.
Health- आरोग्य

मद्यधुंद रशियन्स


औद्योगीकरण झालेल्या देशांमधे, सर्वात जास्त मद्य सेवन कोण करत असेल तर रशियन लोक! विश्वास बसणार नाही पण सरासरीने प्रत्येक रशियन माणसाच्या पोटात दर वर्षी 32 पिंट्स किंवा अंदाजे 16 लिटर शुद्ध मद्यार्क कोणत्या ना कोणत्या स्वरूपात जातो. गेल्या काही शतकात मद्य हे प्रत्येक सर्वसाधारण रशियन माणसाच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक जीवनाचे अविभाज्य अंग बनले आहे. रशियन माणून जन्माला आल्यापासून मरेपर्यंत, त्याच्या आयुष्यातील प्रत्येक घटना व्होडका या मद्याच्या साक्षीनेच साजरी होते. मग तो लग्न समारंभ असो! नवीन ओळख असो किंवा जुन्या मित्रांची परत झालेली भेट असो! नवीन खरेदी असो किंवा विक्री असो! फायदा झालेला असो किंवा तोटा झालेला असो! कोणाशी भांडण झालेले असो किंवा मनोमिलन असो!

एक हजार वर्षांपूर्वी रशियाच्या राजघराण्याचा ग्रॅंड प्रिन्स व्लाडिमिर याने तर सांगूनच टाकले होते की मद्यप्राशन हा रशियाच्या जीवनातला खरा आनंद आहे. रशियन राजघराण्याने ख्रिश्चन धर्म अधिकृत म्हणून स्वीकारण्यामागे बहुदा हेच कारण असावे की हा धर्म मद्यप्राशन निषिद्ध मानत नाही. रशियन लोक मद्यप्राशन घरी, पबमधे तर करतातच पण कामावरही करतात. 1991 साली केल्या गेलेल्या एका पाहणीत असे आढळून आले की घरच्यापेक्षा, कामावर मद्यप्राशन करणारे लोक प्रत्यक्षात जास्तच आहेत.

16व्या शतकात रशियामधे प्रथम दारूचे गुत्ते ओघडले गेले. राज्यकर्त्यांच्या हे लगेच लक्षात आले की करवसुलीचा हा एक सुलभ मार्ग आहे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस रशियन राज्यकर्त्यांच्या उत्पन्नपैकी 40 % उत्पन्न मद्यावरील करापासून मिळू लागले होते. हळू हळू मद्याचे उत्पादन व विक्री ही संपूर्णपणे राष्ट्रीयकृत उद्योग म्हणूनच घोषित करण्यात आली.

रशियामधला मद्यप्राशनाचा इतिहास जितका जुना आहे तितकाच तिथल्या राज्यकर्त्यांनी लोकांचे मद्यप्राशन कमी व्हावे म्हणून केलेल्या प्रयत्नांचा. 1914 मधे पहिल्या महायुद्धाच्या वेळेस निकोलस 2 या झारने संपूर्ण दारूबंदी घोषित केली होती. (ही घटना अमेरिकेमधे दारूबंदी कायदा होण्याच्याही आधीची आहे.) या दारूबंदीचा परिणाम अर्थातच अवैध दारूचे उत्पादन प्रमाणाबाहेर वाढण्यात झाला. या नंतरचा प्रयत्न दुसर्‍या महायुद्धानंतर जोसेफ स्टालिनने करून बघितला. त्याने मद्यार्काचे उत्पादन, विक्री यावर बंधने आणली व कर वाढवून किंमती वाढवल्या. परंतु याचाही परिणाम अवैध दारू व इतर मादक पदार्थांच्या वाढत्या सेवनात झाला. यानंतर क्रुश्चेव्ह, ब्रेझ्नेव्ह यांनीही मद्यपान विरोधी मोहिमा राबवल्या. या प्रत्येक मोहिमेचा परिणाम मद्याचा खप वाढण्यात फक्त झाला. 1982 साली मिखाईल गॉर्बॉचेव्हने मद्यार्काचे उत्पादन 50% कमी केले याचा परिणाम हातभट्टीचे उत्पादन बेसुमार प्रमाणात वाढण्यात फक्त झाला. या अवैध दारूचे उत्पादन एवढे वाढले की या उत्पादनाला आवश्यक असलेली साखर बाजारातून गायब झाली व फक्त काळ्या बाजारात मिळू लागली. लोक कोणतीही विषारी रसायने पिऊ लागले व सरकारी अबकारी कर वसूली 2 बिलियन रूबलने कमी झाली.

बोरिस येल्स्टीन मद्यपान विरोधी मोहिमा राबवणे शक्यच नव्हते कारण तेच भरपूर प्रमाणात मद्य सेवन करत असत. त्यांच्याबद्दलच्या, मॉस्को नदीत मद्यसेवन करून गाडी घालणे किंवा वॉशिंग्टनच्या रस्त्यांवर फक्त आतील कपडे घालून फिरणे अशासारख्या दंतकथा परिचित आहेतच.

रशियाचे सध्याचे अध्यक्ष ड्मित्री मेडव्हडेव्ह यांनीही रशियन लोकांची मद्यसेवनाची सवय कमी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याच्या आधी त्यांनी लोकांनी व्होडका ऐवजी बीअर प्यावी अशी सूचना केली होती. याचा परिणाम फक्त व्होडका बरोबर बीअरचा खप वाढण्यात फक्त झाला. यामुळे नाऊमेद न होता श्री. मेडव्हडेव्ह यांनी आता परत प्रयत्न चालू केला आहे. व्होडकाची कमीत कमी किंमत आता 89 रुबल (अंदाजे 3 अमेरिकन डॉलर) एवढी करण्यात आली आहे. या किंमतवाढीमुळे व्होडकाचा खप कमी होईल अशी श्री. मेडव्हडेव्ह यांना आशा वाटते.

रशियन लोकांच्या जीवन रहाणीत मद्यप्राशन एवढे अंतर्भूत झालेले आहे की व्होडकाची नुसती किंमत वाढवून काय साधेल असा प्रश्न बर्‍याच रशियनांना पडला आहे. मद्यप्राशनाला असलेले सामाजिक स्थान लोकांच्या मनातून कमी करण्याची आवश्यकता आहे असे त्यांना वाटते.

23 जानेवारी 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “मद्यधुंद रशियन्स

  1. उत्तम व माहितीपूर्ण लेख! काही दिवसांपूर्वी मी ह्याच विषयावर इंडियन एक्स्प्रेस दैनिकात लेख वाचला होता. तुमच्या सचित्र लेखाने अजून विस्ताराने माहिती मिळाली. धन्यवाद! पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

    — अरुंधती


    Sing, Dance, Meditate, Celebrate!
    http://iravatik.blogspot.com/

    Posted by arundhati | जानेवारी 24, 2010, 10:40 pm

Trackbacks/Pingbacks

  1. पिंगबॅक Tweets that mention मद्यधुंद रशियन्स « अक्षरधूळ(Akshardhool) -- Topsy.com - जानेवारी 23, 2010

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: