी अडचण येत नाही, चष्म्यावर बाष्प साठत नाही किंवा आणखी दुसरी कुठलीही अडचणही येत नाही.


आठ दिवसापूर्वी पुण्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पुण्याच्या पोलिसांना आता असा साक्षात्कार झाला आहे की रस्त्यावर हे फडके किंवा स्कार्फ बांधून दुचाकी चालवत असलेले दुचाकीस्वार कोण आहेत हे रस्त्यावरच्या पोलिसांना कळत नाही व त्यामुळे दहशतवादी त्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्याच्या पोलिस अधिकार्‍यांनी एक नवीनच हुकुम. पुण्यात आता जारी केला आहे. फडके किंवा स्कार्फ बांधायचा असला तर रुग्ण किंवा बाळंतीण बायका जसा स्कार्फ डोक्याभोवती गुंडाळतात तसा गुंडाळा. स्कार्फने आपला चेहरा झाकला जाणार नाही याची काळजी घ्या.


आता कोणताही नियम इतक्या चटकन मान्य करतील तर ते पुणेकर कसले. हा नियम किती अणि कसा अन्यायकारक आहे हे लगेचच काही स्त्रियांनी सांगितले. एका बाईंचे म्हणणे पडले की आता उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाळात त्वचा कोरडी पडते त्यामुळे स्कार्फ आवश्यकच आहे. ही वेळ काय स्कार्फ बंदीची आहे कां?” तर दुसर्‍या विदूषींचे म्हणणे आहे की शहरात प्रदुषण पातळी किती जास्त आहे अशा वेळी स्कार्फ बंदी केली तर स्त्रियांची त्वचा व त्यामुळे त्यांची तब्येत यावर किती वाईट परिणाम होतील की नाही?” एका स्त्री डॉक्टरांनी तर या हुकुमामागे काही आधार आहे का याबद्दलच शंका व्यक्त केली आहे. त्या म्हणतात की कशावरून स्कार्फ बांधणारेच दहशतवादी असतात? दहशतवादाची भिती एवढी कुठे आहे की ज्यामुळे पोलिसांनी स्कार्फबंदी करावी.”

तरी स्कार्फबंदीच्या विरुद्ध दिलेले व मला सर्वात आवडलेले कारण एका पुणेकर महिलेने दिले. ते असे आहे.” हेल्मेट घातले (समोर प्लास्टिक visor असलेले) तरी चेहरा झाकला जातोच. मग आता पोलिस लोकांना हेल्मेट घालू नका म्हणून सांगणार आहेत कां? ते पहिल्यांदा सांगा आणि नंतर स्कार्फबंदी करा.” आता यापुढे पोलिस काय बोलणार व कसा कोणताही नियम राबवणार?

खरोखर धन्य ते पुणेकर आणि धन्य त्यांचे नियम पालन.

21 फेब्रुवारी 2010.

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

4 thoughts on “पुणेकरांचे नियमपालन

 1. चंद्रशेखर, मस्त लेख! आवडला.

  पुण्यात कोणतेही धोरण राबवण्याबद्दलच निश्चित असे धोरण नाही. 🙂

  त्यामुळे कुणाचाच कुणाला मेळ नाही अशी परिस्थिती आहे.

  रस्त्यावरच्या वाहतुकीबाबतही हेच म्हणता येईल.

  -सौरभ.

  Posted by सौरभ | फेब्रुवारी 21, 2010, 11:23 सकाळी
 2. Uttam Lekh…. Amhi Punekar….. ithe asech chalayche :-).

  Dahashatvadyana seemevarach pakadle pahije, thithe asaa niyam ahe ka!! —

  Ase ajoon koni vicharle nahi hech naval.

  Posted by jitendra gokhale | फेब्रुवारी 21, 2010, 8:14 pm
 3. mi punekar nahi.
  tarihi mi lokana changala olakhto.
  changale likhan aahe.

  Posted by abhijit | फेब्रुवारी 22, 2010, 8:06 pm
 4. khare ahe , punekarana kon adavnar, mast lekh

  Posted by SANGEETA | फेब्रुवारी 24, 2010, 6:08 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 385 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: