.
अनुभव Experiences

विचित्र योगायोग


परवाच्या शनिवारी, पुण्यातल्या जर्मन बेकरीनावाच्या एका छोट्याशा रेस्टॉरंटमधे झालेल्या दहशतवादी हल्यात, नऊ निरपराध व्यक्ती बळी गेल्या. त्यांनी कोणाचे आणि काय वाईट चिंतले होते म्हणून त्यांना ही शिक्षा झाली? हे दहशतवादी ज्या कोणाविरूद्ध लढत आहेत त्या लढ्याचा आणि या नऊ जणांचा काही संबंध सुद्धा नसताना त्यांना आपला जीव का गमवावा लागला? या सर्वांचे आईवडील, नातेवाईक, मित्र या सर्वांना आपल्या जवळच्या कोणाला तरी गमवावे लागल्याचे अपरिमित दु:ख का भोगावे लागते आहे? या प्रश्नांची उत्तरे आपणा कोणाजवळच खरे म्हणजे नाहीत. अलीकडे अशा प्रकारच्या बातम्या वाचल्या की माझा जगातल्या चांगल्या गोष्टींवरचा विश्वासच काही काळ तरी उडतो.

या नऊ जणांत, आनिंदयी म्हणून एक एकोणीस वर्षाची मुलगीही होती. ही मुलगी फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत होती. या वयाची मुले मुली जसे आयुष्याकडे पॉझिटिव्हली बघतात तसेच बघणारी, खूप काही करू इच्छिणारी, उत्साह ओसंडून जाणारी अशी ही मुलगी होती. या मुलीने परवाच्या दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावले. पण अशी काही दुर्घटना होणार आहे अशा पूर्वसूचना तर तिला मिळत नव्हत्या ना! असे वाटायला लागणारे दोन विचित्र योगायोग या आनिंदयीच्या आयुष्यात नुकतेच घडले होते. सर्वसाधारणपणे या दोन्ही गोष्टींकडे कोणाचे लक्ष पण गेले नसते पण शनिवारच्या दुर्घटनेनंतर तिच्या मित्र मैत्रिणींना या दोन गोष्टी लगेच स्मरल्या यात नवल नाही.

ही आनिंदयी, महाविद्यालयात इंग्लिश काव्याचाही अभ्यास करत होती. मागच्याच आठवड्यात ब्राऊनिंगची एक कविता वर्गात शिकवली जात होती. त्या वेळी आनिंदयीने, मृत्युची व्याख्या कशी करता येईल असा प्रश्न आपल्या प्राध्यापिकेला विचारला होता. एकोणीस वर्षाच्या एका मुलीने, जिचा आयुष्याबद्दलचा उत्साह नुसता ओसांडून वहात होता, तिने मृत्य़ुचा विचार करावा हे सुद्धा कल्पनेच्या बाहेरचे वाटते.

आनिंदयीला फोटोग्राफीमधे खूप रूची होती. त्यामुळेच पुण्यात असलेल्या फिल्म ऍन्ड टेलेव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेतील फिल्म मेकिंग या विषयाबद्दल जास्त माहिती करून घेण्यासाठी ती तिथल्या ओळखीच्या मित्रांकडे जात असे. मागच्या सप्टेंबर महिन्यात तिथल्याच एका दिग्दर्शनाच्या कोर्सच्या विद्यार्थ्याने तिला आपल्या छोट्या फिल्ममधे भाग घेण्याची विनंती केली होती. आनिंदयीने याला लगेच मान्यता दिली होती.

या फिल्ममधे आनिंदयीने जे काम केले होते त्यातले एक दृश्य असे होते. आनिंदयी व आणखी काही मित्र, मैत्रिणी एका रेस्टॉरंटमधल्या टेबलाभोवती गप्पा मारत बसले आहेत. तेवढ्यात दारातून अगदी सर्वसाधारण ग्राहकासारखा दिसणारा पण एक दहशतवादी आत येतो. त्याच्या हातात एक काळी बॅग आहे. शनिवारी प्रत्यक्षात हेच तर घडले होते.

आहेत ना दोन्ही विचित्र योगायोग? या विषयातले तज्ञ यावर कदाचित काही लिहू शकतील.

16 फेब्रुवारी 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

4 thoughts on “विचित्र योगायोग

  1. असे योगायोगाचे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात. आपलं तिकडे लक्ष नसतं ! अंतर्मन म्हणा, अंतःप्रज्ञा म्हणा अगर इतर काही म्हणा आपल्याला संकेत मिळत असतात , जे सजग असतात त्याना त्याची लगेच जाणिव होते. त्सुनामी च्या वेळेस त्याठिकाणचे आदिवासी ,हत्तीसारखे इतर काही पशू,पक्षी, दूर उंच जागी गेले. ते या महाप्रलयात बचावले.पण पुण्यातून तेथे संशोधनाच्या निमित्ताने गेलेले त्या प्रलयात वाहून गेले. याच पठलीतला वर नमूद केलेला योगायोग आहे असे वाटत नाही का?
    आपल्याला संकेत मिळून ही आपण तिकडे दुर्लक्ष करतो, असं बर्‍याचदा होते असा माझा स्वतःचा अनुभव आहे.

    Posted by savadhan | फेब्रुवारी 17, 2010, 10:32 सकाळी
  2. खरच खूप वाईट घडले. माझी यापूर्वीची कंपनी कोरेगावपार्क मध्ये होती. ती कंपनी सोडून दोन महिने झाले. रोज त्यासमोरून जायचो. अस काही घडेल याची साधी कल्पनाही नव्हती. माझा वाईट योगायोग असा की मी मुंबईला ज्या कंपनीत होतो. ती डी एन रोडवर होती. ती कंपनी सोडली आणि सहा महिन्यांच्या आत त्याच फोर्ट भागात अतिरेक्यांनी हल्ला केला. आपण ज्या भागात राहिलो तिथल्या भागात अशा घटना घडल्या तर खूप विचित्र वाटते. तुम्ही लिहिलेली नोंद खरच मनाला उद्विग्न करणारी आहे. खूप मार्मिक लिहिले आहे.

    Posted by हेमंत आठल्ये | फेब्रुवारी 17, 2010, 5:08 pm
  3. खरोखरच हा विचित्र योगायोग आहे. असे संदेश अंतर्मन देत रहातं, याचा अनुभव मलाही आला आहे.

    Posted by कांचन कराई | फेब्रुवारी 17, 2010, 7:03 pm
  4. कृपया याविषयी या दूव्यावर लिहिले आहे ते वाचावे हि विनंति

    Posted by savadhan | फेब्रुवारी 18, 2010, 11:07 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

नुकतीच प्रकाशित केलेली ब्लॉगपोस्ट्स

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 384 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

%d bloggers like this: