.
History इतिहास

लेफ्टनंट विन्स्टन चर्चिलचे कर्ज


..1896 मधे ब्रिटिश सेनेमधला एक तरुण लेफ्टनंट, त्याच्या नवीन पोस्टिंगवर, हिंदुस्थानातील एका ब्रिटिश सैन्याच्या छावणीत येऊन दाखल झाला होता.ही छावणी होती दक्षिण हिंदुस्थानातील एका गावात, बेंगळुरूमध्ये. खरे तर या घटनेची नोंद इतिहासाने घ्यावी असे यात काहीच नव्हते. असे हजारो ब्रिटिश अधिकारी हिंदुस्थानातल्या आपल्या पोस्टिंगच्या गावी येत असत व तिथून दुसरीकडे जात असत. परंतु हा ब्रिटिश सेनाधिकारी जेंव्हा पुढे ब्रिटनचा पंतप्रधान बनला व त्याने दुसर्‍या महायुद्धात आपल्या देशाला विजयश्री प्राप्त करून दिली तेंव्हा ही घटना साहजिकच इतिहासाचा एक भाग बनली. हा तरुण सेनाधिकारी होता सर विन्स्टन चर्चिल.

दक्षिण हिंदुस्थानातल्या म्हैसूर राज्यात अठराव्या शतकाच्या अखेरीस टिपू सुलतानाच्या बरोबर झालेल्या युद्धांसाठी बरेच मोठे इंग्रज सैन्य जमा झाले होते. 1799 मधे टिपू सुलतानाचे राज्य हिसकवून घेण्यात ब्रिटिश यशस्वी झाले व त्या नंतर हा एवढा मोठा फौजफाटा कायम स्वरूपात ठेवण्यासाठी 1906 मधे ब्रिटिशांनी बंगळुरू छावणीची स्थापना केली. ही छावणी बरीच मोठी म्हणजे 13 चौरस मैल एवढी होती व त्यात तोफखान्याच्या तीन तुकड्यांशिवाय, घोडदळ, पायदळ व इंजिनीअर्सच्याही तुकड्या होत्या.

ब्रिटिश लोकांच्या जीवनपद्धतीत, एक खास जागा त्यांच्या क्लब्सना आहे. जगाच्या पाठीवर जिथे जिथे ब्रिटिश गेले तिथे तिथे त्यांनी आपले क्लब्स स्थापन केले. सुशिक्षित भारतीयांमधे ही क्लब्सची कल्पना चांगलीच रुचली व ब्रिटिश जरी हिंदुस्थान सोडून गेले तरी त्यांची क्लब संस्कृती भारतात रुजली व आता तर चांगलीच फोफावताना दिसते आहे. बंगळुरू छावणीतल्या ब्रिटिश सेनाधिकार्‍यांनी 1868 मधे असाच एक क्लब स्थापन केला व त्या क्लबला बंगलोर क्लबअसे नाव दिले. हा क्लब आजही भारतातला एक अग्रगण्य व उच्चभ्रू लोकांचा क्लब म्हणून मानला जातो व या क्लबने एकोणिसाव्या व विसाव्या शतकातील आपला दिमाख व भव्यता अजूनही राखली आहे. आजही या क्लबचे सभासदत्व मिळणे हे बंगळुरूमधल्या लोकांसाठी एक मानबिंदू राहिला आहे. दुसर्‍या गावाहून जाणारे लोकही या क्लबमधे आपल्याला रहाता येईल का? याच्या प्रयत्नात असतात.


बंगळुरू छावणीत दाखल झाल्यावर लेफ्टनंट चर्चिल साहजिकच बेंगलोर क्लब मधे जाऊ लागला. त्याला बंगलोरमधले एकंदर वातावरण अजिबात पसंत पडले नाही. स्वत:च्या आत्मचरित्रात चर्चिल, बेंगलोरचे वर्णन एक डल व स्लीपी गाव म्हणून करतो. बेंगलोरमधला वेळ चर्चिलने वाचन करण्यात आणि फुलपाखरे पकडण्यात घालवला असे तो म्हणतो. त्याच्याच शब्दात सांगायचे तर बेंगलोर छावणी त्याला “third rate watering place” with “lots of routine work” to do and “without society or good sport”.वाटत होती. बोअर झालेल्या या तरूण अधिकार्‍याने, आपल्या अनेक संध्याकाळी बेंगलोर क्लबमधे घालवल्या असल्या तर त्यात काही आश्चर्य वाटण्यासारखे नाही. बेंगलोर क्लब त्या वेळेस व्हिस्कीचा मोठा पेग 7 आण्यांना व छोटा पेग चार आण्यांना विकत असे ( 1रुपयाचे 16 आणे मिळत). तीन वर्षांनंतर लेफ्टनंट चर्चिलची बदली अफगाणिस्तानच्या सरहद्दीवर झाली. बदली झाल्यावर जाण्याच्या गडबडीत लेफ्टनंट चर्चिल बेंगलोर क्लब मधली आपली उधारी चुकती करायला बहुदा विसरला. क्लबची हिशोब पुस्तके त्याच्याकडॆ 13 रुपये उधारी दाखवत राहिली.


ही उधारी, क्लबने हिशोबातून नंतर काढून टाकली असली तरी चर्चिलच्या देहावसानानंतर हिशोब पुस्तकातील या उल्लेखाला, एक ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. बेंगलोर क्लबने हे लेजरचे पान फ्रेम करून भिंतीवर लावले आहे. अनेक ब्रिटिश नागरिकांनी नंतर हे कर्ज चुकविण्याची तयारी दर्शविली. परंतु बेंगलोर क्लबने हे पैसे घेणे नाकारले. त्यांच्या मते या उधारीला जे ऐतिहासिक महत्व आहे ते पैसे वसूल करण्याला नाही.


नाहीतरी हे ही खरेच. की दुसर्‍या देशामधे पैसे बुडवून गेलेला असा पंत प्रधान परत कोठून मिळणार?

30 डिसेंबर 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “लेफ्टनंट विन्स्टन चर्चिलचे कर्ज

  1. नाहीतरी ते इथे व्यापाराच्या मिषेने लुटायलाच तर आलेले होते

    Posted by sureshpethe | डिसेंबर 30, 2009, 6:26 pm
  2. aaj britain cha prime minister bharata kade madata magat ahe!!

    Posted by chetan shivankar | ऑगस्ट 21, 2010, 11:38 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: