.
Environment-पर्यावरण

फर्निचर उद्योग आणि वर्षाअरण्ये


जर आज आपण कोणत्याही प्रगत देशातल्या एखाद्या मोठ्या दुकानाला भेट दिली, तर अतिशय सुंदर दिसणार्‍या लाकडांच्या वस्तूंची एक विशाल अशी श्रेणीच बघायला मिळते. यात स्वयंपाकघरातील कागदी रुमालांची गुंडाळी अडकविण्याचा स्टॅंडपासून, घरातले मोठे फर्निचर दिसते. या शिवाय बांधकामात वापरण्यात येणारे जमिनीवरची लाकडी टाइल्स, भिंतीसाठी मोठे तक्ते व दरवाजे हे असतातच. ही सर्व उत्पादने दिसण्यास अतिशय उत्कृष्ट, घरी अगदी जुजबी हत्यारे वापरून जुळणी करता येतील अशा किट स्वरूपात व अतिशय कमी किंमतीला उपलब्ध असतात.

या सुंदर वस्तू उपलब्ध होण्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे या वस्तू बनवण्यासाठी जे लाकूड वापरले जाते त्याच्या फॉर्ममधे झालेला बदल. पूर्वी सर्व फर्निचर झाडाच्या कापलेल्या ओंडक्यांपासून बनवले जात असे. आता या ओंडक्यांचे बारीक तुकडे किंवा भुगा करून ते तुकडे किंवा तो भुगा, ग्ल्यू च्या सहाय्याने एकत्र दाबला जातो व त्या भुग्याचे पाहिजे त्या आकाराचे तुकडे किंवा ताव बनवले जातात.या लाकूड वापरण्याच्या पद्धतीत झालेल्या छोट्याश्या क्रांतीमुळे या लाकडी रॉ मटेरियलची किंमत एकदमच कमी झाली आहे. पर्यायाने ग्राहकांची ही उत्पादने वापरण्याची पद्धतच बदलत चालली आहे. पूर्वीचे आपल्या घरांच्यातले फर्निचर जर आपण स्मरले तर एकतर ते अतिशय महाग असे आणि त्या कुटुंबाला त्या फर्निचरविषयी एक आत्मियता असे. एका पिढीकडून दुसर्‍या पिढीला ते सुपुर्त करण्यात येई. आताचे नवीन फर्निचर एक नवीन मंत्र घेऊनच येते. तो मंत्र म्हणजे, जोडावापराफेकून द्या. हे फर्निचर खूप दिवस टिकत नाही व फेकूनच द्यावे लागते. या आधुनिक फर्निचरची जगभरची मागणी सतत वाढत आहे. ., 2006 मध्ये जगभरातले लाकडी फर्निचरचे उत्पादन US$ 270 बिलियन पर्यंत वाढले. आणि सर्वात धक्कादायक म्हणजे मागची 10 वर्षे हे उत्पादन दरसाल 30% या गतीने वाढत आहे. ग्राहकाच्या दृष्टीने तर ही एक पर्वणीच आहे. काळ आणि फॅशन यांच्यानुसार बदलणारे फर्निचर आणखी आणखी स्वस्त मिळते आहे. ते वापरायचे आणि नको असले की सरळ फेकून द्यायचे. मग यात तक्रार करण्याजोगे तरी काय आहे?


फक्त एक छोटीशी अडचण आहे. जगभरच्या जंगलांच्या दृष्टीने ही फारच धोकादायक बाब आहे. या शिवाय पंधरा वीस वर्षांपूर्वी फर्निचर बनविण्यास उपयुक्त अशा साग, पाइन, अक्रोड आणि शिसम या प्रकारच्याच लाकडांना मागणी असे. आता MDF सारख्या नवीन तंत्रज्ञानामुळे सर्व प्रकारच्या लाकडाला मागणी आहे.

आता आपण चीन मधील यांगझी नदीच्या दक्षिण किनार्‍यावर असलेल्या ‘झांगजियागांग’ ( Zhangjiagang City) शहराचा एक फेरफटका करू. हे शहर ‘जिआंगसू’ ( Jiangsu Province) प्रांतात आहे व चीनमधल्या शांघाय, नानजिंग, सुझॉअ आणि वुशी सारख्या प्रमुख शहरांच्या जवळ आहे. या शहारात असलेल्या प्रक्रिया उद्योगाने मागच्या वर्षी US$12 बिलियन उलाढाल केली. यापैकी एक मोठा वाटा लाकडी वस्तू बनविणार्‍या कारखान्यांचा आहे कारण या शहराच्या आसपास लाकडी वस्तू बनविणारे असंख्य कारखाने आहेत. .2005 मधेच चिनी लाकडी वस्तू उद्योगाने US$51 बिलियन उलाढाल व US$13 बिलियन निर्यात हे पल्ले गाठले होते. त्यामुळे ‘झांगजियागांग’ मधील लाकूडवस्तू उद्योग हा एकूण चिनी लाकूड वस्तू उद्योगाचा मोठा भाग असल्याने आपल्या अभ्यासासाठी पुरेसा होईल.


झांगजियागांग शहराजवळ एक आधुनिक बंदर विकसित झाले आहे. या बंदरावरच्या सीमाशुल्क विभागाने प्रसिद्ध केलेल्या आंकड्यांनुसार 2008 सालच्या पहिल्या सहा महिन्यात US$ 410 मिलियन किंमतीचे व 1.642 मिलियन घन मीटर एवढ्या संख्येचे लाकडी ओंडके चीनमधे फक्त या बंदरातून आयात केले गेले. ही सगळी आयात वैध स्वरूपाची असली पाहिजे हे स्पष्ट आहे. दुसर्‍या एका अहवालानुसार संपूर्ण चीनमधली लाकडी ओंडक्यांची आयात आता प्रतिवर्ष, 45 मिलियन घन मीटर्स या आंकड्यापर्यंत पोचली आहे. यातील बहुतेक सर्व आयात, गरीब विकसनशील देशांकडून, तोडलेले वृक्ष या स्वरूपातीलच आहे. या शिवाय लाकडी भुस्सा व लाकडाचे लहान तुकडेही (चिप्स) चीन मोठ्या प्रमाणात आयात करतो.


सर्वात खेदाची गोष्ट ही आहे की यापैकी बहुतेम ओंडके हे निर्यात करणार्‍या देशांच्या नकळत व कोणत्याही प्रकारचे सीमा शुल्क न भरता, किंबहुना चोरी केलेलेच, चीनमधे येतात. अर्थातच पर्यावरण टिकविण्याची कोणतीही काळजी या वृक्षतोडीमध्ये घेतली जात नाही. ब्राझिल, कंबोडिया, कॅमरून, कॉंगोब्राझव्हील, विषुववृत्तीय गिनी, गॅबन, इंडोनेशिया, ब्रम्हदेश, पापुआ न्यू गिनी आणि सॉलोमन बेटे या गरीब व विकसनशील देशांकडून चीनला होणारी ओंडक्यांची निर्यात कमीत कमी 80% ही चोरलेली व अवैध प्रकारची असते. मलेशिया व रशिया या देशांच्या निर्यातीत हे प्रमाण थोडे कमी म्हणजे 50% ते 60% आहे.


या आयातीची व्याप्ती आणि श्रेणी मी जेंव्हा बघितली तेंव्हा माझ्या मनात साहजिकच हा विचार आला की पृथ्वीच्या पाठीवरची हिरवी जंगले हा फर्निचर उद्योग किती दिवसात गिळंकृत करणार? या गतीने जर जंगले नष्ट होत असली तर ती काही फार दिवस टिकणार नाहीत हे एखादे लहान मूलही सांगू शकेल.

दुर्दैवाने, सर्वच प्रगत राष्ट्रे जंगलांच्या या विध्वंसात महत्वाची भूमिका बजावत आहेत. स्वस्त लाकडी फर्निचरला या राष्ट्रांच्यात असलेली मागणी वाढतच आहे व ही मागणी चिनी फर्निचर उद्योगाला संजीवनीच बनत आहे. ही मागणी जोपर्यंत वाढत रहाणार तोपर्यंत चिनी फर्निचर उद्योगाची वाढ व विकास हा होतच रहाणार.

नॅशनल जिओग्राफिक मासिकातील एका अभ्यासाप्रमाणे ‘बोर्निओ’ या बेटावरचे निम्मे जंगल आतापर्यंत नष्ट झाले आहे आणि लाकडी ओंडक्यांचे उत्पादन करणारी ‘लो लॅन्ड’ जंगले 2010 पर्यंत नष्ट होतील. ब्राझिल, कंबोडिया, कॅमरून, कॉंगोब्राझव्हील, विषुववृत्तीय गिनी, गॅबन, इंडोनेशिया, ब्रम्हदेश, पापुआ न्यू गिनी आणि सॉलोमन बेटे या देशातील जंगलांची हीच अवस्था होण्यासाठी आडकाठी कसली आहे? असा प्रश्न जर कोणी विचारला? तर कोणतीच नाही हेच उत्तर असू शकते. पण हे केंव्हा घडेल? असे जर मला कोणी विचारले तर उत्तर देणे खरोखरच कठीण आहे कारण मला असे प्रामाणिकपणे वाटते की जर जंगलांचा विध्वंस याच गतीने होत राहिला तर ही गोष्ट आपल्याला वाटते आहे त्यापेक्षाही लवकर होईल.

कदाचित आपल्या सर्वांच्या आयुष्यकालात सुद्धा !

18 जानेवारी 2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “फर्निचर उद्योग आणि वर्षाअरण्ये

  1. kharay tumcha mhanan…ithe americet tar lok der month la kahi na kahi furniture baher takun detat…ani parat dusar navin gheun yetat. karan hya lokana 200-300$ mahanje kahich watat nahi.

    Posted by Leena | जानेवारी 18, 2010, 3:52 pm
  2. मराठी ब्लॉगर्सचा पहिलावहिला ब्लॉगकॅम्प सिंहगड रोडवरील पु. ल. देशपांडे उद्यानात मोठ्या उत्साहात झाला, १६ जानेवारी १० ला त्याबद्दल सर्व मराठी ब्लॉगेर्सचे अभिनंदन 🙂 महेश

    Posted by Mahesh | जानेवारी 19, 2010, 11:05 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: