.
अनुभव Experiences

पर्यटक आणि गोव्याचे समुद्र किनारे


मागच्याच आठवड्यात, म्हणजे 28 जानेवारीला, गोव्यामधे, एका 9 वर्षाच्या रशियन मुलीशी एका भारतीय तरूणाने जो ओंगळ प्रकार केला त्याबद्दल कोणत्याही सुजाण भारतीयाच्या मनात अतिशय संताप दाटून येईल याबद्दल माझ्या तरी मनात शंका नाही. या तरूणाच्या साथीदाराने त्या मुलीच्या आईला बोलण्यात गुंतवून ठेवून तिचे मुलीकडचे लक्ष दुसरीकडे विचलित केले व या तरूणाला हे दुष्कर्म करण्यास मदत केली. हे दोन्ही तरूण गोव्यामधे एका औषध कंपनीत कामाला होते. पोलिसांनी 2 दिवसातच दोघांनाही पकडले आहे. आपल्या विकृत मनोवृत्तीमुळे या दोन तरूणांनी या निरागस आणि निष्पाप मुलीला जी पीडा दिली आहे त्याबद्दल त्यांना जास्तीत जास्त कडक शिक्षा मिळावी अशीच आपल्या सर्वांची इच्छा असणार हे नक्की.

या प्रसंगानंतर गोव्यातले मंत्री, पर्यटन विभागाचे अधिकारी यांना काहीतरी बोलणे आवश्यकच होते. त्यामुळे बरीच मुक्ताफळे उधळण्यात आली. एक जण म्हणाले की दोन भागात विभागलेले पोहण्याचे कपडे परिधान केल्याने असे घडले असावे. तर दुसर्‍या एका स्त्री अधिकार्‍याने, बीचवर अर्धनग्न अवस्थेत पर्यटक फिरत राहिले तर स्थानिक लोकांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही असे मत व्यक्त केले. काही स्थानिक लोकांनी तर त्या मुलीलाही दोष देण्यास मागे पुढे पाहिले नाही.

वाचकांपैकी जे लोक गेल्या पाच दहा वर्षात गोव्याला जाऊन आले असतील त्यांच्या लक्षात हे आलेच असेल की गोव्यामधे प्रत्यक्षात दोन स्वतंत्र पर्यटन ठिकाणे आहेत. यापैकी पहिले भारतीय पर्यटकांसाठी आहे. यात गोव्यातली मंगेशी सारखी प्रसिद्ध देवळे, जुन्या गोव्यामधली ऐतिहासिक चर्च, पणजीमधले मिरामार किंवा दोना पावला सारखे बीच वगैरे सारखी ठिकाणे येतात. कलंगुटचा बीचही थोडाफार यातच मोडतो. ही सर्व ठिकाणे मुलाबाळांसह कुटुंबाना मौजमजा करता येईल अशीच आहेत. याउलट बाघा, वेगातर यासारखे बीच, भारतीय पर्यटकांसाठी नाहीतच. या बीचवर गेले तर आपण भारतात आहोत की एखाद्या पाश्चिमात्य देशात, असा संभ्रम निर्माण झाल्याशिवाय रहात नाही. ज्या बीचवर ही दुर्दैवी घटना घडली तो अरंबोल बीच या प्रकारचाच बीच आहे. या किनार्‍यांवर भारतीय कुटुंबे अतिशय कमी प्रमाणात दिसतात. मात्र अनेक आंबटशौकिन भारतीय तरूण येथे हमखास असतात. या दुर्दैवी प्रकरणात गुंतलेले विकृत प्रवृत्तीचे भारतीय तरूण याच वर्गातले असावेत.


गोवा सरकारचे, पर्यटन हे उत्पन्नाचे सर्वात मोठे साधन असल्याने, पाश्चिमात्य पर्यटक ज्या बीचेसवर जास्त करून असतात त्या समुद्र किनार्‍यांच्या बाबत थोडे, मांजर डोळे मिटून दूध पिते, त्या सारखे या सरकारचे धोरण असावे. हे पर्यटक बीचवर काय कपडे परिधान करतात?, कोणत्या अवस्थेत बीचवर पडलेले असतात?, त्यांनी कोणत्या मादक पदार्थांचे सेवन केलेले असते? याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले जाते व या पर्यटकांना संपूर्णपणे मनासारखे वागण्याचे स्वातंत्र्य दिले जाते. असे स्वातंत्र्य दिल्याने हळूहळू त्या पर्यटक केंद्रांचे काय होते हे पहायचे असेल तर थायलंडमधल्या समुद्र किनार्‍यांवर जाऊन बघावे. थायलंड हा देश इतका सुंदर आहे पण परदेशी पर्यटकांना कसेही वागण्याचे स्वातंत्र्य दिल्याने या देशातले पर्यटन स्थळे म्हणजे वेश्याव्यवसाय करण्याची केंद्रे होत चालली आहेत. गोव्याचे थायलंड होऊ नये अशी जर भारतीयांची इच्छा असली तर या समुद्र किनार्‍यावर पर्यटनाचा आनंद लुटू पहाणार्‍या पर्यटकांसाठी , कोणता वेश परिधान करावा? कोणते वर्तन अशोभनीय असून चालणार नाही. हे स्पष्ट करणे जरूरीचे आहे.

गोवा हे Family Resort म्हणून ठेवायचे आहे की थायलंडच्या काही बीचेस सारखे Sex Resort करायचे आहे हे नक्की ठरवले पाहिजे. मध्यपूर्वेमधल्या देशात जेंव्हा परदेशी प्रवासी जातात तेंव्हा त्यांना, विशेषत: स्त्रियांना अनेक बंधने पाळावी लागतात. भारतीयांनाही ती जाचक वाटतात. तरीही ती पाळली जातात. पाश्चिमात्य देशांतील काही हॉटेल्समधे डायनिंग हॉलमधे जेवायचे असेल तर ठराविक फॉर्मल वेष परिधान करावाच लागतो. त्याचप्रमाणे जगातील सर्वोत्कृष्ट अशा गोव्याच्या बीचवर जर पर्यटकाला आनंद लुटायचा असला तर वेषाचे आणि वर्तनाचे काही निर्बंध सर्व पर्यट्कांना पाळणे आवश्यक केलेच पाहिजे.कोणतेही भारतीय कुटुंब आपल्या मुलंबाळासमवेत अशा बीचवर जाणार नाही जिथे पलीकडच्याच बाजूला अर्धनग्न तरूणी पहुडलेल्या असतील. गोव्याच्या बीचेसचे भारतीयांसाठी व परदेशी पर्यटकांसाठी असे जे आपोआप विभाजन झालेले आहे त्याचे हे मुख्य कारण आहे.


गोवा हे जगातले एक सर्वोत्कृष्ट पर्यटन स्थान आहे हे कोणीच अमान्य करणार नाही. बीचवर जाणार्‍या पर्यटकांवर थोडे निर्बंध आले म्हणून गोव्याला येणे पर्यटक कधीच सोडून देणार नाहीत. उलट हिडीसपणा कमी झाल्याने या पर्यटनस्थळाचे सौंदर्य व शान आणखी वाढेल आणि एक अतिशय सुरक्षित व आल्हाददायक सुट्टी घालवण्याचे स्थान म्हणून त्याचा लौकिक वाढेल असे मला वाटते.

3 फेब्रुवारी 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

12 thoughts on “पर्यटक आणि गोव्याचे समुद्र किनारे

 1. Agadi Barobar…Aapli Sanskruti aapanach japali pahije…Chaan Lihilay!

  Posted by Ashish | फेब्रुवारी 3, 2010, 9:01 pm
 2. मस्त लेख आहे. आपले सर्व मुद्दे पटले.

  Posted by निरंजन | फेब्रुवारी 3, 2010, 9:12 pm
 3. उत्तम लेख. पूर्ण सहमत..

  Posted by हेरंब | फेब्रुवारी 4, 2010, 12:55 सकाळी
 4. kharech aahe tumche mhanane. gelya 2 varshapsun govyat rahate.kititari changes hotayet purvipeksha.dupatta killer mahanand naikche udaharan tajech aahe ajun……

  Posted by Rajvi | फेब्रुवारी 5, 2010, 3:36 pm
 5. आपल्या विचाराशी पुर्णपणे सहमत आहे.आपले विचार अमलात आणले तर देशविदेशात भारताचा नावलौकिक वाढेल.

  Posted by ramesh kachare | फेब्रुवारी 22, 2011, 8:06 pm
 6. sir,
  I am from Goa, Our Govt. is not intrested in save our culture. They make GOA as drug center of world.

  Posted by arun ramchandra karekar | मे 19, 2011, 12:32 सकाळी
 7. Kharokhar vichar karava asach lekh aahe.

  Posted by Tukaram | ऑक्टोबर 14, 2011, 11:48 सकाळी
 8. agdi barobar ahe Goa la Goa ch rahudya Bahmas karu naka. ashya kahi beachs var deshwasiya na janachi laj watel tyala kay arth

  Posted by feroz shaikh | नोव्हेंबर 8, 2011, 7:03 pm
  • फेरोझ-

   आपल्या देशातील प्रेक्षणीय स्थळे प्रथम देशवासीयांसाठी आहेत व नंतर परदेशीवासीयांसाठी हे साधे सूत्र लक्षात ठेवण्याची गरज आहे.

   Posted by chandrashekhara | नोव्हेंबर 9, 2011, 7:29 सकाळी
 9. vichar karnya sarkha lekh ahe thank you jay Mharstra

  Posted by Durgesh Jaiswal Lasur Station Aurangabad | एप्रिल 20, 2013, 7:13 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: