.
अनुभव Experiences

मुलांना सर्वात जास्त आवडणारे बक्षिस


गेले काही दिवस वर्तमानपत्रांतून सतत लहान मुलांच्या आत्महत्येच्या बातम्या येत आहेत. मनाला अतिशय क्लेशदायक अशा या बातम्यांमागे मुख्य सूत्र आहे ते या मुलांच्या मनावर आलेल्या अभ्यासाच्या दडपणाचे. ज्या वयात मनसोक्त खेळायचे आणि मजा करायची त्या वयात ही मुले अभ्यासाच्या, परिक्षेतील यशअपयशाच्या, तणावाखाली अक्षरश: दबून,चिरडून गेलेली आहेत.

तसे बघायला गेले तर आता परिक्षा पद्धती कितीतरी सुलभ झालेली आहे. चौथी, पाचवी पर्यंत तर अनेक शाळांच्यात परिक्षाच नसतात. पूर्वीपेक्षा अभ्यासक्रमही सर्वसाधारण मुलांना समजेल उमजेल असेच बनवले जात आहेत. तसेच शिक्षण झाल्यावर पुढे व्यवसायाची इतकी अनेक क्षेत्रे उपलब्ध होत आहेत की एखाद्या परिक्षेतील अपयशावर तुमचे पुढचे संपूर्ण व्यावसायिक आयुष्य अवलंबून असण्याचे दिवस केंव्हाच मागे पडले आहेत. आता हे मात्र खरे की प्रत्येक क्षेत्रात प्रचंड व जीवघेण्या स्पर्धेला प्रत्येकालाच तोंड द्यायला लागते आहे. पण आयुष्यात यश मिळवायचे असले तर या गोष्टींना सामोरे जायलाच लागते. त्यापासून लांब पळून जाऊन कसे चालेल? पन्नास वर्षांपूर्वी मी माझी विद्यार्थीदशा आठवतो तेंव्हाचे चित्र काही फारसे निराळे नव्हते. आम्हालाही अशाच प्रकारच्या स्पर्धेला तोंड द्यायला लागले होते. किंवा वीस वर्षांपूर्वी माझी मुले जेंव्हा आपल्याला हवे ते शिक्षण किंवा व्यवसाय निवडण्यासाठी धडपडत होती तेंव्हाचेही चित्र काही फारसे निराळे नव्हते. स्वत: एक धडपडणारा तरूण म्हणून किंवा स्वत:च्या मुलांची धडपड पहाणारा पालक म्हणून, प्रत्येकाच्या आयुष्यात येणारी ही फेज मी चांगलीच अनुभवली आहे.

मग मनाला असा प्रश्न पडतो की आताच असे काय घडले आहे की ज्या योगे हे तरूण किंवा लहान मुले आत्महत्या करायला प्रवृत्त होत आहेत? आताच्या काळात एक लक्षणीय फरक मात्र माझ्या मनाला नक्कीच जाणवतो आहे. तो फरकच या मुलांना आत्महत्येकडे घेऊन जातो आहे का? मला जाणवणारा हा मुख्य फरक म्हणजे लहान मुलांना घरातून मिळणार्‍या पाठिंब्याचा (Support Systems) आता असलेला संपूर्ण अभाव. मला काय म्हणायचे आहे ते सांगायला थोड्या जास्त खुलाशाची गरज आहे.

अलीकडे बहुतेक घरांच्यात, आई आणि वडील दोघेही कामावर जातात. आर्थिक गरज आणि जास्त चांगली जीवनशैली जगण्याची धडपड या दोन्ही कारणांमुळे हे आवश्यक बनले आहे. घरात येणार्‍या दुहेरी उत्पन्नामुळे घरात सर्व आधुनिक सुखसोयी येतात हे जरी खरे असले तरी त्या घरातील मूल किंवा मुले यांना आधारासाठी कोणीच रहात नाही. संध्याकाळी आईवडील अतिशय दमून थकून घरी येतात. संध्याकाळी घरगुती कामे करावीच लागतात व या नंतर मुलांच्या (त्यांच्या दृष्टीने फालतू) अडचणी व व्यथा सोडवायला त्यांना वेळही नसतो व उत्साहही नसतो. पाठिंबा दुरावलेली मुले एकांडी बनत जातात.

अगदी दहा पंधरा वर्षांपूर्वी सुद्धा घरात आजीआजोबा, किमान पक्षी आजी किंवा आजोबा हे असतच. आईवडील जरी कामावर गेलेले असले तरी आजीआजोबांचा संपूर्ण किंवा कदाचित थोडा जास्तच पाठिंबा मुलांना मिळत असे. एखादे अपयश किंवा अडचण ही संपूर्ण आयुष्याचा विचार करता किती क्षुद्र आहे हे आजीआजोबा मुलांना छान पटवून देऊ शकत. एखाद्या अपयशाने नाउमेद होण्यासारखे काही नाही हे मुलांच्या मनावर ठसत असे. आता बहुतेक आधुनिक घरांत चौकोनी किंवा आता तर त्रिकोणी कुटुंबे दिसतात. त्यात आजी आजोबांना स्थानच नसते. आजीआजोबांच्याबरोबर, नातवंडांना ते देत असलेला पाठिंबाही घरातून जातो.

आईवडीलांनी घरात आणलेल्या पैशांमुळे घरात आर्थिक सुबत्ता येते हे खरेच आहे. या पैशामुळे ते मुलांना सर्वात उत्कृष्ट दर्जाचा सुखसोयी, खेळणी देऊ शकतात. त्यांना हवे तेथे ते पाठवू शकतात. आपल्या आर्थिक सुबत्तेच्या असलेल्या या खुणा आपण मुलांना दिल्या की आपण त्यांच्याबद्दलचे आपले प्रेम व आस्था व्यक्त केली आहे असे पालकांना वाटते व ते एका पातळीपर्यंत खरेही असते. परंतु मुलांना या पुढेही काहीतरी आधिक पालकांच्याकडून हवे असते. ते म्हणजे आईवडीलांचे प्रेम आणि हे प्रेम मुलांना फक्त आईवडीलांच्या सहवासातूनच मिळू शकते. त्यांनी कितीही खेळणी सुखसोयी आणल्या तरी त्यातून नाही.

बहुतेक आईवडीलांना असे वाटते की आपली मुले यामुळे जास्त स्वतंत्र बनतील व जगातील टक्केटोणपे खायला जास्त योग्य बनतील. परंतु सत्य काही निराळेच असते. आईवडील मिळेनासे झाले की मुले आधार बाहेर शोधू लागतात. तो योग्य मिळाला तर गाडे ठीक चालते. नाहीतर मात्र सर्व बिनसत जाते. मुले बिघडत गेली किंवा नैराश्येच्या गर्तेत गेली की मग आईवडील जागे होतात पण तेंव्हा फार उशीर झालेला असतो.

या परिस्थितीवर उपाय तरी काय? सध्याच्या महागाईच्या आणि वाढलेल्या अपेक्षांच्या काळात आई घरी तर बसू शकत नाही. तिच्या स्वत:च्या आपल्या करियर बद्दल अपेक्षा असतात. तिलाही आयुष्यात काहीतरी करायचे असते. त्यामुळे या परिस्थितीत मार्ग एकच आहे. आईवडीलांनी आपला जास्तीत जास्त रिकामा वेळ मुलांसमवेत घालवणे. तुमचे मित्र मैत्रिणी, सोशल कार्यक्रम, करमणूक व टी.व्ही, सगळे काही थोड्या वर्षांसाठी पुढे ढकलले तरी काहीच बिघडत नाही. आईवडील जितका क्वालिटी टाईम मुलांना देऊ शकतील तेवढा त्यांना तो आवश्यकच आहे. मुलांना परत घरात पाठिंबा मिळू लागला की बाहेरच्या जगातली जीवघेणी स्पर्धा, आयुष्यातली किरकोळ अपयशे, सर्व काही ती समर्थपणे पेलू शकतात.

एकदा मुले मोठी झाली, स्वतंत्र झाली की होतातच आईवडील मोकळे! त्यांच्या रुचीप्रमाणे त्यांचे स्वत:चे आयुष्य घालवायला.

11 जानेवारी2010

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “मुलांना सर्वात जास्त आवडणारे बक्षिस

 1. > आई-वडील मिळेनासे झाले की मुले आधार बाहेर शोधू लागतात. या परिस्थितीत मार्ग एकच आहे. आई-वडीलांनी आपला जास्तीत जास्त रिकामा वेळ मुलांसमवेत घालवणे.
  >—-

  1901-1925 पासून १९७६-२००० मधे जन्म झालेले असे चार भाग केलेत, तर १९५० पर्यंत जन्म झालेले आपल्या वडिलांशी बोलतच नसत. आई बरेचदा निरक्षर, तेव्हा ती शिकलेल्या मुलांशी काय बोलून बोलणार?

  १९५१-१९७५ पिढीही घरच्यांपासून दूर पळण्यातच उत्सुक असे, हे तिचा एक भाग म्हणून मी सांगू शकतो. उलट माझ्यानंतरची पिढी (१९७६-२०००) चक्क घरच्यांशी क्रिकेटबद्दल बोलते, एकत्र चित्रपट, टी व्ही मालिका हे प्रकार चालतात. आधीच्या बापांनी मुलांबरोबर हे उद्‌योग केले नसते, आणि मुलांनीही असली संधी निर्माण झाल्यास नकार दिला असता. त्या मानानी मुली आयांशी खुसुखुसू करतात, पण मुलं त्यात नाहीच. माझ्या आज़ोबांना तर क्रिकेटवाल्यांची नावंही माहीत नसावीत; सिनेमा पाहण्याचा प्रश्नच नव्हता. आणि हे दोन विषय मुलांच्या आवडीचे.

  आधीही दारुडे बाप होते, आणि ते आज़च्या तुलनेत जास्त प्रमाणात बायकोला मारहाण करत. अस्पृश्यता होती, आणि त्यामुळे मानहानीसुद्‌धा. तरीही आत्महत्या होत नसत.

  आता दोन पिढ्या एकमेकांशी बोलू लागल्या आहेतच, तर त्यांनी काही सुसंस्कृत गोष्टी एकत्र कराव्यात, सिनेमे पाहण्यात वेळ घालवू नये. पण यातलं कुठलंच आत्महत्येचं कारण वाटत नाही. दहावीच्या परिक्षेत ४० ते ६० टक्के मुलं नापास होत. त्यांच्या घरी त्यांचे पालक त्यांना ‘समज़ून घेणे’ प्रकारात बसणारं काही न करता रागावत असतीलच. बाहेर जगात नाचक्की होई, ते वेगळंच. आज़ ज्यांच्याकडे चार चाकी आहे, ते बरेच लोक तेव्हा कर्ज़ात असत, आणि मुलांनाही प्रत्येकाला वेगळी सायकल मिळेलच याची खात्री नव्हती.

  ‘आज़काल आधीपेक्षा जास्त आत्महत्या होतात’ हे विधान मी १९३७ कडे वारलेल्या चेस्टरटनच्या लेखातही वाचलं आहे. तेव्हा ही तक्रारही ज़ुनी आहे. त्यामागचं कारण मात्र कोणालाच कळलेलं नाही, असं मला वाटतं.

  – नानिवडेकर

  Posted by Anonymous | जानेवारी 11, 2010, 6:28 pm
 2. पालकांची यांत्रिकपणे विचार करण्याची पद्धत मुलानी कानामात्रेचा फरक न करता उचलली आहे एवढाच या आत्महत्यांचा अर्थ आहे.

  Posted by मनोहर | जानेवारी 12, 2010, 1:29 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: